संत कबीरदास माहिती Sant Kabir Information In Marathi

sant kabir information in marathi भारतीय भूमीमध्ये जन्म घेतलेल्या श्रेष्ठ संत यांपैकी एक म्हणजे संत कबीर. हिंदी भाषेतील प्रसिद्ध कवी, समाजसुधारक, उत्तर भारतातील एक सुप्रसिद्ध संत म्हणून ओळखले जाणारे संत कबीरदास. महान संत कबीर म्हणजे काळाच्या पुढे असलेले, पुरोगामी विचारांचे संत कवी.(sant kabir in marathi)

संत ज्ञानेश्वरांची माहिती 

sant-kabir-information-in-marathi
sant kabir information in marathi/sant kabir in marathi

संत कबीर जीवन परिचय (Sant Kabir Information In Marathi)

नाव संत कबीरदास
जन्म ई.स. 1149/1398 
गाव लहरतारा ताल, काशी
आईनीमा
वडीलनीरू
पत्नीलोई
मुलेकमाल,कमाली
मृत्यू1518,मगहर, उत्तर प्रदेश

संत कबीर यांचा जन्म केव्हा व कुठे झाला याविषयी अनेक मतभेद आहेत. संत कबीर यांचा जन्म ई.स. ११४९ साली झाला असे काहीजण मानतात तर, कुणी १३९8 मध्ये कबिरांचा जन्म झाला असे सांगतात.

ज्येष्ठ पौर्णिमेस काशीमधील लहरतारा नावाच्या सरोवरात एक प्रखर तेजस्वी प्रकाशामध्ये कबीर एका कमळाच्या फुलावर प्रकट झाले. हा सर्व प्रसंग तेथे असलेल्या अष्टानंदऋषींनी पाहिला होता. कर्मधर्म संयोगाने काशितले एक मुस्लीम जोडपे नीरु व नीमा हे तेथून जात असताना निमा पाणी पिण्यासाठी सरोवराकडे गेली. तेव्हा तिची नजर त्या तेजस्वी बालकावर पडली, आणि ते जोडपे त्या बालकाला आपल्या सोबत घेऊन गेले. त्या मुलाचे नाव ठेवण्यासाठी निरुने मौलवीना बोलावले, तेव्हा ज्या ज्या वेळेस कुराण शरीफ उघडू पाहिले त्या त्या वेळेस कुराण शरीफ मध्ये सर्वत्र फक्त कबीर कबीर नावच वाचण्यास मिळाले. कबीरचा अर्थ होतो सर्वज्ञ /सबसे बडा. पण हे नाव ठेवण्याची मौलवीची मुळीच इच्छा नव्हती. आणि पुढे ते बालक महान कवी व संत कबीर नावाने प्रसिद्ध झाले. खेमराज श्रीकृष्णदास यांनी प्रकाशित केलेल्या हस्तलिखित “कबीर दास” ग्रंथामध्ये सांगितला आहे. (sant kabir information in marathi)

काही इतिहासकारांच्या मते स्वामी रामानंद हे संत कबिरांचे गुरु होते. कबीर जरी मुस्लीम कुटुंबात रहात असले तरी ते आदिरामाचे उपासक होते. संत कबीर यांनी विवाह केला नव्हता. कमाल नावाचा मुलगा आणि कमाली नावाची मुलगी ही त्यांची मानलेली मुले होती. कबीर हे काशीत विणकर म्हणून काम करत होते. काम करत असताना कबीर देवाची भक्ती करत असत. भजन, दोहे गात असत. देवावर त्यांची गाढ श्रद्धा होती.

संत जनाबाई माहिती 

भारतात जन्मलेल्या संत कबिरांचा धर्म काय होता, याबद्दल काहीही माहिती उपलब्ध नाही. संत कबीर यांच्या दोह्यानुसार “जीवन जगण्याची योग्य पध्दत हाच त्यांचा धर्म आहे”. कबीर हे सर्व धर्मांच्या कुंपणापलीकडे असलेल्या परब्रम्ह्स्वरूप परमेश्वराला जाणत होते. ते मानवजातीचे, मानवतेचे पुजारी होते. कोणत्याही प्रकारचा धर्मभेद, पंथभेद, जातिभेद, याच्या पलीकडे कबीर पोहोचले होते. या भारतातील समाज एकमताने चालावा, एकजुटीने वागावा म्हणून ज्या महापुरुषांनी आटोकाट प्रयत्न केले, सर्व सुखी असावेत अशा विचाराने जे आमरण झटले त्यापैकी एक म्हणजे संत कबीर.

संत कबीर यांचे कार्य (Social Work of sant kabir in marathi)

संत कबीरांना हिदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतिक समजले जाते. मुस्लीम व हिंदूना राम व रहीम ऐक्याची भावना प्रकट केली व समाजाला समजेल अशा शब्दात उपदेश करत ते भारतभर फिरले. संत कबीर यांनी राम, कृष्ण, विठ्ठल अशा अनेक हिंदू दैवतांवरील केलेली पदे अनेक भाषांमध्ये उपलब्ध आहेत.ते नाथ परंपरा, सुफी परंपरा इत्यादी मिश्रित अध्यात्मिक स्वभावाचे संत होते. त्यांनी उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात भक्ती आंदोलने चालवले.

कबीरांनी लोकांचे डोळे उघडून त्यांना मानवता, नैतिकता आणि अध्यात्मिकता चा धडा शिकवला. ते अहिंसेचे अनुयायी व प्रचारक होते. त्यांच्या एका दोह्यात त्यांनी म्हंटले आहे कि,

“सहज मिले ओ पाणी है भाई, मागनेसे मिले ओ दुध है, खीच के लो तो खून है”

अशा परखड शब्दात आपला उपदेश त्यांनी जनतेला दिला. संत कबीर यांनी तत्कालीन रूढींवर प्रहार केले. निर्भीडता हे त्यांच्या ओव्यांचे मुख्य वैशिष्ठ्य. तत्कालीन समाजाचे अवगुण त्यांनी अत्यंत परखडपणे दाखवले. धार्मिक थोतांडावर कडक आसूड ओढणारे आणि हजारो ग्रंथांचे पांडित्य खुजे करणाऱ्या प्रेमाच्या अडीच अक्षराचा मंत्र आपल्या दोह्यामधून सांगणारे पुरोगामी संत म्हणजे कबीर.

संत एकनाथ महाराजांविषयी माहिती

संत कबिरांचे विचार

हिंदू कहें मोहि राम पियारा,तर्क कहें रह्माना,

आपस में दोउ लड़ी-लड़ी मरे, मरम न जाना कोई |

कबीरदास म्हणतात कि हिंदुना राम प्रिय आहे आणि मुस्लिमांना रहमान प्रिय आहे. या गोष्टीवर ते आपापसात भांडतात पण ते सत्य का नाही जाणत.

“पोथी पढि पढि जग मुआ, पंडित भया ण कोय,
ढाई आखर प्रेम का, पढे सो पंडित होय |”

पोथी पुराण वाचून सगळेच काही विद्वान, ज्ञानी झाले नाहीत पण जर प्रेमाचे फक्त अडीच शब्द समजून घेतले म्हणजे प्रेमाचा खरा अर्थ समजून घेतला तर तुम्ही नक्कीच ज्ञानी व्हाल.त्यांचे दोहे आजही समाजाला सन्मार्गावर चालण्याची प्रेरणा देतात.

जाति ण पुछो साधु की, पुछ लीजिये ज्ञान,

मोल करो तरवार का, पडा रहन दो म्यान |

यामध्ये त्यांनी असा सांगितला आहे कि ज्ञानी माणसाच्या जातीपेक्षा त्याच ज्ञान महत्वाच आहे. यावेळी उपमा देताना ते म्हणतात कि तलवारीची किंमत करा त्याच्या म्यानाची नाही.

निंदक नियरे राखिए, औगन कुटी छवाय,

बिन पानी, साबुन बिना, निर्मल करे सुभाय |

कबीर म्हणतात निंदक किंवा आपल्या बद्दल वाईट बोलणाऱ्या व्यक्तीला आपल्या जेवढ जवळ ठेवता येईल तेवढ ठेवायला हवं कारण असा माणूस आपले दोष दाखवून, बिना साबण पाण्यानेच आपल्याला स्वच्छ करत असतो. कबिरांचे एक वैशिष्ठ्य म्हणजे ते आपल्या निंदकांना स्वतःचा हितचिंतक मानायचे.    

दुर्लभ मानुष जन्म है, देह न बारम्बार,

तरुवर ज्यो पत्ता झड़े, बहुरि ण लागे डार |

मनुष्य जन्म फार दुर्लभ असल्याचं कबीर या दोह्यात म्हणतात. मानव शरीर वारंवार मिळत नाही जसं झाडावरून गळालेलं पान पुन्हा झाडाला जोडता येत नाही. 

कबीरा खडा बाज़ार में, मांगे सबकी खैर,

ना काहू से दोस्ती, ण काहू से बैर |

कबीर म्हणतात कि जगात सर्वांच भलं होवो. कोणाशी दोस्ती झाली नाही तरी चालेल पण दुष्मनी होऊ नये.    

संत कबीर दोहे मराठी

लवकरच आम्ही संत कबीर यांचे दोहे येथे प्रस्तुत करणार आहोत वाचण्यासाठी आवश्य भेट देत रहा.

संत मीराबाई विषयी माहिती

संत कबीर यांचा मृत्यू

संत कबीर आयुष्यभर काशीमध्येच राहिले पण मगहर येथून सशरीर हा मृत्युलोक सोडून निजधामाला गेले. असे त्यांनी स्वतःच त्यांच्या दोह्यामध्ये सांगितले आहे.

“सकल जनम शिवपुरी गंवाया |

मरती बार मगहर उठी आय |”

त्यांचा मृत्यू ई.स. १५१८ साली झाला असे मानले जाते. हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ पौर्णिमेला कबीर जयंती असते.

आम्ही दिलेल्या माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

 

मित्रानो तुमच्याकडे जर  संत कबीरदास यांच्याबद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या sant kabir information in Marathi wikipedia या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information about sant kabir in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका. तसेच आपण  या लेखाचा वापर  sant kabir in marathi essay language असा देखील करू शकता. धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट  द्या  :इनमराठी.नेट

1 thought on “संत कबीरदास माहिती Sant Kabir Information In Marathi”

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!