पुण्यातील शनिवार वाड्याची माहिती Shaniwar Wada Information in Marathi

Shaniwar Wada Information in Marathi पुण्यातील शनिवार वाड्याची माहिती शनिवार वाड्याकरिता आणि त्याच्या आजूबाजूच्या किंवा भोवतालच्या बागेकरिता एकत्रित मिळून जवळजवळ तीन बिघ्याहून अधिक जागा गुंतली आहे. शनिवार वाडा हा उत्तराभिमुख असून, त्याला एकूण पाच दरवाजे आहेत. यामध्ये उत्तरेकडील दिल्ली दरवाजा, ईशान्येकडील मस्तानी म्हणजेच अलीबहाद्दर दरवाजा, दक्षिणेकडील आग्नेय व नैर्ऋत्य या दिशांना असलेले गणेश आणि नारायण या नावांचे दरवाजे आणि पूर्व दिशेला असलेल्या जांभळी दरवाजा अशा विभिन्न आणि आकर्षक नावांनी शनिवार वाड्यातील हे दरवाजे प्रसिद्ध होते. 

वाड्याच्या दिल्ली दरवाजातून आत गेल्याबरोबर एक प्रचंड आणि बलाढ्य असा वाटोळा बुरूज लागतो. या बुरुजाच्या माथ्यावर तोफांचा गोल रचला गेलेला आहे. पूर्वीच्या काळी त्याच्या मध्यभागी महाराष्ट्राचे भगवे निशाण फडकत असे. पूर्वी बुरुजाच्या आतील भागांमध्ये तीन मोठया कमानी असून त्या कमानींवर नगारखान्याची माडी होती.

shaniwar wada information in marathi
shaniwar wada information in marathi

पुण्यातील शनिवार वाड्याची माहिती – Shaniwar Wada Information in Marathi

 

वर्णन

वाड्याच्या दिल्ली दरवाजातून आत गेल्याबरोबर एक प्रचंड आणि बलाढ्य असा वाटोळा बुरूज लागतो. या बुरुजाच्या माथ्यावर तोफांचा गोल रचला गेलेला आहे. पूर्वीच्या काळी त्याच्या मध्यभागी महाराष्ट्राचे भगवे निशाण फडकत असे. पूर्वी बुरुजाच्या आतील भागांमध्ये तीन मोठया कमानी असून त्या कमानींवर नगारखान्याची माडी होती.

या कमानींतून आत गेल्यावर एक विस्तीर्ण पटांगण लागत असे. या पटांगणाच्या पूर्व दिशेला आणि पश्चिम दिशेला दोन लहान चौक असून, त्याच्या  दक्षिणेच्या दिशेला वाड्याची मुख्य इमारत होती. ही इमारत साधारणतः सहा मजली असून, तिचे एकूण चार मोठमोठे चौक होते आणि या चारही चौकांना विशेष अशी नाव होती.

आग्नेयेकडील चौकास लाल चौक असे नाव होते, परंतू हा चौक बाहेरील चौक या दुसऱ्या नावानेही ओळखला जाई. नैर्ऋत्येकडील दिशेला असलेल्या चौकाला मोतीचौक असे म्हटले जात असे, शिवाय त्या चौकाला बाईंचा म्हणजेच गोपिकाबाई यांचा चौक असेही त्याकाळचे लोक म्हणत असत.

तर, वायव्येकडील बाजूला असलेल्या चौकास हिरकणी चौक असे नाव होते, पण हा चौक  मधला चौक या नावाने देखील ओळखला जात असे आणि सगळ्यात शेवटच्या म्हणजे ईशान्येकडील बाजूला असलेल्या चौकास माणिकचौक ही संज्ञा वापरली जात होती.

या महत्वाच्या चार मोठया चौकांशिवाय अजूनही काही चौक त्याकाळी असलेले आपल्याला ऐकायला भेटतात. या अन्य चौकांमध्ये  फडाचा चौक, ताकचौक, मुदपाकचौक, पक्कान्नचौक इत्यादि अनेक पोटचौक देखील होते. या चौकांपैकी  फडाचा चौक हा हिरकणी चौकात असून, या चौकामध्ये त्याकाळी पेशवे सरकारांची कचेरी भरत असे.

शनिवार वाड्याचे सर्व चौक उत्तम चिरेबंदीनी बांधलेले असून, त्यांच्या मध्यभागी अनेक हौद आणि आकर्षक कारंजी असतं. यांमधील हिरकणी चौकातले हजारी नावाचे कारंजे कमलाकृती असून त्यांचा घेर जवळपास सुमारे ८० फूट इतका होता. या हजारी कारंज्यामध्ये सोळा पाकळया होत्या आणि यातील प्रत्येक पाकळीत सोळा याप्रमाणे सर्व पाकळ्यांत एकत्रित मिळून २५६ कारंजी उडण्याची सोय केली गेलेली होती.

शनिवार वाड्याचे सुतारकाम उत्तम सागवानी लाकडांनी केलेले असून, त्यांतील दिवाणखान्यांचे आणि महालांचे नक्षीकाम अतिशय  प्रेक्षणीय आणि आकर्षक देखील होते.

याशिवाय, वाड्यातील दिवाणखाने हे कमलदाणी आकाराचे असून, यामध्ये एक मोठा सभामंडप आणि त्याच्या चारी दिशांना चार दालने सुरेख पद्धतींनी काढलेली होती. त्याचबरोबर, यांतील सभामंडपाचे काम सुरूदार नक्षीचे असून त्याच्यावर नक्षीदार आणि कोरीव पद्धतीच्या लाकडी कमानी होत्या आणि त्यांच्यावर पक्षी, फळे, वेलबुट्टी यांसारखी विविध चित्रे कोरलेली होती.

मित्रहो, शनिवार वाड्यातील विशेषतः हिरकणी चौकांतल्या गणपती महालाचे चित्रकाम हे सगळ्यात विलक्षणीय आणि खूपच प्रेक्षणीय होते. कारण, याठिकाणी रामायण आणि महाभारतातील विविध प्रसंगांची आणि कथांची चित्रे होती.

खरंतर, शनिवार वाड्याचे हे संपूर्ण वर्णन सध्याच्या काळी पाहता येणं असंभव आहे, म्हणूनच भोजराज नावाच्या एका चित्रकाराला बोलावून हे पूर्वीच्या काळात असलेले शनिवार वाड्याचे हे वर्णन चित्रकाम त्याच्याकडून तयार करून घेण्यात आले होते.

 इतिहास

शनिवार वाड्याविषयी अनेक घटना तसेच, दुर्घटना संबंधित आहेत. वाड्यातील पेशव्यांच्या कार्यालयामध्ये अनेक वीर आणि मुत्सद्दी येत असतं. खरंतर, या कार्यालयांमध्ये राजकारणाचे अनेक फड रंगत असतं; शिवाय, पेशव्यांचा दरबार देखील येथेच होता. पेशव्यांच्या घरांतील सर्व मुलांमुलींची लग्ने याच वाड्यात खूप जल्लोषाने साजरी होत असतं.

त्याचबरोबर, शनिवारवाड्यासमोरील पटांगणामध्ये मोहिमेला जाणारे सैन्य जमत असे, परंतू पुढील काळात याठिकाणी जाहीर सभा भरवण्यात येऊ  लागल्या. आचार्य प्रल्हाद केशव अत्र्यांनी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ याच पटांगणातून लढवली होती.

शनिवार वाड्याच्या पटांगणातील मारुतीस एक भव्य सभामंडप होता. हे मंदिर लॉइड्ज पूल म्हणजे हल्लीचा नवा पूल किंवा शिवाजी पूल बांधणाऱ्या केंजळ्यांनी त्याकाळी बांधले होते. या मंदिरामध्ये दिनांक १९ मार्च १९२४ रोजी मारुतीची मूर्ती बसविण्यात आली होती.

या मंदिरातील हनुमानाची मूर्ती ही बटाट्या मारुती म्हणून आजही प्रसिद्ध आहे. अशा भव्य, मजबूत आणि बलाढ्य शनिवार वाड्याच्या पायाभरणीचे काम दिनांक १० जानेवारी १७३० रोजी सुरू करण्यात आले होते, तर दिनांक २२ जानेवारी १७३२ साली या विशाल  शनिवारवाड्याची वास्तुशांती खूप मोठ्याने करण्यात आली.

खरंतर, या वाड्याची वास्तुशांती शनिवार या वारी होती, त्यामुळे या वाड्याला शनिवारवाडा असे नाव पडले होते. इसवी सन १७३२ नंतरही या वाड्यात वारंवार नवीन बांधकामे, नक्षीकाम, कोरीवकाम आणि बदल होत राहिले. शनिवार वाड्याच्या वास्तुशांती नंतरदेखील बुरुजाच्या दरवाजाचे काम मात्र पूर्ण  होण्यास १७६० हे वर्ष उजाडले होते.

इसवी सन  १८०८, १८१२, १८१३ या वर्षी शनिवार वाड्याला छोट्या-मोठ्या आगी लागल्याच्या आपल्याला इतिहासात नोंदी सापडतात. परंतू, याशिवाय दिनांक १७ नोव्हेंबर १८१७ ला वाड्यावर ब्रिटिशांचे निशाण लागले. त्यानंतर याठिकाणी काही काळ पुण्याचा पहिला कलेक्‍टर हेन्‍री डंडास रॉबर्टसन वास्तव्यास होता. त्यानंतर, शनिवार वाड्यात तुरुंग, पंगुगृह आणि पोलिसांची निवासस्थाने होती.

इसवी सन १८२८ मध्ये शनिवार वाड्यास सर्वांत मोठी आग लागली होती आणि या आगीत वाड्यातील महत्वाच्या आणि भव्य सर्व इमारती जळून खाक झाल्या. या भीषण आगीनंतर जवळजवळ तब्बल ९० वर्षांनी शनिवार वाड्याची दुरावस्था संपली.

इसवी सन १९१९ मध्ये वाडा संरक्षित स्मारक म्हणून जाहीर झाला आणि वाड्याचे उत्खनन करण्यास सुरुवात करण्यात आली. त्याकाळी, शनिवार वाड्यामध्ये कोर्टासाठी वापरण्यात येणारी इमारत इसवी सन १९२३ पूर्वी उत्खननासाठी पाडण्यात आलेली होती.

शनिवारवाड्याची बांधणी

who built shaniwar wada शनिवार वाड्याची भव्य आणि विशाल इमारत जवळपास २१ फूट उंच होती आणि या इमारतीच्या चारही बाजूने एकूण ९५० फूट लांबीची तटबंदी भिंत होती. सगळ्यात जास्त लांबीची ही मजबूत भिंत आणि बलाढ्य बुरुज आज देखील आपल्याला पुण्यातील मध्यवस्तीत दिमाखाने उभे असल्याच्या स्थितीत पाहायला मिळतात.

शनिवार वाड्याच्या भोवतालच्या भिंतीला पाच मोठे दरवाजे आणि एकूण नऊ बुरूज आहेत. वाड्याच्या तटाला ९ बुरूज असून, या सर्व बुरुजांवर तोफा बसवण्याची उत्तम सोय केलेली आहे. यांपैकी ‘पागेचा बुरूज’ आतून पोकळ आहे आणि त्याच्या पायथ्याशी मध्यभागी बांधलेला एक भलामोठा गोल खड्डा आहे.

या खड्यावरून असे लक्षात येते की, पूर्वीच्या काळी यामध्ये तोफांचे गोळे ठेवले जात असतं. शिवाय, तटबंदीला एकूण पाच दरवाजे असून, या दरवाज्यांना अनुक्रमे दिल्ली, मस्तानी, खिडकी, गणेश, नाटकशाळा ऊर्फ जांभूळ दरवाजा ही नावे देण्यात आलेली होती.

वाड्याचे हे सर्व दरवाजे बाणासारखे टोकदार आणि नाजूक कमानिंमध्ये स्थित असून, यामध्ये मोठे, अणुकुचीदार लोखंडी खिळे व जाडजूड पट्ट्या ठोकून त्यांना अधिक भक्कम बनवले गेले आहे. यामध्ये, दिल्ली दरवाज्याची उंची २१ फूट इतकी असून त्याची रुंदी १४ फूट इतकी आहे.

वाड्याच्या सर्व तटांवर मिळून जवळपास २७५ शिपाई, रात्रंदिवस काम करणारे ५०० स्वार आणि वाड्यातील अंतर्गत बंदोबस्तासाठी १००० हून अधिक नोकर वाड्यामध्ये कामाला होते. शिवाय, वाड्याच्या मुख्य दिल्ली-दरवाज्यावर नगारखाना स्थित आहे.

आगीच्या भीषण प्रलयातून वाचलेला मजबूत, भव्य, टोकदार आणि अस्सल पेशवेकालीन शाबूत असलेला हा इतकाच भाग सध्याच्या काळात आपल्याला पाहायला मिळतो. याशिवाय, देवडीच्या भिंतीवरती शेषशायी विष्णू तसेच, गणपती या देवतांची चित्रे सुरेख पद्धतीने कोरलेली आहेत.

अलीकडच्या काळात ही चित्रे आता बरीच खराब झालेली आहेत. शनिवार वाड्याच्या आतल्या भागांमध्ये काय चालले आहे, हे बाहेरच्या कोणत्याही अनोळखी माणसांना दिसू नये, यासाठी दिल्ली दरवाजा, देवडी आणि आतला चौक नागमोडी रचनेत तयार केला गेला होता. या रचनेंवरून आपल्याला त्या काळातील कारागिरांची विचारक्षमाता लक्षात येते.

                  तेजल तानाजी पाटील

                     बागीलगे, चंदगड.

आम्ही दिलेल्या shaniwar wada information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर पुण्यातील शनिवार वाड्याची माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या shaniwar wada pune information in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information about shaniwar wada in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये shaniwar wada ghost story in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!