श्रावण बाळ योजनेची माहिती Shravan Bal Yojana Information in Marathi

shravan bal yojana information in marathi श्रावण बाळ योजना माहिती आज आपण या लेखामध्ये श्रावण बाळ योजना या विषयावर माहिती लिहिणार आहोत. आपल्याला भारतामध्ये असे अनेक लोक आहेत ज्यांचे म्हातारपणी किंवा उतार वयामध्ये खूप हाल होते. त्यांना चांगल्या प्रकारचे अन्न खायला मिळत नाही किंवा काही चांगल्या आरोग्य सेवा कधी मिळत नाहीत अशा वृद्ध लोकांच्यासाठी म्हणजेच ६५ किंवा ६५ वर्षावरील लोकांच्यासाठी अनेक योजना केंद्र सरकार कडून किंवा राज्य सरकार कडून राबवल्या जातात आणि हि एक  महाराष्ट्र राज्य सरकार कडून वृध्द व्यक्तींच्यासाठी राबवण्यात आलेली एक चांगली योजना आहे.

श्रावण बाळ योजनेचे मुख्य उदिष्ठ हे वृध्दांना आर्थिक प्रोत्साहन देणे आणि त्यांना आर्थिक मदतीसाठी कोणावरही अवलंबून न राहता त्यांना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनवणे हे आहे. श्रावण बाळ योजना (SBY) हि योजना महाराष्ट्र राज्य सरकारने २०२१ मध्ये सुरु केली आहे आणि या योजनेचा लाभ हा वृध्दांना होतो. जे लोक या योजनेसाठी पात्र आहेत अश्या लोकांना किंवा वृध्द व्यक्तींना या योजने अंतर्गत महिन्याला ४०० रुपये किंवा ६०० रुपये पेन्शन किंवा अनुदान दिले जाते जेणे करून ते आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनतील.

श्रावण बाळ हि योजना हि दोन गटामध्ये विभागलेली आहे आणि हि आर्थिक मदत या गटानुसार दिली जाते. जे लोक बिपीएल ( BPL ) कार्ड धारक आहे अश्या लाभार्थ्यांना महिन्याला ६०० रुपयाची आर्थिक मदत केली जाते आणि जे लोक बिपीएल ( BPL ) कार्ड धारक नाहीत अशा लाभार्थ्यांना महिन्याला ४०० रुपयाची आर्थिक मदत केली जाते.

shravan bal yojana information in marathi
shravan bal yojana information in marathi

श्रावण बाळ योजनेची माहिती – Shravan Bal Yojana Information in Marathi

 योजनेचे नावश्रावण बाळ योजना ( shravan bal yojana )
कोणी सुरु केलीमहाराष्ट्र सरकार
केंव्हा सुरु केली२०२१
लाभार्थीमहाराष्ट्रातील वृध्द लोक
आर्थिक लाभ४०० किंवा ६०० रुपये प्रती महिना

श्रावण बाळ योजना कोणी व केंव्हा सुरु केली ?

श्रावण बाळ योजना ( SBY ) हि योजना महाराष्ट्र राज्य सरकारने २०२१ मध्ये सुरु केली आहे आणि या योजनेचा लाभ हा वृध्दांना होतो.

श्रावण बाळ योजना काय आहे ?

हि एक  महाराष्ट्र राज्य सरकार कडून वृध्द व्यक्तींच्यासाठी राबवण्यात आलेली एक चांगली योजना आहे. श्रावण बाळ योजनेचे मुख्य उदिष्ठ हे वृध्दांना आर्थिक प्रोत्साहन देणे आणि त्यांना आर्थिक मदतीसाठी कोणावरही अवलंबून न राहता त्यांना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनवणे हे आहे.

श्रावण बाळ योजनेचे फायदे – benefits 

सरकारने राबवलेल्या सर्व योजनेचा काही ना काही फायदे हे असतात कारण योजना ह्या लोकांच्या कल्याणासाठी आणि फायद्यासाठी बनवलेल्या असतात आणि तसेच श्रावण बाळ योजनेचे देखील काही फायदे आहेत ते आपण खाली पाहूयात.

 • श्रावण बाळ या योजनेद्वारे महाराष्ट्रामध्ये जे निराधार आणि असहाय्य वृध्द आहेत अश्या वृध्दांना दर महिन्याला ४०० किंवा ६०० रुपयाची आर्थिक मदत महाराष्ट्र सरकार करत असते त्यामुळे त्यांना कोणावरही अवलंबून राहावे लागत नाहीत तर ते आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनतात.
 • या योजनेमार्फत जे लोक बिपीएल ( BPL ) कार्ड धारक आहे अशा लाभार्थ्यांना महिन्याला ६०० रुपयाची आर्थिक मदत केली जाईल.
 • जे लोक बिपीएल ( BPL ) कार्ड धारक नाहीत अश्या लाभार्थ्यांना महिन्याला ४०० रुपयाची आर्थिक मदत केली जाते.
 • या योजनेमुळे वृध्दांना आर्थिक गरजेसाठी कोणावर अवलंबून राहावे लागणार नाही.

श्रावण बाळ योजनेसाठी पात्रता निकष – eligibility 

 • जो व्यक्ती या योजनेसाठी अर्ज करणार आहे तो ६५ वर्षाचा किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेला असावा. ६५ पेक्षा कमी वय असलेला व्यक्ती हा या योजनेसाठी पात्र ठरू शकत नाही.
 • जो व्यक्ती श्रावण बाळ या योजनेसाठी अराज करणार आहे याचे वार्षिक उत्पन्न हे २० ते २१ हजार पर्यंत असले पाहिजे किंवा २१ हजाराच्या आत असले पाहिजे तरच त्या संबधित व्यक्तिला या योजनेचा लाभ मिळतो. जर एखाद्या व्यक्तीचे उत्पन्न त्यापेक्षा जरा जरी जास्त असले तर त्या व्यक्तीला या योजनेचा लाभ मिळू शकत नाही.
 • अर्जदार किंवा या योजनेचा लाभ घेणारा लाभार्थी हा महाराष्ट्रातील रहिवासी असावा.
 • अर्जदार हा बिपीएल ( BPL ) कार्ड धारक असेल तर त्याला वेगळा आर्थिक लाभ आणि बिपीएल ( BPL ) कार्ड धारक नसेल त्या व्यक्तीला वेगळा आर्थिक लाभ या योजनेद्वारे मिळतो.

श्रावण बाळ योजनेसाठी लागणारी कागद पत्रे – shravan bal yojana documents

 • पासपोर्ट, पॅन कार्ड, आधार कार्ड किंवा मतदान ओळखपत्र या पैकी कोणतेही एक कागदपत्र ( ओळख पत्र पुरावा ).
 • पासपोर्ट आकाराचा फोटो.
 • वयाचा कोणताही पुरावा ( age certificate ) जसे कि जन्म प्रमाणपत्राची साक्षांकित प्रत.
 • रहिवासी प्रमाणपत्र किंवा दाखला ( रेशन कार्ड ).
 • जात प्रमाण पत्र.
 • उत्पन्नाचा दाखला किंवा बिपीएल प्रत.
 • अर्ज.

श्रावण बाळ योजनेसाठी नोंदणीकशी करावी – how apply for shravan bal yojana 

 • सर्वप्रथम अर्जदाराला या योजनेच्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागते.
 • मग आपल्या समोर त्या वेबसाईटचे होम पेज उघडले जाते.
 • आता या होम पेजवरील नोंदणी या पर्यायावर क्लिक करा.
 • श्रावण बाळ या योजनेसाठी नोंदणी करत असताना आपण एकतर पर्याय एक किंवा मग पर्याय दोन द्वारे नोंदणी करू शकतो.
 • जर तुम्ही त्यामधील एक पर्याय नोंदणीसाठी निवडला असेल तर तुम्हाला तेथे तुमचा जिल्हा निवडावा लागतो आणि मग त्यामध्ये तुमचा नंबर घालावा लागतो. नंबर घातल्यानंतर तुम्हाला तुमच्या नंबरवर एक ओटीपी येईल.
 • आता पुढे वापर कर्त्याचे नाव आणि आणि ओटीपी घाला.
 • जर तुम्ही पर्याय दोन निवडला असेल तर समोर स्क्रीनवर एक नोंदणी फॉर्म उघडेल. आता त्या फॉर्म वर अर्जदाराचा पत्ता, अर्जदाराचे नाव, फोटो, पत्याचा पुरावा यासारखी माहिती भरा.
 • सर्व माहिती भरल्यानंतर रजिस्टर वर क्लिक करा.
 • आता परत होम पेजवर जाऊन श्रावण बाळ या योजनेवर क्लिक करून तेथे त्या पेजवर गेल्यानंतर तुम्हाला समोर लॉगीन फॉर्म दिसेल तेथे तुम्ही माहिती घालून लॉगीन करा.
 • आता परत तुमच्या स्क्रीनवर एक नोंदणी फोरम दिसेल त्या अर्जावर नाव, संपर्क, इमेल, पत्ता घाला आणि त्याठिकाणी आवश्यक कागद पत्रे देखील अपलोड करा.
 • त्यानंतर लाभार्थीच्या बँक खात्यची सर्व माहिती भरा आणि तुम्ही भरलेली माहिती पुन्हा एकदा तपासून पहा आणि तपासणी झाल्यानंतर अर्ज सबमिट करा.
 • अर्ज सबमिट केल्यानंतर एक अर्ज क्रमांक तयार होईल आणि हा अर्ज क्रमांक तुम्हाला भविष्यामध्ये संदर्भासाठी सुरक्षित ठेवणे खूप गरजेचे असते.
 • अश्या प्रकारे तुमची श्रावण बाळ योजनेसाठी नोंदणी प्रक्रिया केली जाते.

आम्ही दिलेल्या shravan bal yojana information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर श्रावण बाळ योजनेची माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या या article मध्ये update करू, मित्रांनो हि information of shravan bal yojana in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये shravan bal yojana documents Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!