यूपीएससी परीक्षा माहिती UPSC Exam Information in Marathi

UPSC Exam Information in Marathi यूपीएससी परीक्षा मराठी माहिती नमस्कार मित्रांनो, यूपीएससीचे  पूर्ण रूप ‘यूनियन पब्लिक सर्विस कमिशन’ अर्थात ‘केंद्रीय लोकसेवा आयोग’आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात 1919 च्या कायद्यानुसार 1926 मध्ये या आयोगाची स्थापना  करण्यात आली आहे.  देशाचे  प्रशासन चालवण्यासाठी लोक सेवकांची गरज असते. या लोक सेवकांची भरती करणे, त्यांना प्रशिक्षण देणे, त्यांची वित्तलब्धी ठरवणे, त्यांचे पदोन्नती धोरण आखणे यासाठी आयोग स्थापण्याची गरज असते. म्हणून केंद्रीय स्तरावर ‘केंद्रीय लोकसेवा आयोग’ स्थापना करण्यात आली आहे.

upsc exam information in marathi
upsc exam information in marathi

यूपीएससी परीक्षा माहिती – UPSC Exam Information in Marathi

घटनेच्या भाग 14 मध्ये कलम 315 ते 323 दरम्यान आयोगाच्या तरतुदी दिल्या आहेत. आयोगाला  निष्पक्षपणे व निर्भयपणे काम करता यावे म्हणून स्वतंत्र घटनात्मक दर्जा देण्यात आहे. यूपीएससीचे मुख्यालय ‘दिल्ली’ येथे आहे. सध्या यूपीएससीचे चेअरमन डॉ. प्रदीप कुमार जोशी हे आहेत.

यूपीएससी मार्फत वेगवेगळ्या सेवांसाठी परीक्षा घेतल्या जातात. त्यातीलच एक महत्वाची म्हणजे ‘भारतीय नागरी सेवा’. एकूण 24 सेवांसाठी ही परीक्षा घेतली जाते. त्या पुढील प्रमाणे:

 1. भारतीय प्रशासकीय सेवा
 2. भारतीय पोलिस सेवा
 3. भारतीय परराष्ट्र सेवा
 4. इंडियन पोस्ट
 5. इंडियन ऑडिट आणि अकाउंट सर्विस
 6. भारतीय महसूल सेवा (सीमाशुल्क आणि अबकारी विभाग)     
 7. इंडियन डिफेन्स अकाउंट सर्विस     
 8. भारतीय महसूल सेवा( आयकर विभाग)   
 9. इंडियन ordenance factories service (असिस्टंट वर्कमॅनेजर , ऍडमिनिस्ट्रेशन) 
 10. भारतीय  डाक सेवा                 
 11. इंडियन सिव्हिल अकाउंट सर्विस       
 12. इंडियन रेल्वे ट्रॅफिक सर्व्हिस   
 13. इंडियन रेल्वे अकाउंट सर्विस 
 14. इंडियन रेल्वे पर्सनल सर्विस         
 15. पोस्ट ऑफ असिस्टंट सेक्युरिटी कमिशनर
 16. इंडियन डिफेन्स इस्टेट सर्विस       
 17. इंडियन इन्फॉर्मेशन सर्विस (ज्युनियर ग्रेड)    
 18. इंडियन  ट्रेड  सर्विस , ग्रुप ‘A’              
 19. इंडियन कार्पोरेट law  सर्विस                 
 20. Armed forces headquarters civil service (section officer grade)          
 21. दिल्ली, अंदमान आणि निकोबार आइसलँड, लक्षद्वीप, दमन आणि दिव, दादरा नगर हवेली सिविल सर्विसेस
 22. दिल्ली, अंदमान आणि निकोबार आइसलँड, लक्षद्वीप, दमन आणि दिव, आणि दादरा आणि नगर हवेली पोलीस सर्विस
 23. पांडिचेरी सिविल सर्विस         
 24. पांडिचेरी पोलीस सर्विस

पात्रता: केवळ भारतीय नागरिक या परीक्षेसाठी पात्र असेल.

शैक्षणिक पात्रता : 

कोणत्याही संवैधानिक मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी पदवीच्या शेवटच्या वर्षाला असणारे सुद्धा अर्ज करण्यास पात्र असतात.

वयोमर्यादा : 

 • वय वर्षे 21  ते 32.                                             
 • Sc/ST  उमेदवारांना  पाच वर्ष सवलत.                     
 • OBC  उमेदवारांसाठी तीन वर्ष सवलत.
  सर्वसाधारण गटातील उमेदवारांना जास्तीत जास्त सहा प्रयत्न करता येतील.
 • ओबीसी गटातील उमेदवारांना नऊ वेळेस तर एस सी/ एसटी गटातील उमेदवारांना प्रयत्नांची अट नाही.
  या परीक्षेमध्ये तीन टप्पे असतात.                               
 1. पूर्व परीक्षा. 
 2. मुख्य परीक्षा
 3. मुलाखत.

पूर्व परीक्षा माहिती:

पूर्व परीक्षा ही 400 गुणांची असते. यामध्ये 2 पेपर असतात. ही परीक्षा इंग्रजी आणि हिंदी दोन्ही भाषांमध्ये असते. पेपर 1 सामान्य अध्ययन हा असून 100 प्रश्न असतात. पेपर 2 नैसर्गिक कौशल्य व क्षमता चाचणी असून  त्यामध्ये 80  प्रश्न असतात. पूर्व परीक्षा ही वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असते. पेपर 2 केवळ पात्रता चाचणी आहे. त्यासाठी उमेदवारांना 33% म्हणजेच 66 गुण मिळवावे लागतात. पेपर 1 मधील गुणांनुसार उमेदवाराची मुख्य परीक्षेसाठी निवड होते.

मुख्य परीक्षा माहिती :                                      

मुख्य परीक्षा ही 1750  गुणांची असून लेखी परीक्षा आहे. उत्तरांच्या लिखाणावरून उमेदवार कसा विचार करतो आणि मोजक्या शब्दात कशी मुद्देसूद मांडणी करतो हे पाहिले जाते. मुख्य परीक्षेमध्ये एकूण 9 पेपर असतात. मुख्य परीक्षा ही आठव्या अनुसूचीमध्ये नमूद असलेल्या कोणत्याही भाषेमधून देता येते.

 • पेपर A –    भारतीय भाषा       300  गुण             
 • पेपर B –    इंग्रजी                300  गुण                     
 • पेपर I –     निबंध                   250  गुण              
 • पेपर II –    सामान्य अध्ययन I     250  गुण               
 • पेपर III –  सामान्य अध्ययन II   250  गुण            
 • पेपर IV –   सामान्य अध्ययन III  250  गुण            
 • पेपर V –    सामान्य अध्ययन IV  250  गुण                 
 • पेपर VI –   वैकल्पिक विषय पेपर I  – 250  गुण    
 • पेपर VII – वैकल्पिक विषय पेपर II – 250  गुण

यामधील पेपर A  भारतीय भाषा आणि  पेपर B  इंग्रजी भाषा केवळ पात्रता असून उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. या दोन पेपर मधील गुण एकूण निकालात ग्राह्य धरले जात नाहीत.

पेपर VI  आणि  पेपर VII  या  पेपर साठी आपल्याला एक वैकल्पिक विषय निवडावा लागेल. वैकल्पिक  विषय म्हणून आपण आठव्या अनुसूची मध्ये नमूद केलेल्या कोणत्याही एका भाषेचे साहित्य किंवा इंग्रजी साहित्य निवडू शकतो. असे वैकल्पिक विषय खालील प्रमाणे आहेत.

वैकल्पिक विषय                                                     

 1. मानवंशशास्त्र
 2. अग्रिकल्चर
 3. बॉटनी
 4. केमिस्ट्री
 5. सिव्हिल इंजीनियरिंग
 6. इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग
 7. ऍनिमल husbandry  and veterinary science
 8. कॉमर्स and accountancy
 9. इकॉनॉमिक्स
 10. जिओग्राफी
 11. जिओलॉजी
 12. हिस्टरी
 13. law
 14. Management
 15. मॅथेमॅटिक्स
 16. मेकॅनिकल इंजीनियरिंग
 17. मेडिकल सायन्स
 18. philosophy
 19. Physics
 20. पॉलिटिकल  सायन्स and   इंटरनॅशनल  रिलेशन
 21. सायकॉलॉजी
 22. पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन
 23. sociology
 24. statastics
 25. zoology

मुलाखत माहिती:

मुलाखत ही शेवटची आणि महत्वाचा टप्पा आहे. ही मुलाखत दिल्ली येथे घेतली जाते. 275 गुणांची असणारी मुलाखत म्हणजे उमेदवारांच्या व्यक्तिमत्त्वाची चाचणी असते. यामध्ये त्यांची अचूक निर्णय घेण्याची क्षमता तपासणी जाते. अंतिम गुणांमध्ये  मुख्य परीक्षेचे 1750 आणि मुलाखतीचे 275 यांची बेरीज केली जाते. आणि अंतिम निकाल जाहीर केला जातो. गुणांनुसार उमेदवाराला सेवा विभागून दिल्या जातात. प्रशिक्षणासाठी उमेदवारांना मसूरी, उत्तराखंड येथे पाठवले जाते.

यु पी एस सी ची तयारी करण्यासाठी बरेच coaching classes उपलब्ध आहेत. तसेच Barty, यशदा, siac सारख्या संस्था entrence च्या माध्यमातून मेरीट बेसवर फ्री मध्ये ट्युशन देतात. तसेच  सध्या वेगवेगळ्या ॲपच्या माध्यमातून तयारी करता येते.

पेपरएकूण प्रश्नांची संख्याएकूण गुणडिग्रीवेळनिगेटिव्ह

गुण

पेपर I100200डिग्री2 तासआहे
पेपर II80200डिग्री आणि डिग्री स्कूलचे मिश्रण2 तासआहे

यूपीएससी परीक्षा संकेतस्थळ:

https://www.upsc.gov.in/

वरील सर्व मजकूर पाहून आपणास अंदाज लागला असेलच, यूपीएससी परीक्षा म्हणजेच केंद्रीय लोकसेवा आयोग upsc exam information in marathi pdf  कशी असते? त्याचे स्वरूप व पात्रता काय आहे? त्याचा अभ्यासक्रम काय आहे ? पेपर कोणते व किती मार्क्स चे असतात महत्वाची पुस्तके कोणती आहेत या सर्वाचे थोडक्यात मार्गदर्शन केले गेले आहे. upsc information in marathi हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच information of upsc exam in marathi हा लेख कसा वाटला व अजून काही यूपीएससी परीक्षा म्हणजेच केंद्रीय लोकसेवा आयोगा विषयी राहिले असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद.

आम्ही दिलेल्या upsc in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू. अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

1 thought on “यूपीएससी परीक्षा माहिती UPSC Exam Information in Marathi”

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!