सर्जेकोट किल्ला माहिती Sarjekot Fort Information in Marathi

sarjekot fort information in marathi सर्जेकोट किल्ला माहिती, सिंधूदुर्गचा सोबती किंवा संरक्षक म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी तीन किल्ले बांधलेले होते आणि त्यामधील एक किल्ला म्हणजे सर्जेकोट किल्ला. सर्जेकोट हा किल्ला महाराष्ट्र राज्यात्तील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण या शहराजवळ अरबी समुद्रामध्ये हा किल्ला वसलेला आहे आणि हा एक जुना लष्करी किल्ला म्हणून ओळखला जातो. सर्जेकोट हा किल्ला सर्जेकोट या गावाजवळ तळाशील नदी आणि अरबी समुद्राच्या संगमावर वसलेला आहे आणि ज्या ठिकाणी नदीचा आणि समुद्राचा संगम होतो त्याला खाडी म्हटले जाते आणि हा किल्ला कोळंब खाडीवर वसलेला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ल्याचे संरक्षण करण्यासाठी १६६८ मध्ये सिंधुदुर्ग किल्ल्याच्या काही अंतरवर  तीन किल्ले बांधले होते ते म्हणजे सर्जेकोट, पद्मदुर्ग आणि राजकोट हे किल्ले बांधले होते. सर्जेकोट या किल्ल्यामध्ये आपल्याला तटबंदी, मुख्य प्रवेशद्वार, टेहळणीसाठी बुरुज, जुन्या राजवाड्याचे अवशेष, पाण्याच्या विहिरी या सारखे बांधकाम पाहायला मिळते.

सर्जेकोट या किल्ल्याचा वापर तर सिधुदुर्ग किल्ल्याचे संरक्षण करण्यासाठी तर केलाच जायचा पण जर पावसाळ्याच्या दिवसामध्ये जर वादळ होत असेल तर त्यावेळी जहाजांच्या मुक्कामासाठी या किल्ल्याचा वापर केला जात होता. अरबी समुद्रामध्ये सर्जेकोट आणि कुलाबा हे दोन किल्ले जोडकिल्ले म्हणून उभे आहेत आणि म्हणून हा किल्ला मिश्रदुर्ग किल्ला म्हणून ओळखले जाते. जरी हा किल्ला जलदुर्ग जरी असला तरी अहोतीच्या वेळी या किल्ल्याची जमीन हि रिकामी होते.

sarjekot fort information in marathi
sarjekot fort information in marathi

सर्जेकोट किल्ला माहिती – Sarjekot Fort Information in Marathi

किल्ल्याचे नावसर्जेकोट किल्ला
प्रकारजलदुर्ग
स्थापना१६६८
संस्थापकछत्रपती शिवाजी महाराज
ठिकाणसर्जेकोट हा किल्ला महाराष्ट्र राज्यात्तील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण या शहराजवळ अरबी समुद्रामध्ये हा किल्ला वसलेला आहे

सर्जेकोट किल्ल्याचा इतिहास – Sarjekot Fort history in Marathi

छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ल्याचे संरक्षण करण्यासाठी १६६८ मध्ये या किल्ल्याच्या काही अंतरावर तीन किल्ले बांधले होते ते म्हणजे पद्मदुर्ग, सर्जेकोट किल्ला आणि राजकोट किल्ला. सर्जेकोट हा किल्ला मालवण शहराजवळ असणाऱ्या खाडीवर बांधला होता आणि ह्या किल्ल्याचा उपयोग हा पूर्वी पावसाळ्यामध्ये जर समुद्रामध्ये वादळ झाले तर जहाजांचा मुक्काम करण्यासाठी केला जात होता.

सर्जेकोट किल्ल्यावरील पाहण्यासारखी ठिकाणे

सर्जेकोट हा एक छोटासा किल्ला आहे जो तळाशील नदीच्या आणि अरबी समुद्राच्या संगमावर बांधला आहे आणि ह्या किल्ल्याला भक्कम अश्या तटबंदीचा घेर आहे आणि या तटबंदीला लागून बुरुज आहेत आणि या बुरुजांचा वापर हा पूर्वीच्या काळामध्ये टेहाळणी बुरुज म्हणून केला जात असावा आणि किल्ल्याच्या आतल्या बाजूला तटबंदीवर चढण्यासाठी पायऱ्या देखील आहेत आणि या किल्ल्याला छोटस प्रवेशद्वार देखील आहे.

तसेच आपल्याला या किल्ल्याच्या आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला पडलेल्या इमारतीचे काही अवशेष पाहायला मिळतात तसेच त्या ठिकाणी जिने तुळशी वृंदावन देखील आहे आणि त्या ठिकाणी एक विहीर देखील आहे ज्यामधील पाणी हे पूर्वीच्या काळी पिण्यासाठी वापरले जात असावे तसेच या किल्ल्यामध्ये वेताळ मंदिर देखील होते असे म्हटले जाते.

सर्जेकोट किल्ल्याची सध्याची स्थिती

किल्ल्याच्याची सध्याची स्थिती हि खूप बिकट आहे म्हणजेच या किल्ल्याचा काही भाग हा पडत आहेत आणि या किल्ल्याच्या ऐतिहासिक भाग हे कोसळत आहे आणि या किल्ल्यावर मोठ्या प्रमाणात स्थानिक लोकांनी अतिक्रमण केले आहे म्हणजेचे ते किल्ल्याचा वापर करत आहेत आणि त्याच्या डाकडूजी कडे दुर्लक्ष केले जात आहे. सर्जेकोट या किल्ल्याची समुद्राकडील तटबंदीची भिंत आणि बुरुज आणि छोटेशे प्रवेश दार चांगल्या स्थितीत आहे नाही तर किल्ल्यामधील अनेक प्राचीन अवशेष उद्वस्त झालेले आहेत.

सर्जेकोट किल्ल्याविषयी महत्वाची माहिती – information about sarjekot fort in Marathi

  • सर्जेकोट ह्या किल्ल्याचे बांधकाम करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी आदेश दिला होता आणि त्यांच्या काळामध्ये ह्या किल्ल्याचे बांधकाम सुरु देखील होते नंतर छत्रपती संभाजी महाराजांनी या किल्ल्याचे बांधकाम पूर्ण केले असे म्हटले जाते.
  • छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ल्याचे संरक्षण करण्यासाठी १६६८ मध्ये या किल्ल्याच्या काही अंतरावर तीन किल्ले बांधले होते ते म्हणजे पद्मदुर्ग, सर्जेकोट किल्ला आणि राजकोट किल्ला.
  • सर्जेकोट हा किल्ला महाराष्ट्र राज्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण या शहराजवळील सर्जेकोट या गावाजवळील तळाशील नदी आणि अरबी समुद्राच्या संगमावर हा किल्ला वसलेला आहे आणि या संगमाला कोळंब खाडी म्हणून ओळखले जाते.
  • किल्ल्यामध्ये आपल्याला किल्ल्याची मजबूत तटबंदी, तटबंदीला असलेले बुरुज, विहीर, जुने तुळशीचे वृंदावन, जुन्या इमारतीचे अवशेष या सारखे काही बांधकाम पाहायला मिळते.
  • ह्या किल्ल्याचा उपयोग हा पूर्वी पावसाळ्यामध्ये जर समुद्रामध्ये वादळ झाले तर जहाजांचा मुक्काम करण्यासाठी केला जात होता.
  • सर्जेकोट हा किल्ला सिंधुदुर्ग किल्ल्याचा सोबती म्हणून बांधला गेला होता.
  • सर्जेकोट आणि कुलाबा हे दोन किल्ले जोडकिल्ले म्हणून उभे आहेत आणि म्हणून हा किल्ला मिश्रदुर्ग किल्ला म्हणून ओळखले जाते.

सर्जेकोट किल्ल्याचे स्थान

मालवण जेट्टीपासून रस्त्याने ३ किलो मीटर हा सिंधुदुर्ग किल्ल्याच्या उत्तर दिशेला हा किल्ला आहे आणि आचरा रोडवर सर्जेकोटला जाणारा छोटासा रस्ता देखील आहे.

सर्जेकोट किल्ल्यापर्यंत कसे पोहचायचे – How to reach 

सर्जेकोट किल्ल्याला भेट देण्यासाठी तुम्ही मुंबई किंवा पुणे या शहरातून बस पकडून अलिबागला जावू शकत आणि मग त्या ठिकाणाहून तुम्ही स्थानिक बसने, टॅक्सीने किंवा रिक्षाने सर्जेकोट गावापर्यंत जावू शकता आणि मग किल्ल्यापर्यंत तुम्ही पायवाटेने जाऊ शकता.

आम्ही दिलेल्या sarjekot fort information in marathi language माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर सर्जेकोट किल्ला माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या sarjekot fort information in marathi wikipedia या article मध्ये update करू, मित्रांनो हि information about sarjekot fort in Marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!