त्र्यंबकेश्वर मंदिर माहिती Trimbakeshwar Temple Nashik Information in Marathi

Trimbakeshwar Temple Nashik Information in Marathi त्र्यंबकेश्वर मंदिराची माहिती आजच्या ब्लॉग मध्ये आपण नाशिक मधील गोदावरी जवळ असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिराची माहिती घेणार आहोत. मंदिर अतिशय अद्भुत स्थापत्यकलेन संपूर्ण आहे. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर महाराष्ट्र प्रांतातील नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबक गावांमध्ये स्थित आहे. येथील जवळच्या ब्रह्मगिरी पर्वतावरून गोदावरी नदीचा उगम होतो. अशा पुण्य असलेल्या गोदावरीचा उगम स्थानाजवळ त्रंबकेश्वर भगवान वसले आहेत. यांचा महिमा खूप अपार आहे. गौतम ऋषि आणि गोदावरीचा प्रार्थना यानुसार भगवान शिव या ठिकाणी वास्तव्य करण्यास प्रसन्न झाले आणि त्रंबकेश्वर नावाने त्यांची ख्याती विश्वात प्रसिद्ध झाली. 

trimbakeshwar temple nashik information in marathi
trimbakeshwar temple nashik information in marathi

त्र्यंबकेश्वर मंदिर माहिती – Trimbakeshwar Temple Nashik Information in Marathi

त्र्यंबकेश्वर मंदिरमाहिती
मंदिराचे नावत्र्यंबकेश्वर मंदिर
उत्सव, यात्रामहाशिवरात्रि
मंदिर कोठे आहेत्र्यंबकेश्वर मंदिर ब्रह्मगिरी नावाच्या पर्वतावर जवळील त्र्यंबक या गावांमध्ये स्थित आहे
मंदिर कोणी बांधलेपुनर्निर्माण तिसरे पेशवे बालाजी अर्थात नानासाहेब पेशवे
पाहाण्यासारखी ठिकाणेमांगीतुंगी मंदिर,‌ पंचवटी, पांडवलेणी, श्री सप्तशृंगी गड, सोमेश्वर मंदिर, राम कुंड, लक्ष्मण कुंड, धम्मगिरी, कुशावर्त तीर्थ, काळाराम मंदिर

मंदिर वास्तुकला – trimbakeshwar temple architecture

गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर स्थित त्र्यंबकेश्वर मंदिर काळ्या शिलाखंडाने बनवला गेला आहे. मंदिराचे स्थापत्य अद्भूत आहे. या मंदिराच्या पंचक्रोशी मध्ये कालसर्प, शांती त्रिपिंडी विधी, नारायण नागबळी यांची पूजा संपन्न होते. ह्या पूजा भक्तजनांच्या वेगवेगळ्या इच्छापूर्तीसाठी केल्या जातात. या प्राचीन मंदिराच पुनर्निर्माण तिसरे पेशवे बालाजी अर्थात नानासाहेब पेशवे यांनी केलं होतं. या मंदिराच्या बांधकामाची सुरुवात १७५५ मध्ये सुरू झाली होती आणि ३१ वर्षानंतर १७८६ मध्ये ह्या मंदिराचा बांधकाम पूर्ण करण्यात आलं.

असं म्हटलं जातं हे भव्य मंदिराचे निर्माण करण्यासाठि जवळपास सोळा लाख रुपये खर्च केले होते. जे की त्या काळातील ही खूप मोठी रक्कम आहे. त्र्यंबक गावामध्ये हे मंदिर स्थित आहे गावाच्या थोडं आत मध्ये चालत गेल्यानंतर मंदिराचं मुख्यद्वार दिसायला लागतं. त्र्यंबकेश्वर मंदिराची ही भव्य इमारत सिंधु आर्य शैलीच उत्कृष्ट उदाहरण आहे.

मंदिराच्या आत गर्भगृहात प्रवेश केल्यावर शिवलिंगाचे फक्त अर्गा दिसतो. बारकाईने पाहिला तर अर्गाच्या आत प्रत्येकी एक इंच तीन लिंग दिसतात. हे लिंग ब्रह्म, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तीची अवतार मानले जातात. सकाळच्या पुजनानंतर या अर्गाला पंचमुखी चांदीचा मुकुट अर्पण केला जातो.

मंदिराचा इतिहास – trimbakeshwar temple history

एकदा महर्षी गौतमच्या तपोवनात रहाणार्‍या ब्राह्मणांच्या बायका काही प्रकरणामुळे आपल्या पतीवर नाराज झाल्या होत्या. त्यांनी आपल्या पतींना गौतमांच्या विरोधात अपमान करण्यास प्रेरित केले. ब्राह्मणांनी यासाठी भगवान श्री गणेशाची पूजा केली. या पूजेवर प्रसन्न झाल्याने गणेश ची हजर झाले आणि त्यांनी ब्राह्मणांना वरदान मागण्यास सांगितले.

तेव्हा ते ब्राह्मण म्हणाले स्वामी आपण आमच्यावर प्रसन्न असाल तर कसं तरी गौतम ऋषी यांना आश्रमातून बाहेर काढा. हे एकूण श्री गणेश यांनी असं वरदान न मागण्यास सांगितले पण. ब्राह्मण त्याच्या विनंतीवर ठाम राहिले. अखेर गणेश यांना ब्राह्मणांच्या विनंतीचे पालन करण्यास भाग पडले. भक्तांचे मन राखण्यासाठी त्यांनी एका कमकुवत गाईचे रूप धारण केले आणि गौतम ऋषींनी गाय पिकाला चरताना पाहून ऋषी यांनी हळुवार हातात पेंडा घेऊन गाईला चारु लागले. त्या पेंढ्याला स्पर्श झाल्यावर गाय तिथेच खाली पडली आणि मरण पावली.

एकच हाहाकार माजला सर्व ब्राह्मण जमा झाले आणि त्यांनी गौतम ऋषींची गोहत्या प्रकरणावरुन निंदा करण्यास सुरुवात केली. गौतम ऋषी अतिशय आश्चर्यचकित आणि दुःखी झाले होते. आता सर्व ब्राह्मणांनी सांगितले की तुम्ही हा आश्रम सोडून दूर कुठेतरी जा आम्ही गोहत्या करणाऱ्या माणसासोबत राहिलो तर आम्हालाही पाप लागेल. मग गौतम ऋषि आश्रम सोडून आपल्या पत्नी सोबत आश्रमापासून थोडंच दूर राहू लागले. परंतु ब्राह्मणांनी ऋषींचे तिथे राहणे देखील कठिण करून सोडले.

ब्राह्मणांनी ऋषींना सांगितले की आता इथे कोणत्याही प्रकारची यज्ञ कार्य किंवा पुजा पाठ करण्याचा तुम्हाला अधिकार राहिलेला नाही. म्हणून ऋषींनी ब्राह्मणांना प्रार्थना केली की ह्यातून मुक्त करण्यासाठी मला काहीतरी उपाय सांगा. तेव्हा ब्राह्मण म्हणाले तुम्ही तुमच पाप सगळ्यांना सर्वत्र सांगत पृथ्वीला तीन वेळा परिक्रमा करा. मग परत येऊन इकडे एक महिना व्रत करा. त्याच्यानंतर ब्रह्मगिरी पर्वताला १०१ परिक्रमा घाला. त्याच्या नंतर तुम्हची शुद्धी होईल.

मग गंगेच्या पाण्याने स्नान करून एक करोड पार्थिव शिवलिंग मधील शिव जी यांची आराधना करा. त्यानंतर पुन्हा गंगेत स्नान करा आणि ब्रह्मगिरी पर्वताचे अकरा परिक्रमा करा. मग पुन्हा शंभर घोड्यांच्या पवित्र जल पार्थिव शिवलींगं वर अर्पण करा आणि मग तुमचा उद्धार होईल‌. ब्राह्मणांच्या कथेनुसार महर्षी गौतम यांनी सर्व कार्य पूर्ण करून तल्लीन होऊन भगवान शिवची आराधना केली. मग त्याच्या नंतर भगवान शिव त्यांच्यावरती प्रसन्न झाले आणि प्रकट होऊन त्यांनी वरदान महर्षी गौतम यांना वरदान मागण्यास सांगितले. तेव्हा महर्षी गौतम म्हणाले मला माझ्या गो हत्येच्या पापा मधून मुक्त करा. तेव्हा शंकर म्हणाले की तुझ्यावर कुठलंच पाप नाही आहे.

तू निष्पाप आहेस. गोहत्येचा अपराध तुझ्यावरती जाणीपूर्वक तुझ्या आश्रमातल्या ब्राह्मणांनी लावला होता. त्यामुळे मी त्यांना शिक्षा देऊ इच्छितो. असे म्हंटल्यावर महर्षी गौतम म्हणाले की प्रभू त्यांच्या मुळेच तर मला तुमचं दर्शन प्राप्त झाला आहे. तुम्ही त्यांच्यावरती क्रोधित नका होऊ. म्हणून मग ऋषी आणि देवगण एकत्र येऊन गौतम यांच्या बोलण्यास पाठिंबा देत भगवान शिव यांना या ठिकाणी कायमस्वरूपी निवास करण्याची प्रार्थना केली. मग भगवान शिव यांनी त्रंबक ज्योतिर्लिंग मध्ये भगवान शिव ज्योतिर्लिंग मध्ये कायमस्वरूपी स्थित‌ झाले.  गौतम यांच्याद्वारे आणलेली गंगा देखील गोदावरी नावाने तिकडे प्रवाहित होऊ लागली.

मंदिराची वैषिष्ट:

त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर महाराष्ट्र प्रांतातील नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबक गावांमध्ये स्थित आहे. येथील जवळच्या ब्रह्मगिरी पर्वतावरून गोदावरी नदीचा उगम होतो. अशा पुण्य असलेल्या गोदावरीचा उगम स्थानाजवळ त्रंबकेश्वर भगवान वसले आहेत. यांचा महिमा खूप अपार आहे. गौतम ऋषि आणि गोदावरीचा प्रार्थना यानुसार भगवान शिव या ठिकाणी वास्तव्य करण्यास प्रसन्न झाले आणि त्रंबकेश्वर नावाने त्यांची ख्याती विश्वात प्रसिद्ध झाली.

मंदिराच्या आत मध्ये एका लहान खड्ड्यात तीन लहान लिंग आहेत. ज्यांना ब्रह्मा, विष्णु आणि शिव यांचे प्रतिक मानलं जातं. शिव पुराणानुसार ब्रह्मगिरी पर्वतावर जाण्यासाठी ७०० रुंद पायर्‍या आहेत. पायर्‍या चढून वर गेल्यावर रामकुंड आणि लक्ष्मणकुंड आहेत. आणि शिखराच्या सर्वात उंचावरून गोमुख मधून निघणारी भगवती गोदावरीचा दर्शन होतं. त्रंबकेश्वर ज्योतिर्लिंग मध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश असे तिन्ही देव विराजमान आहेत. हीच या ज्योतिर्लिंगाची सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. बाकी ज्योतिर्लिंगमध्ये फक्त भगवान शिव विराजमान आहेत.

मंदिराचे मनोरंजक तथ्य:

प्राचीन काळात त्र्यंबक हे गौतम ऋषी यांची तपोभूमी होती. त्यांच्यावर झालेल्या गोहत्याबंदीच्या पासून मुक्त होण्यासाठी गौतम ऋषी यांनी कठोर तपश्चर्या केली आणि शिव यांना गंगेचा अवतार देण्यासाठी वरदान मागितले. त्याचा परिणाम म्हणून दक्षिणेच्या गंगा म्हणून गोदावरी नदीचा उगम झाला. गोदावरीच्या उगमा मुळे आणि गौतम ऋषींनी मनापासून केलेल्या प्रार्थनेमुळे भगवान शिव या मंदिरात विराजमान होण्यास मंजूर झाले. आणि तीन डोळ्यांच्या शिवशंभुच्या उपस्थितीमुळे हे स्थान त्र्यंबक म्हणजेच तीन डोळे म्हणून ओळखलं जाऊ लागलं. उज्जैन आणि ओंकारेश्वर प्रमाणे त्रंबकेश्वर महाराज यांना या गावाचा राजा मानल जात. म्हणून तर सोमवारी त्र्यंबकेश्वरचा राजा आपल्या प्रजेची स्थिती जाणून घेण्यासाठी शहर दौऱ्यासाठी बाहेर पडतो.

उत्सव, यात्रा:

मंदिर भगवान शिव यांना समर्पित असल्या मुळे मंदिरामध्ये महाशिवरात्रि उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. प्रत्येक महा शिवरात्रीला इथे भाविकांचा कल्लोळ असतो. उत्सवा मध्ये त्रंबकेश्वर महाराजांचा पंचमुखी सोन्याचा मुखवटा पालखीमध्ये बसवून गावांमध्ये फिरवला जातो. त्यानंतर कुशावर्त तीर्थ येथे घाटावर स्नान केले जाते व त्यानंतर मुखवटा परत मंदिरात आणला जातो. पुन्हा त्यांना हिरेजडित सोन्याचा मुकुट घातला जातो संपूर्ण दृश्य त्रंबक महाराजांच्या राज्याभिषेका सारखे वाटते.

हा प्रवास पाहणे अंत्यंत अलौकिक अनुभव आहे. कुशावर्ती तीर्थाची कथा अत्यंत रंजक आहे. असे म्हणतात की गोदावरी नदी ब्रह्मगिरी पर्वत वरून पुन्हा पुन्हा लुप्त व्हायची. गोदावरीच्या पलायन ला रोखण्यासाठी गौतम ऋषींनी एका कुशच्या मदतीने गोदावरी त्यांच्या गुलामगिरीत बांधून ठेवले. तेव्हा पासून या तलावांमध्ये नेहमीच भरपूर पाणी असते. हा तलाव स्वतः कुशावर्त तीर्थ म्हणून ओळखला जातो. स्नानाच्या वेळी भगवान शिव स्वतः या कुंडामध्ये शाही स्नान करायचे.

त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग फोटो:

trimbakeshwar temple nashik information in marathi
trimbakeshwar temple nashik information in marathi

मंदिर कोठे आहे? कसे जायचे?:

त्र्यंबकेश्वर मंदिर ब्रह्मगिरी नावाच्या पर्वतावर जवळील त्र्यंबक या गावांमध्ये स्थित आहे. ह्या पर्वतावरून पवित्र गोदावरीचा उगम होतो. ब्रह्मगिरी श्री पर्वताच्या पायथ्याशी हे मंदिर वसले आहे नाशिक पासून साधारण २८ किलोमीटर किलोमीटर अंतरावर हे मंदिर स्थित आहे. हवाई मार्गे जायचं असेल तर सर्वात जवळचे विमानतळ म्हणजे ओझर नाशिक आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. हे विमानतळ मुख्य शहरापासून २४ किलोमीटर अंतरावर स्थित आहे. नाशिकला जाण्यासाठी भारताच्या सर्व मुख्य शहरातून रेल्वेसेवा सुरू आहेत. जवळचे रेल्वे स्थानक आहे नाशिकरोड साधारण मुख्य शहरापासून ४० किलोमीटर अंतर दूर आहे. नाशिक हे मुख्य रस्त्यांशी चांगल्या पद्धतीने जोडला गेला आहे त्यामुळे नाशिक ते त्रंबकेश्वर अंतर साधारण ३० किलोमीटर आहे.

मंदिर कोणी बनवले आहे:

मंदिराच पुनर्निर्माण तिसरे पेशवे बालाजी अर्थात नानासाहेब पेशवे यांनी केलं होतं. या मंदिराच्या बांधकामाची सुरुवात १७५५ मध्ये सुरू झाली होती आणि ३१ वर्षानंतर १७८६ मध्ये ह्या मंदिराचा बांधकाम पूर्ण करण्यात आलं.

पाहण्यासारखी ठिकाणे:

नाशिक मध्ये पाहण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत. जसे की सर्व धर्म मंदिर तपोवन चे प्रभू राम चंद्र यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या पंचवटीतील तपोवन परिसरात सर्वधर्म मंदिर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. मांगीतुंगी मंदिर,‌ पंचवटी, पांडवलेणी, श्री सप्तशृंगी गड, सोमेश्वर मंदिर, राम कुंड, लक्ष्मण कुंड, धम्मगिरी, कुशावर्त तीर्थ, काळाराम मंदिर.

त्र्यंबकेश्वर मंदिर अधिकृत वेबसाइट – trimbakeshwar temple official website

https://www.trimbakeshwartrust.com

त्र्यंबकेश्वर मंदिर कोविड -१९. मध्ये खुले आहे का? – is trimbakeshwar temple open

नाशिक मधील त्रंबकेश्वर हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. परंतु महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा प्रभाव वाढत असल्याने महाराष्ट्रातील धर्म क्षेत्र बंद ठेवण्यात आली आहेत. त्याचाच परिणाम हा नाशिक मधील त्र्यंबकेश्वर येथे देखील दिसून येतो. मंदिर फक्त मंदिरातील मुख्य भटजींसाठी सुरु आहे बाकी श्रद्धाळू आणि भक्तजनांसाठी हे मंदिर बंद आहे.

वरील सर्व गोष्टी पाहून आपणास अंदाज लागला असेलच कि हा त्र्यंबकेश्वर मंदिर नाशिक मराठी माहिती trimbakeshwar temple nashik information in marathi हे मंदिर कुठे आहे? ह्याचे वैशिष्ट्य, त्याचे सौंदर्य, याचा इतिहास,  मंदिरातील रहस्य, मंदिरात घडणारे उत्सव, जत्रा याची थोडक्यात माहिती  दिली आहे. trimbakeshwar temple information in marathi language हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच information about trimbakeshwar temple in marathi हा लेख कसा वाटला व अजून काही त्र्यंबकेश्वर मंदिर नाशिक मराठी माहिती विषयी राहिले असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद.

आम्ही दिलेल्या trimbakeshwar temple nashik information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू. अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!