श्रीखंड रेसिपी मराठी Shrikhand Recipe in Marathi

Shrikhand Recipe in Marathi श्रीखंड रेसिपी मराठी आपण सणामध्ये किंवा काही खास समारंभांना वेगवेगळे गोड पदार्थ बनवतो जसे कि बासुंदी, आम्रखंड, गुलाब जामून, काजू कतली आणि रसमलाई या सारखे अनेक पदार्थ सणाची किंवा समारंभाची वाढवण्यासाठी केले जातात त्यामधील एक सर्वांना आवडणारा आणि खूप सोप्या पद्धतीने बनवला जाणारा पदार्थ म्हणजे श्रीखंड. श्रीखंड हा पदार्थ गोड असून हा पदार्थ भारतातील महाराष्ट्र आणि गुजरात राज्याची खासियत असली तरी हा पदार्थ देशाच्या अनेक भागामध्ये बनवला जातो आणि खाल्ला देखील जातो.

जर आपण श्रीखंड बनवण्यासाठी आधीपासून चक्का बनवून ठेवला असेल तर श्रीखंड बनण्यासाठी फक्त १० ते १५ मिनिटे लागतात आणि हा पदार्थ आपल्याला गॅसवर शिजवावा देखील लागत नाही. लहानांच्या पासून मोठ्यांच्या पर्यंत असे अनेक लोक आहेत ज्यांना श्रीखंड हा पदार्थ खूप आवडतो आणि काहींना तर या पदार्थाचे नाव घेताच तोंडाला पाणी सुटते.

त्याचबरोबर श्रीखंड हा असा पदार्थ आहे जो आपण खूप सोप्या पध्दतीने आणि खूप कमी वेळामध्ये अगदी मोजक्या साहित्यामध्ये अगदी उत्तम प्रकारे बनवू शकतो. चला तर आज आपण या लेखामध्ये श्रीखंड रेसिपी कशी बनवायची ते पाहणार आहोत.

shrikhand recipe in marathi
shrikhand recipe in marathi

श्रीखंड रेसिपी मराठी – Shrikhand Recipe in Marathi

तयारीसाठी लागणारा वेळ६ ते ७ तास
बनण्यासाठी लागणारा वेळ१० ते १५ मिनिटे
एकूण लागणारा वेळ७ तास १५ मिनिटे
पाककलामहाराष्ट्रीयन किंवा गुजराती

श्रीखंड म्हणजे काय ?

श्रीखंड हा दह्यापासून बनणारा एक पदार्थ आहे जो दही ६ ते ७ तास किंवा शक्य असल्यास त्यापेक्षा जास्त वेळ बांधून त्यामधील पाणी गाळून घेवून त्याचा चक्का बनवला जातो आणि मग त्यामध्ये साखर घालून ते चांगले फेटले जाते आणि मग त्यामध्ये फ्लेवरसाठी वेलची पूड घालून श्रीखंड बनवले जाते.

श्रीखंड बनवण्यासाठी लागणारे मुख्य साहित्य – key ingredients

  • दही : श्रीखंड बनवण्यासाठी दही हे एक महत्वाचे साहित्य आहे कारण दह्याशिवाय श्रीखंड बनू शकत नाही. दह्याचा सर्वप्रथम चक्का बनवला जातो आणि त्यामध्ये नंतर साखर घालून ते फेटले जाते.
  • साखर : श्रीखंड बनवताना त्यामध्ये साखर घालणे आवश्यक असते कारण साखर घातल्यामुळे श्रीखंडला गोड पणा येतो.

श्रीखंड बनवण्याची रेसिपी मराठी – shrikhand recipe marathi

श्रीखंड हा पदार्थ जरी महाराष्ट्र आणि गुजरात राज्यामध्ये सतत बनत असला तरी हा पदार्थ भारतामध्ये इतर भागामध्ये देखील बनवला जातो. श्रीखंड हा पदार्थ दह्यापासून बनवला जातो आणि दही हे या पदार्थाचे मुख्य साहित्य आहे आणि हा पदार्थ जर चक्का पूर्वीपासून तयार असेल तर श्रीखंड बनण्यास १० ते १५ मिनिटे लागतात. श्रीखंड हा पदार्थ झटपट बनणारा आणि खूप कमी साहित्यामध्ये बनणारा एक सोपा पदार्थ आहे. चला तर मग पाहूयात श्रीखंड कसे बनवायचे आणि ते बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते.

तयारीसाठी लागणारा वेळ६ ते ७ तास
बनण्यासाठी लागणारा वेळ१० ते १५ मिनिटे
एकूण लागणारा वेळ७ तास १५ मिनिटे
पाककलामहाराष्ट्रीयन किंवा गुजराती

श्रीखंड रेसिपी बनवण्यासाठी लागणारे साहित्य – ingredients needed to make shrikhand recipe

श्रीखंड रेसिपी बनवण्यासाठी अगदी मोजकेच साहित्य लागते आणि ते आपल्या घरामध्ये अगदी सहज उपलब्ध असू शकते. श्रीखंड बनवताना आपल्यला दही, साखर, वेलची पावडर आणि काही ड्राय फ्रुट्स लागतात आणि हे सर्व आपल्या घरामध्ये उपलब्ध असते. फक्त दही आपण घरामध्ये लावून बनवू शकतो किंवा बाजारातून विकत अनु शकतो. परंतु जर आपण घरामध्येच दही लावले तर ते घट्ट लागते आणि त्याचे श्रीखंड देखील छान बनते. चला तर मग पाहूयात श्रीखंड बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी.

  • ४ वाटी दही.
  • ३ ते ४ मोठे चमचे मोठी साखर किंवा पिठी साखर.
  • दीड चमचा वेलची पावडर.
  • १ छोटी वाटी काजू आणि बदाम तुकडे.

श्रीखंड बनवण्यासाठी केली जाणारी कृती – process to make shrikhand recipe 

आता आपण वर दिलेल्या साहित्यापासून स्वादिष्ट श्रीखंड रेसिपी कशी बनवायची ते पाहूयात.

  • श्रीखंड बनवताना सर्वप्रथम आधल्या दिवशी रात्री दही लावून ठेवा म्हणजे आपण ते दही सकाळी चक्का करण्यासाठी वापरू शकतो.
  • चक्का बनवताना सर्वप्रथम एक पांढरे स्वच्छ कापड घ्या आणि ते कापड एका भांड्यावर घाला आणि मग त्यामध्ये दही घाला. दही घातल्यानंतर त्यामध्ये असणारे पाणी भांड्यामध्ये गाळले जाईल.
  • आता दही ओतलेले कापडाच्या सर्व कडा हातामध्ये घेवून त्याला पोठली सारखे बांधा आणि ते फ्रीज मध्ये तंगुंठेवू शकतो किंवा आपल्या स्वयंपाक कट्ट्यावर असणाऱ्या बेसिनच्या नळाला देखील आपण दही टांगून ठेवू शकतो.
  • त्या टांगून ठेवलेल्या दह्याच्या पोठलीच्या खाली एक भांडे ठेवा जेणेकरून दह्यामधील गळणारे पाणी त्या भांड्यामध्ये गळेल. हे दही कमीत कमी ६ ते ७ तास टांगून ठेवा किंवा त्यापेक्षा जास्त वेळ देखील टांगून ठेवू शकता.
  • ६ ते ७ तासांनी दह्यामधील सर्व पाणी निघून जाईल आणि आपले दही घट्ट होईल. आता ते घट्ट दही किंवा चक्का कापडामधून काढून घेवून त्यामध्ये साखर घाला आणि ते चमच्याने १० ते १५ मिनिटे चांगले श्रीखंड मऊ आणि क्रीम सारखे होईपर्यंत चांगले फेटून घ्या.
  • मग त्यामध्ये वेलची पावडर आणि काजू आणि बदामचे तुकडे घाला आणि ते मिक्स करा.
  • श्रीखंड तुम्हाला एकदम थंड हवे असेल तर ते १ तास फ्रीजमध्ये ठेवा आणि कमी थंड हवे असल्यास ते फ्रीजमध्ये ठेवू नका ते तसेच सर्व्ह करा.

श्रीखंड कश्यासोबत खाल्ले जाते – serving suggestions

श्रीखंड हा एक गोड पदार्थ आहे जो आपण सणामध्ये किंवा काही खास कार्यक्रमांना बनवला जातो आणि हा स्वादिष्ट पदार्थ आपण तसाच खावू शकतो किंवा पुरी , चपाती सोबत देखील खावू शकतो.

टिप्स (Tips) 

  • साखरेचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करा.
  • जर तुम्ही बाजारातून आणलेले दही श्रीखंड बनवण्यासाठी वापरत असाल तर ते फक्त ३ ते ४ तास टांगून ठेवले तरी चालते कारण त्यामध्ये पाण्याचे प्रमाण थोडे कमी असते.
  • आपण श्रीखंड हा पदार्थ वेगवेगळ्या फ्लेवरच देखील बनवू शकतो जसे कि आपण श्रीखंड मध्ये २ ते ३ चमचे केसरचे दुध किंवा पाणी घालून ते श्रीखंड केसर फ्लेवरचे श्रीखंड बनवू शकतो.

आम्ही दिलेल्या shrikhand recipe in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर श्रीखंड रेसिपी मराठी माहिती बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या shrikhand recipe in marathi madhura या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि homemade shrikhand recipe in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये how to make shrikhand at home Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!