स्वच्छता महत्व निबंध मराठी Swachata Che Mahatva Marathi Nibandh

Swachata Che Mahatva Marathi Nibandh – Parisar Swachata Essay in Marathi परिसर स्वच्छता महत्व निबंध मराठी “स्वच्छ भारत, निर्मळ भारत” आज आपण या लेखामध्ये परिसर स्वच्छता या विषयावर निबंध लिहिणार आहोत. स्वच्छतेचे महत्व आपल्या सर्वांनाच माहितच आहे कारण श्रीमंत लोकांच्या पासून ते गरीब लोकांच्या पर्यंत सर्वांना स्वच्छतेचे महत्व माहित आहे. तसेच आपल्या देशामध्ये देखील आपला देश स्वच्छ ठेवण्यासाठी अनेक पावले उचलली आणि त्यामधील एक महत्वाच उपक्रम म्हणजे “स्वच्छता अभियान”. जसे देशाचे सरकार आपला देश स्वच्छ ठेवण्यासाठी धडपडत असते तसेच जर आपण सर्वांनी देखील आपले घर आणि आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवला तर आपला परिसर स्वच्छ राहील आणि अप्रत्यक्षपणे आपला देश देखील स्वच्छ राहील.

आपण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणाचा परिसर हा स्वच्छ असला पाहिजे म्हणजे त्या ठिकाणी कोणताही कचरा असू नये किंवा कोणत्याही प्रकारची दुर्गंधी येवू नये म्हणजे तेथील परिसर हा स्वच्छ असल्यामुळे तेथील हवामान देखील स्वच्छ राहील आणि स्वच्छ हवामान असल्यामुळे आपेल आरोग्य देखील चांगले राहील.

जसे आपल्याला जगण्यासाठी अन्न, वस्त्र आणि निवारा जश्या गरजेच्या आहेत तसेच स्वच्छता देखील महत्वाची आहे आणि आपल्याला स्वच्छते बद्दल लहानपणी पासूनच शिकवले जाते. स्वच्छता म्हणजे आपण सर्व बाबतीमध्ये नीटनेटके पणे काम करणे तसेच कोठेही कचरा न करणे किंवा पाणी दुषित न करणे हे सर्व घटक स्वच्छतेमध्ये समाविष्ट होतात. आपले घर तसेच आपला परिसर स्वच्छ आणि नीटनेटका असला तर आपल्याला कोणाला आवडणार नाही कारण आपल्या सर्वांना वाटते कि आपल्या आजूबाजूचा परिसर हा स्वच्छ आणि नीटनेटका असावा.

swachata che mahatva marathi nibandh
swachata che mahatva marathi nibandh

स्वच्छता महत्व निबंध मराठी – Swachata Che Mahatva Marathi Nibandh

Parisar Swachata Essay in Marathi

पूर्वीच्या काळी ग्रामीण भागामध्ये बघितले तर घराच्या आजूबाजूचा परिसर हा खूप सुंदर, स्वच्छ आणि नीटनेटका होता. म्हणजे घराच्या आजूबाजूला पहिले कि प्रसन्न वाटायचे. ग्रामीण भागामध्ये पूर्वी घराच्या आजूबाजूला कोणत्याही प्रकारचा कचरा नसायचा तसेच परिसर अगदी साफसुत्रा आणि रिकामा असायचा आणि घराच्या समोरील रिकामी जागा शेणाने सारवलेली असायची तसेच घराच्या बाजूला वेगवेगळी झाडे असायची त्यामुळे परिसर अगदी खुलून दिसायचा आणि घराच्या परिसरातील वातावरण देखील चांगले राहायचे तसेच तेथे झाडे असल्यामुळे हवा देखील शुध्द राहत होती आणि लोकांचे आरोग्य देखील चांगले राहत होते.

पण सध्या आपण पहिले तर सगळीकडे अस्वच्छता, कचरा आणि घाण दिसते आणि त्याच प्रमाणे आपल्या रस्त्यावर किंवा आपण राहतो त्या ठिकाणी आपल्याला प्लॅस्टिक पिशव्या तसेच प्लॅस्टिक कचरा पाहायला मिळतो आणि त्यामुळे शहरामध्ये प्लॅस्टिक प्रदूषण खूप झाले आहे. ग्रामीण भागामध्ये तसेच शहरीभागामध्ये देखील आपल्याला अस्वच्छता दिसत आहे.

म्हणजे पूर्वी ग्रामीण भागामध्ये आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवला जात होता परंतु त्याचे प्रमाण देखील कमी झाले आहे आणि शहरीभागामध्ये तर आपल्याला बघेल तिकडे कचरा आणि अस्वच्छ पाहायला मिळते पण या सगळ्यामुळे हवामानावर तसेच मनुष्याच्या आरोग्यावर अनेक परिणाम झालेले पाहायला मिळतात. त्यामुळे लोकांनी आपल्या आजू बाजूचा परिसर हा स्वच्छ ठेवला पाहिजे घराच्या आजूबाजूला कोणत्याही कचरा होणार नाही.

याची काळजी घेतली पाहिजे तसेच परिसरामध्ये कोणत्याही प्रकारची दुर्गंधी येवू नये आयची काळजी घेतली पाहिजे आणि जर दुर्गंधी येत असेल तर लगेच त्यावर उपाय करून दुर्गंधी कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तसेच शहरामध्ये देखील लोकांना कचरा टाकण्यासाठी मोठ्या आकाराच्या कचऱ्याच्या पेट्या असतात त्यामध्ये कचरा टाकला पाहिजे किंवा मग काचेरेवले येतात त्यांच्याकडे कचरा दिला पाहिजे तो कोठेही इतरत्र फेकू नये तसेच ओळ कचरा आणि सुका कचरा वेगवेगळ्या टाकला पाहिजे.

अश्या वेगवेगळ्या प्रकारे आपण आपल्या आजू बाजूचा परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे. आपण जसे नीटनेटके राहतो तसेच आपला परिसर देखील आपण स्वच्छ ठेवला पाहिजे. सार्वजनिक ठिकाणी आपण स्वच्छता ठेवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे रस्त्यावर कचरा टाकणे थांबवले पाहिजे तसेच रस्त्यावर मूत्र विसर्जन किंवा थुंकणे टाळले पाहिजे. पर्यावरणाची किंवा परिसराची स्वच्छता हि खूप महत्वाची आहे.

कारण पर्यावरणाची स्वच्छता हि आपल्या देशाच्या विकासामध्ये महत्वाची भूमिका बजावते म्हणून आपण सर्वांनी आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवला तर अप्रत्यक्षपणे आपला देश देखील स्वच्छ राहील. आपण जर आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ राखला आणि वारंवार स्वच्छता केली तर आपल्या आजू बाजूला राहणाऱ्या लोकांना देखील स्वच्छ करण्यासाठी प्रोस्ताहित होतात आणि आपल्या घराच्या आजूबाजूचे देखील स्वच्छ करतात त्यामुळे आपला भाग स्वच्छ होतो.

अनेक लोक असे म्हणतात कि ज्या ठिकाणी जास्त गरीब लोक आहेत त्या ठिकाणी जास्त गर्दी असते परंतु मला असे वाटत नाही कारण गरिबी आणि स्वच्छता याचा काही संबध नाही. स्वच्छता हि सगळ्यांच्यासाठी सारखीच आहे आणि स्वच्छता हि सर्वांनी केलीच पाहिजे तो गरीब असो किंवा मग श्रीमंत असो.

आपल्या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी पर्यावरण स्वच्छतेला प्रोत्साहन देण्यासाठी स्वच्छ भारत अभियान हि योजना सुरु केली आणि त्यांनी या योजनेमध्ये देखील सहभाग घेतला आणि देश्याच्या आणि पर्यावरणाच्या स्वच्छतेची केवढी गरज आहे यांचे महत्व पटवून देण्याचा प्रयत्न केला. चांगल्या, स्वच्छ, सुंदर आणि नीटनेटक्या पर्यावरणासाठी आणि देशासाठी आपल्या सरकारने सुरु केलेल्या ह्या उपक्रमाला पाठींबा दिला पाहिजे आणि आपला देश आणि आपल्या जुबजुचे पर्यावरन स्वच्छ ठेवले पाहिजे. अश्या प्रकारे आपण परिसर स्वच्छतेचे महत्व समजून घेवून सर्व ठिकाणी स्वच्छता ठेवली पाहिजे.

आम्ही दिलेल्या parisar swachata essay in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर स्वच्छता महत्व निबंध मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या Swachata Che Mahatva Marathi Nibandh या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि Cleanliness essay in Marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये swachateche mahatva marathi nibandh Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!