शेव भाजी रेसिपी मराठी Shev Bhaji Recipe in Marathi

Shev Bhaji Recipe in Marathi झणझणीत शेव भाजी रेसिपी मराठी आपल्याला केंव्हातरी चरचरीत, झणझणीत किंवा मसालेदार भाज्या खावू वाटतात त्यावेळी आपण वेगवेगळ्या भाज्या बनवून खातो जसे की काजू मसाला, कुर्मा, पनीर मसाला, काजू कुर्मा यासारख्या मसालेदार भाज्या बनवतो त्यामधील एक मसालेदार, चविष्ट आणि झणझणीत प्रकार म्हणजे शेव भाजी. शेव भाजी हा प्रकार मोठ्या प्रमाणात बनवला जात असला भारताच्या काही इतर भागामध्ये देखील शेव भाजी हा प्रकार खूप आवडीने बनवून खातात आणि महाराष्ट्रातर शेव भाजी हा प्रकार बहुतेक लोकांचा आवडता पदार्थ आहे.

शेव भाजी हा पदार्थ जरी तिखट असला तरी हा खाल्ल्याचा आनंद काही वेगळाच असतो कारण चरचरीत काही तरी खाण्याची जी आपली चटक असते ती हि भाजी खाल्ल्याने भागते. शेव भाजी ही मोठी शेव, काही मसाले, चटणी आणि मीठ यासारखे काही घटक घालून बनवली जाते आणि हा पदार्थ आपण चपाती किंवा भाकरी सोबत खावू शकतो.

शेव भाजी हा पदार्थ घरी देखील बनवण्यासाठी खूप सोपा आहे आणि कमी वेळेमध्ये आणि मोजक्या साहित्यामध्ये बनतो. जर आपण महाराष्ट्रातून रस्त्याने प्रवास करत असाल तर रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या ढाब्यांच्यामध्ये तुम्हाला हमखास मसालेदार शेव भाजी हि डिश मिळू शकते.

जर तुम्हाला ढाब्या सारखी शेव भाजी बनवायची असेल तर त्यामध्ये मसाल्याचे प्रमाण आणि तिखट पणा थोडा जास्ती असावा. आज या लेखामध्ये आपण घराच्या घरी ढाब्यासारखी शेव भाजी कशी बनवायची याविषयी पाहणार आहोत.

shev bhaji recipe in marathi
shev bhaji recipe in marathi

शेव भाजी रेसिपी मराठी – Shev Bhaji Recipe in Marathi

तयारीसाठी लागणारा वेळ१० मिनिटे
बनण्यासाठी लागणारा वेळ१५ मिनिटे
एकूण लागणारा वेळ२५ मिनिटे
पाककलामहाराष्ट्रीयन

शेव भाजी म्हणजे काय ?

शेव भाजी हा ढाब्यावर मिळणारा झणझणीत आणि मसालेदार पदार्थ आहे ज्यामध्ये मोठी शेव, काही मसाले आणि तिखट वापरून बनवली जाते तसेच या भाजीचा आनंद आपण भाकरी किंवा चपाती सोबत घेवू शकतो.

शेव भाजी बनवण्यासाठी लागणारे मुख्य साहित्य – key ingredients

  • शेव : शेव भाजी बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्यापैकी शेव हा मुख्य घटक आहे जो आपण घरी बनवू शकतो किंवा बाजारातून अनु शकतो. शेव भाजी बनवण्यासाठी शक्यतो मोठी शेव वापरली जाते.
  • मसाले आणि लाल तिखट : शेव भाजी बनवताना या पदार्थामध्ये जर आपण योग्य प्रमाणात मसाले आणि लाल तिखट वापरले तर भाजील खूप चांगली टेस्ट येते.

शेव भाजी कशी करायची – how to make shev bhaji recipe in marathi

शेव भाजी हा पदार्थ महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात बनवला जाणारा पदार्थ आहे आणि तेथील लोक हा पदार्थ खूप प्रेमाने बनवतात आणि आवडीने खातात. जर एकाद्या व्यक्तीला सतत तिखट आणि झणझणीत खाण्याची सवय असेल तर शेव भाजी हा पदार्थ त्या व्यक्तीसाठी खूप उत्तम आहे कारण झणझणीतपणा आणि मसालेदारपणा हि या भाजीची खासियत आहे.

महाराष्ट्रातील रस्त्यांच्या बाजूला असणाऱ्या ढाब्यांच्यामध्ये शेव भाजी हा पदार्थ तुम्ही जर ऑर्डर केला तर हमखास खायला मिळू शकतो आणि मग ढाब्यामधील शेव भाजी खाल्ल्यानंतर कित्येक लोकांना असे वाटते कि आपल्यालाहि ढाब्यासारखी शेव भाजी बनवता आली पाहिजे आणि अश्याच लोकांच्यासाठी आज आपण शेव भाजी कशी बनवायची आणि त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहणार आहोत.

तयारीसाठी लागणारा वेळ१० मिनिटे
बनण्यासाठी लागणारा वेळ१५ मिनिटे
एकूण लागणारा वेळ२५ मिनिटे
पाककलामहाराष्ट्रीयन

शेव भाजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य – ingredients needed to make shev bhaji 

शेव भाजी बनवण्यासाठी शेव, मसाले आणि तिखट – मीठ हे महत्वाचे घटक आहेत तसेच भाजी बनवण्यासाठी जे साहित्य लागते ते आपल्या घरामध्ये आधीपासून उपलब्ध असते किंवा जर घरामध्ये उपलब्ध नसेल तर ते आपण बाजारातून अगदी सहजपणे उपलब्ध होऊ शकते. त्याचबरोबर भाजी बनवण्यासाठी जी शेव लागते ती आपण जर तुम्हाला वेळ असेल तर घरामध्ये देखील बनवू शकतो किंवा बाजारातून विकत अनु शकतो. चाल तर मग पाहूयात शेव भाजी बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी.

  • १ वाटी मोठी किंवा जाड शेव.
  • १ उभा चिरलेला कांदा.
  • १ टोमॅटो ( बारीक चिरलेला ).
  • २ चमचे आले लसून पेस्ट.
  • १ छोटी वाटी खोबरे ( खिसलेले ).
  • २ ते ३ चमचे लाल मिरची पावडर.
  • १/२ चमचा हळद.
  • १ चमचा धने पावडर.
  • कोथिंबीर.
  • तेल ( आवश्यकतेनुसार ).
  • पाणी ( आवश्यकतेनुसार ).
  • मीठ ( चवीनुसार ).

खडा मसाला 

  • १ दालचिन तुकडा.
  • १ बदाम फुल.
  • २ वेलदोडे.
  • १ मसाला वेलदोडे.
  • २ ते ३ लवंग.
  • ३ काळीमिरी.

शेव भाजी बनवण्यासाठी केली जाणारी कृती – process to make shev bhaji recipe 

  • आता आपण वर दिलेल्या सर्व साहित्यापासून शेव भाजी कशी बनवायची याबद्दल पाहूयात.
  • सर्वप्रथम गॅसवर मध्यम आचेवर कढई गरम करायला ठेवा आणि कढई गरम झाली की त्यामध्ये तेल घाला आणि मग त्या तेलामध्ये थोडा कांदा आणि टोमॅटो घाला आणि ते थोडा वेळ चांगले भाजून घ्या. मग त्यामध्ये खवलेले खोबरे घाला आणि ते देखील या मिश्रणामध्ये थोडे भाजा.
  • हे सर्व मिश्रण चांगले भाजले कि गॅस बंद करा आणि गार होईपर्यंत वाट पहा.
  • तोपर्यंत एक छोटी कोरडी कढई घ्या आणि ती गॅसवर मध्यम आचेवर ठेवा आणि त्यामध्ये दालचिन, बदाम फुल, वेलदोडे, काळीमिरी, लवंग आणि मसाला वेलदोडे घाला आणि ते चांगले भाजून घ्या.
  • आणि मग ते मसाले मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून त्या मसाल्यांची एकदम बारीक पावडर करून घ्या आणि तो मसाला एका वाटीमध्ये काढून ठेवा.
  • आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टोमॅटो, कांदा आणि खोबऱ्याचे मिश्रण काढा आणि त्याची मिक्सरमध्ये एकदम बारीक पेस्ट करून घ्या.
  • आता आपण जाऊयात मुख्य रेसिपीकडे.
  • आता पुन्हा कढई गॅसवर मध्यम आचेवर ठेवा आणि ती गरम झाली कि त्यामध्ये तेल ( साधारण अर्धी वाटी ) घाला.
  • तेल गरम झाले कि त्यामध्ये शिल्लक राहिलेला कांदा घाला आणि थोडा वेळ भाजा. मग त्यामध्ये आले लसून पेस्ट घालून ती तेला मध्ये चांगली मिक्स करा आणि कांद्याला लालसर रंग येई पर्यंत भाजा.
  • आता यामध्ये टोमॅटो पेस्ट घालून ते चांगले भाजा आणि मग त्यामध्ये धने पावडर, हळद, लाल मिरची पावडर आणि आपण तयार करून ठेवलेला मसाला घाला आणि हे सर्व मिश्रण एकत्र करा.
  • मग त्यामध्ये लगेच थोडे पाणी ( आवश्यकतेनुसार ) आणि मीठ ( चवीनुसार ) घालून चांगल्र ढवळा आणि त्याला एक चांगली उकळी आणा आणि गॅस बंद करा.
  • आता त्यामध्ये शेव घाला आणि सर्व्ह करा.

शेव भाजी कश्या सोबत खातात – serving suggestions

  • शेव भाजी हा झणझणीत आणि मसालेदार पदार्थ चपाती किंवा भाकरी सोबत खूप छान लागतो.

आम्ही दिलेल्या shev bhaji recipe in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर शेव भाजी रेसिपी मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या shev bhaji recipe in marathi by madhura या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि hotel shev bhaji recipe in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये sev bhaji recipe in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!