छत्रपती शाहू पॅलेस कोल्हापूर Shahu Palace Kolhapur Information in Marathi

shahu palace kolhapur information in marathi छत्रपती शाहू पॅलेस कोल्हापूर, कोल्हापूर या शहरामध्ये अनेक जुनी स्मारके आहेत जसे कि शालिनी पॅलेस, न्यू पॅलेस, बिनखांबी गणेश मंदिर, महालक्ष्मी मंदिर, सज्जा कोठी, कोपेश्वर मंदिर, भवानी मंडप या सारखी अनेक प्राचीन स्मारके कोल्हापूरमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. परंतु आज आपण या लेखामध्ये शाहू पॅलेस विषयी सविस्तर माहिती घेणार आहोत. शाहू पॅलेस ला न्यू पॅलेस किंवा महाराजा पॅलेस म्हणून देखील ओळखले जाते आणि हे बांधकाम खूप प्राचीन म्हणजेच १८७७ ते १८८४ या काळातील आहे.

आणि सध्या हे पॅलेस कोल्हापूर शहरातील प्रमुख पर्यटन आकर्षनापैकी एक आहे आणि या पॅलेस च्या विस्तीर्ण अश्या परिसरामध्ये बाग, संग्रहालय, तलाव, प्राणी संग्रहालय आणि कुस्ती मैदान यांचा समावेश आहे. हा राजवाडा प्रशंसनीय वास्तुकला प्रदर्शित करतो आणि या वाड्याच्या तळमजल्याचा वापर हा शाहू महाराजांच्या काळामध्ये शस्त्रास्त्रे, दागिने, पोशाख या सारखे साहित्य ठेवण्यासाठी केला जात होता.

तसेच राजवाड्याच्या आत गेल्यानंतर आपल्याला एक संग्रहालय पहायला मिळते ज्या संग्रहालयामध्ये तोफा, ट्रॉफी आणि महान शासक छत्रपती शहाजी महाराज यांच्या कपड्यांचा संग्रह त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो त्याचबरोबर आपल्याला संग्रहालया मध्ये तलवारी, शॉटगण आणि सोन्याचे मुलाम या सारखे प्राचीन काळातील संग्रह देखील पाहायला मिळतात.

तसेच या पॅलेसच्या आवारामध्ये प्राणी संग्रहालय देखील आहे आणि या संग्रहालयामध्ये जंगली कुत्रे, हिमालयीन काळे अस्वल, सिंह, आळसी अस्वल, कला पँथर या प्रकारचे प्राणी आहेत.

shahu palace kolhapur information in marathi
shahu palace kolhapur information in marathi

छत्रपती शाहू पॅलेस कोल्हापूर – Shahu Palace Kolhapur Information in Marathi

शाहू पॅलेसचा इतिहास – shahu palace kolhapur history in marathi

शाहूपॅलेस हे खूप प्राचीन इमारत आहे आणि हि इमारत १८७७ ते १८८४ या काळामध्ये काळ्या दगडापासून बांधलेली प्राचीन इमारत आहे आणि या वस्तूची रचना करणारे वास्तूविशारद हे मेजर मांट होते आणि हे बांधकाम गुजरात, राजस्थान आणि राजवाडा शैलीतील हिंदू आणि जैन बांधकाम शैलीतील संमिश्रण आहे.

हे शाहू महाराजांचे निवास्थान होते आणि या वाड्याच्या तळमजल्याचा वापर हा शाहू महाराजांच्या काळामध्ये शस्त्रास्त्रे, दागिने, पोशाख या सारखे साहित्य ठेवण्यासाठी केला जात होता.

शाहू पॅलेसमधील पाहण्यासारखी ठिकाणे

 • शाहू पॅलेसमध्ये गेल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम मुख्य प्राचीन इमारत पाहायला मिळते.
 • त्याचबरोबर या पॅलेसच्या तळमजल्यावर एक संग्रहालय आहे आणि या संग्रहालयामध्ये संस्मरणीय वस्तू आहेत ज्यामध्ये शस्त्रास्त्रे, दागिने, पोशाख, नाणी, तोफा  आणि औरंगजेबाच्या तलवारीपैकी एक असलेल्या चांदीच्या हत्तीच्या खोगीराचा समावेश आहे. त्याबरोबर या संग्रहालयामध्ये ब्रिटीश व्हॉईसरॉय आणि भारताचे गव्हर्नर जनरल यांचे पत्र देखील आहे.
 • त्याचबरोबर राजवाड्यामध्ये फोटो गॅलरीमध्ये राजेशाहीची अनेक मनोरंजक चित्रे आहेत.
 • राजवाड्याच्या परिसरामध्ये एक लहान तलाव आहे ज्याच्या बाजूला एक खुले प्राणिसंग्रहालय आहे आणि तलावामध्ये फ्लेमिंगोसारखे सारखे अनेक स्थलांतरित पक्षी आहेत. मोर, ठिपकेदार हरीण, इमू हे प्राणी संग्रहालयामधील मुख्य आकर्षण आहे.

शाहू पॅलेसविषयी मनोरंजक तथ्ये – facts

 • शाहू पॅलेसला न्यू पॅलेस किंवा महाराजा पॅलेस म्हणून देखील ओळख मिळालेली आहे.
 • न्यू पॅलेस हे १८७७ ते १८८४ या काळामध्ये काळ्या दगडांच्यापासून बांधलेली एक प्राचीन इमारत आहे जी सध्या कोल्हापूर शहरातील प्रमुख पर्यटन स्थळापैकी एक आहे.
 • या पॅलेस च्या विस्तीर्ण अश्या परिसरामध्ये बाग, संग्रहालय, तलाव, प्राणी संग्रहालय आणि कुस्ती मैदान यांचा समावेश आहे.
 • या पॅलेसचे बांधकाम हे हिंदू आणि जैन अश्या दोन संमिश्रण शैलीतील आहे.
 • हे पॅलेसशाहू महाराजांचे निवास्थान होते.

शाहू पॅलेसला कसे जायचे – how to reach

शाहूपॅलेस हे कोल्हापूर शहराजवळ असल्यामुळे आपल्याला कोणत्याही मार्गाने कोल्हापूर या शहरामध्ये येण्यासाठी पर्याय आहे म्हणजेच जर आपल्याल शाहू पॅलेसला भेट द्यायची असल्यास आपण कोणत्याही मुख्य शहरातून बसने, किंवा रेल्वेने किंवा विमानाने कोल्हापूर या शहरामध्ये येऊ शकतो.

कारण हे तिन्हीहि पर्याय कोल्हापूरला येण्यासाठी उपलब्ध आहेत. आपण बसने, ट्रेनने किंवा विमानाने कोल्हापूर या शहरामध्ये आल्यानंतर कोल्हापूर मधून शाहू पॅलेस हे १० किलो मीटर अंतरावर आहे आणि आपण त्या ठिकाणी रिक्षा किंवा टॅक्सी पकडून पोहचू शकतो.

शाहू पॅलेसला भेट देण्याचा उत्तम काळ – best time to visit

पावसाळा हा ऋतू सोडला कि सर्व महिने आपण कोल्हापूरला भेट देऊ शकतो आणि कोल्हापूर मधील अनेक ऐतिहासिक ठिकाणे पाहू शकतो आणि जर तुम्ही किल्ले पर्वत आणि दऱ्या या सारख्या निसर्गरम्य परिसराला भेट देणार असेल तर तुम्ही सप्टेंबर ते फेब्रुवारी या महिन्यामध्ये भेट द्या.

शाहू पॅलेस जवळील इतर पर्यटन ठिकाणे

शाहू पॅलेस हे कोल्हापूर शहरामध्ये आहे आणि या ठिकाणी इतर अनेक पर्यटन स्थळे आहेत जसे कि महालक्ष्मी मंदिर, भवानी मंडप, कोपेश्वर मंदिर, शालिनी पॅलेस, बिनखांबी गणेश मंदिर, रंकाळा तलाव, सज्ज कोठी, ज्योतिबा मंदिर, पन्हाळा या सारखी इतर ठिकाणे देखील आपण पाहू शकतो.

टिप्स

 • शाहू पॅलेस किंवा न्यू पॅलेस पाहण्यासाठी शुल्क आकाराला जातो आणि यामध्ये प्रौढ लोकांच्यासाठी १८ रुपये आणि मुलांच्यासाठी ६ रुपये शुल्क आहे. त्याच बरोबर लष्कर किंवा पोलीस कर्मचारी गणवेशामध्ये असतील तर त्यांच्यासाठी १२ रुपये शुल्क आकाराला जातो आणि शालेय सहल असेल तर पहिली ते दहावी विद्यार्थ्यासाठी ६ प्रती विद्यार्थी शुल्क आहे आणि आठवी ते दहावी विद्यार्थ्यांच्यासाठी १२ रुपये प्रती विद्यार्थी आहे.
 • दुपारी २.३० ते संध्याकाळी ६ पर्यंत सोमवारी खुले असते आणि सोमवार सोडून सर्व दिवस सार्वजनिक पाहण्यासाठी खुले असते.
 • शाहू पॅलेसमधील संग्रहालय हे सकाळी ९ ते दुपारी १ पर्यंत खुले असते. 

आम्ही दिलेल्या shahu palace kolhapur information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर छत्रपती शाहू पॅलेस कोल्हापूर माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या shahu palace kolhapur history in marathi या shahu maharaj palace kolhapur history in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि information about shahu palace kolhapur in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!