औषधी वनस्पती तुळस माहिती मराठी Tulsi Information in Marathi

Tulsi Information in MarathiBasil in Marathi तुळशीची माहिती मराठी तुळस म्हणताच आपल्या डोळ्यासमोर येत रोज पुजली जाणारी घरा समोरील तुळशीची tulsi chi mahiti marathi कुंडी आणि त्यामधे बहरणारी छोट्या पण जाड पानांची तुळस tulsi in marathi आणि त्याच पानांमधून निघालेला फुलांचा लांबलचक गुच्छ आणि ते प्रसन्न वातावरण. भारत देशामध्ये तर तुळशीला साक्षात देवाचा मान  दिलेला आहे. सर्वाना आठवत असेलच संध्याकाळी दिवा  लावल्यावर शुभंकरोती म्हणाली  जायची त्यातील एक वाक्य दिवा लावला देवांपाशी उजेड पडला तुळशीपाशीं, तुळस म्हणजे  साक्षात लक्ष्मीचे रुप.

tulsi-information-in-marathi
tulsi information in marathi/tulsi in marathi

औषधी वनस्पती तुळस माहिती मराठी – Tulsi Information in Marathi

तुळशीच्या  बहुगुणी फायद्यामुळे आयुर्वेदा मध्ये  तुळशीला खूप वरचे स्थान आहे. तुळशीला “हर्बल क्वीन “ किंवा “औषधांची राणी “ असेही  म्हणतात.

नावतुळस (तुलसी, Holy Basil in marathi)
शास्त्रिय नावOcimum sanctum, ऑसिमम सॅंक्टम
सरासरी उंची30 ते  60 cm
हंगामसर्व (पाण्याच्या उपलब्धते नुसार)
लावणी1x 0.3 m
पीक कालावधी30 ते 50 दिवस
तापमान7°  ते 27 ° C
मातीचा सामू  (ph)4.3 ते   8.2

तुळशीची संक्षिप्त माहीती 

साधारणतः तुळस ही 30 ते  60 cm वाढते, पण काही प्रजाति 100 cm पर्यंत वाढतात. तुळशीचा असा एकही अवयव नाही की जिचा औषध म्हणुन उपयोग  होत नाही. तुळशीच्या याच आश्चर्यकारक औषधी गुणधर्मामुळे फक्त भारतात आढळणारी आढळणारी तुळस कालांतराने आशिया खंडातील इतर देशांमध्ये आढळू लागली.

तुळशीचे प्रकार 

  1. राम तुळस
  2. श्याम किंवा श्यामा तुळस
  3. वन तुळस
  4. लिंबू तुळस
  5. श्वेत/विष्णू तुळस

11 तुळशीचे फायदे आणि उपयोग – tulsi che upyog in marathi

तुळस ही बहुगुणी औषधी वनस्पती आहे, सर्वात महत्त्वाचे म्हणजे ती आपल्याला भरपूर प्रमाणात अॉक्सिजनचा पुरवठा करते, त्यामुळे तुळशी जवळचे वातावरण नेहमी प्रसन्न राहते.

1.सर्दी खोकला

आपल्या सर्वांना माहीतच आहे सर्दी खोकला झाला की आई सर्वात आधी आपल्याला तुळशीचा काढा देते. कारण तुळस रोगप्रतिकारक शक्ती वाढवते.

2.त्वचाविकार /त्वचासंसर्ग

त्वचाविकारांवर तुळस खूप गुणकारी आहे. त्वचेला खाज सुटत असेल किंवा त्वचासंसर्ग(infection )असेल तर त्यावर तुळशीच्या पानाचा रस लावला जातो, कारण तुळशी मध्ये Antifungal, Antiimflemntary, Antiseptic गुण आढळतात.

3.चेहऱ्याचे आरोग्य – benefits of tulsi in marathi

त्वचेचा वर्ण सुधारण्यासाठी तुळशीचा उपयोग होतो. तुळशीच्या रसामध्ये हळद मिक्स करून लावल्यास वर्ण सुधारण्यासाठी मदत होते.

4.मुखदुर्गंधी पासून आराम 

रोज तुळशीची 1-2 पाने चावून खाल्ल्यास मुखदुर्गंधी पासून आराम मिळतो.

5.स्मरणशक्ती वाढण्यास मदत 

ऊपाशीपोटी तुळशीचे पाने खाल्याने स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते.

6.मानसिक तणाव,धुम्रपान डोकेदुखी वर आराम

तुळशी मध्ये असलेल्या Antistress Agent property मुळे  मानसिक तणाव, धुम्रपान व डोकेदुखी कमी होण्यास मदत होते.

7.दातांच्या आणि हिरड्यांच्या समस्येपासून आराम 

तुळशीच्या पानाची पावडर मोहरी च्या तेलात मिसळून त्याची पेस्ट दातांच्या आणि हिरड्यांच्या समस्येपासून आराम मिळतो.

8.शरीर तरुण राहते

तुळस तुमचे वय लपवण्यास मदत करते (Anti-aging). तुळस मध्ये प्रचंड प्रमाणात असणार्‍या अँटीऑक्सिडंट आणि तिच्या रोगप्रतिकारक शक्ति वाढवणार्‍या गुणधर्मामुळे आपल्या शरीराची होणारी झीज मंदावते आणि आपले शरीर जास्त काळ तरुण राहते.

9.वजन कमी करण्यासाठी फायदेशीर 

तुळस तुमचे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. तुळस तुमची चयापचय क्रिया (metabolism) सुधारण्यात मदत करते, ज्यामुळे तुमची पचनशक्ती सुधारते आणि योग्य आहाराचे सेवन करून तुम्हाला वजन कमी करण्यासाठी मदत करते.

10.जखम लवकर भरण्यास मदत

जखम झालयास तुळशीच्या  पानाचा रस  लावलयास जखम लवकर भरते आणि इन्फेकशन पण होत नाही.

11.मुळव्याधी वर गुणकारी

तुळशीचं  बी  दह्यासोबत  खाल्यास मुळव्याधीचा त्रास  दूर होतो.

तुम्हाला माहित आहे का ?

जेव्हा ब्रिटिश भारतात आले तेव्हा डासां पासून वाचण्यासाठी त्यांनी आपल्या घरा भोवती तुळस आणि कडुलिंबाची झाडे लावली होती. ते याला Mosquito Plants म्हणत.

दुष्परिणाम

सर्वाना माहितच असेल मराठीत एक म्हण आहे “अति तिथे माती” म्हणजे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक झाला की त्याची माती (वाईट परिणाम) होते, त्याला ही तुळस तरी का वावगी ठरेल? तर पाहुया तुळशीच्या अतिरिक्त वापराचे दुष्परिणाम

  1. तुळस रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करते, मधुमेही रूग्णांनी जर त्याच्या औषधासोबत तुळशीचे सेवन जास्त प्रमाणात केले तर धोकादायक ठरू शकते.
  2. तुळस रक्त पातळ करते, हृदय रोगीना पण रक्त पातळ करणारी औषधे असतात तर अश्या रोग्यांनी तुळशीचे अतिरिक्त सेवन करू नये, कारण रक्त जास्त प्रमाणात पातळ झाले तर रक्तस्राव होऊन ब्रेनहॅमरेज होवू शकते.
  3. गर्भवती महिलांनी तुळशीचे सेवन करु नये. तुळशीच्या अतिरिक्त सेवनामुळे गर्भपात होण्याची शक्यता असते.
  4. जर दिवसातून २ पेक्षा जास्त वेळ तुळशीचा चहा घेतला तर छातीत पोटात जळजळ यासारख्या समस्या उदभवतात.

-सौ सुचित्रा युवराज करोशी 

आम्ही दिलेल्या tulsi tree information in marathi wikipedia माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर तुळस या औषधी वनस्पती बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या tulsi information in marath या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information about tulsi plant in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका. तसेच आपण या लेखाचा वापर असा देखील करू शकता. धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या : इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!