क्रांतिकारक सुखदेव यांची माहिती Sukhdev Information in Marathi

Sukhdev Information in Marathi – freedom fighter sukhdev information in marathi क्रांतिकारक सुखदेव यांची माहिती यह देश है वीर जवानों का। हे मोहम्मद रफी यांनी गायलेलं गाणं अगदी सत्य परिस्थितीवर अवलंबून आहे. या गाण्यातील हे वाक्य आपल्या भारताची खरी ओळख सांगत. या भारताला अनेक मोठे मोठे हुतात्मे लाभले. ज्यांच्या विचारामुळे भारतामध्ये क्रांती घडून आली. ज्यांनी समाजाच्या सुखासाठी, आपल्या हक्कांसाठी लढा दिला. आजच्या लेखामध्ये आपण अशाच एका वीर क्रांतीकारकाची माहिती जाणून घेणार आहोत. सुखदेव एक भारतीय क्रांतिकारक ज्यांच्या मनामध्ये स्वातंत्र्यासाठीचा लढा आणि नसानसात देशभक्ती साचली होती.

त्यांनी देशासाठी केलेले बलिदान खरंच खूप महान आहे, देशासाठी लढत असताना त्यांना फाशी वर जावं लागलं. चला तर जाणून घेऊया सुखदेव यांची वीर गाथा.

sukhdev information in marathi
sukhdev information in marathi

क्रांतिकारक सुखदेव यांची माहिती – Sukhdev Information in Marathi

पूर्ण नाव सुखदेव रामलाल थापर
जन्म१५ मे १९०७
जन्म गावपंजाबच्या लुधियाना शहरातील नौघरा बाजार
राष्ट्रीयत्व भारतीय
ओळख भारतीय क्रांतिकारक
मृत्यू२३ मार्च १९३१

जन्म

पंजाबच्या लुधियाना शहरातील नौघरा बाजार येथे सुखदेव यांचा जन्म १५ मे १९०७ रोजी झाला. सुखदेव यांच मुळनाव सुखदेव रामलाल थापर असे आहे. सुखदेव हे त्यांचं टोपण नाव आहे. रामलाल थापर आणि राल्ली देवी या दांपत्याच्या पोटी सुखदेव यांचा जन्म झाला. ते पंजाबी हिंदू समाजाचे होते. सुखदेव खूप लहान असतानाच त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला.

या घटनेनंतर सुखदेव यांच पालनपोषण त्यांच्या काकांनी म्हणजेच लाला अचिंतराम यांनी केले होते. लहानपणापासूनच ब्रिटिशांनी भारतावर केलेला अत्याचार सुखदेव बघत आले होते. त्यामुळे कुठेतरी मनामध्ये देशभक्ती रुजू लागली. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी धडपड सुरू झाली. ते म्हणतात ना संगतीचा परिणाम.

संगत माणसाला घडवते. लहान वयातच भगतसिंग, राजगुरू यांच्यासारख्या प्रगत विचारांचे मित्रपरिवार सुखदेव यांना लाभला. भगतसिंग सुखदेव व राजगुरू यांनी सोबतच भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी शपथ घेतली आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळीत सामील झाले. भारताचा इतिहास जाणून घेण्यासाठी आणि रशियन राज्यक्रांती, जागतिक क्रांतिकारी साहित्याची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी लाहोरचा राष्ट्रीय महाविद्यालयांमध्ये सुखदेव यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं.

लाहोरच्या नॅशनल कॉलेजमध्ये तरुणांना भारताचा इतिहास शिकवण्याचे काम सुखदेव करायचे. याच माध्यमातून ते तरुण युवा पिढीला स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेण्यासाठी प्रोत्साहित करायचे.

स्वातंत्र्य चळवळीतील कारकीर्द

असं म्हणतात सुखदेव भगतसिंग आणि राजगुरू यांच्या बलिदानानंतर देशांमध्ये क्रांतीची लाट आली. चला तर जाणून घेऊया सुखदेव यांनी स्वातंत्र्य चळवळीत दिलेल योगदान. तरुण वयामध्ये सुखदेव यांनी स्वातंत्र्याची मशाल हाती घेतली. आपल्या कॉलेजमधील सर्व तरुणांना त्यांनी प्रोत्साहित केलं. ब्रिटिश आपल्या भारतावर कसा अत्याचार करत आहेत.

ब्रिटिश सरकारचे आगळे वेगळे नियम, त्यांचा व्यवहार पद्धती, जनतेचे हाल हे सगळं किती चुकीच आहे. हे सुखदेव यांनी तरुणांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. आणि हे स्वातंत्र्य मिळणं भारतासाठी आणि येणाऱ्या पुढील काळासाठी किती गरजेच आहे हे सुखदेव यांनी त्यांच्या साथीदारांना आणि त्यांच्या कॉलेजमधील तरुणांना समजावून सांगितले.

तरुणांना स्वातंत्र्य चळवळीमध्ये भाग घेण्यासाठी प्रोत्साहित केलं. प्रत्येक तरुणाच्या मनामध्ये स्वातंत्र्याची ठिणगी पेटवली. सुखदेव, भगतसिंग कॉम्रेड रामचंद्र व भगवती सिंग व्होरा या साथीदारांच्या मदतीने व सहमताने लाहोर येथे नौजवान भारत सभेची स्थापना करण्यात आली. ब्रिटिशांकडून होणारी हेळसांड,‌ अत्याचार, जातीव्यवस्था,‌ अस्पृश्यता या सर्व गोष्टींना लढा देणं हे या नौजवान भारत सभेचं मुख्य उद्दीष्ट होतं. त्यासोबतच जास्तीत जास्त तरुणांना स्वातंत्र्य लढा मध्ये भाग घेण्यासाठी जागृत करणे.

सशस्त्र क्रांतिकारक सुखदेव यांनी आपल्या सभेच्या साथीदारांसोबत बॉम्बची कवचे बनवण्यासाठी लाहोरला जाण्याचा निर्णय घेतला. ब्रिटिश सरकार नम्रपणे ऐकणारऱ्यातले नव्हते. म्हणून काम करण्यासाठी कधीतरी वाकड्या मार्गाचा उपयोग करावा लागतो. अहिंसेच्या नव्हेतर हिंसक मार्गाने त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतला. ब्रिटिश सरकार विरुद्ध वेगवेगळे कट रचण्यास सुरुवात केली.

सुखदेव लाहोरला पोहोचल्यानंतर त्यांनी तयार केलेल्या बॉम शची चाचणी झांशी येथे पार पाडली. सुखदेव यांच्या मध्ये लहान वयातच देशाबद्दल प्रेम आणि क्रांती जागी झाली होती. त्यांच्या क्रांतीकारक विचारांवर राम प्रसाद बिस्मिल आणि चंद्रशेखर आझाद यांचा मोठा प्रभाव होता. सुखदेव हे हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन मधील एक नेता होते.

या असोसिएशन मध्ये महत्त्वाचे निर्णय घेण्याचा अधिकार सुखदेव यांना होता. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत सुखदेव यांचा सक्रिय सहभाग होता. ब्रिटिश पोलीस अधिकारी साॅंर्डर्स हे प्रकरण त्यावेळी बरंच गाजलं होतं. झालं असं नोव्हेंबर १९२८ मध्ये लाला लजपत राय यांचा लाहोर येथे झालेल्या लाठीमार यामध्ये मृत्यू झाला. या मृत्यूचा बदला म्हणून पोलीस अधिकारी साॅंर्डर्स याच्यावर गोळ्या झाडल्या.

साॅंर्डर्स च्या खुनाचा आरोप भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांच्या वर लादला गेला. या प्रकरणा दरम्यान ‌भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना अटक झाली. आणि त्यांना लाहोरच्या तुरुंगात कैद करून ठेवण्यात आले. तुरुंगामध्ये असतानादेखील तिकडच्या कैद्यांना देण्यात येणाऱ्या अमानवीय वागणूकी वर सुखदेव यांचं लक्ष गेलं आणि त्यांनी तुरुंगातील कैद्यांच्या हक्कासाठी लढा सुरू केला. तुरुंगामध्ये त्यांनी उपोषणाला सुरुवात केली. सुखदेव यांचा तुरुंगातील कुपोषण फार प्रसिद्ध आहे.

एकीकडे साॅंर्डर्सची हत्या तर दिल्लीमधील सेंट्रल असेंबली येथे बॉम्बस्फोट घडवून आणला गेला. अहिंसेच्या मार्गाने स्वातंत्र्य मिळणं शक्य नव्हतं म्हणून हिंसक पद्धतीने लढा देण्याचा निर्णय घेतला. ब्रिटिशांच्या नाकात दम आणून ठेवला होता. २४ वर्षाचे सुखदेव संपूर्ण ब्रिटिश सरकारवर भारी पडत होते.

सुखदेव, भगतसिंग, राजगुरू हे तुरुंगात असताना राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी त्यांना सोडवण्याचा भरपूर प्रयत्न केले. त्यांना सशस्त्र क्रांतिकारी मार्गाचे समर्थन करणारे पत्र देखील लिहिले. परंतु ते यशस्वी ठरले. लाहोरच्या तुरुंगा मध्ये असताना २३ मार्च १९३१ रोजी राजगुरू, भगतसिंग यांच्या सोबतच सुखदेव या तिघांना फाशी देण्याची शिक्षा सुनावण्यात आली.

२३ मार्च १९३१ रोजी या तिघांना फासावर चढवण्यात आले. जे हसत हसत मरणाला सामोरे गेले ते सुखदेव. त्यांना मरणाची भीती नव्हती तर देशाला स्वातंत्र्य मिळताना बघायचं होतं. सुखदेव, भगतसिंग, राजगुरू यांच्या या बलीदानानंतर बरेच युवा तरुण पुढे येऊन स्वातंत्र्यासाठी लढले. नंतर त्यांचे मृतदेह कारागृहातील मागील भिंती फोडून मुक्तपणे बाहेर आणले गेले.

आणि लाहोर पासून जवळपास पन्नास मैल दूरवर हुसैनीवाला येथील सतलज नदीच्या काठी त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. खेळण्यास फिरण्याच्या वयामध्ये सुखदेव आपल्या साथीदारांसोबत भारत मातेसाठी, भारताच्या संरक्षणासाठी, स्वातंत्र्यासाठी लढा देत होते. एवढ्या लहान वयामध्ये आपली देशाप्रती असलेली कर्तव्य त्यांनी जाणली. सुखदेव यांच्यासारखा तरुण रक्त तरुण क्रांतिकारक भारताला लाभलं हे आपलं भाग्यच समजायचं. त्यांनी आपल्या सर्वांच्या हितासाठी केलेल्या बलिदानाला साठी आपण त्यांचे जन्मो जन्माचे ऋणी आहोत.

भारतीयांसाठी काळा दिवस

सुखदेव यांनी भारत मातेसाठी केलेलं बलिदान व्यर्थ गेले नाही. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत देश स्वतंत्र झाला. ब्रिटिशांच्या कैदेतून भारत मुक्त झाला. देशाला स्वातंत्र्य प्राप्त करून देण्यामध्ये अनेक मोठ-मोठ्या महान क्रांतिकारकांचा सहभाग आहे. या यादीमध्ये एक महत्त्वाचं नाव म्हणून सुखदेव यांचा देखील समावेश होतो.

२३ मार्च या दिवशी महान क्रांतिकारक भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात येऊन फासावर चढवले गेले. त्यामुळे तेव्हापासून संपूर्ण भारतामध्ये २३ मार्च हा दिवस काळा दिवस म्हणून मानला जातो. २३ मार्च या दिवशी आपण शहीद दिवस देखील साजरा करतो. या हुतात्म्यांनी दिलेल्या प्राणाच्या आहूती मुळे आपण त्यांचे सदैव ऋणी आहोत.

याची जाणीव करून या हुतात्म्यांना आपण अभिवादन करतो. अगदी चोवीस वर्षाचे होते सुखदेव जेव्हा त्यांना फासावर चढवण्यात आलं. लहानपणापासून मनी बाळगलेलं स्वप्न ते म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळवून द्यायचं. देशासाठी काहीतरी करून दाखवायचं. याचं समाधान त्यांच्या चेहऱ्यावर होतं. हुस्सैनीवाला येथे भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच शहीद स्मारक उभारले गेले आहे. याच ठिकाणी त्यांच्यावर अंत्यसंस्कार देखील करण्यात आले होते.

आम्ही दिलेल्या sukhdev information in marathi wikipedia माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर क्रांतिकारक सुखदेव यांची माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या freedom fighter sukhdev information in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information of sukhdev in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये bhagat singh rajguru sukhdev information in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!