सावित्रीबाई फुले यांची माहिती Savitribai Phule Information In Marathi

नमस्कार मित्रमंडळी येथे आपण थोर समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांची माहिती savitribai phule information in marathi या विषयावर माहिती घेणार आहोत. या विषयाचा वापर करून आपण सावित्रीबाई फुले यांच्यावरती निबंध व भाषण (savitribai essay in marathi\savitribai speech in marathi)  लिहिण्याकरिता हि उपयोग होऊ शकतो.सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या शिक्षिका होत्या. तसेच त्या एक चांगल्या कवियित्री आणि थोर समाजसुधारक होत्या.

Savitribai-Phule-INFORMATION-IN-MARATHI
सावित्रीबाई फुले यांची माहिती

सावित्रीबाई फुलें विषयी संपूर्ण माहिती  Savitribai Phule Information in Marathi

चला आपण आज जाणून घेउयात सावित्रीबाई फुले (Savitribai phule) यांच्या जीवनातील माहिती. सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या शिक्षिका होत्या. तसेच त्या एक चांगल्या कवियित्री आणि थोर समाजसुधारक होत्या. कवयित्री म्हणून त्यांनी २ काव्य पुस्तके लिहिलीत. ती म्हणजेत काव्य फुले आणि बावनकशी सुबोधारत्नाकार. त्यांनी १९ व्या शतकामध्ये महिलांचे शिक्षण आणि सशक्तीकरण यामध्ये खूप महत्वपूर्ण भूमिका घेतली होती.

सावित्रीबाई फुले कार्य – Savitribai Phule Work in Marathi

महिलांच्या अधिकार आणि संघर्ष करणाऱ्या सावित्रीबाई फुले यांनी विधवांसाठी एका केंद्राची स्थापना केली आणि त्यांना पुनर्विवाहसाठी प्रोत्साहित केले. त्यांनी दलितांच्या अधिकारांसाठी खूप संघर्ष केला. त्यांनी कधीच हार मानली नाही आणि खूप संघर्ष केला व तसेच आपले धैर्य खचू दिले नाही.

मुलींची पहिली शाळा – First School for Girls in India

सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांनी मिळून सन १८४८ मध्ये ९ विद्यार्थ्याना घेऊन एका शाळेची सुरवात केली. महात्मा फुले हे त्यांचे फक्त पती नसून एक चांगले गुरु आणि संरक्षक पण होते. शिक्षणाच्या माहेर घर असलेल्या पुण्यामध्ये त्यांनी ही पहिली महिलांसाठी शाळा सुरु केली.

सावित्रीबाई फुले यांचा जन्म – Savitribai Phule Born\Jayanti

सावित्रीबाई फुले यांचा जन्म ३ जानेवारी, १८३१ ला नायगाव येथे झाला. सध्या ते गाव सातारा जिल्यामध्ये आहे. त्यांचा जन्म शेतकरी घरामध्ये झाला. त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील आणि आईचे नाव लक्ष्मी आहे. त्या कुटुंबातील सगळ्यात मोठी मुलगी होती. त्या काळामध्ये मुलीचे लवकर लग्न लाऊन दिले जात असे. त्यांचा मृत्यू १० मार्च १८९७ ला झाला.

सावित्रीबाईंचा विवाह – Savitribai Phule Marriage

सावित्रीबाई फुले यांचा विवाह सन १८४० मध्ये फक्त ९ वर्ष वयामध्ये १२ वर्षांच्या ज्योतीराव फुले यांच्यासोबत झाला. ज्योतिबा खूप हुशार व बुद्धिमान होते, त्यांनी मराठीमधून शिक्षण घेतले. ते महान क्रांतिकारी , समाजसेवक, लेखक, थोर विचारवंत होते. सावित्रीबाईचे सासरे गोविंदराव फुले हे मुळचे फुरसुंगीचे क्षीरसागर, परंतु पेशव्यांनी त्यांना पुण्यातील फुलबागेची जमीन बक्षीस दिली म्हणून ते पुण्याला येऊन राहिले व फुलांच्या व्यवसायावरून त्यांना फुले हे आडनाव मिळाले.

सावित्रीबाई फुले शिक्षण Savitribai Phule Education

सावित्रीबाईची शिक्षण त्यांच्या लग्नानंतर सुरु झाले. त्यांच्या पतीने म्हणजेच ज्योतीरावाणी त्यांना वाचायला आणि लिहायला शिकवले. ते एका साध्या शाळेमध्ये तिसरी आणि चौथीचे शिक्षण पास झाले. त्यानंतर त्यांनी अहमदनगर येथे मिस फरार इन्स्टीटूशन (ms farar ) मध्ये पुढचे शिक्षण घेतले.

त्या काळामध्ये शिक्षणाची अनुमती नसल्यामुळे सावित्रीबाईच्या शिक्षणाकरता ज्योतीरावांच्या कुटुंबाने खूप विरोध केला. तसेच ज्योतीबांच्या परिवाराने दोघांना घराबाहेर काढले पण ज्योतीबांनि सावित्रीबाईचे शिक्षण सुरूच ठेवले. आणि त्यांचा प्रवेश एका शाळेमध्ये करून घेतले. समाजाच्या विरोधामध्ये जाऊन त्यांनी त्यांचे शिक्षण पूर्ण केले.

या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मोठ्या प्रशंसक होत्या. “ शिक्षित व्हा, संघटीत व्हा आणि संघर्ष करा “ हा नारा डॉक्टर बाबासाहेबानी पिडीत आणि शोषित यांच्यासाठी दिला होता त्या नाऱ्याच्या पाश्वभूमी सावित्रीबाई फुलेनी आपल्या कवितांच्या माध्यमातून खूप आधीपासून तयार केल्या होत्या.

सावित्रीबाई फुले समाज कार्य- Savitribai Phule Social Work

सावित्रीबाई फुले (Savitribai phule) शाळेमध्ये जात होत्या त्यावेळी लोक दगडे मारत. त्यांचावर घाण फेकत. त्यावेळी सावित्रीबाई फुलेनी मुलींसाठी शाळा सुरु केल्या तर त्यावेळी मुलीना शिकवणे योग्य मानले जात न्हवते. सावित्रीबाई फुलेनी १९ व्या शतकामध्ये सतीची चाल, बाल विवाह, अस्पुर्षता याच्या विरोधामध्ये आपल्या पती बरोबर मिळून काम केले.

तसेच सावित्रीबाई फुलेनी आत्महत्या करायला चाललेल्या एका विधवा ब्राह्मण महिला काशीबाईची आपल्या घरामध्येच डिलिवरी करून त्यांच्या मुलाला म्हणजे यशवंतला दत्तक पुत्र म्हणून गोद घेतल. त्या दत्तक पुत्र यशवंतला त्यांनी पुढे जाऊन डॉक्टर बनवल. स्त्री भृण हत्या थांबवण्यासाठी आश्रमांची उभारणी केली.

सावित्रीबाई यांची  शाळा – Savitribai School

१ जानेवारी १८४८ पासून १५ मार्च १८५२ पर्यंत त्यांनी १८ मुलींसाठी शाळा सुरु केल्या. ज्योतीराव व सावित्रीबाई फुलेनी यामध्ये कोणाचीही आर्थिक मदत घेतली नाही. सावित्रीबाई फुलेनी मुस्लीम महिलांसाठी पुण्यामध्ये १८४९ ला उस्मान शेख यांच्या घरी त्या महिलांना शिक्षित करण्यासाठी शाळा चालू केल्या. सावित्रीबाई फुलेनी शिक्षणाचे महत्व लक्षात घेता १८८४ मध्ये पुण्यात आलेल्या हंटर कमिशन पुढे सर्व जाती धर्माच्या १२ वर्ष खालील मुला-मुलीना प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचे करण्याचा आग्रह केला.

सावित्रीबाई फुले अवार्ड्स – Savitribai Phule Awards

सावित्रीबाई फुलेनी महिलांच्या शिक्षण कार्य सतत चलू ठेवल ते योगदान पाहून ब्रिटीश शासनाने त्यांचा गौरव १६ नोव्हेंबर १८५२ मध्ये केला. महाराष्ट्र आणि भारत सरकारने त्यांच्या नाव अनेक पुरस्काराना दिले. आणि सावित्रीबाई फुलेच्या सन्मानार्थ एक डाक तिकीट पण काढले गेले. तसेच शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुणे युनिवर्सिटीला सुद्धा देखील त्यांचे नाव देण्यात आले “सावित्रीबाई फुले पुणे युनिवर्सिटी “ (SPPU)

सावित्रीबाई फुले कविता – Savitribai Phule Kavita\Poems

तयास मानव म्हणावे का?
ज्ञान नाही विद्या नाही
ते घेणेची गोडी नाही
बुद्धी असुनि चालत नाही
तयास मानव म्हणावे का?
दे रे हरी पलंगी काही
पशूही एेसे बोलत नाही
विचार ना आचार नाही
तयास मानव म्हणावे का?
पोरे घरात कमी नाहीत
तयांच्या खाण्यासाठीही
ना करी तो उद्योग काही
तयास मानव म्हणावे का?
सहानुभूती मिळत नाही
मदत न मिळे कोणाचीही
पर्वा न करी कशाचीही
तयास मानव म्हणावे का?
दुसऱ्यास मदत नाही
सेवा त्याग दया माया नाही
जयापाशी सदगुण नाही
तयास मानव म्हणावे का?
ज्योतिष रमल सामुद्रीकही
स्वर्ग नरकाच्या कल्पनाही
पशुत नाही त्या जो पाही
तयास मानव म्हणावे का?
बाईल काम करीत राही
एेतोबा हा खात राही
पशू पक्षात एेसे नाही
तयास मानव म्हणावे का?
पशु-पक्षी माकड माणुसही
जन्ममृत्यु सर्वा नाही
याचे ज्ञान जराही नाही
तयास मानव म्हणावे का?

सावित्रीबाई फुले यांची माहिती Savitribai phule information in Marathi
२८ नोव्हेंबर १८९० मध्ये ज्योतीरावांचे पक्षाघाताने निधन झाले. अत्यंयात्रेच्यावेळी जो टिटवे धरतो त्याला वारसा हक्क मिळत असल्याने ज्योतिरावाचे पुतणे आडवे आले आणि ज्योतिरावांचा दत्तक पुत्र यशवंतरावांना विरोध करू लागले. त्यावेळेस सावित्रीबाई धैर्याने पुढे आल्या व स्वत: टिटवे धरले. अंत्ययात्रेच्या अग्रभागी चालल्या आणि स्वत:च्या हाताने ज्योतिरावांच्या पार्थिवाला अग्नी दिला. यशवंतराव हा विधवेचा मुलगा असल्याने त्याला कुणीही मुलगी द्यायला तयार नव्हते. तेव्हा कार्यकर्ता ज्ञानोबा कृष्णाजी ससाणे यांच्या राधा नावाच्या मुलीशी ४ फेब्रुवारी १८८९ रोजी विवाह यशवंतचा करून दिला. हाच महाराष्ट्रातील पहिला आंतरजातीय विवाह होय.

“ विद्येविना मती गेली।
मतिविना नीती गेली।
नीतिविना गती गेली।
गतिविना वित्त गेले।
वित्ताविना शूद्र खचले।
इतके अनर्थ एका
अविद्येने केले।। ”

ज्योतीरावांनी त्यांच्या पत्नी सावित्रीबाईंना शिक्षण देऊन शिक्षणकार्यास प्रवृत्त केले. शाळेच्या मुख्याध्यापकपदी आरूढ झालेली भारतातील पहिली महिला म्हणजे सावित्रीबाई. त्याचप्रमाणे स्वतंत्रपणे फक्त स्त्रियांसाठी शाळा काढणारे महात्मा फुले पहिले भारतीय होत.
१८४८ साली पुण्यामध्ये बुधवार पेठेतील भिडे यांच्या वाड्यात पहिली मुलींची शाळा काढून तेथील शिक्षिकेची जबाबदारी सावित्रीबाईंवर सोपविली. महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची ही मुहूर्तमेढ ठरली. 

सावित्रीबाई यांचा मृत्यू – Savitribai Phule death

सावित्रीबाई फुले यांचे पती ज्योतीराव फुले यांचा मृत्यू सन १८९० मध्ये झाला. तेव्हा सावित्रीबाई फुलेनी त्यांच्या स्वप्नांना पूर्ण करण्याचा निश्चय केला. त्यानंतर सावित्रीबाई फुलेचा मृत्यू १० मार्च, १८९७ या वर्षी प्लेग रोगाच्या आजारी असलेल्या लोकांचा बघण्यात झाला. सावित्रीबाई फुलेनी स्वताची परवा न करता रुग्णाची सेवा करत राहिल्या. त्यांचे संपूर्ण जीवन समाजापासून वंचित प्रमुख म्हणजे महिला आणि दलितांच्या अधिकारांसाठी संघर्ष करण्यात गेला. त्यांची एक खूप प्रसिद्ध कविता आहे त्यामध्ये त्यांनी सगळ्यांना वाचायला आणि लिहायला प्रेरणा दिली.

आम्ही दिलेल्या माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर थोर समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या Savitribai Phule Information In Marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि Savitribai Phule Information In Marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!