ताडासन मराठी माहिती Tadasana Information in Marathi

tadasana information in marathi ताडासन मराठी माहिती, योग हा सध्याच्या दगदगीच्या आणि प्रदूषणाच्या काळामधील एक डोस बनला आहे कारण आपण जर नियमितपणे योग आणि वेगवेगळ्या प्रकारची योग असणे केली तर आपल्याला शरीरामध्ये एक चांगली उर्जा मिळते तेच आपले आरोग्य देखील चांगले राहण्यास मदत होते. योग हा आपल्या आयुष्यातील असा घटक आहे कि आपण याचा रोजचा सराव केला तर आपल्याला ते अनेक रोगांच्या पासून दूर ठेवू शकते तसेच आपल्या शरीराला मजबूत बनवून आपली प्रतिकार शक्ती देखील वाढवण्यास मदत होते.

योग करणे हे रोजच्या जीवनातील एक महत्वाची क्रिया बनली आहे कारण सध्याच्या दगदगीच्या आणि प्रदूषणाच्या काळामध्ये आपल्याला अनेक आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागते आणि या आरोग्य समस्यांच्या पासून जर आपल्याला आपला बचाव करून घ्यायचा असेल तर आपल्याला रोज नियमित पण वेगवेगळ्या प्रकारेचे व्यायाम आणि योगासन करणे खूप गरजेचे आहे त्यामुळे आपले आरोग्य देखील चांगले राहते आणि आपली जीवनशैली देखील सकारात्मक बनण्यास मदत होते.

अनेक आरोग्य फायद्यासाठी अनेक योग प्रकार केले जातात जसे कि अन्लोम विन्लोम, प्राणायाम, सूर्य नमस्कार, चक्रासन, पद्मासन, वज्रासन, भुजंगासन, ताडासन, गोमुखासन आणि इतर अनेक प्रकार केले जातात आणि आज आपण या लेखामध्ये “ताडासन” विषयी माहिती घेणार आहोत. चला तर आता आपण ताडासन काय आहे, ते कसे केले जाते आणि त्याचे आरोग्य फायदे काय आहेत या विषयी संपूर्ण माहिती सविस्तर घेऊया.

tadasana information in marathi
tadasana information in marathi

ताडासन मराठी माहिती – Tadasana Information in Marathi

आसनाचे नावताडासन
इंग्रजी नावmountain pose
अर्थसंस्कृत मध्ये तड म्हणजे पर्वत आणि आसन म्हणजे मुद्रा
करण्याची पातळीसोपी
फायदेएकाग्रहता वाढवणे, पाठीचा कणा आणि स्नायू यांच्यामध्ये सुधारणा, उंची वाढण्यासाठी मदत.

ताडासन विषयी माहिती – information about tadasana in marathi

ताडासन हा एक योगामधील प्रकार आहे आणि हे आसन सर्व उभ्या योगासनाचा पाया आहे असे म्हटले जाते आणि या मुद्रेला इंग्रजी मध्ये मांऊटेन पोझ ( mountain pose ) असे म्हणतात तर ताडासन हे संस्कृत नाव आहे म्हणजेच संस्कृत मध्ये तड म्हणजे पर्वत आणि आसन म्हणजे मुद्रा आणि हे आसन पर्वतासारखे दिसते म्हणून त्याला ताडासन म्हणतात. ताडासन हि इतर योग मुद्रेपेक्षा खूप सोपी मुद्रा जरी असली तरी यांचे अनेक आरोग्य फायदे आहेत.

असंतुलित स्नायू सुधारण्यासाठी या मुद्रेचा फायदा होतो तसेच या मुद्रेच्या नियमित सरावाने एकाग्रहता वाढवण्यासाठी देखील मदत होते त्याचबरोबर ज्या लोकांचा पाठीचा कणा हा कमकुवत आहे आणि ज्यांना पाठीच्या समस्या आहेत अश्या लोकांनी हि योगमुद्रा रोजच्या रोज केली तर त्यांच्या या समस्या दूर होऊ शकतात आणि आणखी अनेक फायदे हि मुद्रा नियमित केल्यामुळे होतात ते आपण खाली पाहणार आहोत.

ताडासन कसे केले जाते – steps 

  • प्रथम जमिनीवर चटई किंवा जमखाना अंथरून घ्या.
  • आता चटईवर उभे रहा आणि तुमच्या दोन्ही पायांच्यामध्ये अंतर ठेवा आणि आपले हात हे आपल्या शरीराच्या बाजूला असले पाहिजेत.
  • त्यानंतर खोलवर श्वास घ्या आणि हळू हळू तुमचे हात वर करत रहा आणि मग नंतर तुमचे दोन्ही हाताची बोटे एकमेकांना लावा.
  • आता तुमची तच थोडी वर करा आणि तुमच्या पायाच्या बोटांच्यावर उभे राहण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुम्हाला तुमचे शरीर ताणले आहे असे वाटेल आणि या स्थितीमध्ये टीमही वर बघा.
  • तुमच्या शरीराचे वजन हे तुमच्या पायाच्या बोटांच्यावर ठेवा आणि तुमचे खांदे, हात छाती वर पसरवा आणि थोडा वेळ याच स्थितीमध्ये राहण्याचा प्रयत्न करा.
  • आता श्वास सोडा आणि तुमच्या सुरवातीच्या स्थितीमध्ये परत या.

ताडासन करण्याचे फायदे – tadasana benefits in marathi

योग हा नियमित करण्याचे अनेक आरोग्य फायदे असतात आणि ताडासन देखील एक योगाचा प्रकार आहे आणि जर ताडासन हे नियमितपणे केले तर आपल्याला ह्याचे अनेक आरोग्य फायदे मिळू शकतात. चला तर आता आपण ताडासनाचे वेगवेगळे फायदे काय आहेत ते पाहूया.

  • काही मुलांना आपल्या उंची वाढेल कि नाही याचे खूप टेन्शन असते अश्या मुलांनी जर या मुद्रेचा सराव लवकर करण्यास सुरुवात केली आणि ते नियमितपणे केले तर त्या मुलांची उंची वाढू शकते म्हणजेच हे असं उंची वाढवण्यासाठी खूप उपयोगी आहे.
  • सध्याच्या प्रदूषणाच्या काळामध्ये श्वास घेण्याच्या, हृदयाच्या आणि फुफ्फुसाच्या अनेक आरोग्य समस्या उद्भवतात पण जर तुम्ही नियमित सराव केला तर तुमचे फुफ्फुस उघडते तसेच चांगले काम करण्यास मदत होते.
  • ताडासनाच्या नियमित सरावाने आपल्यला आपल्या खोल चेतानांशी जोडले जाण्यास मदत होते आणि तुमची मानसिक जागरूकता वाढवण्यास मदत होते तसेच तुम्हाला शांत आणि संयमित बनण्यास मदत होते.
  • ताडासन रोज न चुकता केल्याने यामुळे आपली उर्जा पातळी वाढण्यासाठी मदत होते आणि यामुळे थकवा जाणवत नाही आणि मन, शरीर आणि आत्मा यांना पुनरुज्जीवित करते.
  • ज्या व्यक्तींना पाठीचा कणा किंवा स्नायूंच्या काहीही समस्या आहेत अश्या व्यक्तींनी ताडासन हे रोज केल पाहिजे ज्यामुळे त्यांच्या ह्या समस्या दूर होतात.
  • या मुद्रा केल्यामुळे आपल्या संपूर्ण शरीराला ताण पडतो आणि आपल्या शरीरातील स्नायू देखील सैल होतात आणि त्यामुळे आपले शरीर लवचिक बनण्यासाठी मदत होते.
  • ताडासन केल्यामुळे सायटिक वेदना कमी होण्यास मदत होते त्याचबरोबर याच्या नियमित सरावाने पाठ, नितंब आणि पाय मजबूत बनतात.
  • ताडासनाच्या सरावाने पाठीमधील, कंबरेच्या आणि खांद्याच्या वेदना कमी होतात.
  • जे लोक ताडासनाचा सराव करतात अश्या व्यक्तींची चपळता वाढते तसेच हे तुमच्या शरीरातील मुख्य स्नायूंना टोनिंग करण्यास मदत करते.
  • यामुळे रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होते.
  • पार्किन्स रोगाचे निदान झालेल्या व्यक्तीने ताडासन केले तर ते फायदेशीर ठरू शकते कारण ते त्यांना शरीरातील टाकत वाढवण्यासाठी मदत करू शकते.
  • अँकीलोझिंग स्पॉन्डिलायटीस ग्रस्त लोकांना अनेकदा से आढळून आले आहे कि ताडासन आसन या आजारांशी संबधित वेदना कमी करण्यासाठी मदत करते. हे त्यांना त्यांची लवचिकता वाढवण्यासाठी देखील मदत करते.

आम्ही दिलेल्या tadasana information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर ताडासन मराठी माहिती बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या tadasana yoga information in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि information about tadasana in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये tadasana information in marathi wikipedia Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!