स्वावलंबन मराठी निबंध Swavalamban Essay in Marathi

Swavalamban Essay in Marathi – Self Reliance Essay in Marathi स्वावलंबन मराठी निबंध आज आपण या लेखामध्ये स्वावलंबन या विषयावर निबंध लिहिणार आहोत. स्वावलंबन म्हणजे कोणावरहि अवलंबून न राहता आपण आपले स्वताचे काम करणे शिकणे म्हणजे स्वावलंबन होय. जर आपण स्वताचे काम कशाचाही वाट किंवा कोनाच्यावर लादवून करण्याऐवजी आपण जर स्वताच केले तर ते काम चांगल्या प्रकारे आणि आपल्या मनासारखे होते म्हणून जगातील प्रत्येक माणसाने आपले काम हे आपण स्वता केले पाहिजे. स्वावलंबन हे माणसाला स्वातंत्र्यपणे जगण्यासाठी आणि आपल्या मनासारखे करण्यासाठी प्रोत्साहित करते.

आणि त्यामुळे आपल्याला आपण जे काम करतो त्याच्यापासून आपल्याला समाधान मिळते त्यामुळे स्वावलंबन हे आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्वाचे आहे. जे लोक स्वावलंबी असतात ते नशिबावर विश्वास ठेवत नाहीत किंवा ते असे देखील म्हणत नाहीत कि आपण कितीही आटापिटा केला किंवा एखादी गोष्ट मिळवण्यासाठी कष्ट केले तरी आपल्याला काही मिळत नाही तर आपल्याला जे मिळते ते आपल्या नशिबावर मिळत असते किंवा आपल्याला नशिबात आहे तेवढेच मिळते असे म्हणत नाही तर ते आपल्या कामावर, प्रामाणिक प्रयत्नांच्यावर आणि आपल्या स्वावलंबी वृत्तीवर विश्वास ठेवतात आणि आपल्या सर्व इच्छा आणि स्वप्ने पूर्ण करतात.

त्याचबरोबर ते कोणतीही संधी आपल्या पर्यंत येण्याची वाट पाहत नाहीत तर ते स्वताच स्वतासाठी संधी निर्माण करतात आणि त्याचे आपल्या आयुष्यासाठी सोने बनवून घेतात किंवा संधीचा पुरेपूर फायदा घेतात. तसेच या प्रकारची वृत्ती असणारे लोक कोणत्याही परिस्थितीला दोष देत नाहीत किंवा ते म्हणत नाहीत कि आपल्या आयुष्यामध्ये अनेक संकटे येतात आणि माझ्या आयुष्यामध्ये असेच होते म्हणून ते शांत बसत नाहीत तर ते त्यांच्या आयुष्यामध्ये येणाऱ्या सर्व संकटांना अगदी ध्येयाने सामोरे जातात आणि आपल्या सर्व अडचणी दूर करण्याचा प्रयात करत असतात.

swavalamban essay in marathi
swavalamban essay in marathi

स्वावलंबन मराठी निबंध – Swavalamban Essay in Marathi

Self Reliance Essay in Marathi

स्वावलंबी लोक हे स्वताचे काम स्वताच करतात तर ते कोणाला करण्यासठी सांगत नाहीत किंवा कोणाकडून ते करवून घेत नाहीत तर त्यांना आपले काम हे आपणच करण्यात समाधान वाटत असते. जर एकदा व्यक्ती स्वावलंबी असेल तर त्या व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तींच्या कडून सन्मान मिळतो आणि त्याच्या अवतीभोवातीचे लोक त्या व्यक्तीला आदर देतात अश्या प्रकारे स्वावलंबी व्यक्तीला अनेक फायदे होतात. स्वालंबी असणाऱ्या व्यक्तीचा आपोआप पाने आत्मविश्वास वाढतो आणि आत्मविश्वास वाढल्यामुळे व्यक्ती कुठेही तटत नाही.

सध्याच्या जगामध्ये लोक हे पैसे मिळवण्यासाठी खूप व्यासात झाला आहे आणि सध्याच्या जगामध्ये स्वावलंबन हा शब्द पैश्याशी जोडला आहे म्हणजेच आज पैसा असेल तर आपण सर्व गोष्टी पूर्ण करू शकतो आणि जर ह्या आपल्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी आपल्याकडे आपण स्वता मिळवलेला पैसा असेल तर त्या मनुष्याला स्वावलंबी मनुष्य म्हणून संबोधू शकतो कारण हा व्यक्ति आपल्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी कोणावरही अवलंबून असत नाही तर स्वताच्या इच्छा आणि स्वप्न स्वताच पूर्ण करतो.

त्यामुळे सध्याच्या जगामध्ये आपल्याला जर स्वावलंबी जीवन जगायचे असेल तर आपल्याला पैसे मिळवले पाहिजेत जेणेकरून आपण आपल्या इच्छा पूर्ण करू शकू. मला असे वाटते कि देवाने आपल्याला जन्म दिला आहे तो स्वावलंबी बनून आपल्या कुटुंबासाठी, आपल्या आजूबाजूच्या लोकांच्यासाठी किंवा देशासाठी काही तरी करण्यासाठी केला जातो. देवाने आपल्याला जे हात, पाय, मेंदू दिलेले आहेत ते स्वताच्या हिंमतीवर कष्ट करून आपल्या गरजा आपण भागवण्यासाठी.

जर तुम्हाला स्वावलंबी बनायचे असेल तर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये काही ना काही बदल घडवले पाहिजेत ज्यामुळे तुम्ही आत्मनिर्भर किंवा स्वावलंबी बनू शकता आणि तुम्हाला तुमच्या स्वताच्या जीवावर काही तरी केले तर तरच तुम्हाला तुमच्या आजूबाजूचे लोक ओळखतील आणि तुमचा आदर – सन्मान करतील. जर एकदा व्यक्ती स्वावलंबी असेल तर तो व्यक्ती त्याच्या जीवनातील निर्णय हे स्वताच घेवू शकतो तसेच स्वावलंबी असणाऱ्या व्यक्तीचा विश्वास हा अपोआपपणे वाढतो.

जे व्यक्ती स्वावलंबी असतात ते कर्तव्य निष्टावान असतात म्हणजेच अश्या प्रकारच्या व्यक्तीला आपली कर्तव्ये आणि आपल्या जबाबदाऱ्या माहित असतात. तसेच त्या व्यक्तींना आपल्या कुटुंबांलेखी किंवा आपल्या आई वडिलांच्या विषयी आपल्या काय जबाबदाऱ्या आहेत ते माहित असते जर एखादा व्यक्ती स्वावलंबी नसेल तर तो दुसऱ्यांच्यावर अवलंबून असतो आणि त्यामुळे त्या व्यक्तीची प्रगती होत नाही.

परंतु जर एखादा व्यक्ती स्वावलंबी असेल तर तो आपल्या संधी आपणच निर्माण करतो किंवा आपली स्वप्ने आपण पूर्ण करण्यासाठी धडपडत असतो. अश्या प्रकारची व्यक्ती कामासाठी कोणावर अवलंबून राहत नाहीत तर ते आपले काम आपणच करतात त्यामुळे त्यांची चांगल्या प्रकारे प्रगती होते आणि त्यामुळे यामधून देशाची देखील प्रगती होते.

स्वावलंबन हे एखाद्या व्यक्तीला समाजामध्ये एक प्रतिष्ठीत नागरिक बनवण्यासाठी मदत करते. अश्या प्रकारे एकाद्या व्यक्तीकडे स्वावलंबन हा गुण असेल तर अश्या प्रकारच व्यक्ती कुठेही तटत नाहीत तसेच तो आपली स्वप्ने आणि इच्छा पूर्ण करण्यासाठी आपणच धडपडत असतो तसेच तो आपल्या पर्यंत कोणतीही संधी येण्याची वाट पाहत नाही तर तो संधीची निर्मिती करतो आणि अश्या प्रकारे स्वावलंबी वृत्तीने सर्व साध्य करतो आणि आपल्याला जर आपल्या इच्छा पूर्ण करायच्या असतील तर जीवनात स्वावलंबी बनणे खूप गरजेचे असते.

जसा व्यक्ती स्वावलंबी असतो तसाच आपला देश देखील स्वावलंबी असला पाहिजे म्हणजेच अनेक वेगवेगळ्या गोष्टींच्यासाठी दुसऱ्या देशांच्यावर अवलंबून असला नसला पाहिजे तर देशाने आपल्या सर्व तडजोडी ह्या आपण स्वत केल्या पाहिजेत म्हणजेच आपल्या देशामध्ये जे काही लागते ते दुसऱ्या देशातून आयात करण्याऐवजी त्या आपल्या देशामध्ये कश्या उपलब्ध करून देता येतील याचा विचार केला पाहिजे आणि स्वावलंबी बनले पाहिजे.

जर आपल्या देशाचा स्वाभिमान आणि स्वातंत्र्य आपल्याला टिकवून ठेवायचे असल्यास आपण आपला देश स्वावलंबी बनवला पाहिजे ज्यामुळे आपल्या देशाला इतर देशांच्याकडून आदर सन्मान मिळेल तसेच देशाला कोणत्याही दुसऱ्या देशाचे ऐकावे लागणार नाहीत तसेच आपला देश जर स्वावलंबी बनला तर आपल्या देशाचा विकास देखील चांगला होईल आणि यामुळे आपल्या देशाची प्रतिष्ठा देखील वाढेल.

आम्ही दिलेल्या swavalamban essay in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर स्वावलंबन मराठी निबंध बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या self reliance essay in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!