तुगलकाबाद किल्ला माहिती Tughlaqabad Fort Information in Marathi

Tughlaqabad Fort Information in Marathi तुगलकाबाद हा किल्ला दिल्लीतील एक प्राचीन किल्ला असून या किल्ल्याची स्थापना आणि तुगलकाबाद या शहराची स्थापना गयासुद्दिन तुगलक याने केली होती. हा तुगलकाबाद हा किल्ला मोडकळीस आलेला किल्ला आहे जो ६ किलो मीटरच्या परिघा मध्ये वसलेला आहे. हा किल्ला मोडकळीच्या अवस्थेत असला तरी तो दिल्ली सल्तनतच्या पूर्वीच्या काळातील वैभव आणि पराक्रमाची साक्ष देतो. बहुतेक हा किल्ला गयासुद्दिन तुगलक याने इ. स. १३२१ मध्ये बांधला आहे. तुगलकाबाद किल्ला हा ५ व्या शतकामध्ये ऐतिहासिक शहराच्या रुपात स्थापित केलेला किल्ला होता.

इ. स १३२७ मध्ये हा किल्ला मोठ्या प्रमाणात विकसित केला आणि या बांधकामासाठी दगडांचा केला आणि किल्ल्याचे संरक्षण करण्यासाठी भक्कम अशी तटबंदी बांधली या तटबंदीच्या भिंतीची उंची कमीत कमी १० ते १५ मीटर इतकी असेल आणि याच तटबंदीच्या भिंतीला शत्रूवर लक्ष ठेवण्यासाठी आणि शत्रूवर आक्रमण करण्यसाठी मजबूत असे बुरुज देखील बांधण्यात आले.

तुगलकाबाद या किल्ल्याला पूर्वीच्या काळी एकूण ५२ दरवाजे होते पण आत्ता या किल्ल्याला एकूण १३ ते १४ दरवाजे शिल्लक आहेत. तुघलकाबाद किल्ल्याची प्रचंड तटबंदी, युध्दनौका आणि मोठे दगडकाम कारागीरांच्या आर्किटेक्चरल कौशल्याची आणि प्रगतीबद्दल खूप काही सांगतात. हा राजकीय अशांततेचा काळ होता आणि साम्राज्याच्या उत्तर पश्चिम सीमेवरून मंगोल हल्ल्याचा सतत धोका होता आणि साम्राज्य व त्याच्या प्रजेला मारहाण करणाऱ्या मंगोलांपासून वाचवण्यासाठी गयासुद्दिन तुगलक ने तुघलकाबाद किल्ला बांधला.

tughlaqabad fort information in marathi
tughlaqabad fort information in marathi

तुगलकाबाद किल्ला मराठी माहिती – Tughlaqabad Fort Information in Marathi

किल्याचे नावतुगलकाबाद किल्ला
प्रकारभूकील्ला
ठिकाणदिल्ली (तुगलकाबाद शहर)
स्थापनाइ. स. १३२१
संस्थापकगयासुद्दिन तुगलक
बांधकाम शैलीइंडो इस्लामिक शैली
किल्ल्यावर पाहण्यासारखी ठिकाणेभुयारी मार्ग, कृत्रिम पाण्यचा साठा, दुमजली बुरुज, दरवाजे, राजवाडे, प्रेक्षकगृह

tughlaqabad fort delhi information in marathi तुगलकाबाद हा किल्ला दिल्लीतील एक प्राचीन किल्ला असून या किल्ल्याची स्थापना आणि तुगलकाबाद या शहराची स्थापना गयासुद्दिन तुगलक इ. स. १३२१ मध्ये केली. तुगलकाबाद हा एक भूकिल्ला असून या किल्ल्याचा एकूण परीघ ६ किलो मीटर आहे. या किल्ल्याचे बांधकाम हे इंडो इस्लामिक शैलीतील आहे आणि या प्रचंड अश्या किल्ल्याच्या परिसरामध्ये आपल्याला अनेक स्मारके बांधलेली पाहायला मिळतात. तुगलकाबाद हा किल्ला चार वर्षांच्या अल्प कालावधीत (इ. स. १३२१ ते इ. स. १३२५) बांधून पूर्ण झाला.

किल्ल्याचे संरक्षण करण्यासाठी भक्कम अशी तटबंदी बांधली या तटबंदीच्या भिंतीची उंची कमीत कमी १० ते १५ मीटर इतकी आहे आणि त्या भिंतीना मजबूत असे दुमजली बुरुज बांधलेले आहेत आणि किल्ल्याच्या पूर्वेकडील बाजूस तुगलकाबाद हे शहर वसलेले आहे. या किल्ल्यामध्ये आपल्यला भव्य बुरुज, भव्य वाडे, मशिदी आणि प्रेक्षकगृहे या सारख्या इमारती पाहायला मिळतील.

तुगलकाबाद किल्ल्याचा इतिहास – Tughlaqabad Fort History in Marathi

तुघलकाबाद किल्ला तुघलक राजवंशाचा संस्थापक गयासुद्दिन तुगलक तुगलक यांनी इ. स. १३२१ मध्ये बांधला होता. पाचव्या ऐतिहासिक शहराच्या रूपात स्थापित केलेला हा किल्ला नंतर  इ. स. १३२७ मध्ये हा किल्ला विकसित करण्यात आला आणि या बांधकामासाठी दगडांचा केला आणि किल्ल्याचे संरक्षण करण्यासाठी भक्कम अशी तटबंदी बांधली या तटबंदीच्या भिंतीची उंची कमीत कमी १० ते १५ मीटर इतकी आहे आणि भिंतीना भक्कम असे बुरुज देखील बांधण्यात आले.

तुगलकाबाद किल्ल्याच्या मागे एक मनोजरंजक आख्यायिका आहे कारण या किल्ल्याबद्दल असे मानले जाते की गयासुद्दिन तुगलकला परिसरातील प्रत्येक कामगारांनी हा शहर-किल्ला बांधावा असे वाटत होते म्हणून त्याने तेथील सर्व कामगार किल्ला बांधण्यासाठी घेतलेले होते कारण गयासुद्दिन तुगलक याने त्या शहरतील सगळे कामगार किल्ल्यावर काम करतील असा आदेश दिला होता आणि कामगार त्याचा आदेश मोडू शकत नव्हते.

यामुळे सुफी संत निजामुद्दीन औलिया हे खूप भडकले कारण आधीपासून चालू असलेले त्यांच्या विहिर बांधायचे काम आदेशानंतर तसेच राहिले आणि म्हणून त्यांनी एक शाप दिला “या रे हिसार, या बससे गुर्जर” म्हणजे इथले लोक इथेच राहतील पण फक्त गुज्जर येथे राज्य करतील. या शापानंतर असे मानले जाते की तुगलक साम्राज्य समृद्ध होऊ शकले नाही आणि लवकरच त्यांना किल्ला आणि शहर सोडून जावे लागले.

किल्ल्यावर पाहण्यासारखी ठिकाणे 

  • तुगलकाबाद या किल्ल्याच्या दक्षिण भागामध्ये मोठ्या प्रमाणात कृत्रीम साठा आहे तसेच या किल्ल्यामध्ये पावसाचे पाणी साठवण्यासाठी टाक्या देखील बांधल्या आहेत.
  • तुगलकाबाद या किल्ल्याच्या वैशिट्यापैकी एक म्हणजे किल्ल्यामध्ये असणारा भुयारी मार्ग ज्याला गुप मार्ग म्हणतात. किल्ल्यामध्ये एक भुयारी मार्ग आहे ज्यामध्ये चेंबर देखील आहेत आणि ते राजवाड्याला जोडले आहेत.
  • इंडो इस्लामिक शैलीच्या नक्षीकामाचे तसेच बांधकामाचे सौंदर्य आपल्याला या किल्ल्यामध्ये पाहायला मिळते.
  • या किल्ल्यावरून आपल्यला किल्ल्याजवळ असणारे तुगलक राजाचे थडगे पाहायला मिळेल.
  • हा किल्ला जरी मोडकळीस आला असला तरी या पूर्ण किल्ल्यचा कोणताही भाग पूर्णपणे नष्ट झालेला नाही प्रत्येक इमारतीचे काही ना काही अवशेष आपल्यला तेथे पाहायला मिळतात.
  • या किल्ल्यला पूर्वीच्या काळामध्ये एकूण ५२ दरवाजे होते पण आता या किल्ल्याला एकूण १३ ते १४ दरवाजे शिल्लक आहेत.
  • इतर महत्वाची ठिकाणे म्हणजे राजवाडे, भक्कम आणि भव्य बुरुज, सभागृहे आणि मशिदी.

किल्ल्याजवळील इतर ठिकाणे

तुगलकाबाद या किल्ल्याजवळ बरीच अशी ठिकाणे आहेत जी आपण पाहू शकतो आणि त्यामधील काही खाली दिलेली आहेत.

  • या किल्ल्याच्या काही अंतरावर एक कमळ मंदिर आहे ज्याची रचना एका कमळाच्या आकाराची आहे. येथे ध्यानासाठी एक प्रार्थना गृह तसेच मंदिराच्या आवारात एक सुंदर बाग आणि तलाव आहे.
  • खिरकी मशीद : खिरकी मशीद हे १३ व्या शतकामध्ये दिल्लीमध्ये राज्य करणाऱ्या फिरोजशाह तुगलक याने बांधले होते. खिरकी मशीद हे देखील किल्ल्याजवळील पाहण्यासारखे ठिकाण आहे.
  • आदिलाबाद किल्ला : आदिलाबाद किल्ला हा तुगलक घराण्याने बांधलेला हा एक मध्यम आकाराचा किल्ला आहे. हा किल्ला जहांपनाह शहराजवळ मुहम्मद बिन तुगलक याने बांधला होता.

तुगलकाबाद किल्ला फोटो:

tughlaqabad fort information in marathi
tughlaqabad fort information in marathi

तुगलकाबाद या किल्ल्यावर कसे जायचे ? 

तुगलकाबाद हा किल्ला दिल्ली शहराजवळ असल्यमुळे आपल्यला हा किल्ला पाहायला जाण्यासाठी वाहतुकीची कोणतीही अडचण येत नाही.

  • जर तुम्हाला हा किल्ला पाहण्यासाठी रेल्वे ने यायचे असल्यास तुम्हाला कोणत्याही मुख्य शहरातून दिल्ली रेल्वे स्थानकाला यावे लागेल. दिल्ली रेल्वे स्थानकापासून हा किल्ला २५ किलो मीटर अंतरावर आहे. रेल्वे स्थानकापासून किल्ल्यापर्यंत जाण्यासाठी तुम्हाला रिक्षा किवा टॅक्सी घ्यावी लागेल.
  • तुम्ही दिल्लीला विमानाने देखील येवू शकता कारण हा किल्ला दिल्ली विमानतळापासून २० किलो मीटर आहे आणि तेथून रिक्षा किवा टॅक्सी घेवून किल्ल्यापर्यंत पोहचू शकता.

टीप

  • तुगलकाबाद हा किल्ला सकाळी ७ ते संध्याकाळी ५ पर्यंत पर्यटकांच्यासाठी खुला असतो.
  • हा किल्ला पाहण्यासाठी भारतीय पर्यटकांच्या कडून ५ रुपये प्रवेश शुल्क घेतला जातो आणि विदेशी पर्यटकांच्या कडून १०० रुपये प्रवेश शुल्क घेतला जातो.

वरील सर्व गोष्टी पाहून आपणास अंदाज लागला असेलच, तुगलकाबाद किल्ला tughlaqabad fort information in marathi language हा कसा आहे? कोठे आहे? त्याचा इतिहास काय आहे? तिथे पाहण्यासारखी ठिकाणे आणि तसेच त्यांची वैशिट्ये कोणती आहेत. tughlaqabad fort delhi information in marathi हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच information about tughlaqabad fort in marathi हा लेख कसा वाटला व अजून काही तुगलकाबाद किल्ला विषयी राहिले असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद.

आम्ही दिलेल्या tughlaqabad fort in marathi language information माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू. अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!