स्वातंत्र्यवीर सावरकर निबंध मराठी Swatantryaveer Savarkar Essay in Marathi

Swatantryaveer Savarkar Essay in Marathi – Essay on Veer Savarkar in Marathi स्वातंत्र्यवीर सावरकर निबंध मराठी आज आपण या लेखामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी निबंध लिहिणार आहोत. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना कोण ओळखत नाही ज्यांनी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळावे म्हणून इंग्रजांच्या विरुद्ध लढा दिला. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे पूर्ण नाव स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर असे असून त्यांचा जन्म नाशिक मधील भगूर मध्ये २८ मी १८८३ मध्ये झाला. सावरकरांनी हिंदुत्व आणि हिंदू राष्ट्रवादाची विचारधारा तयार केली होती आणि ते हिंदू महासभेतील एक प्रमुख व्यक्ती होती. स्वातंत्रवीर सावरकर यांची समाजक्रांतिकारक, स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक किंवा सेवक, राजकारणी, कवी आणि लेखक अशी त्यांची ओळख होती.

त्यांच्या वडिलांचे नाव दामोदर विनायक सावरकर आणि आईचे नाव राधाबाई दामोदर शास्त्री असे होते. सावरकरांना दोन भावू होते आणि ते म्हणजे बाबाराव आणि नारायाराव होय. स्वातंत्रवीर यांची आई हि त्यांच्या खूप लहान वयात म्हणजेच ते ९ वर्षाचे असतानाच वारली त्यामुळे त्यांना त्यांच्या आईचा सहवास जास्त मिळाला नाही.

त्यानंतर इ.स १८९९ मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे वडील म्हणजेच दामोदर विनायक शास्त्री यांना प्लेग झाला आणि ते मरण पावले आणि त्यांनतर त्यांचे पालन पोषण त्यांच्या मोठ्या भावाची बायको म्हणजेच त्यांची येसूवहिनी यांनी त्यांचा सांभाळ केला. स्वातंत्रवीर सावरकर यांनी इ.स १९०२ मध्ये फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये प्रवेश घेवून त्यांनी इ.स १९०६ मध्ये आपले उच्च शिक्षण पूर्ण केले.

swatantryaveer savarkar essay in marathi
swatantryaveer savarkar essay in marathi

स्वातंत्र्यवीर सावरकर निबंध मराठी – Swatantryaveer Savarkar Essay in Marathi

युगप्रवर्तक सावरकर निबंध – Vinayak Damodar Savarkar Essay In Marathi

वीर सावरकरांच्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील सहभागाबद्दल ब्रिटिश सरकारने त्यांची पदवी काढून घेतली. जून १९०६ मध्ये ते बॅरिस्टर होण्यासाठी लंडनला गेले. त्यांनी भारताच्या स्वातंत्र्य संग्रामावर “द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स १८५७” हे पुस्तक लिहिले, ज्यावर ब्रिटिशांनी बंदी घातली होती. लंडनमध्ये असताना त्यांनी इंग्लंडमधील भारतीय विद्यार्थ्यांना ब्रिटीश वसाहतवादी धन्यांच्या विरोधात प्रोत्साहन दिले.

स्वातंत्र्यवीर सावरकर हे ज्यावेळी कॉलेज मध्ये होते त्यावेळी त्यांनी कॉलेजमध्ये एक विद्यार्थ्यांच्या गटावर वर्चस्व मिळवले आणि त्यांनी मित्र मेळा हे गटाचे नाव बदलिउन अभिनव भारत असे ठेवले. स्वातंत्र्यवीर सावरकरांना असे वाटायचे कि भारत स्वातंत्र्य झालाच पाहिजे, आपला भारत देश संघटीत असलाच पाहिजे, भारत हे प्रजासत्ताक असलेच पाहिजे, भारताकडे समान भाषा असलीच पाहिजे असे वाटत होते आणि त्यांनी त्याच्यासाठी प्रयत्न केले.

इ.स १९०५ मध्ये त्यांनी बंगालच्या फाळणीबद्दल संताप व्यक्त करण्यासाठी त्यांनी त्यांच्या विद्यार्थ्यांच्यासोबत एक विदेशी वस्तूंची मोठी बाजारपेठ आग लावली. ज्यावेळी चाफेकर बंधूंना फाशी मिळाली होती त्यावेळी हे समजल्यानंतर सावरकरांनी त्यांची कुलदेवता भगवती देवीच्या मंदिरामध्ये शपथ घेतली होती कि देशाला स्वतंत्र मिळवण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करेन आणि असे देखील म्हणातले होते कि मारीत मारिता मरेतो झुंजेन.

ज्यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर पॅरीस हून लंडनला चालले होते त्यावेळी त्यांना अटक करण्यात आली होती आणि त्यावेळी सावरकरांना असे वाटू लागले कि जर आपल्यावर होणारा खटला हा भारतामध्ये सुरु राहिला तर चांगले होईल म्हणून त्यांनी फ्रान्स मधील मार्सेलिस बंदरामधून समुद्रामध्ये उडी घेतली आणि ते गोळ्यांचा वार चुकवत ते पुढे पोहत जात होते आणि त्यांनी तसे करत फ्रान्सचा समुद्र किनारा गाठला परंतु त्यांना फ्रान्स मध्ये ब्रिटीश सैनिकांनी पुन्हा अटक केले होते.

Essay on Veer Savarkar in Marathi

इ.स १८९७ मध्ये इंग्रजांच्या विरुध्द भारतामध्ये झालेला उठावावर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अठराशे सत्तावनचे स्वातंत्र्य समर हा ग्रंथ लिहिला होता. हा इ.स १८५७ मध्ये झालेला उठाव हा फक्त उठाव नसून हा एक बंड होता. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी इ.स १८५७ मध्ये झालेल्या भारतीय बंडाबद्दल ‘भारतीय स्वातंत्र्य युद्ध’ प्रकाशित केले होते परंतु हे ब्रिटीश अधिकाऱ्यांना समजताच त्यांनी यावर बंदी घातली होती.

वीर सावरकरांना इ.स १९१० मध्ये क्रांतिकारी गट इंडिया हाऊस संबधित असल्यामुळे त्यांना ब्रिटिशांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. मार्सेलिसमधून पळून जाण्याचा अयशस्वी प्रयत्न केल्यानंतर त्याला दोन जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.

तसेच त्यांना अंदमान निकोबार बेटावरील सेल्युलर जेलमध्ये नेण्यात आले होते. इ.स १९२१ मध्ये त्यांनी क्षमा याचिकेवर स्वाक्षरी केल्यावर त्यांची सुटका करण्यात आली ज्या अंतर्गत ते क्रांतिकारी क्रियाकलापांचा त्याग करतील. सावरकरांनी हिंदू महासभेच्या राजकीय पक्षाचे अध्यक्ष म्हणून काम केले आणि हिंदु राष्ट्र (हिंदू राष्ट्र) म्हणून भारताची कल्पना मांडली. सावरकरांनी १९४२ च्या भारत छोडो आंदोलनाला विरोध केला. त्याचबरोबर सावरकरांवर महात्मा गांधींच्या हत्येच्या कटात सहभाग असल्याचा आरोप होता, परंतु नंतर न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली.

हे दुर्दैव आहे की सावरकर हे कवी, कादंबरीकार, लघुकथा लेखक, नाटककार, इतिहासकार आणि भाषेच्या ‘शुध्दीकरणाचे’ चॅम्पियन होते हे फार कमी लोकांना माहीत होते. सावरकरांची कविता हा चिरस्थायी वारसा आहे, जो जवळपास प्रत्येक महाराष्ट्रीयाला माहीत आहे. सावरकरांनी त्यांची पहिली कविता “स्वदेशीचफटका” वयाच्या ११ व्या वर्षी रचली आणि शाळेत आणि लंडनमध्ये विद्यार्थी म्हणून लेखन चालू ठेवले. अंदमान येथील सेल्युलर जेलमध्ये असताना त्यांची काही उत्कृष्ट कामे लिहिली गेली.

सावरकरांनी इतिहासावर तीन पुस्तके लिहिली: भारतीय स्वातंत्र्ययुद्ध इ.स १८५७,  हिंदुपदपादशाही आणि सहा गौरवशाली युगे . या पुस्तकांतून त्यांचा इतिहासाचा सखोल अभ्यास आणि अंतर्दृष्टी,  तपशिलाची तळमळ आणि प्रेरणादायी पण चांगल्या प्रकारे संशोधन केलेली सामग्री दिसून येते. हिंदुत्व’ हे पुस्तक रत्नागिरी कारागृहात लिहिले गेले.

६ जानेवारी १९२४ रोजी त्यांची तुरुंगातून सुटका झाली आणि नंतर त्यांनी प्राचीन भारतीय संस्कृतीचे जतन करण्यासाठी रत्नागिरी हिंदू सभेची स्थापना केली आणि सामाजिक कल्याणाच्या दिशेने कार्य केले. नंतर ते टिळकांनी स्थापन केलेल्या स्वराज पक्षात सामील झाले आणि हिंदू महासभा या वेगळ्या राजकीय पक्षाची स्थापना केली आणि त्याचे अध्यक्ष म्हणून निवडून आले.

अश्या प्रकारे सावरकर इंडिया हाऊसशी संबंधित होते आणि त्यांनी अभिनव भारत सोसायटी, फ्री इंडिया सोसायटी यासह विद्यार्थी संघटनांची स्थापना केली आणि क्रांतीद्वारे संपूर्ण भारतीय स्वातंत्र्य मिळवण्याचे बोलणारी प्रकाशने सुरू केली. अमर चित्रकथा या संस्थेने इ.स १९७० च्या दशकात त्यांच्यावर एक कॉमिक बुक प्रकाशित केले. २००२ मध्ये अंदमान आणि निकोबार बेटावरील पोर्ट ब्लेअर विमानतळाचे नामकरण वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळ करण्यात आले.

आम्ही दिलेल्या swatantryaveer savarkar essay in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर स्वातंत्र्यवीर सावरकर निबंध मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या yoga information in marathi language pdf या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information of yoga in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Vinayak Damodar Savarkar Essay In Marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!