सिद्धिविनायक मंदिर मुंबई माहिती Siddhivinayak Temple Information in Marathi

Siddhivinayak Temple Information in Marathi सिद्धिविनायक मंदिराची माहिती आजच्या ब्लॉगमध्ये आपण सिद्धिपिठांपैकी एक असलेल सिद्धिविनायक मंदिरा बद्दल माहिती घेणार आहोत. हे मंदिर गणपतीच प्रसिद्ध मंदिर आहे. मुंबई मधील श्री सिद्धिविनायक मंदिर जसं प्रसिद्ध आहे तसेच एक दुसरं सिद्धिविनायक मंदिर देखील आहे हे. ते अहमदनगरच्या श्रीगोंदा या गावापासून साधारण ४८ किलोमीटर लांब पुणे-सोलापूर महामार्गावर उपस्थित आहे. सिद्धीटेक इथे हे मंदिर आहे. गावापासून दोन तासाच्या अंतरावर आहे.सिद्धिविनायक मंदिर मुंबई मधील एक प्रसिद्ध मंदिर आहे. सिद्धिविनायक गणेश लोकप्रिय आहे. या प्रतिमे मध्ये गणपती बाप्पांची सोंड डाव्या बाजूला वळली असून ती सिद्धीपीठाशी जोडली गेली आहे. सिद्धिविनायकाचा महिमा अपरंपार आहे. 

siddhivinayak temple information in marathi
siddhivinayak temple information in marathi

सिद्धिविनायक मंदिर मुंबई माहिती – Siddhivinayak Temple Information in Marathi

श्री सिद्धिविनायक मंदिरमाहिती
मंदिराचे नावश्री सिद्धिविनायक मंदिर
अष्टविनायकदुसरा गणपती
उत्सव, यात्राप्रत्येक वर्षी गणपती पूजा महोत्सव येथे भाद्रपद चतुर्थी पासून अनंत चतुर्थी पर्यंत
मंदिर कोठे आहेमहाराष्ट्रातील अहमदनगरच्या या जिल्ह्यात आहे
पाहण्यासारखी ठिकाणेअष्टविनायक चे दुसरे गणपती

मंदिराचा इतिहास:

या मंदिराचं निर्माण १६९२ मध्ये केलं गेलं. परंतु सरकारी नोंदणी नुसार हे मंदिर १९ नोव्हेंबर १८०१ मध्ये पहिल्यांदा निर्माण करण्यात आलं. सिद्धिविनायकाचं हे पहिलं मंदिर अतिशय छोटं होतं गेल्या दोन दशकांत मधील या मंदिराचं किती वेळा पुनर्निर्माण निर्माण करण्यात आलं आहे. १९९१ मध्ये महाराष्ट्र सरकारने या मंदिराच्या भव्य निर्माणासाठी वीस हजार वर्ग फिटची जमीन प्रदान केली.

दुसरा गणपती:

मुंबई मधील श्री सिद्धिविनायक मंदिर जसं प्रसिद्ध आहे तसेच एक दुसरं सिद्धिविनायक मंदिर देखील आहे हे. ते अहमदनगरच्या श्रीगोंदा या गावापासून साधारण ४८ किलोमीटर लांब पुणे-सोलापूर महामार्गावर उपस्थित आहे. सिद्धीटेक इथे हे मंदिर आहे. गावापासून दोन तासाच्या अंतरावर आहे. येथे पोहोचण्यासाठी चौफुला पाटस या मार्गाद्वारे प्रवास करावा लागतो. हे मंदिर भीमा नदीच्या काठावर स्थित आहे.

मंदिर वास्तुकला:

वर्तमान मधील मंदिराची इमारत पाच मजली आहे. आणि याच्यामध्ये प्रवचन ग्रह, गणेश संग्रहालय, गणेशपीठ शिवाय, दुसऱ्या मजल्यावर दवाखाना देखील आहे. जिथे रोगांची मुक्त मोफत चिकित्सा केली जाते. त्याच मजल्यावर स्वयंपाक घर देखील आहे इथून एक लिफ्ट थेट गर्भगृहामध्ये जाते. पुजारी गणपतीचा प्रसाद याच मार्गे आणतात. नवनिर्मित मंदिराचा गाभारा अशाप्रकारे बनवला गेला आहे, जेणेकरून जास्तीत जास्त भक्त गणपतीच दर्शन सभामंडपा मधून करू शकतील.

पहिल्या मजल्यावरील गाभारा देखील अशा प्रकारे बनवला गेला आहे की भक्तजण तिथून थेट दर्शन करू शकतील. अष्ठभुजी गर्भगृह साधारण दहा फूट लांबीचा तेरा फूट उंच आहे. गर्भगृहाच्या आतल्या बाजूस सुवर्ण शिखर असलेला चांदीचा सुंदर मंडप आहे. गर्भगृहामध्ये भक्त जणांसाठी तीन दरवाजे आहेत. जिथे अष्टविनायक, अष्टलक्ष्मी आणि दशावतार प्रतिमा आहेत.

मंदिराची वैषिष्ट:

सिद्धिविनायक मंदिर मुंबई मधील एक प्रसिद्ध मंदिर आहे. सिद्धिविनायक गणेश लोकप्रिय आहे. या प्रतिमे मध्ये गणपती बाप्पांची सोंड डाव्या बाजूला वळली असून ती सिद्धीपीठाशी जोडली गेली आहे. सिद्धिविनायकाचा महिमा अपरंपार आहे. हा गणपती बाप्पा भक्तांची मनोकामना पूर्ण करतो. परंतु असं म्हणतात हा गणपती लगेच प्रसन्न होतो पण लगेच कोपतो पण. गणपती चतुर्भुज विग्रह आहे. वरील डाव्या हातात कमळ आणि उजव्या हातात अंकुश, खालच्या डाव्या हातात मोत्याची माळ उजव्या हातात मोदकाने भरलेला कटोरा.  

गणपतींच्या सोबत त्यांची पत्नी ऋद्धी व सिद्धी जे धन, ऐश्वर्य, सफळता आणि भक्तजनांची मनोकामना पूर्ण करण्याच प्रतीक आहेत. मूर्तीच्या मस्तकावर भगवान शिव  यांच्यासारख तिसरा डोळा आणि गळ्यामध्ये एक सर्पहार देखील आहे. सिद्धिविनायकाचा विग्रह अडीच फिट उंच आहे. आणि हा विग्रह २ फिट लांबीच्या काळया शिलाखंडावर बनवला गेला आहे.

मंदिराचे रहस्य:

सिद्धिविनायक मंदिराची अद्भुत अशी गोष्ट म्हणजे ह्या मंदिरातील गणपतीची सोंड डाव्या बाजूला वळली आहे जिचा संबंध सिद्धीपिठा मध्ये येतो आणि हाच वरून या गणपतीला सिद्धिविनायक असे नाव पडले आहे.

उत्सव, यात्रा:

असे सिद्धिविनायक मंदिरामध्ये प्रत्येक मंगळवारी भक्तजनांच्या रांगा लागतात गणपती बाप्पाचं दर्शन करण्यासाठी‌‌. इथे इतकी गर्दी असते की रांगेमध्ये चार ते पाच तास उभे राहिल्यानंतर दर्शन होतं. प्रत्येक वर्षी गणपती पूजा महोत्सव येथे भाद्रपद चतुर्थी पासून अनंत चतुर्थी पर्यंत एक विशेष कार्यक्रमात मनवला जातो.

सिद्धिविनायक मंदिर फोटो:

siddhivinayak temple information in marathi
siddhivinayak temple information in marathi

मंदिर कोठे आहे? कसे जायचे?:

महाराष्ट्रातील मुंबई येथे प्रभादेवी जवळ स्थित गणपती सिद्धिविनायक मंदिर आहे. जे भगवान गणपती यांना समर्पित केल आहे. सिद्धिविनायक मंदिरला भेट देण्यासाठी सगळ्यात आधी मुंबई मध्ये जावं लागेलृ. देशाची आर्थिक राजधानी मुंबई ही देशाच्या सगळ्या प्रमुख शहरांशी रोड, रेल्वे आणि हवाई मार्गाने जोडले गेले आहे. रोड मार्गे जाण्यासाठी मुंबईच्या प्रभादेवीला भागात स्थिती आहे. या मंदिरात पोहोचण्यासाठी बस किंवा टॅक्सी च्या आधारे तुम्ही पोहोचू शकता. मुंबईच्या काही भागांवरून इथे पोचण्यासाठी थेट बस सेवा उपलब्ध आहेत. रेल्वेद्वारे मंदिरात पोहोचण्यासाठी कुठल्याही रेल्वेस्थानकावरून दादर ला जाण्यासाठी रेल्वे मिळेल. दादर रेल्वे स्टेशन वरुन तुम्ही पंधरा मिनिटं पुढे चालत जाऊन मंदिरा पर्यंत पोहोचू शकता.

श्री सिद्धिविनायक मंदिर, मुंबई पत्ता:

महाराष्ट्रातील मुंबई शहरातील सिद्धिविनायक मंदिर हे गणेश भगवान यांना समर्पित केलं असून एक अतिशय प्रसिद्ध मंदिर आहे ते बघण्यासाठी भक्तजन देश- विदेशातून येथे पोहोचतात. हे मंदिर देशातील सर्वात पूजनीय धार्मिक स्थळ मध्ये येतं. इथली गणपती बाप्पाची मूर्ती भक्तजनांनी मागितलेली इच्छा त्वरित पूर्ण करते. दरवर्षी करोडो मध्ये दान करतात म्हणूनच हे मंदिर सर्वात श्रीमंत मंदिर मानलं जातं. ह्या मंदिराचा खरा पत्ता एस.के बोले मार्ग, प्रभादेवी, मुंबई, महाराष्ट्र(४०००२८).

श्रीसिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्ट:

श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्ट अनेक सेवाभावी कार्यात सामील आहे. त्यापैकी काही कार्य खाली नोंदवली आहे. वैद्यकीय सेवा, डायलिसिस सेंटर, शैक्षणिक संसाधन, रुग्णालय त्यांचा आगामी प्रकल्प आहे.

श्रीसिद्धिविनायक मंदिर अहमदाबाद:

गुजरात मध्ये सोमनाथ, अंबाजी, पावगड आणि अक्षरधाम असे अनेक विशाल मंदिर आहेत. परंतु इथे एक सगळ्यात मोठा विशाल गणेश मंदिर आहे. या मंदिराचे नाव देखील सिद्धिविनायक मंदिर आहे. हे संपूर्ण देशातील सर्वात मोठं गणेश मंदिर आहे. ह्या मंदिराचं निर्माण अहमदाबाद जवळ स्थित असलेल मेहमदाबाद. वात्रक नदीच्या किनाऱ्यावर झाला आहे. या मंदिराचा शिलान्यास ७ मार्च २०११ मध्ये झाला होता. या सिद्धिविनायक मंदिरात निर्माण सहा लाख सेक्टर फिट मध्ये करण्यात आलं आहे.

गणपतीच्या आकाराच असलेलं हे मंदिर जमिनीपासून वीस फूट उंचावर निर्मित आहे. ज्याच्या मध्ये भगवान गणेश यांच्या मूर्तीची स्थापना जमीनपासून ५६ फीट उंचावर केली गेली आहे. मंदिर मध्ये मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरामधून आणलेल्या ज्योतची स्थापना केली आहे. म्हणून त्या मंदिराचे नाव देखील सिद्धिविनायक मंदिर आहे.

श्री सिद्धिविनायक मंदिर मुंबई वेळ :

सकाळी पहाटे साडेपाच ते रात्री नऊ वाजून पन्नास मिनिटांन पर्यंत या मंदिराचे दरवाजे पर्यटक आणि भक्त जनांसाठी खुले असतात. मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी या मंदिराला दोन प्रवेशद्वार आहेत इथे सीनियर सिटीजन, लहान मुलं, विकलांग आणि महिलांसाठी, एन आर आय आणि विदेशी श्रद्धाळूंच्या दर्शनासाठी एक खास सुविधा उपलब्ध असते‌.

श्री सिद्धिविनायक लाइव दर्शन:

श्रीसिद्धिविनायक लाइव दर्शनासाठी गुगल प्ले स्टोर वरून श्री सिद्धिविनायक गणपती टेंपल या नावाचा ॲप डाऊनलोड करून याच्यावरून तुम्ही लाईव्ह दर्शन पाहू शकता किंवा मंदिराला विजीट करण्यासाठी ऑनलाईन बुकींग पण करू शकता.

श्रीसिद्धिविनायक मंदिर कथा:

जेव्हा ब्रह्मदेवाला सृष्टी निर्माण करायची होती तेव्हा त्यांनी ओम या स्वराचा जप केला. आणि मग भगवान गणपती त्यांच्यावर प्रसन्न झाले आणि त्यांनी ब्रह्मदेव यांना सृष्टी निर्माण करण्यास परवानगी दिली. आणि मग ब्रह्मदेवाच्या दोन कन्या म्हणजेच सिद्धी व सिद्धी यांचा भगवान गणपती यांनी पत्नी म्हणून स्वीकार केला. सृष्टी निर्माण करताना भगवान विष्णू निद्राधीन झाले.

त्यांच्या कानातुन मधु आणि कैतभ असे दोन राक्षस निर्माण झाले. ते देव-देताना त्रास देऊ लागले. मग त्यांच्या लक्षात आले कि फक्त श्री विष्णू या राक्षसांचा नाश करू शकतात.  परंतु अपार प्रयत्न करून सुद्धा विष्णुदेव या राक्षसांचा नाश करू शकले नाही. मग त्यांनी गंधर्व रूप धारण करून गायन सुरू केले. आणि मग महादेव शंकर यांनी विष्णूंना बोलावून घेतलं.

मग महादेव शंकर यांनी विष्णू यांना ओम गणेशाय नमः या मंत्राचा जप करायला सांगितला. या मंत्राचा जप करण्यासाठी महाविष्णू यांनी सोलापूर मधील सिद्धटेक हे ठिकाण निवडलं. या ठिकाणी गणपतीच मंदिर उभ करून त्यात गणपतीची मूर्ती स्थापन करून गणपतीची आराधना केली. आणि त्यांना सिद्धी प्राप्त झाली आणि मग त्यांनी राक्षसांचा नाश केला. कालांतराने हे मंदिर नष्ट झाले. आणि दुसऱ्या एका कथेनुसार एका गुराख्याने येथे गणपती पहिला आणि त्याने तिथे गणपतीची पूजा करायला सुरुवात केली. नंतर इथे पूजा-अर्चना करण्यासाठी एक पुरोहित मिळाला आणि अखेरीस व पेशव्यांच्या राज्यात येथे पुन्हा मंदिर उभं केलं गेलं. खेडचे संत नारायण महाराजांनी व श्री मोरया गोसावी यांना या ठिकाणी मुक्ती मिळाली.

सिद्धिविनायक मंदिर खुले आहेत का? (कोरोनमुळे) :

कोरोनाव्हायरस च्या वाढत्या प्रभावामुळे सर्व धार्मिक स्थळ बंद पडली आहेत. आणि त्याचा प्रभाव मुंबई येथील सिद्धिविनायक मंदिरावर देखील दिसून येतोय‌‌. कोरोनामुळे आता हे मंदिर श्रद्धाळूंसाठी एका तासाला ८०० श्रद्धाळू ऑनलाईन बुकिंग करून दर्शन घेऊ शकतात. मंदिर दर्शनासाठी सकाळी सात वाजल्यापासून दुपारी बारा वाजेपर्यंत खुले राहणार. त्याच्यानंतर अर्धा तासाच्या  ब्रेक नंतर हे मंदिर साडेबारा वाजता खुले होत. आणि मग त्यानंतर संध्याकाळी सात वाजेपर्यंत हे मंदिर खुले राहत. पुन्हा संध्याकाळी आठ ते नऊ वाजेपर्यंत मंदिर दर्शनासाठी खुल असत. ज्यांची ऑनलाइन बुकिंग आहे तेच क्यूआर कोडच्या वतीने श्री सिद्धिविनायक मंदिरात दर्शन घेऊ शकतात.

पाहाण्यासारखी ठिकाणे:

शिवाजी पार्क, दादर चौपाटी, कीर्ती वडापाव, शिवसेना भवन, प्रमोद महाजन पार्क, दादर स्टेशन मार्केट (जर तुम्हाला आयुष्य आणि मुंबईकरांची गर्दी शिकायची असेल तर अवश्य भेट द्या), रवींद्र नाट्य मंदिर बर्‍याच गगनचुंबी इमारती आणि कंपन्या आहेत. कोहिनूर टॉवर (दादरची सर्वात उंच इमारत), स्वतंत्र वीर सावरकर संस्था, नारळी बाग‌. गणेश चतुर्थी उत्सव आणि नवरात्राती, विशेषत: विसर्जन दरम्यान तुम्ही मजा, रोमांच आणि भक्ती अनुभवू शकता.

वरील सर्व गोष्टी पाहून आपणास अंदाज लागला असेलच कि हा सिद्धिविनायक मंदिर मुंबई siddhivinayak temple information in marathi language हे मंदिर कुठे आहे? ह्याचे वैशिष्ट्य, त्याचे सौंदर्य, याचा इतिहास,  मंदिरातील रहस्य, मंदिरात घडणारे उत्सव, जत्रा याची थोडक्यात माहिती  दिली आहे. siddhivinayak temple mumbai information in marathi wikipedia हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच information about siddhivinayak temple in marathi हा लेख कसा वाटला व अजून काही सिद्धिविनायक मंदिर मुंबई विषयी राहिले असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद.

आम्ही दिलेल्या siddhivinayak temple in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू. अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!