singing tips in marathi – singing meaning in marathi सिंगिग टिप्स, जर एखाद्या व्यक्तीला सिंगर बनायचे असल्यास त्यासाठी आपण आपल्या आवाजाची काळजी कशी घ्यायची तसेच आपले सिंगिंग चांगले होण्यासाठी कोणकोणते नियम पाळावे लागतात तसेच कोणकोणत्या टिप्स फॉलो कराव्या लागत ते पाहूया. आपला चांगला आवाज हा आपल्या चांगल्या व्यक्तीमत्वाचा एक भाग आहे आणि जर आपला आवाज चांगला असेल आणि आपण जर चांगले गाणे म्हणत असू तर त्यामुळे आपली मोठी ओळख देखील बनण्यास खूप मदत होते. गायक म्हणून जर आपली देशामध्ये किंवा जगामध्ये ओळख निर्माण झाली तर ती आपली खूप मोठी प्रसिध्दी आहे कारण सध्या अनेक गाणी रोज रिलीज होत असतात.
आणि त्या गाण्यांच्यापाठीमागे अनेक गायक असतात जे आपला मधुर आवाज त्या गाण्यांना देतात. जर एकदा गाणे प्रसिध्द झाले किंवा लोकांच्या पसंतीस आले तर अपोआप त्या गायकाचे देखील नाव प्रसिध्द होते किंवा तो गायक देखील लोकांच्या मनामध्ये घर करण्यास मदत होते पण असे मोठ मोठे जे सिंगर असतात त्यांना त्यांच्या चांगल्या सिंगिंग साठी अनेक प्रयत्न करावे लागतात तसेच त्यांना त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयी मध्ये अनेक बदल करावे लागतात तसेच अनेक पदार्थ खाण्यासाठी निर्बंध देखील घालावे लागतात.
जर एखाद्या वयातील चांगला गायक किंवा गायिका बनवायची असेक तर त्या व्यक्तीला अनेक गोष्टी कराव्या, आहारामध्ये बदल करावा लागतो तसेच गाण्याचा सराव देखील करावा लागतो अश्या प्रकारे अनेक टिप्स फॉलो कराव्या लागतात. चला तर आता आपण सिंगिग साठी वेगवेगळ्या टिप्स पाहूया.
सिंगिग टिप्स – Singing Tips in Marathi
सिंगिग टिप्स – how to learn singing at home in marathi
आपला चांगला आवाज हा आपल्याला देवाने दिलेली एक चांगली देणगी आहे आणि आपण ती चांगल्याप्रकारे जपून ठेवली पाहिजे. आपला आवाज चांगला ठेवण्यासाठी आपल्याला अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या टिप्स फॉलो कराव्या लागतात त्यामुळे आपला आवाज हा चांगला राहू शकतो. चला तर आता आपण खाली काही सिंगीगी टिप्स पाहूया.
- आपला आवाज चांगला ठेवायचा असेल तर तुम्हाला प्रथम तुमच्या आहारामध्ये बदल केला पाहिजे तसेच तुम्ही अनेक पदार्थ खाणे टाळले पाहिजेत जसे कि तेलकट, तुपकट, जंक फूड, फास्ट फूड या सारखा आहार कमी खाल्ला पाहिजे त्यामुळे तुमच्या घश्याला कोणतेही निकासन पोहचणार नाही आणि तुमचा आवाज हा मधुर येईल.
- तुम्हाला तुमची गाणी चांगली म्हणण्यासाठी तुम्हाला रोजचा सराव देखील खूप महत्वाचा असतो कारण आपल्याल सराव केल्याशिवाय कोणतीही गोष्ट हि चांगल्या प्रकारे येवू शकत नाही त्यामुळे तुम्हाला गाण्याचा रोजचा सराव हा खूपच उपयोगी असतो.
- तसेच तुम्ही रोजच्या रोज वेगवेगळ्या प्रकारची आणि वेगवेगळ्या काळातील म्हणजे सध्या नवीन आलेली तसेच जुनी गाणी सतत ऐका म्हणजे तुमच्याकडे गाण्याचे भांडार मोठ्या प्रमाणात जमा झालेले असेल.
- अनेक लोक हे गाणे गाताना मनामध्ये कसली तरी भीती बाळगून गाणे गात असतात आणि त्यामुळे आपले गाणे चांगले होत नाही म्हणून जर तुम्ही गाणे गात असाल तर त्यावेळी तुमच्या मनामध्ये कसलीही भीती न बाळगता गाणे गा. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल, स्टेज डेरिंग देखील वाढेल आणि तुमचे गाणे देखील चांगले होईल.
- तुम्ही तुमच्या जवळ असणाऱ्या ऑडिशनमध्ये देखील भाग घ्या. जरी तुमचे त्यामध्ये सिलेक्शन नाही झाले तरी त्याचे काही वाईट मानून घेवू नका कारण यामुळे तुमचा आत्मविश्वास तर वाढन्यास मदत होईल.
- जर तुम्हाला तुमचे गाणे हे चांगल्या प्रकारे म्हणायचे असेल तर तुम्हाला त्या गाण्याच्या लिरिक्स माहित असणे हे खूप गरजेचे असते त्यामुळे तुम्ही गाण्याच्या लिरिक्स ह्या पाठ करून ठेवा म्हणजे तुम्हाला गाणे म्हणताना खूप सोपे जाईल आणि तुमचे गाणे देखील खूप चांगले होण्यास मदत होईल.
- तुम्ही ज्यावेळी गाण्याचा सराव करत असाल तर तुम्ही गाणे म्हणत असताना तुमचे गाणे रेकॉर्ड करून घ्या आणि मग त्या ते रेकॉर्ड केलेले गाणे ऐका आणि मग त्यामध्ये काय चुका आहेत ते पहा आणि मग त्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करा.
- गाणे गाताना आपला श्वास हा रोखून ठेवण्याची सवय आपल्याला अवश्यकत असतात कारण गाणे गाताना आपल्याला अनेकवेळा श्वास हा रोखून ठेवावा लागतो त्यामुळे तुम्ही श्वासाचा व्यायाम हा रोजच्या रोज नियमित पणे केला तर त्यामुळे आपल्याला फायदाच होऊ शकतो.
- जर तुम्हाला गायनाची आवड असेल तर तुम्ही लहान असल्यापासूनच तुम्ही तुमच्या गायनाचा सराव हा सुरु केला पाहिजे तसेच तुम्ही वाद्य आणि वेगवेगळ्या प्रकारचे संगीत शिकले पाहिजे त्यामुळे तुमच्या गायनाच्या ज्ञानामध्ये चांगली भर पडण्यास मदत होऊ शकते.
- तसेच तुम्हाला जर गायनामध्ये करिअर घडवायचे असल्यास तुम्ही तुमचे गायन चांगले करण्यासाठी सिंगिगचा चांगला क्लास धरा. क्लास मुळे सिंगिग विषयी अनेक गोष्टी ह्या आपल्याला समजतील.
- जर एखाद्या व्यक्तीचा आवाज चांगला असेल परंतु तो व्यक्ती जर मध्यपान किंवा धुम्रपान करत असेल तर त्याचा आवाज हा खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे अश्या लोकांनी मध्यापान आणि धुम्रपान करणे सोडून दिले पाहिजे त्यामुळे त्याचा आवाज खराब होणार नाही.
- जर तुम्हाला चांगले गायक बनण्यासाठी इच्छुक आहेत अश्या लोकांनी धूळ आणि माती या पासून लांब राहिले पाहिजे कारान नाकामध्ये डूल आणि माती गेल्यामुळे त्याचा संसर्ग आपल्या घश्याला होतो आणि त्यामुळे आपला आवाजामध्ये थोडा बदल जाणवतो. त्यामुळे अश्या लोकांनी धूळ आणि माती या पासून लांब राहिले पाहिजे.
- असे म्हणतात कि आपल्या शारीरिक आणि मानसिक तणावाचा परिणाम हा आपल्याला आवाजावर होऊ शकतो त्यामुळे तुम्ही शारीरिक आणि मानसिक तणाव कमी करण्यासाठी विश्रांती घेतली पाहिजे, चांगली झोप घेतली पाहिजे तसेच श्वासाचे व्यायाम केले पाहिजेत त्यामुळे आपल्याला फ्रेश होण्यासाठी मदत होईल.
- मुलांचा किंवा मुलींचा मेकअप सेट करण्यासाठी अनके प्रकारचे स्प्रे वापरले जातात आणि त्यामुळे देखील आपल्याला धोका असू शकतो. ते मारताना नाकामध्ये जावू शकते आणि त्याचा परिणाम हा आपल्या घाश्यावर होऊ शकतो आणि हे पूर्णपणे आपल्या आवाजावर परिणाम करते. म्हणून मेकअप स्प्रे वापरताना काळजीपूर्वक वापरा.
आम्ही दिलेल्या singing tips in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर सिंगिग टिप्स माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या singing meaning in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि how to learn singing at home in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट