होमी भाभा निबंध मराठी Short Essay on Dr Homi Bhabha in Marathi

Short Essay on Dr Homi Bhabha in Marathi होमी भाभा निबंध मराठी आज आपण या लेखामध्ये भारतातीत लोकप्रिय शास्त्रज्ञानपैकी आणि भारताचे विज्ञान क्षेत्रामध्ये नाव उंचावणाऱ्या डॉ. होमी भाभा यांच्या विषयी आज आपण या लेखामध्ये निबंध लिहिणार आहोत. आज आपण होमी भाभा कोण होते, त्यांनी कशाचा शोध लावला आणि त्यांचे नाव कशामुळे इतके मोठे झाले, या सगळ्याबद्दल आता आपण या लेखामध्ये पाहणार आहोत. चला तर मग आता आपण होमो भाभा यांच्या विषयी निबंध लिहुयात. होमी भाभा यांचा जन्म ३० ऑक्टोबर १९०९ मध्ये एका पारशी कुटुंबामध्ये झाला आणि हे एक प्रतिष्ठित कुटुंब होते.

होमी भाभा यांचे पूर्ण नाव होमी जहांगीर भाभा असे होते. होमी भाभा यांच्या आईचे नाव हे मेहराण भाभा असे होते आणि वडिलांचे नाव जहांगीर होमुर्सजी भाभा होते आणि ते वकील म्हणून काम करत होते.

तसेच ते टाटा इंडस्ट्री साठी देखील काम करायचे आणि ते एक लोकप्रिय वकील होते. त्यांनी त्यांचे शालेय शिक्षण हे बॉम्बे कॅथेड्रल या शाळेमध्ये प्रवेश घेवून केली आणि त्यांनी थोड्या दिवसांनी आपली शाळा बदलली आणि त्यांनी जॉन कॉनन या शाळेमध्ये प्रवेश घेतला. वयाच्या १५ व्या वर्षी ते वरिष्ठ केम्ब्रिज परीक्षा उतीर्ण झाके आणि मग त्यांनी एल्फिन्स्टन या महाविद्यालया मध्ये प्रवेश घेतला. त्यानंतर त्यांनी इ. स १९२७ मध्ये रॉयल इंस्टीट्युट ऑफ सायन्स या कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि त्यांनी त्यांचे पुढील शिक्षण पूर्ण केले.

घरातील लोकांची योजना अशी होती कि डॉ होमी भाभा यांनी केम्ब्रिज मधून मॅकेनिकल करून तो भारतामध्ये येवून टाटा स्टील इंडस्ट्रीज मध्ये मेटलर्जीस्ट म्हणून काम करेल पण त्यांनी केम्ब्रिज विद्यापीठातून अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केले परंतु त्यांनी स्टील इंडस्ट्रीज मध्ये मेटलर्जीस्ट म्हणून काम केले नाही तर त्यांनी सायन्स मधून शिक्षण घेतले कारण त्यांना शास्त्रज्ञ व्हायचे होते.

short essay on dr homi bhabha in marathi
short essay on dr homi bhabha in marathi

होमी भाभा निबंध मराठी – Short Essay on Dr Homi Bhabha in Marathi

Doctor Homi Bhabha Marathi Nibandh

होमी जहांगीर भाभा हे एक शास्त्रज्ञ होते हे आपल्या सर्वांना माहित आहेच परंतु त्यांनी विज्ञान क्षेत्रामध्ये अनेक प्रगती केली आणि हे कोणालाच माहित नाही डॉ होमी भाभा हे अनुभौतिक शोधतील पथशोधकांपैकी एक होते आणि या स्केत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना भारतातील अनुकार्याक्रमांचा जनक असे म्हटले जाते. होमी जहागीर भाभा यांनी सुरुवातीअसूनच गाणी आणि भौतिक शास्त्र विषयाबद्दल ओढ होती. होमी भ्भा यांनी १९३४ साली डॉक्टरेट हि पदवी मिळवली.

डॉ होमी भाभा हे भारतामध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी आले होते. होमी जहांगीर भाभा यांना भारतीय अणुशक्तीचे जनक म्हणून ओळखले जाते. त्याचबरोबर त्यांनी महागड्या असलेल्या युरेनियमची निर्यात करण्याऐवजी भारतातील थोरियमचा मोठा साठा इंधन म्हणून वापरण्याच्या धोरणावर त्यांनी नेहमीच भर दिला.

होमी भाभा हे नंतर काही दिवसांनी टाटा इंस्टीट्युट ऑफ फंडामेंटल रिसर्च या संस्थेचे ते संस्थापक संचालक आणि प्राध्यापक होते तसेच होमी भाभा अणुउर्जा आस्थापन, ट्रॉम्बे या संस्थेचे संचालक म्हणून देखील त्यांनी काम केले आहे. त्यांनी जरी विज्ञान क्षेत्रा मध्ये वेगवेगली कामे केली असली तरी होमी भाभा यांचे आण्विक भौतिक शास्त्रावरील संशोधन हे खूप आकर्षक ठरले तसेच हे खूप महत्वपूर्ण देखील होते.

होमी भाभा यांनी अनेक संशोधनावर पुस्तके प्रकाशित केली त्यामधील काही म्हणजे कॉस्मिक रेडिएशनवर त्यांचा शोधनिबंध प्रकाशित केल्यानंतर होमी भाभा यांना डॉक्टरेट मिळाली. तसेच त्याने केंब्रिजमध्ये आणि कोपनहेगनमध्ये नील बोहर यांच्यासोबत काम करण्यासाठी आपला वेळ विभागला. इ. स १९३५ मध्ये त्यांनी इलेक्ट्रॉन-पॉझिट्रॉन स्कॅटरिंगच्या क्रॉस-सेक्शनच्या निर्धारावर त्यांचा शोधनिबंध प्रकाशित केला, ज्याला नंतर त्यांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी “भाभा स्कॅटरिंग” असे नाव देण्यात आले.

१९३६ साली वॉल्टर हेटलरसोबत भागीदारीत “द पॅसेज ऑफ फास्ट इलेक्ट्रॉन्स अँड द थिअरी ऑफ कॉस्मिक शॉवर्स” या पेपरचे ते सह-लेखक होते. भाभा यांनी दुसरे महायुद्ध संपेपर्यंत त्यांनी त्यांचे संशोधन कार्य चालू ठेवले. विश्वकिरण संशोधन, विखुरलेले प्रयोग इत्यादी सुविधा देण्यासाठी कोणतीही स्थापना नाही. त्यावेळी भाभा यांनी सर दोराबजी टाटा ट्रस्टला ‘मूलभूत भौतिकशास्त्रातील संशोधनाची शाळा’ स्थापन करण्याचा प्रस्ताव केला आणि विश्वस्तांनी प्रस्ताव मान्य करून आर्थिक पाठबळ देण्याचे मान्य केले.

बॉम्बे सरकारच्या मदतीने, संस्थेची स्थापना करण्यात आली आणि १९४५ मध्ये टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च असे नाव देण्यात आले.पण ठराविक काळानंतर होमी जहांगीर भाभा यांच्या लक्षात आले की टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च सेंटरमध्ये यापुढे अणुसंशोधन करता येणार नाही. त्यामुळे त्यांनी सरकारला इन्स्टिट्यूट बांधण्याचा प्रस्ताव दिला. त्यामुळे ट्रॉम्बेमध्ये अणुसंशोधन केंद्राचे नाव अणुऊर्जा एस्टॅब्लिशमेंट ट्रॉम्बे या नावाने स्थापन करण्यासाठी ट्रॉम्बेमध्ये नवीन जमीन संपादित करण्यात आली, जी १९५४ मध्ये सुरू झाली. तसेच होमी भाभा यांनी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा मंचांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले.

१९३१ – १९३२ या शैक्षणिक वर्षात, अभियांत्रिकीमधील सॅलोमन्स स्टुडंटशिप नावाच्या पुरस्काराने भाभा यांचे कौतुक झाले. तसेच १९३२ मध्ये त्यांनी त्यांची गणिताच्या ट्रायपोसमध्ये प्रथम श्रेणी प्राप्त केली आणि त्यामुळे त्यांना “गणितातील राऊस बॉल प्रवासी विद्यार्थीत्व” हा प्रतिष्ठित पुरस्कार देण्यात आला. थोरियम भारतात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असल्याने भारताच्या अणुऊर्जा कार्यक्रमाचे लक्ष युरेनियमवरून थोरियमवर आधारित प्रणालींकडे वळवण्याचे श्रेय होमी जे बाबा यांना जाते. १९५४ मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच त्यांच्या सन्मानार्थ बॉम्बे येथील अणुऊर्जा प्रतिष्ठानचे नाव बदलून भाभा अणु संशोधन केंद्र असे ठेवण्यात आले.

होमी भाभा इ.स १९६६ मध्ये एअर इंडिया फ्लाइट १०१ मध्ये प्रवास करत होते आणि ते आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी ऑस्ट्रियातील व्हिएन्ना येथे जात होते त्यावेळी त्यांच्या विमानाचा अपघात माँट ब्लँकजवळ झाला आणि होमी भाभा यांचा मृत्यू २४ जानेवारी १९६६ मध्ये झाला.

अश्या प्रकारे होमी जहांगीर भाभा यांनी अणुउर्जा क्षेत्रामध्ये प्रगती घडवून आणली आणि याच संशोधनामुळे भाभा यांना ओळखले जाते तसेच त्यांना अनुउर्जा संशोधनाच्या कामगिरी मुळे पुरस्कार देवून गौरवण्यात आले आणि त्यांना त्यांच्या चांगल्या कामगिरीसाठी भारत सरकारने १९५४ मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तसेच जे बॉम्बे मध्ये अनु उर्जा केंद्र आहे त्याचे नाव बदलून भाभा अणु संशोधन केंद्र असे ठेवले.

आम्ही दिलेल्या short essay on dr homi bhabha in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर होमी भाभा निबंध मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या doctor homi bhabha marathi nibandh या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि Dr Homi Bhabha Essay in Marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!