केस सिल्की कसे करावे Smooth and Silky Hair Tips in Marathi

smooth and silky hair tips in marathi – silky hair tips in marathi केस सिल्की करण्यासाठी घरगुती उपाय आज आपण केस सिल्की कसे बनवू शकतो या बद्दल माहिती घेणार आहोत. आजच्या आधुनिक जगामध्ये प्रदूषणामुळे आणि दुषित हवामानामुळे आपल्या चेहऱ्याकडे, केसांच्याकडे तसेच आपल्या त्वचेकडे लक्ष देणे खूप गरजेचे आहे आणि म्हणून आपण रोजच्या रोज आपल्या सौंदर्याची काळजी घेतली पाहिजे आणि केस हे देखील आपल्या सौंदर्याचाच भाग आहे.सध्या सर्वांना वाटते कि आपले केस देखील सिल्की आणि शायनी दिसावे पण सध्या वाढत्या प्रदूषणामुळे आणि अनेक केसांच्यावर केल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या केमिकलयुक्त प्रक्रियांच्यामुळे अनेकांचे केस हे खराब झालेले पाहायला मिळतात.

म्हणजेच केस पांढरे होणे, फाटे फुटणे, केसांची वाढ खुंटणे, केस गळणे या सारख्या समस्या उद्भवतात आणि या समस्यांच्यामुळे आपले केस सिल्की आणि शायनी दिसत नाहीत. केस हे जितके जितके लांबलचक, सिल्की, काळेभोर दिसतात तितकेच स्त्रियांचचे सौंदर्य खुलून दिसते आणि आणि शक्यतो पुरुषांच्या पेक्षा अधिक स्त्रियाच आपल्या सौंदर्याबद्दल सतत काळजीत असतात.

परंतु सध्या कामाच्या दगदगीमुळे केसांच्या कडे लक्ष न दिल्यामुळे किंवा अनेक आरोग्य समस्यांमुळे केस हे अशक्त दिसतात किंवा चांगले सिल्की दिसत नाहीत अश्या स्त्रिया आपल्या केसांच्या विषयी चिंतिती असतात परंतु असे काही घरगुती टिप्स असतात ज्यामुळे आपले केस सिल्की होतात तसेच आपल्या केसांच्या अनेक समस्या देखील दूर होतात. चला तर आता आपण केस सिली करण्यासाठी कोणकोणते घरगुती उपाय करू शकतो ते पाहूया.

smooth and silky hair tips in marathi
smooth and silky hair tips in marathi

केस सिल्की कसे करावे – Smooth and Silky Hair Tips in Marathi

केस सिल्की बनवण्यासाठी टिप्स – silky hair tips at home in marathi

केस हा सौंदर्याचा भाग आहे आणि आपले केस लांब, सिल्की, काळेभोर आणि चमकदार असतील तर अश्या केसांच्यामुळे आपले सौंदर्य वाढण्यास मदत होते. सिल्की केस हे खूप फायद्याचे आहेत कारण आपले केस जर सिल्की असतील तर आपण कोणत्याही प्रकारची हेअर स्टाईल करू शकतो आणि आपण आपले केस कसे हि सेट करू शकतो. आपले केस जितके सिल्की आणि चमकदार असतील तितके ते आपले सौंदर्य वाढवतात म्हणून आता आपण खाली केस सिल्की बनवण्यासाठी काय काय टिप्स आपण फॉलो करू शकतो ते पाहणार आहोत.

  • केसांना नियमितपणे तेलाचा मसाज केला तर आपल्याला अनेक केसांचे फायदे होतात जसे कि आपले केस काळे होतात तसेच लांब होतात, सिल्की आणि चमकदार देखील होतात म्हणून तुम्ही रोज रात्री केसांना तेलाचा मसाज करा आणि सकाळी कोमट पाण्याने स्वच्छ धुवा.
  • काही लोक केस धुताना फक्त शाम्पूचा वापर करतात परंतु जर आपण शाम्पू आणि कंडिशनर हे दोन्ही वापरल्यामुळे आपले केस सिल्की होण्यास मदत होते.
  • पूर्वीच्या काळापासून शिकेकाई देखील केसांच्या सौंदर्यासाठी वापरली जाते आणि शिकेकाई मध्ये देखील असे आयुर्वेदिक गुणधर्म असतात जे केस वाढवण्यासाठी, सिल्की बनवण्यासाठी, काळेभोर बनवण्यासाठी आणि लांबलचक बनवण्यासाठी मदत करते. ज्या वेळी आपण केस धुणार असतो त्यावेळी जर शिकेकाई पाण्यामध्ये चांगल्या प्रकारे उकळून ते पाणी गाळून ते थंड करू त्याने आपले केस धुतले तर आपले केस सिल्की बनतात तसेच आपल्या केसांना अनेक पोषक घटक मिळतात त्यामुळे आपल्या केसांची इतर समस्यांची देखील दुरुस्ती होते.
  • केसांना जर आपल्याला सिल्की बनवायचे असल्यास तुम्ही मोगऱ्याची फुले एक भांड्यामध्ये पाण्यामध्ये रात्रभर तशीच ठेवा आणि मग ते पाणी सकाळी तुमचे केस धुण्यासाठी वापरा करा या मोगऱ्याच्या पाण्यामुळे देखील तुमचे केस सिल्की बनण्यास मदत करते.
  • आवळा व शिकेकाई हे दोन्ही एका भांड्यामध्ये पाण्यात भिजत घाला आणि हे मिश्रण दोन दिवसांनी त्यामधील बिया काढा आणि हे मिश्रण मिक्सरवर वाटून घ्या आणि मग त्यामध्ये दही आणि मेहंदी मिक्स करा आणि ते मिश्रण केसांना लावा आणि हे तसेच एक तास ठेवा आणि एक तासाने तुमचे केस स्वच्छ पाण्याने धुवा . हे केल्याने आपले केस सिल्की बनतात तसेच चमकदार देखील बनवते.
  • केसांना आठवड्यातून एकदा दही लावले आणि २५ ते ३० मिनिटांनी धुतले तर आपले केस सिल्की बनतात तसेच आपल्या केसांच्या मधी कोंडा देखील कमी होण्य्स मदत होते.
  • जर तुम्हाला तुमचे केस सिल्की, चमकदार, लांबलचक आणि काळेभोर बनवायचे असेल तर त्यावर जास्वंदीचे तेल हे देखील एक रामबाण उपाय आहे आणि हे जास्वंदीचे तेल आपण घरच्या घरी अगदी सहजपणे बनवू शकतो. जास्वंदीचे तेल बनवताना ५ ते ६ जास्वंदीची फुले घ्या आता एका खोल भांड्यामध्ये १ मोठी वाटी तेल घाला आणि त्यामध्ये फुले कुस्करून घाला आणि ते मिश्रण चांगले १० मिनिटे उकळून घ्या आणि उकळ्यानंतर गॅस बंद करा आणि ते थंड होऊ द्या. तेल थंड झाले कि ते एका बाटलीमध्ये काढा आणि ते तेल आठवड्यातून एकदा केसांना लावा.
  • कोरफड मध्ये देखील अनेक चांगले गुणधर्म असतात आणि हे केसंच्यासाठी देखील उपयुक्त ठरते. केसांना मऊ पणा आणि केस सिल्की बनण्यासाठी कोरफड हे महत्वाची भूमिका बजावते. कोरफडचा गर केसांना लावून ते १५ ते २० मिनिटे तसे ठेवून ते पाण्याने स्वच्छ धुतले तर केस वाढतात आणि केस दाट देखील होतात.
  • भृंगराज तेल किंवा ऑलीव्ह तेलाने केसांना मालिश केली तरी आपले केस सिल्की बनण्यासाठी आणि वाढण्यासाठी देखील मदत करते.
  • केळ हे अनेक सौंदर्याच्या कारानंच्यासाठी वापरले जाते आणि केळ्याचा वापर हा केस रेशमी, मऊ आणि चमकदार बनवण्यासाठी देखील केले जाते. केळाची पेस्ट बनवा आणि ती पेस्ट केसांना लावा आणि ते २५ ते ३० मिनिटे तसेच ठेवा आणि मग ते थोड्या वेळाने कोमट पाण्याने धुवा पण केस धुताना तुम्हाला सूट होणारा शाम्पू वापरा.
  • सिल्की केस हे आपले सौंदर्य वाढवू शकतात आणि त्यासाठी आपण जर केसांना आठवड्यातून एकदा कडूलिंबाच्या पाल्याचा रस लावला तर आपले केस वाढू शकतात. परंतु कडूलिंबाच्या पाल्याचा रस काढून तो १५ ते २० मिनिटे केसांना मसाज करा आणि आणि तो रस तसाच केसांना लाऊन २० ते २५ मिनिटे तसाच ठेवा आणि मग ते स्वच्छ पाण्याने तुम्हाला सुट होणाऱ्या शाम्पूने केस धुवा.
  • तुम्ही ज्यावेळी केस धुता त्यावेळी तुम्ही तुमचे केस हे खूप गरम पाण्याने धुवू नका त्यामुळे आपले केस हार्ड होतात त्याऐवजी तुम्ही केस धुण्यासाठी कोमट पाणी वापरा त्यामुळे तुमचे केस सिल्की होऊ शकतील.
  • केसांना जर आपण आयुर्वेदिक मेहंदी लावल्यामुळे देखील आपले केस हे सिल्की, रेशमी आणि चमकदार बनू शकतात तसेच मेहंदी लावल्यामुळे आपले केस वाढण्यास देखील मदत होते.
  • अंड्याचे पांढरे जर आपण केसांना आठवड्यातून एकदा लावले आणि ते लावून २५ ते ३० मिनिटे ठेऊन ते पाण्याने स्वच्छ धुवा आणि मग त्याला शाम्पू आणि आणि कंडिशनर घालून देखील केस धुवा म्हणजेच अंड्याचा वास पूर्णपणे नाहीसा होईल.

टीप: या लेखात दिलेली माहिती बातम्या इंटरनेट वरून घेतलेली असून त्याचा वापर करण्याअगोदर तुमच्या डॉक्टरचा सल्ला आवश्य घ्या.

आम्ही दिलेल्या smooth and silky hair tips in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर केस सिल्की करण्यासाठी घरगुती उपाय माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या silky hair tips at home in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि long and silky hair tips in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!