टोमॅटो सूप रेसिपी मराठी Tomato Soup Recipe in Marathi

Tomato Soup Recipe in Marathi टोमॅटो सूप रेसिपी मराठी टोमॅटो हि एक फळ भाजी आहे हे आपल्या सर्वाना माहित आहेच आणि भारतीय स्वयंपाक पद्धती मध्ये टोमॅटोला महत्वाचे स्थान आहे टोमॅटोचा उपयोग स्वयंपाक घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारे केला जातो आणि त्यामधील एक प्रकार म्हणजे टोमॅटो सूप आणि हा टोमॅटो वापरून वारंवार केला जाणारा एक पदार्थ आहे कारण ह्या फळभाजी पासून अनेक आरोग्य फायदे मिळतात कारण त्यामध्ये टोमॅटोमध्ये पौटैशियम विटामिन सी, विटामिन इ, ए असते जे आपल्या शरीराला खूप उपयोगी असते. बहुतेक लोक टोमॅटो पासून बनवले जाणारे इतर पदार्थ आवडीने खायला बघत नाहीत.

पण टोमॅटो सूप हा अनेक लोकांचा आवडता पदार्थ असतो आणि हा पदार्थ लोक आवडीने पितात देखील. टोमॅटो सूप हा टोमॅटो शिजवून ते मिक्सरमध्ये घालून त्याची एकदम बारीक प्युरी बनवली जाते आणि त्याला लसून पेस्ट, तिखट – मीठ, हिंग, हळद याची खमंग अशी फोडणी दिली जाते.

आपल्याला थंडीच्या किंवा पावसाळाच्या थंड वातावरणामध्ये गरम गरम काही तरी खावेसे वाटते त्यावेळी आपण टोमॅटोचा सूप बनवून खाऊ शकतो कारण हा सूप गरमागरम सर्व्ह करायचा असतो आणि हा पचण्यासाठी देखील हलका असतो. त्याचबरोबर टोमॅटो सूप हा लहानांच्या पासून मोठ्यांच्यापर्यंत सर्वांना आवडतो. चला तर मग पाहूयात टोमॅटो सूप कसा बनवायचा.

tomato soup recipe in marathi
tomato soup recipe in marathi

टोमॅटो सूप रेसिपी मराठी – Tomato Soup Recipe in Marathi

तयारीसाठी लागणारा वेळ१५ मिनिटे
शिजण्यासाठी लागणारा वेळ१० मिनिटे
एकूण लागणारा वेळ२५ मिनिटे
पाककलाभारतीय
वाढणी३ ते ४ व्यक्ती

टोमॅटो सूप म्हणजे काय – tomato recipe marathi

टोमॅटो सूपला टोमॅटो सार या नावाने देखील ओळखले जाते आणि हा पदार्थ बनवताना तोमतो चिरून ते शिजवले जातात आणि शिजवलेल्या टोमॅटोची एकदम बारीक प्युरी बनवली जाते आणि त्याला तूप, मसाले, लसून आणि तिखट आणि मीठ घालून फोडणी दिली जाते आणि त्यामध्ये थोडे पाणी घालून ते थोडे पातळ बनवले जाते जेणे करून ते आपल्याला पिता येईल.

टोमॅटो सूप रेसिपी – how to make tomato soup recipe in marathi

टोमॅटो सूप हा एक भारतीय पदार्थ असून हा पदार्थ अनेक ठिकाणी आवडीने बनवला जातो आणि खाल्ला देखील जातो. टोमॅटो सूप हा पदार्थ घरामध्ये बनवण्यासाठी खूप सोपा आहे आणि खूप कमी वेळेत आणि मोजक्या साहित्यामध्ये अगदी उत्तम पदार्थ आहे कारण यामुळे आपल्याला अनेक आरोग्य फायदे मिळतात. आता आपण पाहूयात टोमॅटो सूप कसा बनवायचा आणि तो बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते.

तयारीसाठी लागणारा वेळ१५ मिनिटे
शिजण्यासाठी लागणारा वेळ१० मिनिटे
एकूण लागणारा वेळ२५ मिनिटे
पाककलाभारतीय
वाढणी३ ते ४ व्यक्ती

टोमॅटो सूप बनवण्यासाठी लागणारे साहित्य – ingredients needed to make tomato soup 

टोमॅटो सूप बनवण्यासाठी विशेष असे काही साहित्य लागत नाही आणि जे साहित्य लागते ते आपल्या घरामध्ये अगदी सहजपणे उपलब्ध असू शकते आणि जर सूप बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्यापैकी काही नसेल तर आपण ते बाजारामधून लगेच विकत अनु शकतो.

  • अर्धा किलो टोमॅटो.
  • १ चमचा तांदळाचे पीठ.
  • २ चमचे आले लसून पेस्ट.
  • १/२ चमचा मोहरी.
  • १ चमचा तूप किंवा बटर.
  • दीड चमचा लाल मिरची पावडर.
  • १/२ चमचा हळद.
  • १ चमचा गरम मसाला.
  • १/४ चमचा हिंग.
  • मीठ ( चवीनुसार ).
  • साखर ( चवीनुसार ).
  • पाणी ( आवश्यकतेनुसार ).
  • कोथिंबीर.

टोमॅटो सूप बनवण्यासाठी केली जाणारी कृती – process to make tomato soup 

  • टोमॅटो सूप बनवण्यासाठी सर्वप्रथम टोमॅटो स्वच्छ धुवून घ्या आणि त्याचे अर्धे अर्धे भाग करून त्यामधील बिया काढून ते कुकरमध्ये किंवा भांड्यामध्ये शिजवून घ्या.
  • मग त्यामधील जादाचे पाणी काढून त्या शिजवलेल्या टोमॅटोची एकदम बारीक प्युरी करून घ्या आणि ते काही वेळासाठी बाजूला ठेवा.
  • आता एक भांडे घ्या आणि ते गॅसवर मंद आचेवर गरम करण्यासाठी ठेवा आणि ते भांडे गरम झाले कि त्यामध्ये तूप किंवा बटर घालून ते वितळू द्या.
  • ते वितळल्यानंतर त्यामध्ये मोहरी टाका आणि मोहरी चांगली तडतडली कि त्यामध्ये लगेच आले लसून पेस्ट घाला आणि काही सेकंद भाजा आणि मग त्यामध्ये हिंग, हळद, गरम मसाला आणि लाल तिखट घाला आणि ते चांगले मिक्स करा आणि त्यामध्ये लगेच टोमॅटो प्युरी मिक्स करा आणि ते मिश्रण चांगले एकत्र करा. ( टीप : हि प्रक्रिया थोडी झटपट करावी लागते नाही तर लसून करपण्याची शक्यता असते ).
  • आता एका छोट्या वाटीतून अर्धी वाटी पाणी घ्या आणि त्यामध्ये तांदळाचे पीठ घालून ते चांगले एकजीव करून घ्या आणि ते टोमॅटो प्युरीमध्ये घाला आणि चांगले मिक्स करा आणि सूप थोडा पातळ होण्यासाठी त्यामध्ये आणखी थोडे पाणी घाला.
  • मग त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि साखर घालून ते चांगले ढवळा आणि त्याला चांगली उकळी येवू द्या म्हणजेच ते चांगले शिजवून घ्या.
  • तुमचा पौष्टिक टोमॅटो सूप तयार झाला.
  • आता तो सर्व्हिंग बाऊमध्ये काढून त्यावर थोडी कोथिंबीर आणि टोस्टचे तुकडे टाकून आपण ते गरमागरम खाण्यासाठी सर्व्ह करू शकतो.

टिप्स ( Tips )

  • टोमॅटो तसेच अखंड शिजवू नका कारण शिजवलेले टोमॅटो मिक्सरमध्ये फिरवताना त्यामधील बिया देखील त्यामध्ये मिक्स होतात आणि त्यामुळे टोमॅटो प्युरीला थोडी कडवट चव येते.
  • जर तुम्हाला फोडणीमध्ये तूप आवडत नसेल तर तुम्ही त्यामध्ये तेल देखील वापरू शकता.
  • तसेच टोमॅटो सूपला चांगला रंग येण्यासाठी तुम्ही त्यामध्ये थोडा फूड कलर देखील वापरू शकता.
  • थोड्याश्या तिखट चवीसाठी आणि चांगल्या स्वादासाठी आपण सुपमध्ये काळी मिरी पावडर देखील वापरू शकतो.

टोमॅटो मधील पौष्टिक सत्व – tomato nutritional value 

टोमॅटोमध्ये बरेचसे गुणकारी सत्व असतात आणि यामधील काही पौष्टिक सत्व खाली दिलेले आहेत

पोषक घटकप्रमाण १०० ग्रॅम
विटामिन ए८३३ आय यु
विटामिन सी१३.७ मिली ग्रॅम
विटामिन ई०.५३ मिली ग्रॅम
फायबर१.२ ग्रॅम
प्रोटीन०.८८ गरम
कॅलरी१८ कॅलरी
पोटॅशियम२३७ मिली ग्रॅम
कॅल्शियम१० मिली ग्रॅम
शुगर२.६ ग्रॅम

आम्ही दिलेल्या tomato soup recipe in marathi by madhura माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर टोमॅटो सूप रेसिपी मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या cream of tomato soup recipe in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि simple tomato soup recipe in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये tomato soup in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!