टायटॅनिक जहाजाची माहिती Titanic Ship History in Marathi

titanic ship history in marathi – titanic ship information in marathi टायटॅनिक जहाजाची माहिती टायटॅनिक हे नाव ऐकताच डोळ्यासमोर दृश्य उभ राहत ते म्हणजे भव्य दिव्य अशा जहाजाचे. टायटॅनिक या जहाजाचे संपूर्ण नाव आर. एम. एस टायटॅनिक असे होते आणि ही जहाज जगातील सर्वात मोठी प्रवासी जहाज होती. या जहाजाची बांधणी अशा प्रकारे केली गेली होती की ही जहाज कधी हि न बुडणारी होती परंतु पहिल्याच यात्रेमध्ये ही जहाज समुद्रामध्ये बुडाली. टायटॅनिक जहाज व त्या सोबत घडलेली ही घटना नेहमीच सर्वांच्या चर्चेचा विषय ठरलेली आहे. या जहाजाची बांधणी १९१२ मध्ये करण्यात आली.

ही जहाज बांधण्यासाठी अनुभवी अभियंत्यांचा वापर केला गेला होता. जहाजाचे डिझाईन व त्याची बांधणी करण्यासाठी त्या काळातील सर्वात अद्ययावत उत्पादन तंत्रे वापरली गेली होती. तीन हजाराहून अधिक मनुष्यबळ या जहाजाच्या निर्मितीकरता वापरण्यात आलं होतं. तीन वर्षाच्या कालावधीनंतर या जहाजाचे बांधकाम पूर्ण झाले.

१० एप्रिल १९१२ रोजी टायटॅनिक जहाज आपल्या पहिल्या सागरी प्रवासासाठी निघाली. असं म्हणतात ज्यावेळी ही जहाज सागरी प्रवासासाठी निघाली त्यावेळी तेथील बंदरावर जवळपास एक लाखाहून अधिक लोक हि भव्य दिव्य जहाज बघण्यासाठी गेले होते. टायटॅनिक ही जहाज न बुडणारी जहाज आहे असा दावा ही जहाज बनवणाऱ्या कडून करण्यात आला होता परंतु पहिल्याच सफारी मध्ये हि जहाज बुडाली या मुळे बऱ्याच तज्ञांना आश्चर्याचा धक्का बसला.

 titanic ship history in marathi
titanic ship history in marathi

टायटॅनिक जहाजाची माहिती – Titanic Ship History in Marathi

titanic ship information in marathi

टायटॅनिक हे जहाज दहा एप्रिल १९१२ रोजी इंग्लंड मधील साउथहॅंप्टन येथून न्यू यॉर्क शहराकडे आपल्या पहिल्या सफारीसाठी निघाले. टायटॅनिक हे जगातील सर्वात मोठे व भव्यदिव्य असे जहाज होते. जे बाहेरून बघताना अतिशय सुंदर दिसायचं तसेच ते आतून देखील दहापट सुंदर होतं. हे जगातील सर्वात मोठे प्रवासी जहाज मानले जायचे ज्यावेळी हे जहाज आपल्या पहिल्या सफारीसाठी निघाले त्यावेळी याच जहाजांमध्ये एकूण २,२२७ प्रवासी होते.

या भव्य दिव्य जहाजे मध्ये एकूण सोळा कंपार्टमेंट होते. ही जहाज बनवण्यासाठी करोडो रुपये खर्च करण्यात आले होते त्यामुळे या जहाजातून प्रवास करणारे प्रवासी देखील जगातील श्रीमंत लोकांपैकी एक होते. या जहाजा मध्ये प्रवाशांचे एकूण तीन वर्ग होते प्रथम वर्ग, द्वितीय वर्ग व तृतीय वर्ग. पहिल्या वर्गाचे प्रवासी जहाजेच्या सगळ्यात वरच्या मजल्यावर राहत होते तर तिसऱ्या वर्गाचे प्रवासी जहाजेच्या सर्वात खालच्या मजल्यावर होते.

हजारोच्या संख्येने प्रवासी एकाच वेळी या जहाजा मधून प्रवास करू शकतील अशी या जहाजाची रचना करण्यात आली होती. या मध्ये पुरवल्या जाणाऱ्या सोयीसुविधा अगदी फाईव्ह स्टार हॉटेल सारख्या होत्या. हे जहाज अतिशय मजबूत होते व या जहाजाला कोणीही टक्कर देऊ शकत नव्हते. त्याकाळी मोठ-मोठे जहाज बनवण्याची स्पर्धा सुरू होती आणि या स्पर्धेतून या जहाजाची निर्मिती करण्यात आली होती. जवळपास २८९ मीटर लांबी असणारी ही टायटॅनिक जहाज त्याकाळातील सर्वात मोठे जहाज मानले जायचे.

या जहाजाची पहिली सफारी ज्यावेळी सुरू झाली त्यावेळी त्या जहाजात एकूण २,२२७ प्रवासी व कर्मचारी होते. कॅप्टन स्मिथ हे या जहाजाचे कप्तान होते ते सर्वात अनुभवी होते व हा प्रवास संपता ते या क्षेत्रातून निवृत्ती देखील घेणार होते. या प्रवासामध्ये ही जहाज दोन ठिकाणी थांबली आणि त्यापुढे २,२४० प्रवाशांना घेऊन ही जहाज त्याच्या अंतिम डेस्टिनेशन कडे म्हणजेच न्यूयॉर्क कडे वळाली.

अटलांटिक महासागर यांमध्ये एक हिमनग असल्याचे संदेश या जहाजाला सतत मिळत होते. परंतु या जहाजाचे कॅप्टन स्मिथ यांनी त्याकडे वारंवार दुर्लक्ष केलं. परंतु पुन्हा एकदा अमेरिका नावाच्या स्टीमर ने टायटॅनिकला त्याच्या मार्गामध्ये हिमनग असल्याचा संदेश १४ एप्रिल रोजी दुपारच्या वेळेस दिला होता. परंतु या संदेशाखडे काही फारसे लक्ष दिले गेले नाही ज्याचे परिणाम येणाऱ्या वेळेत टायटॅनिकला भोगावे लागले. रात्रीच्या वेळेस काही टेहळणी पथक आयोजित केले गेले होते.

रात्रीची वेळ होती आणि ११. ४० वाजता पथकाला जहाजाच्या सरळ रेषेतच उभा असलेला हिमनग दिसला. यावेळी जहाज किनाऱ्यापासून चारशे मैल दूर होतं. सावधानतेचा संदेश मिळताच तेथील कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांनी ताबडतोब जहाज डावीकडे वळविण्याचे आदेश दिले वळवण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले जहाजाची दिशा बदलली परंतु जरी टायटॅनिक ची टक्कर हिमनगाशी झाली नसली तरी जो भाग टायटॅनिक च्या उजव्या बाजूचा पाण्याखाली वीस फूट खोलवर होता तो हिमनगावर घासला गेला ज्यामुळे त्या भागाला खूप मोठ्या भेगा पडल्या आणि त्या भागातील प्लेट्स हलल्या आणि पाणी जहाजाच्या आत मध्ये शिरायला सुरूवात झाली.

बघता क्षणी तळाकडे जे मजले होते ते पाण्याने भरू लागले आणि टायटॅनिक जहाजाचा मागील भाग पाण्याखाली जाऊ लागला. इतका मोठा प्रसंग घडून देखील बऱ्याच प्रवाशांना या घटनेची कल्पना नव्हती परंतु जसजसे पाणी खालच्या मजल्यावरून वरच्या मजल्यावर ती शिरू लागले तसतसं टायटॅनिक चा एक भाग पाण्याखाली जाऊ लागला व दुसऱ्या भागावर जास्त ताण आल्यामुळे या जहाजाचे दोन तुकडे झाले.

समुद्रामध्ये अपघात होतच असतात परंतु हा अपघात जगातील सर्वात विनाशकारी सागरी अपघात मानला जातो कारण त्यावेळी दोन २,२२७ प्रवासी व कर्मचाऱ्यांपैकी १,५१७ लोक या घटनेमध्ये मृत्युमुखी पडले. त्याचे सगळ्यात मुख्य कारण म्हणजे या लोकांचा मृत्यू बूडण्यामुळे नसून तर त्यावेळी पाण्याच्या तापमानामुळे झाला ज्यावेळी जहाज पाण्यात बुडाली त्यावेळी पाण्याचे तापमान २८°F (-२°C) इतकं होतं या प्रकाराच्या तापमानामध्ये माणसाचा मृत्यू अवघ्या पंधरा मिनिटात होतो.

या दुर्घटनेनंतर फक्त ७१० लोकांचा जीव वाचला याहून अधिक लोकांचा देखील जीव वाचू शकत होता परंतु जीवरक्षक नावा त्यांच्या क्षमतेपेक्षा कमी लोकांना भरवून अर्धवटच गेल्या आणि त्या वेळी टायटॅनिकच्या कर्मचारी वर्गाने आधी प्रथम दर्जाच्या लोकांना प्राधान्य दिलं आणि त्यामध्ये देखिल स्त्रिया व मुले प्रथम प्रवास करतील यामुळे अनेक लोकांचे जीवन उद्ध्वस्त झाले. अनेक सुरक्षा वैशिष्ट्यांचा वापर करून देखील हे जहाज पहिल्याच सफारीमध्ये बुडाले ही थोडी न पचणारी व धक्कादायक गोष्ट होती.

या घटनेमध्ये दीड हजार लोकांचे प्राण गेले. त्या वेळी त्या प्रसंगाला तेथील प्रवासी हसत हसत सामोरे गेले काहींनी मृत्यूला स्वीकारलं काहींनी जहाज बुडणार आहे आणि आपला मृत्यू जवळ आला आहे हे माहीत असून सुद्धा आपल्या आयुष्यातील शेवटचे क्षण आनंदात घालवण्याचा प्रयत्न केला. तेथील एका संगीत पथकाने वेगवेगळ्या प्रकारचे संगीत वाद्य वाजवून शेवटच्या क्षणी देखील संगीताचा आस्वाद घेतला तर काहींनी नवीन कपडे परिधान केले.

या घटनेला आज १०० हून अधिक वर्ष उलटून गेली आहेत परंतु तरीही ही घटना आजही अनेक लोकांच्या चर्चेचा विषय बनली आहे व आजही या घटनेबद्दल तेवढीच उत्सुकता लोकांच्या मनामध्ये आहे. काहींच्या मते टायटॅनिक या जहाजाचे बांधकाम करताना चांगल्या गुणवत्तेचा माल वापरला गेला नाही म्हणून हे जहाज बुडाले असे काहींचे मत आहे, तर काही जण हिमनगाला जबाबदार ठरवतात. कधी हि न बूडणारी जहाज आज अटलांटिक समुद्राच्या तळाशी गंज खात पडलेली आहे.

या दुर्घटनेनंतर सत्तर वर्षांनी रॉबट बल्लार्ड व त्यांच्या टीमने १९८५ मध्ये सर्वात प्रथम या टायटॅनिक जहाजाच्या समुद्रात असणारे अवशेष शोधून काढले. हे मिशन अतिशय कठीण होतं कारण ज्या भागांमध्ये टायटॅनिक जहाजाचे अवशेष आहेत तो भाग समुद्रतळाशी असून तिथे पाण्याचा प्रवाह जास्त आहे. अटलांटिक महासागरामध्ये १३ हजार १२५ फुट खोलवर टायटॅनिक जहाजाचे अवशेष आहेत. अनेक वेगवेगळी तज्ञ या अवशेषांना भेट देऊन त्यावरती रिसर्च करून वेगवेगळे शोध लावण्याचा व ही जहाज कशी बुडाली याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

हे अवशेष येणाऱ्या काही वर्षांमध्ये संपूर्ण त-हा नष्ट होतील असा दावा वैज्ञानिकांद्वारे केला गेला आहे. पाण्यामुळे व पाण्यात असणाऱ्या वेगवेगळ्या जीवाणूंमुळे या अवशेषांचा ऱ्हास होत आहे असे समजले आहे. समुद्रातील प्रत्येक जीव १८० किलो जहाजाचा भाग दिवसाला नष्ट करतो आणि त्यामुळे वैज्ञानिक व तज्ञांच्या मते येणाऱ्या तीस ते चाळीस वर्षांमध्ये टायटॅनिक या प्रसिद्ध जहाजाचे अवशेष अटलांटिक समुद्रातून कायमचे नष्ट होतील. १९९७ मध्ये जेम्स कॅमरुन प्रसिद्ध दिग्दर्शकांनी घडलेल्या या घटनेवर एक टायटॅनिक नावाचा चित्रपट काढला.

हा चित्रपट अत्यंत लोकप्रिय ठरला आणि ज्यामुळे संपूर्ण जगभरातून या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला आणि तेव्हापासूनच या जहाजा बद्दल सर्वसामान्यांना माहिती मिळाली व प्रत्येकाची उत्सुकता अजूनच वाढली. आज अनेक वैज्ञानिक या घटनेवर संशोधन करत आहेत.

आम्ही दिलेल्या titanic ship history in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर टायटॅनिक जहाजाची माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या information about titanic ship in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि titanic ship information in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!