Tipu Sultan Biography in Marathi – Tipu Sultan Information In Marathi टिपू सुलतान माहिती मराठी म्हैसूरचा वाघ म्हणून प्रसिद्ध असणारे टिपू सुलतान हे मैसूरचे राजे होते. इतिहासामध्ये त्यांच्या शौर्याच्या गाथा सांगणाऱ्या अनेक कथा प्रचलित आहेत. टिपू सुलतान हे मैसूरचे राजे होते आणि त्यांनी आपल्या राज्याच ब्रिटिशांपासून संरक्षण केलं म्हैसूरच स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी टिपू सुलतान यांनी इंग्रजांविरुद्ध लढा दिला. त्यांनी दक्षिण भारतामध्ये ब्रिटिश सत्तेला विरोध केला आणि ब्रिटिश सैन्याला दूर ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. आजच्या लेखामध्ये आपण शेर-ए-म्हैसूर म्हणून ओळखले जाणारे टिपू सुलतान यांच्या जीवना बद्दल माहिती जाणून घेणार आहोत.
टिपू सुलतान माहिती मराठी – Tipu Sultan Biography in Marathi
पूर्ण नाव (Name) | टिपू सुलतान |
जन्म (Birthday) | २० नोव्हेंबर १७५० |
जन्म गाव (Birth Place) | बंगळूर |
राष्ट्रीयत्व (Citizenship) | भारतीय |
ओळख (Identity) | मैसूरचे राजे |
मृत्यू | ४ मे १७९९ |
Tipu Sultan Information In Marathi
जन्म व वैयक्तिक आयुष्य
२० नोव्हेंबर १७५० रोजी टिपू सुलतान यांचा जन्म बंगळूर येथे झाला. हे शहर कर्नाटक येथे स्थित असून पूर्वी हे शहर देवनखहल्ली नावाने ओळखले जायचे. टिपू सुलतान यांचे वडील हैदरअली मैसूर या दक्षिण भारतातील साम्राज्याचे सैन्य अधिकारी होते. टिपू सुलतान यांचे संपूर्ण नाव सुलतान सैद वलशरीफ फतेह अली खान बहादुर शाह टीपू होय. परंतु त्यांनी केलेल्या पराक्रमां मुळे स्थानिक लोकांनी त्यांना टिपू सुलतान असं नाव दिलं. सन १७६१ मध्ये म्हैसूर साम्राज्याचे अधिपत्य टिपू सुलतान यांचे वडील हैदर अली यांच्या हाती सोपवण्यात आलं.
हैदर अली यांनी आपल्या राज्याचा विस्तार केला त्यांची फ्रेंचशीं राजकीय मैत्री देखील झाली आणि याचा चांगलाच फायदा टिपू सुलतान यांना झाला. त्यांनी फ्रेंच कडून लष्करी डावपेच आणि रणीतीनचा अभ्यास करून घेतला. वडिलांनी टिपू सुलतानला नेमबाजी, तलवारबाजी यांसारखे विविध विषय शिकवण्यासाठी उत्तम शिक्षक नियुक्त केले होते.
गाजी खान हे हैदर अली यांच्या सैन्यातील एक उच्च अधिकारी होते आणि एक महान योद्धा होते. यांच्या हाताखाली टिपू सुलतान यांनी लष्करी शिक्षण घेतलं. टिपू सुलतान यांना हिंदुस्तानी भाषा- हिंदी, उर्दू, पर्शियन, अरबी, कन्नड, मराठी इत्यादी भाषां ज्ञात होत्या. टिपू सुलतानच्या पत्नीचे नाव सिंधू सुलतान होते. टिपू सुलतान ने अनेक विवाह केले आणि त्यामुळे त्याला अनेक संतान प्राप्ति झाली.
टिपू सुलतान म्हैसूरचे शासक
टिपू सुलतान हा मैसूरचा मुस्लिम शासक होता सर्वात शक्तिशाली म्हणून ओळखला जायचा. टिपू सुलतान हे लहानपणापासूनच राजकीय दृष्ट्या हुशार होते त्यांनी उत्तम शिक्षकांच्या हाताखाली लष्करी शिक्षण घेतलं होतं. सण १७६६ मधील मलबार च्या हल्ल्यांमध्ये टिपू सुलतान यांनी आपल्या वडिलांसोबत लढाई केली आणि त्या वेळी टिपू सुलतान अवघी पंधरा वर्षाचे होते त्यांनी जवळपास तीन हजार सैन्यासोबत मलबार सरदारच्या कुटुंबाला ताब्यात घेतलं टिपू सुलतान यांच्या यशस्वी आक्रमणामुळे मलबार च्या शासकाने हैदर अलीला शरणागती पत्करली.
टिपू सुलतान यांच्याकडे दूरदृष्टी होती. सन १७८२ मध्ये टिपू सुलतान यांचे वडील हैदर अली यांचा मृत्यू झाला आणि त्यांच्यानंतर टिपू सुलतान मैसूर च्या गादीवर बसले. मैसूरची गादी प्राप्त केल्यावर टिपू सुलतान यांनी आपल्या राज्यातील प्रजेला चांगल आयुष्य लाभाव म्हणून वेगवेगळे नियम व प्रणाली जाहीर केल्या. त्यांनी नवीन नाणी, नवीन चंद्र कॅलेंडर आणि नवीन जमीन महसूल प्रणालीसह अनेक वेगवेगळे कायदे काढले. मैसूर मध्ये रेशीम उद्योगाच्या वाढीस सुरुवात केली त्यांच्या वडिलांनी त्यांना दक्षिणेकडील कृष्णानदी, पूर्वेला पूर्वघाट आणि पश्चिमेला अरबी समुद्र लागून असलेले मोठे राज्य वारसी हक्कामुळे प्राप्त झाले.
टिपू सुलतान यांना चांगलेच माहीत होतं की त्यांच्या राज्याला इंग्रजांपासून धोका आहे परंतु त्यांच्या वडिलांची फ्रेंचशीं चांगली राजकीय मैत्री होती. त्याचा फायदा टिपू सुलतान यांना देखील झाला त्यांनी फ्रेंच च्या मदतीने म्हैसूर राज्याच संरक्षण केलं. इंग्रजांविरुद्ध लढायचे असेल तर लष्करामध्ये मोठी वाढ करायला हवी हे टिपू सुलतान यांच्या लक्षात आल. टिपू सुलतान ने दोन वेळा ब्रिटिशां वर विजय प्राप्त केला होता परंतु त्याच्या लक्षात आले की ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी त्याच्या स्वतंत्र राज्यासाठी गंभीर धोका आहे.
आणि म्हणूनच त्यांनी लष्करी प्रगतीवर अधिक लक्ष केंद्रित केलं. वडिलांच्या काळात अपूर्ण राहिलेले सर्व कामे टिपू सुलतान यांनी त्यांच्या शासकीय कारकिर्दीत पूर्ण केली. विविध रस्ते बांधले, नाण्यांना एक नवीन रूप दिले, आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी रेशीम उत्पादनावर भर दिला. टिपू सुलतानला नवीन तंत्रज्ञानाबद्दल एक वेगळे आकर्षण होतं. टिपू सुलतान हा एक धर्माभिमानी मुस्लिम होता. पण त्याच्या बहुसंख्य हिंदू प्रजेच्या विश्वासाबद्दल सहिष्णू होता. टिपू सुलतानने सक्षम शासन उभारलं.
वडिलांसोबत टिपू सुलतान यांनी अनेक यशस्वी लष्करी मोहिमांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. त्यामुळे त्यांना वेगवेगळ्या रणनीती चांगल्याच ठाऊक होत्या शिवाय त्यांच्यासोबत फ्रेंच शासन होतच. त्यांनी तयार केलेले मैसूर रॉकेट याचा उपयोग त्यांच्या वडिलांनी ब्रिटिशांविरुद्ध च्या दुसऱ्या अँग्लो मैसूर युद्धात केला होता. हे क्षेपणास्त्र यशस्वी ठरलं. मैसूर ची क्षेपणास्त्रे बनवण्याची पद्धत थोडी वेगळी होती त्यांची क्षेपणास्त्रे लोखंडी असून त्यामध्ये तलवार बसवली गेली होती.
हे रॉकेट लांब प्रवास करत आणि खाली उतरण्यापूर्वी हवेमध्ये विविध किलोमीटर अंतर कापत तलवारीने शत्रूवर हल्ला करत. ही क्षेपणास्त्रे ब्रिटिशांच्या क्षेपणास्त्रापेक्षा देखील खूप प्रगत होती कारण ती विध्वंसक होती आणि म्हणून ती प्रसिद्ध झाली. पहिलं रॉकेट हे हैदर अली आणि त्यांचा मुलगा टिपू सुलतान यांनी तयार केलेल्या रॉकेटच्या योजनेवर आधारित तयार करण्यात आलं. टिपू सुलतान यांनी लष्करी सैन्यामध्ये वेगवेगळे बदल केले.
त्यांनी तयार केलेली लष्करी शक्ती अद्भुत व विलक्षण होती ज्याचा वाईट परिणाम ब्रिटीश सैन्यदलावर होऊ लागला होता. टिपू सुलतान हा एक महत्त्वाकांक्षी राजा होता आणि त्याला आपल्या राज्याचा विस्तार दूरवर घेऊन जायचा होता. सन १७८९ ते १७९२ यादरम्यान टिपू सुलतान ला तिसऱ्यांदा इंग्रजांचा सामना करावा लागला होता परंतु यावेळी म्हैसूरला त्यांचे राजकीय मित्र असणारे फ्रांस यांच्या कडून कोणतीही मदत मिळणार नव्हती आणि परिणामी युद्धाच्या शेवटी इंग्रजांनी टिपूची राजधानी श्रीरंगपट्टण या शहराला वेढा घातला आणि मैसूरच्या नेत्याला शरण जावे लागले.
१७९३ मध्ये झालेल्या श्रीरंगपटनाच्या तहा मध्ये ब्रिटिशांनी आणि मराठा साम्राज्य यांनी मैसूरचा अर्धा भूभाग घेतला. तिसऱ्या ऐंग्लो म्हैसूर लढाईमध्ये टिपू सुलतानाचा पराभव झाला. सन १७९९ मध्ये चौथी इंगलो महसूल लढाई झाली. आपल्या राज्याचे स्वातंत्र्य अबाधित राहावे म्हणून टिपू सुलतानने ब्रिटिश सैन्याविरुद्ध जोरदार लढाई केली परंतु या युद्धात त्याला बराच मोठा पराभव पत्करावा लागला.
सगळ्यात मोठी बाब म्हणजे यामध्ये टिपू सुलतान च संपूर्ण मैसूर साम्राज्य ब्रिटिशांच्या ताब्यात गेलं आणि टिपू सुलतान चा मृत्यूही झाला. इंग्रजांनी टिपू सुलतान याला ठार मारून त्याचा पराभव केला आणि त्याची तलवार आपल्या सोबत आपल्या मायदेशी घेऊन गेले. टिपू सुलतान हा एक पराक्रमी योद्धा होता ज्याने आपल्या साम्राज्याचा बचाव करण्यासाठी आपल्या प्राणाचे बलिदान दिले परंतु तो कठोर होता आणि त्यामुळे भारतातील बऱ्याच भागांमध्ये जुलमी शासक म्हणून त्याची ओळख आहे.
टिपू सुलतान याने हिंदू व ख्रिश्चन धर्मांना इस्लाम धर्मात समावेश करून घेतला आणि त्यांची मंदिरे नष्ट केली. टिपू सुलतान आपल्या सभोवतालच्या गोष्टींमध्ये बऱ्याच वेळा इस्लामीकरण करण्याचा प्रयत्न करायचा त्याने बऱ्याच ठिकाणांचे नामकरण मुस्लीम नावांमध्ये देखील केले होते परंतु त्याच्या निधनानंतर सर्व ठिकाणांची नावे पुन्हा त्यांच्या पूर्वरुपात आली.
मृत्यू
४ मे १७९९ रोजी टिपू सुलतान यांचा मृत्यू वसाहतवादी इंग्रजांविरुद्ध आपल्या साम्राज्याचा रक्षण करताना रणांगणावर झाला. मैसुर ची राजधानी श्रीरंगपटना येथे टिपू सुलतान यांचे निधन झाले. टिपू सुलतान याचे पार्थिव म्हैसूर येथील श्रीरंगपटना शहरात दफन करण्यात आले आहे. टिपू सुलतान यांच्या मृत्यूनंतर म्हैसूर हे ब्रिटिश राजवटीच्या अधिपत्याखालील दुसरे संस्थान बनले.
यानंतर टिपू सुलतान यांच्या कुटुंबियांना फार जाच सहन करावा लागला. टिपू सुलतान यांनी आपल्या साम्राज्याचा स्वातंत्र्य टिकवून ठेवण्यासाठी एक दीर्घ आणि कठोर लढा दिला परंतु शेवटी त्यांना पराभव सहन करावा लागला. टिपू सुलतान हे एक तेजस्वी व वीर स्वातंत्र्यसेनानी आणि योद्धा राजा म्हणून ओळखले जातात.
आम्ही दिलेल्या Tipu Sultan Biography in Marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर टिपू सुलतान माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या Tipu Sultan Information In Marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information of Tipu Sultan in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट