sayajirao gaekwad information in marathi महाराजा सयाजीराव गायकवाड यांची माहिती, आज आपण या लेखामध्ये समाजसुधारक, ज्ञानोउपासक, ग्रंथकारांचे आश्रयदाते महाराज म्हणून ओळखणारे सयाजीराव गायकवाड यांच्याविषयी माहिती पाहणार आहोत. सयाजीराव गायकवाड यांचा जन्म हा महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यामधील कवणाने या गावामध्ये ११ मार्च १८६३ मध्ये झाला होता आणि त्यांचे जन्मानंतरचे नाव गोपाळराव काशिराव गायकवाड असे होते आणि नंतर ते सयाजीराव खंडेराव गायकवाड असे झाले.
महाराज सयाजीराव गायकवाड यांची महत्वपूर्ण ओळख म्हणजे ते १८७५ ते १९३९ या काळापर्यंत बडोदा या संस्थेचे अधिपती होते आणि यांना एक चांगले आणि आपल्या कर्तुत्वाची जाणीव असणारे संस्थानिक म्हणून त्यांची ओळख होते. सयाजीराव गायकवाड यांचा जन्म हा गरीब कुटुंबातील घरामध्ये झाला आणि त्याचे जन्माचे नाव गोपाळराव काशिराव गायकवाड असे होते आणि ज्यावेळी खंडेराव गायकवाड म्हणजेच जे बडोदा संस्थानाचे अधिपती होते.
त्यांच्या मृत्यूनंतर गोपाळराव हे बडोदा राजघराण्यामध्ये दत्तक गेले आणि त्यांचे नाव सयाजीराव खंडेराव गायकवाड असे ठेवण्यात आले. सयाजीराव गायकवाड हे संस्थानाचे अधिपती झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या बडोद्याच्या संस्थानामध्ये प्राथमिक शिक्षण हे सक्तीचे केले, तसेच गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यासाठी सुरुवात केली, संस्कृत भाषेमधील ग्रंथांचे प्रकाशन केले तसेच ग्रंथकरांचे आश्रयदाते म्हणून देखील काम केले.
तसेच त्या ठिकाणी असलेल्या ग्रामपंचायतीचे पुनरुज्जीवन केले तसेच अस्पृशांचे निवारण केले तसेच त्या ठिकाणच्या विद्यार्थ्यांच्यासाठी कला शिक्षणाची सोय देखील त्यांनी करून दिली आणि अश्या प्रकारे अनेक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी काम केले आणि समाजसुधारक, राजकारणी, ज्ञानोउपासक तसेच ग्रंथ लिहिणाऱ्यांचे आश्रयदाते म्हणून त्यांनी काम केले. चला तर खाली आपण सयाजीराव गायकवाड यांच्याविषयी सविस्तर माहिती घेवूया.
महाराजा सयाजीराव गायकवाड यांची माहिती – Sayajirao Gaekwad Information in Marathi
जन्मानंतरचे नाव | गोपाळराव काशिराव गायकवाड |
बदलेले नाव | महाराज सयाजीराव खंडेराव गायकवाड |
जन्म | ११ मार्च १८६३ |
जन्मठिकाण | महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यामधील कवणाने या गावामध्ये |
सयाजीराव गायकवाड यांचे सुरुवातीचे जीवन – early life
सयाजीराव गायकवाड यांचा जन्म हा महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यामधील कवणाने या गावामध्ये ११ मार्च १८६३ मध्ये एका गरीब कुटुंबामध्ये झाला होता आणि त्यांचे नवा गोपाळराव काशिराव गायकवाड असे होते. नंतर जे बडोदा घराण्याचे आणि संस्थानाचे अधिपती होते, म्हणजे खंडेराव गायकवाड यांच्या मृत्यूनंतर गोपाळराव हे बडोदा घराण्यामध्ये दत्तक गेले आणि मग त्यांचे नाव सयाजीराव खंडेराव गायकवाड असे पडले. काही दिवसांनी ते बडोदा संस्थानाचे अधिपती बनले आणि मग त्यांनी या संस्थानाचा सर्व राज्यकारभार पहिला.
सयाजीराव गायकवाड यांची कारकीर्द
- त्यांनी बडोदा संस्थानाचे अधिपती किंवा राजकर्ते बनल्यानंतर अनेक प्रकारची वेगवेगळी कामे केली जसे कि त्या ठिकाणी असणाऱ्या ग्रामपंचायतीमध्ये अनेक वेगवेगळे बदल घडवून आणले म्हणजेच तेथे असणाऱ्या ग्राम पंचायतीचे पुनरुज्जीवन केले, तसेच अस्पृश्यांचे निवारण आणि हरिजन विद्यार्थ्यांच्यासाठी शाळा सुरु केल्या.
- तसेच त्यांनी त्यांच्या संस्थानामध्ये प्राथमिक शिक्षण सुरु केले तसेच कला शिक्षण देखील सुरु केले, त्यांनी संस्कृत भाषेमधील ग्रंथांचे प्रकाशन केले तसेच ग्रंथकरांचे आश्रयदाते म्हणून देखील काम केले आणि अश्या प्रकारे त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये अनेक गोष्टी केल्या.
- त्यांनी त्यांच्या कारकीर्दीमध्ये स्त्रियांच्यासाठी देखील अनेक प्रकारे कामे केली तसेच त्यांनी स्त्रियांना देखील न्याय मिळावा म्हणून पुढाकार घेतला म्हणजेच त्यांनी पूर्वी असणाऱ्या बालविवाह पध्दतीवर बंदी घातली, तसेच विधवा विवाह सुरु केला, त्याचबरोबर स्त्रियांना वारश्याचे हक्क मिळावे म्हणून प्रयत्न केले तसेच त्यांनी मुलींना विकण्याची पध्दत देखील बंद केली.
- त्यांनी जोतीबा फुले यांना महात्मा हि पदवी बहाल केली. त्याचबरोबर त्यांनी डॉ बाबासाहेब यांना शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती दिली होती तसेच त्यांनी त्यांच्या संस्थानामध्ये नोकरी देखील दिली.
- ग्रंथालय चळवळीचे श्रेय देखील सयाजीराव खंडेराव गायकवाड यांना जाते आणि त्यांनी अनेक प्रकारच्या ग्रंथांचे प्रकाशन केले आहे तसेच त्यांना ग्रंथ लिहिणाऱ्याचे आश्रयदाते म्हणून देखील ओळखले जातात.
सयाजीराव गायकवाड यांच्याविषयी विशेष तथ्ये – facts
- सयाजीराव गायकवाड यांचे पूर्ण नाव हे गोपाळराव उर्फ सयाजीराव खंडेराव गायकवाड असे आहे आणि त्यांचा जन्म नाशिक जिल्ह्यामधील कवनाने गावामध्ये ११ मार्च १८६३ मध्ये झाला.
- महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या पत्नीचे नाव हे चिमणाबाई सयाजीराव गायकवाड असे होते आणि त्यांच्या आईचे नाव हे जमनाबाई खंडेराव गायकवाड असे होते.
- मोठे सार्वजनिक उद्यान मुलाचे कामटी बाग म्हणून ओळखले जाणारे उद्यान हे सध्या सयाजी बाग म्हणून ओळखले जाते
- २८ डिसेंबर १८८१ रोजी सयाजीराव यांचा पदग्रहण सोहळा हा थाटामाटामध्ये पार पाडण्यात आला ज्यामध्ये ब्रिटिश सरकारच्या वतीने सयाजीराव यांना शासक म्हणून घोषित करण्यात आले होते. वयाच्या १९ व्या वर्षी सयाजीराव एक पूर्णपणे तयार झालेले शासक होते.
- ज्यावेळी वाधवान नगरपालिकेने १९२५ मध्ये अस्पृश्यांना नदीकाठच्या वाळूने खोदलेल्या छोट्या खड्यातून पाणी काढण्यास बंदी घालणारा कायदा सुरु केला त्यावेळी बडोद्याने सर्व विहिरी ह्या सर्व सामुदायांच्यासाठी खुल्या केल्या.
- ज्यावेळी भारतामधील समाजसुधारक अस्पृश्यांना शिक्षण देण्याचे मार्ग शोधात होते तेंव्हा सयाजीरावांनी त्यांच्यासाठी स्वातंत्र्य शाळा उघडल्या होत्या. घटस्पोट कायदा, विधवा पुनर्विवाह कायदा आणि जातीय अंतरविवाह कायदा देखील त्यांनी पुढे ढकलला.
- तत्यांच्या आर्थिक विकासाच्या उपक्रमामध्ये १९०८ मध्ये बँक ऑफ बडोदाची स्थापना समाविष्ट होती. जी अजूनही अस्तित्वात आहे आणि गुजराती डायस्पोराच्या समर्थनार्थ परदेशामध्ये असंख्य ऑपरेशन्ससह भारतातील अग्रगण्य बँकांच्यापैकी एक आहे.
आम्ही दिलेल्या sayajirao gaekwad information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर महाराजा सयाजीराव गायकवाड यांची माहिती बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या maharaja sayajirao gaekwad information in marathi या maharaja sayajirao gaekwad history in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि information about sayajirao gaekwad in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये sayajirao gaekwad information in marathi language Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट