Tatya Tope Information in Marathi तात्या टोपे यांची माहिती भारताचा इतिहास हा नेहमीच थरारक व अभिमानास्पद राहिला आहे. भारताला अनेक वीर क्रांतिकारक लाभले होते. ज्यांनी भारताला ब्रिटिशांच्या गुलामगिरीच्या कैदी मधून मुक्त करण्यासाठी भरपूर प्रयत्न केले. वेळ आली तर स्वतःच्या जीवाची पर्वा न करता भारत मातेचे रक्षण केलं. आजच्या लेखामध्ये देखील आपण एका महान क्रांतिकारका विषयी माहिती जाणून घेणार आहोत. तात्या टोपे हे भारतीय स्वातंत्र्य सेनानी होते. भारत भूमीला ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून वाचवण्यासाठी यांनी अथक प्रयत्न केले. स्वातंत्र्य समराच्या लढाईमध्ये यांनी मुख्य भूमिका बजावली आहे. तर जाणून घेऊ या स्वातंत्र्य सेनानी तात्या टोपे यांच्या संघर्षाची वीरगाथा.
क्रांतिकारक तात्या टोपे यांची माहिती – Tatya Tope Information in Marathi
पूर्ण नाव | तात्या टोपे |
जन्म | 16 फेब्रुवारी १८१४ |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
वडील | पांडुरंग राव |
आई | रुक्मिणी |
जन्मगाव | नाशिक येथील एका येवला नावाच्या गावांमध्ये |
मृत्यू | १८ एप्रिल १८५९ |
जन्म
सन १८१४ मध्ये स्थळ नाशिक येथील एका येवला नावाच्या गावांमध्ये तात्या टोपे यांच्यासारख्या वीर पुरुषाने जन्म घेतला. तात्या टोपे यांचं पूर्ण नाव रामचंद्र पांडुरंग राव असं होतं. तात्या टोपे यांचा ब्राह्मण घराणं होतं. तात्या हे रामचंद्र यांचं खरं नाव असून तात्या हे त्यांचे टोपण नाव आहे. प्रेमाने सगळे त्यांना तात्या म्हणायचे.
तात्या यांची आई रुक्मिणी या एक साध्या गृहिणी होत्या तर त्यांचे वडील पांडुरंग हे दुसरा बाजीराव पेशवा यांच्या इथे सेवा देत होते. बाजीराव पेशवा यांच्या हाताखालीची सगळी कामे तात्या टोपे यांच्या वडिलांकडे असायची. पुढे जाऊन तात्या आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराला उत्तर प्रदेशातील कानपूर जवळ बिठूर इकडे स्थान शबद्ध व्हावं लागलं.
त्याचं कारण म्हणजे द्वितीय बाजीराव पेशवा हे ब्रिटिशांविरुद्धच्या एका युद्धामध्ये अयशस्वी ठरले आणि त्यांच्या त्यांना राज्य सोडून दुसरीकडे स्थलांतर करावं लागलं. बाजीराव पेशवा यांच्यासोबत त्यांच्या हाताखालची काही माणसे ज्यामध्ये तात्या व त्यांच्या कुटुंबाचा देखील समावेश होता.
हे सगळेच उत्तर प्रदेशामध्ये जाऊन स्थायिक झाले. तिकडे गेल्यावर दुसरे बाजीराव पेशवे यांनी दत्तक घेतला त्यांचा दत्तक पुत्र नानासाहेब यांच्यासोबत तात्या टोपे यांची जिवाभावाची मैत्री झाली.
शिक्षण
तात्या टोपे यांचा लहानपणापासूनच युद्धाशी संबंध आल्यामुळे युद्ध, सैन्य या सगळ्या गोष्टी त्यांना आवडू लागल्या. त्यासोबतच त्यांनी युद्धात प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. त्यासोबतच त्यांचे जिवलग मित्र नानासाहेब त्यांच्यासोबत त्यांनी शालेय शिक्षण देखील घेतलं.
अण्णा साहेबांचा उजवा हात म्हणून तात्या टोपे यांची ओळख निर्माण झाली. तात्या यांना युद्धामध्ये आवड निर्माण झाली त्यामुळे युद्धा संबंधित जी काही कामे असायची की तात्या टोपे शिकून घ्यायचे. ते साहसी आणि पराक्रमी देखील होते.
अठराशे सत्तावनचा लढा
तात्या टोपे यांचे वडील बाजीराव पेशवे यांच्या इथे सेवेस होते. त्यामुळे लहानपणापासून तात्यांना युद्ध, राजकारण युद्धाशी संबंधित इतर गोष्टी या सगळ्यांचा परिचय होता. शिवाय तात्या आणि द्वितीय बाजीराव पेशवे यांचे दत्तकपुत्र नानासाहेब यांच्यामध्ये जीवलग मैत्रीचं नातं होतं. बाजीराव पेशव्यांचा पराभव झाला तेव्हा राजाला आणि राज्यातील बऱ्याच लोकांना स्थलांतर करावं लागलं होतं.
शिवाय ब्रिटिशांनी केलेला अत्याचार ब्रिटिशांची खूप क्रूरतेची वागणूक तात्या यांनी अगदी जवळून पाहिली होती. त्यामुळे कुठेतरी त्यांच्या मनामध्ये ब्रिटिशांविरुद्ध तो राग होता शिवाय, ब्रिटिशांकडून मिळणारी वागणूक यामुळे तात्या यांच्या मनामध्ये एक क्रांतिकारक भावना निर्माण झाली होती.
इसवीसन अठराशे सत्तावन मध्ये इंग्रजांचा सेनानी जनरल लॉर्ड डलहौजी याने संपूर्ण भारतातील वेगवेगळ्या प्रांतांवर आपले अयोग्य नियम लागू करण्यास सुरुवात केली. हे नियम इतके क्रूर होते याच्या मध्ये संपूर्ण राज्याची आणि प्रजेचे हाल होऊ लागले. या प्रांतांमध्ये द्वितीय बाजीराव पेशवे यांच्या प्रांताचा देखील समावेश होता.
शिवाय हे ब्रिटिश राजांनी निवडून दिलेल्या उत्तराधिकार यांचा स्वीकार करण्यास देखील नकार देत होते. बाजीराव पेशवे यांचे उत्तराधिकारी नानासाहेबांना उत्तराधिकारी माण्यास ब्रिटिशांनी नकार दिला. या गोष्टींचा नानासाहेब व त्यांचे जिवलग मित्र तात्या टोपे यांच्या मनात राग होता त्यामुळे या दोघांनी संधी साधून ब्रिटिशांना अद्दल घडवू देण्याचे ठरवले. व त्यांना त्यांची लायकी दाखवून द्यायचा असा निश्चय केला.
तात्या टोपे व नानासाहेबांनी आपली एक विशेष सेना तयार केली. द्वितीय बाजीराव पेशव्यांच्या मृत्यूनंतर इंग्रजांनी आठ लक्ष रुपये पेन्शन जनतेला मिळायचे तेदेखील देणं बंद केलं. जनतेची होणारी हेळसांड याशिवाय नाना साहेबांकडून हिरावून घेतलेले त्यांचे अधिकार या सगळ्यांचा राग तात्या टोपे यांच्या मनामध्ये होता.
त्यामुळे इंग्रजांच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा षडयंत्र तात्या टोपे आणि नानासाहेबांनी तयार केलं. तात्या टोपे आणि नानासाहेब यांनी आपली स्वतःची सेना बनवून इंग्रजांवर हल्ला केला. या युद्धामध्ये नानासाहेब तात्या टोपे यांनी कानपूर वर कब्जा केला. यानंतर नानासाहेब यांना कानपुर चे पेशवा आणि तात्या टोपे यांना सेनापती म्हणून नियुक्त करण्यात आलं.
इंग्रजांनी पुन्हा कानपुर वर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि या युद्धामध्ये इंग्रजांनी पुन्हा कानपुर वर ताबा मिळवला. या युद्धानंतर नानासाहेब पेशवे यांनी हार स्वीकारली आणि त्यांनी नेपाळ येथे स्थलांतर करावे लागले. परंतु तात्या टोपे हे आपल्या राज्याशी एकनिष्ठ होते. त्यांना कसंही करून इंग्रजांना हरवायच होते.
त्यामुळे तात्या टोपे यांनी आपली वेगळी स्वतंत्र सेना निर्माण करून पुन्हा इंग्रजांवर हल्ला केला. परंतु दुर्दैवाने हे युद्ध त्यांच्या मनासारखे झाले नाही आणि त्यांना या युद्धातून पळ काढावा लागला.
तात्या टोपे यांचे वडील द्वितीय बाजीराव पेशवे यांच्या येथे सेवेत होते. त्यानंतर तात्या टोपे यांची निष्ठा पाहून बाजीराव पेशवे तात्या टोपे यांना आपल्या राज्याचा मुनीम म्हणून नेमलं. आपल्याला दिलेली जबाबदारी तात्या टोपे यांनी अत्यंत उत्तमपणे पार पाडली. ज्यामुळे राज्याला देखील फायदाच झाला. तात्या टोपे यांनी राज्यात होणारे भ्रष्टाचार काळे धंदे याशिवाय राज्याला अधिक प्रबोधन कारक बनवण्याचा प्रयत्न केला.
बाजीराव पेशवे यांनी तात्या टोपे यांची राज्या विषयीची काळजी व कर्तव्य परायणता पाहून तात्या टोपेंना आपल्या राजदरबारात बोलवून रत्नजडीत मौल्यवान टोपी घालून त्यांचा सन्मान करण्यात आला. तेव्हापासून त्यांचे नाव टोपे असं पडलं असं काही लोकांचं मत आहे.
झाशीची राणी आणि तात्या टोपे
झाशीची राणी आणि तात्या टोपे हे एकमेकांचे बालपणीचे मित्र मैत्रिण होते. एकमेकांसोबत शाळेत जाणं शिवाय खेळायला देखील सोबत असणं. ब्रिटिशांनी लावलेल्या क्रूर नियमांमध्ये झाशीची राणी देखील अडकली होती. झाशीच्या राणीचे उत्तराधिकारी दामोदर राव यांना उत्तराधिकारी मांण्यास ब्रिटिशांचा नकार होता. शिवाय झाशी वर त्यांचा डोळा होता.
या युद्धामध्ये देखील झाशीला ब्रिटिशांच्या ताब्या मध्ये जाऊन देण्यापासून वाचवले. अठराशे सत्तावन्न मध्ये इंग्रजांनी झांशी वर हल्ला केला या हल्ल्यामध्ये झाशीची राणी आणि तात्या टोपे यांनी खूपच हुशारीने इंग्रजांना लढा दिला. इंग्रजांच्या तावडीतून झाशीच्या राणीचा बचाव करण्यासाठी तात्या टोपे झाशीच्या राणीला कलापी येथे घेऊन गेले.
तात्या टोपेंनी इंग्रजांच्या नाकामध्ये धुमाकूळ घालून ठेवला होता. तात्या टोपेंनी आखलेली रणनीती यशस्वी ठरली तात्या टोपेंनी झाशीच्या राणीला ग्वालियर या किल्ल्यावर आपला अधिकार स्थापन करण्यास सांगितले आणि तिकडच्या राजाला देखील आपल्या बाजूने वळवून घेतलं होतं नंतर इंग्रजांविरुद्ध युद्ध पुकारून ग्वालियर चा किल्ला शेवटी मिळवलाच.
या युद्धानंतर इंग्रजांना तात्या टोपे यांचा प्रचंड वैताग आला होता. त्यामुळे तात्या टोपेंना बंदिस्त करण्याचा निर्णय इंग्रजांनी घेतला. परंतु तात्या टोपे काही इंग्रजांच्या हाती आले नाही. एखाद्या ठिकाणी जर तात्या टोपे यांना हार पत्करावी लागली तर ते दुसऱ्या ठिकाणी जाऊन तिथे आपले नवीन सैन्य तयार करून पुन्हा एकदा इंग्रजांविरुद्ध युद्ध लढायला उभे राहायचे.
१८५८ मध्ये इंग्रजांनी ग्वालियर वर पुन्हा हल्ला केला. तर या हल्ल्यामध्ये झाशीची राणी जखमी झाल्या आणि तिकडेच त्या वीर गतीला प्राप्त झाल्या. इतक सगळा होऊन सुद्धा तात्या टोपे यांनी कधीच हार मानली नाही. ते अत्यंत शेवटच्या क्षणापर्यंत इंग्रजांविरुद्ध रणनीती आखत राहिले आणि इंग्रजांना लढा देत राहिले.
मृत्यू
तात्या टोपे यांनी बजावलेली कामगिरी कौतुकास्पद आहे. ते वीर सेनानी होते. परंतु त्यांच्या मृत्यू बद्दल काही अचूक माहिती उपलब्ध नाही आहे. काहींच्या मते ब्रिटिशांनी त्यांना पकडून फाशी दिली. तर काहींच्या मध्ये तात्या टोपे यांच्यासह काही लोकांनी त्यांच्याशी दगाबाजी करून त्यांना ब्रिटिशांच्या ताब्यात दिली.
आम्ही दिलेल्या tatya tope information in marathi language माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर क्रांतिकारक तात्या टोपे यांची माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या tatya tope information in marathi wikipedia या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information about tatya tope in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये tatya tope in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट