राष्ट्रीय विज्ञान दिन निबंध Science Day Essay in Marathi

Science Day Essay in Marathi राष्ट्रीय विज्ञान दिन निबंध आज आपण या लेखामध्ये विज्ञान दिवस किंवा राष्ट्रीय विज्ञान दिवस या विषयावर निबंध लिहिणार आहोत. सध्याच्या आधुनिक जगामध्ये आपण जे नवनवीन वैशिष्ठ्यांच्या वस्तू वापरतो जसे कि फ्रीज, मोबाईल, वॉशिंग मशीन, टी व्ही, ए.सी, यासारख्या असतात आणि ह्या वस्तू देखील विज्ञानातील संशोधनामुळे जन्माला आलेल्या आहेत. विज्ञान दिवस हा जगभरामध्ये साजरा केला जातो पण आपल्या भारत देशामध्ये हा दिवस २८ फेब्रुवारी साजरा केला जातो आणि आपण कोणताही दिवस साजरा करण्यापाठीमागे काही ना काही कारण असते तसेच विज्ञान दिवस देखील साजरा करण्यापाठीमागे देखील कारण आहे.

आणि ते म्हणजे मुलांच्यामध्ये, विद्यार्थ्यांच्यामध्ये  किंवा लोकांच्यामध्ये विज्ञान विभागाबद्दल जागृकता निर्माण करणे. विज्ञान हे आपल्या जीवनामध्ये खूप महत्वाचे आहे कारण विज्ञान संशोधनामध्ये रोज वेगवेगळ्या प्रकारचे शोध लागतात आणि लोक सध्या कामे करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची साधने वापरतात ती देखील विज्ञानाची देणगी आहे.

science day essay in marathi
science day essay in marathi

राष्ट्रीय विज्ञान दिन निबंध – Science Day Essay in Marathi

National Science Day Essay in Marathi

विज्ञानाने अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू शोधून काढल्या ज्यामुळे आपले काम चांगले, सोपे आणि लवकर होऊ लागले. अश्या प्रकारे आपल्याला विज्ञानाचे अनेक प्रत्येक क्षेत्रामध्ये फायदे होऊ लागले आणि त्यामुळे वेगवेगळ्या क्षेत्रातील उत्पादक क्षमता देखील वाढली. आज जे आपण कार्यालयीन कामासाठी वापरतो ते संगणक देखील आपल्याला विज्ञानानेच दिलेली देणगी आहे आणि आपण संगणक वापरून आपली अनेक कामे सोपी आणि जलद करू शकतो.

तसेच आपण फॅनचा किंवा ए. सी चा वापर केल्यामुळे केल्यामुळे आपल्याला गार वारे मिळते. त्याचबरोबर मोबाईल हि देखील आपल्याला विज्ञानाने दिलेली महत्वाची देणगी आहे कारण मोबाईल मुले आपण अनेक गोष्टी करू शकतो जसे कि मोबाईल चा वापर करून आपण आपल्यापासून लांब असणाऱ्या व्यक्तीशी संपर्क साधू शकतो तसेच त्या व्यक्तीशी व्हिडीओ कॉल करून त्यांना पाहू शकतो आणि त्याच्यासोबत बोलू शकतो.

त्याचबरोबर मोबाईल मुळे आपण वेगवेगळ्या प्रकारची पेमेंट करू शकतो जसे कि वीज बिल, पाणी बिल अश्या प्रकारे आपण मोबाईलचा वेगवेगळ्या प्रकारे वापर करू शकतो म्हणजे मोबईल मुळे जी व्यक्ती आपल्यापासून लांब आहे त्या व्यक्तीला पाहता येते तसेच त्या व्यक्तीसोबत बोलता येते हे फक्त आणि फक्त विज्ञान क्षेत्रामुळे शक्य झाले आहे.

तसेच जर आपल्या भारताच्या विज्ञानाच्या क्षेत्रांतील प्रगती जर आपल्याला पहायची असली तर ती देखील एक मिलची प्रगती आहे आणि आपल्या भारतामध्ये देखील अनेक महान शास्त्रज्ञ होवून गेले ज्यांनी अनेक वेगवेगळ्या प्रकारचे शोध लावले आणि विज्ञान क्षेत्रामध्ये भर पाडून आपली मोलाची कामगिरी बजावली. भारतातील काही प्रसिध्द शास्त्रज्ञ म्हणजे चंद्रशेखर व्यंकट रामन, ए. पी. जे अब्दुल कलाम, होमी भाभा, विक्रम साराभाई, हर गोविंद खुराना, मेघनाद साहा या प्रकारे अनेक शास्त्रज्ञ होवून गेले आणि आज देखील अनेक शास्त्रज्ञ आहेत ज्यांनी विज्ञानामध्ये भर पाडली.

जगभरामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिवस हा १० नोव्हेंबर या दिवशी साजरा केला जातो पण भारतामध्ये २८ फेब्रुवारी या दिवशी साजरा केला जातो कारण चंद्रशेखर व्यंकट रमण यांनी २८ फेब्रुवारी १९२८ मध्ये रमण प्रभाव या नावाचा शोध कोलकत्ता येथे लावला होता आणि हा भारतामध्ये लागलेला पहिलाच शोध होता आणि ते पहिलेच शास्त्रज्ञ होते ज्यांनी हा शोध लावला होता आणि त्या दिवशी पासून म्हणजेच २८ फेब्रुवारी दिवशी भारतामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिवस हा साजरा केला जातो.

डॉक्टर चंद्रशेखर व्यंकट रमण यांना या कामगिरीसाठी इ.स १९३० मध्ये नोबेल पुरस्कार देऊन सन्मानित देखील करण्यात आले होते. विज्ञान दिवस हा संपूर्ण भारतामध्ये साजरा केला जातो आणि हा दिवस शाळेतील विद्यार्थी तसेच शिक्षक, कॉलेज मधील विद्यार्थी, वेगवेगळ्या प्रकारच्या विज्ञान विषयक संस्था आणि देशाच्या शास्त्रज्ञांच्याद्वारे साजरा केला जातो.

या दिवशी शाळेतील किंवा कॉलेजमधील विद्यार्थी विज्ञान विषयक काही प्रकल्प बनवतात किंवा काही विज्ञानाचा वापर घेवून काही मॉडल बनवतात आणि ते शाळेमध्ये किंवा कॉलेज मध्ये विद्यार्थ्यांच्या समोर साजरे करतात आणि यामुळे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शाळेमध्ये असतानाच विज्ञानाची आवड निर्माण होते.

त्याचबरोबर राष्ट्रीय आणि राज्य संशोधन संस्था देखील आपले वेगवेगळे लावलेले शोध देशासमोर आणतात. तसेच या दिवशी टी. व्ही, रेडीओ या सारख्या माध्यमातून विज्ञान विषयो माहिती सांगितली जाते तसेच या दिवशी जमेल त्या पध्दतीने विज्ञानाविषयी जरुती निर्माण केली जाते आणि विज्ञानाचे आपल्या जीवनामध्ये काय महत्व आहे ते सांगितले जाते. विज्ञान दिवसा दिवशी वेगवेगळ्या प्रकारचे टी. व्ही शो, शाळेमध्ये मुलांनी केलेलं विज्ञान प्रदर्शन किंवा संशोधन संस्थेने केलेले मोठे विज्ञान प्रदर्शन, विज्ञान चित्रपट प्रदर्शन, विज्ञान विषयावर प्रश्न उत्तर चर्चा, तसेच विज्ञान विषयावर भाषण, मॉडल यासारखे अनेक उपक्रम विज्ञान दिवसादिवाशी राबवले जातात.

भारतामध्ये विज्ञान दिवस हा मोठ्या थाटामाटात म्हणजे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे विज्ञान विषयक उपक्रम राबवून केले जातात जेणेकरून सामान्य जनतेला विज्ञान विषयी माहिती होवो किंवा मग विज्ञान विषयी जागरुकता वाढो किंवा लोकांच्या मनामध्ये विज्ञाना विषयी आवड निर्माण होवो.

२००९ मध्ये विज्ञान दिनाच्या समारंभामध्ये सरकारने तसेच गैर सरकारी संस्थांनी विज्ञान क्षेत्रामध्ये मोलाची कामगिरी करणाऱ्या आणि विज्ञान क्षेत्रामध्ये भर पाडणाऱ्या पाच विज्ञान संस्थांना राष्ट्रीय पुरस्कार देवून त्यांना सन्मानित केले होते आणि त्यांचे विज्ञान विषयक कामगिरीसाठी सरकारने आणि गैर सरकारी संस्थांनी त्यांचे कौतुक केले होते. तसेच अश्याच प्रकारे दरवर्षी राष्ट्रीय विज्ञान दिवसा दिवशी वेगवेगळ्या प्रकारचे विज्ञान विषय उपक्रम तर राबवले जातातच परंतु त्या उपक्रमांच्या आधारे विज्ञान क्षेत्रांमध्ये ज्या संस्थांनी किंवा ज्या व्यक्तीने चांगली कामगिरी केली आहे.

त्याला पुरस्कार देवून सन्मानित केले जाते जेणेकरून त्या व्यक्तीने किंवा संस्थेने आणखीन काही चांगले करण्यास प्रेरणा मिळते. विज्ञान हे सध्या आपल्या जगण्यासाठी खूप महत्वाचे आहे कारण सध्या विज्ञानातून जन्माला आलेल्या गोष्टींचा वापर आपण मोठ्या प्रमाणात करतो आणि हे महत्व पटवून सांगण्यासाठी आणि लोकांच्या मनामध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी विज्ञान दिवस २८ फेब्रुवारी या दिवशी संपूर्ण भारतामध्ये साजरा केला जातो.

आम्ही दिलेल्या science day essay in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर राष्ट्रीय विज्ञान दिन निबंध मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या national science day essay in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि short essay of national science day in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!