शरद पवार निबंध मराठी Sharad Pawar Essay in Marathi

Sharad Pawar Essay in Marathi शरद पवार निबंध महाराष्ट्र राज्यातील राजकारणामधील एक अनुभवी आणि महत्वाचे व्यक्तिमत्व किंवा राजकर्ते म्हणून ज्यांची ओळख आहे ते म्हणजे शरद पवार. शरद पवार यांचा जन्म १२ डिसेंबर १९४० मध्ये पुणे जिल्ह्यातील बारामती येथे झाला आणि त्यांचे पूर्ण नाव शरदचंद्र गोविंदराव पवार असे आहे. शरद पवार यांच्या आईचे नाव शारदाबाई पवार असे होते आणि वडिलांचे नाव गोविंदराव पावडर असे होते आणि यांचे वडील गोविंदराव पवार हे बारामती मध्ये असणाऱ्या बारामती शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघटने मध्ये काम करत होते तसेच शरद पवार यांची काटेवाडी या गावामध्ये शेती होती आणि पूर्वी शेतीची सर्व कामे आई पाहत होती.

तसेच शरद पावडर यांच्या पत्नीचे नाव प्रतिभा पवार असे आहे आणि त्यांनी एक मुलगी आहे जिचे नाव सुप्रिया सुळे आहे. शहरात पवार यांनी आपले शालेय शिक्षण महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या शाळेमध्ये केले होते आणि मग त्यांनी त्यांचे कॉलेजचे शिक्षण बृहन महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स या पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत असणाऱ्या कॉलेज मध्ये केले आणि यांनी बी. कॉम पर्यंत शिक्षण घेतले आहे.

 sharad pawar essay in marathi
sharad pawar essay in marathi

शरद पवार निबंध मराठी – Sharad Pawar Essay in Marathi

Essay on Sharad Pawar in Marathi

शरद पवार यांना लहानपाणी पासूनच राजकारणाची आवड असावी कारण ते शाळेमध्ये शिकत असताना त्यांनी गोवा मुक्ती सत्याग्रहामध्ये भाग घेतला होता आणि त्याला पाठींबा दिला होता आणि हा काळ १९५६ चा होता. हे राजकारणामध्ये तर पारंगत आहेतच परंतु त्यांना सांस्कृतिक, क्रीडा आणि शिक्षण या खेत्रांची देखील आवड होती असे दिसून येते कारण हे आज देखील अश्या क्षेत्रामध्ये आपल्याला हजर असलेले किंवा वावरताना दिसतात.

तसेच हे पुणे विद्यापीठ अंतर्गत असणाऱ्या बृहन महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स मध्ये शिकत असताना विद्यार्थी संघटनेचे प्रतिनिधित्व केले तसेच त्यांनी सरचिटणीस म्हणून देखील आपली कामगिरी पार पाडली. विद्यार्थी संघटनेचे प्रतिनिधित्व करत असताना ते यशवंतराव चव्हाण यांच्या संपर्कात आले आणि त्यावेळी यशवंतराव चव्हाण यांनी त्यांची हुशारी ओळखली आणि त्यांना वाटले कि आपण या व्यक्तीला जर राजकारणामध्ये प्रोत्साहन दिले तर हि व्यक्ती उंचीचे शिखर गाठेल.

त्यावेळी पासून शरद पवार यांची राजकारणामध्ये प्रवेश झाला आणि ते युवक कॉंग्रेसचे नेते बनले. तसेच त्यांच्या आयुष्यातील एक महत्वाचा भाग म्हणजे त्यांनी १९९९ मध्ये आपला स्वताचा पक्ष स्थापन केला आणि तो म्हणजे राष्ट्रवादी कॉंग्रेस या पक्ष्याची स्थापना करून ते त्या पक्ष्याचे अध्यक्ष बनले. त्यांना राजकारणा सोबत क्रीडा क्षेत्रामध्ये देखील रास असल्यामुळे ते २००५ ते २००८ या दरम्यामध्ये भारतीय क्रिकेट नियमक मंडळाचे अध्यक्ष बनले होते तसेच २०१० ते २०१२ हे २ वर्ष देखील ते आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष होते.

शरद पवार यांची राजकारणामधील खरी वाटचाल हि १९५६ पासून सुरु झाली ज्यावेळी त्यांनी विद्यार्थी संघटनेसाठी काम केले तसेच सचिव म्हणून काम करत असताना त्यांच्या कॉलेज मध्ये यशवंतराव चव्हाण हे त्यांच्या कॉलेज मध्ये आले होते त्यावेळी त्यांनी त्यांची बोलण्याची क्षमता आणि खेळाचे आयोजन आणि मांडणी केलेली पहिली आणि त्यांना असे वाटले कि हि व्यक्ती राजकारणामध्ये मोठे नाव करेल असे वाटले आणि त्यवेळी ते कॉंग्रेस पक्ष्याचे नेते बनले.

मग ते १९६७ मध्ये ते महाराष्ट्र विधान सभेचे सदस्य, कॉंग्रेस विधिमंडळ पक्षाचे महाराष्ट्रातील सचिव आणि प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे महाराष्ट्रातील सरचिटणीस बनण्यास त्यांना यश मिळाले. १९७२ ते १९७४ या २ ते ३ वर्षाच्या काळामध्ये ते महाराष्ट्र राज्यातील ते गृह, क्रीडा, अन्न, नागरी पुरवठा, पुनर्वसन आणि युवक कल्याण अश्या विभागाचे ते राज्यमंत्री होते.

मग त्यांना १९७४ ते १९७८ च्या काळामध्ये त्यांना कॅबीनेट मंत्री बनण्याच्या भाग्य त्यांना लाभले आणि ते महाराष्ट्रातील गृह, कृषी, उद्योग, शिक्षण, युवक कल्याण आणि कामगार कॅबीनेट मंत्री झाले. अश्या प्रकारे ते दिवसेंदिवस यशाच्या उंचीचे शिखर गाठू लागले आणि त्यांना १९७८ मध्ये त्यांना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनण्यास यश मिळाले आणि ते १९७८ ते १९८० म्हणजेच ३ वर्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते.

त्यांनी काही काळ महाराष्ट्रामधील विधानसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून देखील काम केले आहे तसेच तसेच त्यांनी १९८२ पासून १९८७ पर्यंत ते कॉंग्रेस पक्ष्याचे अध्यक्ष म्हणून देखील काम केले. १९८८ मध्ये ते परत एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले आणि १९८८ ते १९९१ हा त्यांचा मुख्यमंत्री पदाचा काळ होता. १९९१ मध्ये लोकसभा निवडणुकी झाल्या आणि ते १० व्या लोकसभेवर पुन्हा निवडून आले.

मग त्यांनी १९९१ ते १९९३ पर्यंत महाराष्ट्राचे संरक्षण मंत्री म्हणून आली आकामगिरी बजावली होती. १९९३ ते १९९५ पर्यंत ते महाराष्ट्र विधान सभेचे सदस्य होते तसेच ते या काळामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देखील होते. ११ व्या लोकसभेमध्ये ते तिसऱ्यांदा निवडून आले आणि आणि १९९६ ते १९९७ मध्ये ते परायावर आणि वन समिती विज्ञान समितीचे सदस्य बनले.

त्याचबरोबर ते १९९८ मध्ये ४ थ्या वेळी ते १२ व्या लोकसभेचे सदस्य बनले आणि त्यांना विरोधी पक्षनेते बनवण्यात आले आणि ते १९९८ ते १९९९ पर्यंत लोकसभेचे सदस्य होते.  १९९९ मध्ये त्यांनी आपल्या स्वतंत्र्य पक्ष्याची स्थापना केली आणि त्या पक्ष्याचे नाव आहे राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि त्यांनी १९९९ मध्ये लोकसभेमध्ये पाचव्यांदा निवडून आले आणि त्यांचा पक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस या पक्ष्याचे नेतृत्व केले.

१९९९ ते २००० या काळामध्ये ते सामान्य उद्देश समिती आणि कृषी समितीचे सदस्य म्हणून आपली कामगिरी बजावली तसेच त्यांनी २००० ते २००१ मध्ये ते नितीशास्त्र समितीचे सदस्य देखील होते. शरद पवार यांनी २००१ पासून २००४ पर्यंत राष्ट्रीय आपत्ती समितीचे उपाध्यक्ष म्हणून आपली कामगिरी बजावली आणि ते लोकसभेमध्ये राष्ट्रवादीचे नेतृत्व देखील करत होते.

२००४ मध्ये ते परत लोकसभेमध्ये निवडून आले आणि ते सार्वजनीक वितरण, ग्राहक व्यवहार, कृषी आणि अन्न विभागाचे केंद्रीय कॅबीनेट मंत्री बनले आणि त्याच काळामध्ये ते जलसंधारण आणि व्यवस्थापन संसदीय मंचाचे उपाध्यक्ष होते. २००९ मध्ये ते परत सार्वजनीक वितरण, ग्राहक व्यवहार, कृषी आणि अन्न विभागाचे केंद्रीय कॅबीनेट मंत्री बनले.

अश्या प्रकारे त्यांनी आज पर्यंत अनेक विजय मिळवले अनेक राजकीय कामगिऱ्या बजावल्या. त्याचबरोबर ते मुंबई नेहरू सेंटर, विद्या प्रतिष्टान, सातारा रयत शिक्षण संस्था, पुण्यातील वसंतदादा सुगर इन्स्टिट्यूट अश्या सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील अध्यक्ष होते. असेच ते महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद, मुंबई क्रिकेट असोसिएशन, महाराष्ट्र कब्बडी असोसिएशन, गरवारे क्लब हाऊस, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अश्या क्रीडा संस्थांचे देखील त्यांनी अध्यक्ष पद भूषवले होते.

शरद पवार यांना लॉरेन्स टेक्नोलॉजीकल युनिवर्सिटी, साऊथफिल्ड, मिशिगन, डेट्रोईट, युएसए यांनी त्यांना मानविकी मध्ये मानद डॉक्टरेट पदवी दिली तसेच २००८ मध्ये फास्ट फॉरवर्ड हे त्यांच्या भाषणाचा संग्रह असणारे पुस्तक प्रकाशित करण्यात आले होते.

आम्ही दिलेल्या sharad pawar essay in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर शरद पवार निबंध मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या
sharad pawar essay या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि sharad pawar nibandh marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये sharad pawar wikipedia Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!