surya namaskar information in marathi – surya namaskar names in marathi सूर्य नमस्कार माहिती मराठी, आपल्याला आपला अनेक आरोग्य समस्यांच्यापासून बचाव करून घ्यायचा असेल तर आपल्याला रोज नियमितपणे वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम आणि योगासन करणे खूप गरजेचे आहे कारण आपण जर नियमितपणे योगा आणि व्यायाम केला तर आपल्याला कोणत्याही प्रकारची आरोग्य समस्या उद्भवणार नाही तसेच योग नियमितपणे सराव करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीच्या जीवनशैलीत कायमस्वरूपी सकारात्मक फरक निर्माण करू शकतो. योगाचे अनेक प्रकार आहेत.
प्राणायाम, अन्लोम विन्लोम, भस्त्रिका, पद्मासन, चक्रासन, सूर्य नमस्कार, सवासन, भुजंगासन, वज्रासन, गोमुखासन, त्रिकोणासन आणि इतर असे अनेक प्रकार आहेत. आज आपण या लेखामध्ये सूर्य नमस्कार या विषयी माहिती घेणार आहोत. चला तर आता आपण सूर्य नमस्कार काय आहे तसेच सूर्य नमस्कार कसा केला जातो आणि सूर्य नमस्काराचे फायदे काय काय आहेत ते पाहूया.
सूर्य नमस्कार माहिती मराठी – Surya Namaskar Information in Marathi
surya namaskar chi mahiti
सूर्य नमस्कार हा देखील योगासनाचा प्रकार आहे आणि हा योगासनाचा प्रकार हा खूप प्राचीन काळापासून केला जाणारा प्रकार आहे आणि ग्रहावरील सर्व प्रकारच्या जीवनास सक्षम करणाऱ्या सूर्याबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी किंवा कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा प्रकार वापरला जातो. सूर्य हा उर्जेचा स्त्रोत आणि त्याचप्रमाणे सूर्य नमस्कार हे योगासन देखील आपल्या शरीरामध्ये उर्जा निर्माण करते म्हणजेच हे शरीराला आणि मनाला जागृत बनवते आणि मन शक्तीशाली आणि प्रभावी देखील बनवते.
सुर्य नमस्कार हा शरीरातील तीन महत्वाच्या भागांना चांगले ठेवण्यासाठी प्रयत्न करत असतो म्हणजे सूर्य नामासक कफ, पित्त आणि वात यांना संतुलित ठेवण्यास मदत करतो तसेच सूर्य नमस्कार मध्ये एकूण १२ मुद्रा आहेत आणि या मधील प्रत्येक मुद्रेचा काही ना काही फायदा आहेच तसेच सुर्य नमस्कार केल्याने मन शांती मिळते तसेच वजन कमी करण्यासाठी मदत होते आणि अश्या प्रकारे अनेक फायदे होतात.
सूर्यनमस्कार कसे करावे – surya namaskar steps in marathi
सूर्य नमस्कार चे प्रकार – surya namaskar names in marathi
सूर्य नमस्कार करण्याचे अनेक फायदे आहेत आणि असे अनेक लोक आहेत जे नियमित सूर्य नमस्कार करतात. सूर्य नमस्काराच्या एकूण १२ मुद्रा आहेत.
प्रार्थना मुद्रा
प्रार्थना मुद्रा हि सूर्य नमस्कार या आसनाची पहिली पायरी आहे. हा प्रकार आपण उभे राहून किंवा चटईवर बसून पूर्ण करू शकतो. यामध्ये ताठ बसा किंवा ताठ उभे रहा आणि तुमचे हात जोडा आणि मग दीर्घ श्वास घ्या आणि खांदे आराम ठेवा. आता श्वास घेताना हात वर करा आणि परत श्वास सोडा आणि तुमचे हात परत जोडा. या प्रकारच्या स्थितीला प्रार्थना स्थिती म्हटले जाते.
हस्त उत्तानासन
हस्त उत्तानासन हे सूर्यनमस्काराची दुसरी पायरी आहे यामध्ये तुमच्या हाताचे तळवे एकत्र जोडा आणि दीर्घ श्वास घ्या आणि किंचित मागे वाकून आपले हात वर करा आणि थोडे आणखीन पाठीमागे वाका आणि या स्थितीमध्ये थोडावेळ थांबा.
हस्त पद्मासन
हस्त पद्मासन मध्ये उभे राहून पुढे वाकले जाते. हस्त पद्मासन करताना श्वास सोडा आणि पुढे वाका आणि तुमच्या हाताच्या बोटांनी तुमच्या पायाच्या बोटांना स्पर्श करा. पाठीचा कणा वाकवू नका आणि तुमची मान देखील शिथिल ठेवा आता ह्याच स्थितीमध्ये तुमच्या हाताच्या बोटांनी तुमच्या पायाच्या टाचांना स्पर्श करा. हि मुद्रा सोडताना श्वास घ्या आणि मग हि मुद्रा सोडा.
अश्व संचलनासन
अश्व संचलनासन हि ४ थी पायरी आहे आणि हस्त पद्मासन करून झाल्यानंतर आपले गुढघे थोडेसे वाकवा आणि आपले तळवे जमिनीवर आपल्या पायाच्या रेषेमध्ये ठेवा आणि डावा पाय मागे ताणताना उजवा गुढघा छातीच्या उजव्या बाजूला आणा आणि डोके उभे करा.
चतुरंग दंडासन
चतुरंग दंडासन करताना श्वास घ्या आणि तुमचा उजवा पाय मागे डाव्या पायाच्या पुढे आणा आणि तुमचे हात खांद्याच्या सरळ रेषेमध्ये जमिनीवर ठेवा. तुमचा भार हातावर देत तुमचे शरीर सरळ रेषेमध्ये थोडे वर उचला आणि त्या मुद्रेमध्ये श्वासाचे संतुलन करा.
अष्टांग नमस्कार
हि मुद्रा करताना श्वास सोडा आणि तुमचे गुढघे जमिनीवर आणा आणि तुमची हनुवटी देखील जमिनीवर स्पर्श करा आणि तुमचे नितंब जमिनीपासून थोडे वर करा.
भुजंगासन करताना तुमच्या पोटावर झोप आणि कंबरेच्या खाली भाग सरळ ताठ ठेवा आणि तुमचे डोके, छाती आणि धड नाभी पर्यंत वर उचला आणि हे करताना श्वास घ्या. तुमच्या ओटीपोटाचा भाग हा जमिनीला स्पर्श असुदे आणि तुमचे हात खांद्याला सरळ रेषेमध्ये असू द्या आणि तुमचे मान आणि डोके देखील सरळ असू द्या.
- अधो मुख स्वानसन
अधो मुख स्वानसन करताना तुम्हाला पोटावर झोपावे लागते आणि तुमचे हात आणि पाय जमिनीवर स्पर्श करा. आता तुमच्या हातावर आणि पायावर भार देऊन तुमचे नितंब वर उचला आणि श्वास घेत रहा.
- अश्व संचनासन
आपले गुढघे थोडेसे वाकवा आणि आपले तळवे जमिनीवर आपल्या पायाच्या रेषेमध्ये ठेवा आणि डावा पाय मागे ताणताना उजवा गुढघा छातीच्या उजव्या बाजूला आणा आणि डोके उभे करा.
- हस्त पद्मासन
हस्त पद्मासन करताना श्वास सोडा आणि पुढे वाका आणि तुमच्या हाताच्या बोटांनी तुमच्या पायाच्या बोटांना स्पर्श करा. पाठीचा कणा वाकवू नका आणि तुमची मान देखील शिथिल ठेवा आता ह्याच स्थितीमध्ये तुमच्या हाताच्या बोटांनी तुमच्या पायाच्या टाचांना स्पर्श करा.
- हस्त उत्तनासन
वर आपण हस्त उत्तनासनासाठी ज्या पायऱ्या वापरल्या आहेत त्याच पायऱ्या वापरून हे आसन करावे.
- प्रार्थना मुद्रा
आपण सूर्य नमस्काराच्या सुरुवातीस जशी प्रार्थना मुद्रा करतो तशीच प्रार्थना मुद्रा करा आणि इथे तुमचा सूर्य नमस्कार पूर्ण झाला.
सूर्य नमस्कार चे फायदे मराठी – surya namaskar benefits in marathi
सध्या प्रदूषणाच्या जगामध्ये व्यायाम आणि योगा नियमित करणे हि काळाची गरज आहे. आपले आरोग्य चांगले ठेवण्यासाठी लोकांच्याकडून अनेक योगाचे प्रकार केले जातात जसे कि चक्रासन, पद्मासन, भुजंगासन आणि इतर अनेक प्रकार परंतु सूर्य नमस्कार हा असा योगाचा प्रकार आहे कि ज्यामध्ये आणि मुद्रांचा समावेश होतो त्यामुळे सूर्य नमस्कार नियमितपणे केले तर आपल्याला अनेक आरोग्य फायदे मिळू शकतात ते फायदे काय आहेत ते आपण आता पाहणार आहोत.
- सूर्य नमस्कार केल्यामुळे हात, पाय, पाठीचा कणा, छाती आणि संपूर्ण शरीराला ताण मिळतो त्यामुळे आपल्या शरीरातील स्नायू लवचिक बनण्यास मदत होते.
- सूर्य नमस्काराच्या नियमितपणे सराव करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीच्या जीवनशैलीत कायमस्वरूपी सकारात्मक फरक निर्माण होऊ शकतो.
- सूर्य नमस्काराच्या नियमित सरावाने वजन कमी करण्यासाठी देखील मदत होते.
- जर एखाद्या व्यक्तीला कामाचा तणाव खूप असेल किंवा त्याचे जीवन खूप दगदगीचे असेल तर त्या व्यक्तीने रोजच्या रोज सूर्य नमस्कार केला पाहिजे या मुळे आपला ताण कमी होतो आणि मन शांत होते.
- रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होते तसेच पचनक्रिया देखील चांगली होती.
- सूर्य नमस्कार रोजच्या रोज केल्यामुळे आपल्या हृदय बळकट बनते तसेच हृदयाच्या छोट्या मोठ्या समस्या दूर होतात.
- सूर्य नमस्कार रोज नियमित केल्यामुळे त्वचेचे आणि केसांचे सौंदर्य वाढण्यासाठी मदत होते.
- सूर्य नमस्कार केल्यामुळे अनेक रोगांच्यापासून मुक्ती मिळू शकते त्यामुळे सूर्य नमस्कार नियमित करणे तुमच्या रोग्याच्या फायद्याचे आहे.
आम्ही दिलेल्या surya namaskar information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर सूर्य नमस्कार माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या surya namaskar names in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि surya namaskar steps in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट