teeth whitening at home tips in marathi दात स्वच्छ करण्यासाठी घरगुती उपाय, आज आपण या लेखामध्ये दात पांढरेशुभ्र तसेच स्वच्छ कसे ठेवायचे या बद्दल टिप्स पाहणार आहोत. दात हा आपला एक महत्वाचा अवयव आहे आणि आपल्या दातांची काळजी हि चांगल्या प्रकारे घेणे आपले कर्तव्य आहे. आपण जो आहार घेतो तो दातांनी चाऊन मग खातो त्यामुळे आपले दात हे मजबूत आणि घट्ट असणे गरजेचे असतेच परंतु दात मजबूत असण्यासोबत स्वच्छ आणि पांढरेशुभ्र असणे देखील तितकेच महत्वाचे आहे. काही कारणांच्या मुळे आपले दात हे पिवळे दिसतात आणि आपण अनेक प्रयत्न करून देखील काही वेळा आपले दात हे पांढरे शुभ्र दिसत नाहीत.
त्यामुळे तुम्ही काही वेळा त्रस्त असतात कारण जर आपले दात हे पिवळे दिसत असतील तर आपल्या दातांचा किंवा तोंडातून दुर्गंधी येते तसेच आपले दात खराब देखील होऊ शकतात त्यामुळे आपण आपल्या दातांची वेळोवेळी काळजी घेणे खूप गरजेचे असते. दात हे अस्वच्छतेमुळे किंवा आपल्या खाण्याच्या चुकीच्या सवयीमुळे पिवळे होऊ शकतात आणि त्यामुळे तुम्ही खूप त्रस्त होऊ शकता परंतु यामध्ये काळजी करण्यासारखे काहीच कारण नाही.
कारण आपण दातांची रोजच्या रोज स्वच्छता करून किंवा दातांची रोजच्या रोज काळजी घेवून आपण आपले दात हे चांगले, स्वच्छ आणि पांढरे शुभ्र ठेवू शकतो. दातांना पांढरे शुभ्र बनवण्यासाठी खाली काही टिप्स पाहूया. चला तर आता आपण दात पांढरे बनवण्यासाठी कोणकोणत्या टिप्स आपण वापरू शकतो ते बघुया.
दात स्वच्छ करण्यासाठी घरगुती उपाय – Teeth Whitening at Home Tips in Marathi
दात पांढरे करण्यासाठी केले जाणारे उपाय – teeth whitening at home in marathi
दात हा आपला एक महत्वाचा अवयव आहे आणि आपण आपला आहार हा दातांनी तोडून आणि बारीक करू खातो त्यामुळे ते मजबूत असणे गरजेचे आहे परंतु ते स्वच्छ दिसणे देखील तितकेच महत्वाचे असते आणि म्हणूनच आज आपण दात पांढरेशुभ्र दिसण्यासाठी आपण कोणकोणते उपाय करू शकतो हे पाहणार आहोत.
- दात पिवळे दिसण्याचे मुख्य कारण दातांची रोजच्या रोज स्वच्छता न करणे असू शकते किंवा दातांची अस्वच्छता यामुळे असू शकते. दात स्वच्छ आणि पांढरे दिसंयाठी आपल्याला रोजच्या रोज दातांची स्वच्छता केली पाहिजे म्हणजेच आपले दात रोजच्या रोज घासले पाहिजे. सकाळी सगळेच दात घासतात परंतु रात्री देखील दात घासले तर आपले दात स्वच्छ आणि पांढरेशुभ्र दिसतील.
- असे म्हणतात कि लिंबू आणि सोड्याच्या वापराने आपले दात स्वच्छ आणि पांढरेशुभ्र होण्यास मदत होते. अर्धा चमच्या सोड्यामध्ये एक चमचा लिंबू रस घाला आणि त्याची पेस्ट बनवून घ्या आणि मग ती पेस्ट ब्रशवर घ्या आणि तुमचे दात या मिश्रानाणे हळुवारपणे ७ ते ८ मिनिटे घसा. हा प्रयोग तुम्ही आठवड्यातून २ वेळा केला तर तुमचे दात पांढरे शुभ्र बनण्यास मदत होते तसेच दात मजबूत देखील बनतात.
- आपल्या देशामध्ये अनेक लोक असे आहेत जे धुम्रपान करतात आणि दात पिवळे होण्याचे हे एक कारण आहे. जे लोक धुम्रपान करतात त्यांचे दात पिवळे होतात त्यामुळे अश्या लोकांनी धुम्रपान करणे सोडले पाहिजे.
- कडुलिंब हा सर्वांना माहित आहे आणि कडूलिंबामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात आणि त्याचा वापर अनेक आरोग्य फायद्यासाठी केला जातो तसेच दात मजबूत बनवण्यासाठी पांढरेशुभ्र बनवण्यासाठी देखील आपण कडुलिंब वापरू शकतो. कडुलिंबाचे पाने आपल्याला सहज उपलब्ध होऊ शकतात, कडूलिंबाची पाने हि पूर्ण पणे उन्हामध्ये वळवून घ्या आणि मग त्याची एकदम बारीक पावडर बनवून घ्या आणि त्या पावडरने तुम्ही तुमचे दात रोज घासले तर तुमचे दात झपाट्याने पांढरे होण्यास मदत होते तसेच तुमचे दात खूप मजबूत बनतात. बाजारामध्ये सध्या आपल्याला कडुलिंब पावडर मिळू शकते त्यामुळे ती पावडर आपल्याला घरी बनवण्याची काय गरज नाही.
- अल्यामध्ये देखील अनेक औषधी गुणधर्म असतात आणि त्यामुळे आल्याचा वापर हा दाताच्या मजबुतीसाठी, स्वच्छतेसाठी आणि पांढरेशुभ्र पणा आणण्यासाठी केली कावू शकते. आल्याची एकदम बारीक पेस्ट बनवा आणि त्यामध्ये थोडा मध आणि मीठ घाला आणि त्या पेस्ट ने दात घासा त्यामुळे तुमचे दात मजबूत आणि पांढरेशुभ्र बनतात, हा प्रयोग तुम्ही आठवड्यातून २ ते ३ वेळा करू शकता.
- असे म्हणतात कि दातांच्या साठी पेरूची पाणी देखील खूप उपयुक्त ठरू शकतात. तुम्ही पेरूची पाने स्वच्छ पाण्यामध्ये धुवा आणि मग एक भांड्यामध्ये पाणी घ्या आणि मग त्यामध्ये ५ ते ६ पेरूची पाने घाला तसेच त्यामध्ये अर्धा चमचा मीठ घाला आणि ते पाणी पानांचा अर्क पाण्यामध्ये उतारे पर्यंत उकळा आणि मग गॅस बंद करा आणि पाणी थोडे नॉर्मल झाले कि ते पाणी गाळा आणि त्या पाण्याने चुळा भर यामुळे तुमचे दात मजबूत आणि पांढरे तर होतीलच परंतु तुमची दात दुखी देखील कमी होण्यास मदत होईल. हा प्रयोग तुम्ही आठवड्यातून एकदा करू शकता.
- असे म्हणतात कि अननस खाल्ल्याने आपले दात हे पांढरे शुभ्र बनतात आणि होय हे खरे आहे कि अननस खाल्ल्याने आपल्या तोंडातील प्लाक्स कमी होण्यास मदत होते आणि त्यामुळे आपले दात स्वच्छ आणि पांढरेशुभ्र दिसण्यास मदत होते. त्यामुळे तुमचे दात पिवळे असतील तर तुम्ही योग्य प्रमाणात रोज अननस हे फळ खा.
- तुम्ही तुमच्या आहारामध्ये कॅल्शियमयुक्त आहार घ्या त्यामुळे याचा फायदा तुमच्या दातांना देखील होईल.
- आपण अनेक वेळा केळाची साल हि टाकून देतो परंतु असे म्हटले जाते कि केळाची सालचा आतील भाग हा दातावर घासला तर आपले पिवळे दात पांढरे होण्यास मदत होते.
- लवंग देखील अनेक आरोग्य फायद्याच्यासाठी खूप उपयुक्त आहे आणि दातांचा पांढरेपणा राखण्यासाठी देखील उपयुक्त ठरू शकते. लवंग आपल्या दाताची स्वच्छता करण्यासाठी अनेक प्रकारे वापरली जावू शकतो. तुम्ही लवंग तशीच चघळू शकतात त्यामुळे देखील तुमचे दात स्वच्छ होऊ शकतात किंवा मग तुम्ही लवंगाची पावडर करून ठेवा आणि त्या पावडरने रोजच्या रोज दात घसा. यामुळे तुमचे दात पांढरे दिसण्यास मदत होईल.
- काही वर्षाच्या पाठीमागे कोलगेट सारख्या टूथपेस्ट नव्हत्या त्यामुळे पूर्वी लोक दात घासण्यासाठी मिठाचा वापर करत होते आणि आपल्याला जर आपले दात पांढरेशुभ्र दिसावे असे वाटत असेल तर आपण देखील मिठाने दात घासले तर आपले दात देखील पांढरेशुभ्र दिसण्यास मदत होते.
- थाईम आणि पेपरमिंट या सारख्या तेलाने आपले दात घासले तर आपले दात पांढरे शुभ्र दिसण्यास मदत होते तसेच या प्रकारच्या तेलामुळे दात मजबूत तर होतात परंतु याने दात दुखी असल्यास ती कमी होण्यास देखील मदत होते.
- कांदे देखील बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि जंतुनाशक असतात त्यामुळे जर तुम्ही कांद्याच्या पावडरने तुमचे दात घासले तर तुमच्या दाताचा पिवळेपणा कमी होतो तसेच तुमचे दात स्वच्छ देखील होतात.
टीप: या लेखात दिलेली माहिती बातम्या इंटरनेट वरून घेतलेली असून त्याचा वापर करण्याअगोदर तुमच्या डॉक्टरचा सल्ला आवश्य घ्या.
आम्ही दिलेल्या teeth whitening at home tips in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर दात स्वच्छ करण्यासाठी घरगुती उपाय माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या teeth whitening at home in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि teeth whitening tips in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट