वरण रेसिपी मराठी Varan Recipe in Marathi

Varan Recipe in Marathi वरण रेसिपी मराठी वरण हा एक पारंपारिक पदार्थ आहे. जो खूप लोक आवडीने पांढऱ्या भातासोबत खातात किंवा आजारी असणाऱ्या लोकांना देखील डॉक्टर वरण भात खाण्याचा सल्ला देतात कारण वरण भात हे पचण्यासाठी हलके असते. वरण हि रेसिपी भारतामध्ये बहुतेक स्वयंपाक घरामध्ये बनते ती रोजच्या जेवणामध्ये असो किंवा मग आपण देवाला नैविद्या दाखवण्यासाठी बनवलेली असो. देवाला नैवैद्य दाखवण्यासाठी जे पदार्थ बनवतो त्यामध्ये वरण आणि भात हा देखील ठरलेला पदार्थ असतो. तसेच भारतीय संस्कृतीमध्ये वेगवेगळे उपवास केले जातात आणि ते सोडताना वरण भात खावून सोडले जातात.

आता आपण वरण हि रेसिपी कशी बनवायची ते पाहणार आहोत. वरण हे तुरीच्या डाळीपासून बनवले जाते परंतु काही वेळेला मुगाच्या डाळीचे किंवा मुग आणि तुरीची डाळ मिक्स करून देखील वरण बनवले जाते. वरण बनवताना सर्व प्रथम डाळ कुकरमध्ये चांगली मऊ शिजवली जाते आणि मग त्याला फोडणी दिली जाते.

वरण हि रेसिपी बनवण्यासाठी खूप सोपी आहे आणि खूप कमी वेळेमध्ये म्हणजे २० ते २५ मिनिटामध्ये मोजक्या साहित्यामध्ये बनते. चला तर आता आपण या लेखामध्ये वरण रेसिपी कशी बनवायची ते पाहूयात.

varan recipe in marathi
varan recipe in marathi

वरण रेसिपी मराठी – Varan Recipe in Marathi

तयारीसाठी लागणारा वेळ१० मिनिटे
बनण्यासाठी लागणारा वेळ१० मिनिटे
एकूण लागणारा वेळ२० मिनिटे
बनवण्याची पध्दतखूप सोपी
वाढणी२ ते ३ व्यक्ती

वरण बनवण्यासाठी लागणारे मुख्य साहित्य – key ingredients 

  • डाळ : वरण बनवण्यासाठी डाळ हि महत्वाचा घट आहे. वरण बनवताना डाळीमध्ये पाणी घालून तो कुकर मध्ये चांगली शिजवली जाते आणि मग त्याला जिरे. मोहरी, लसून, कडीपत्ता याची फोडणी दिली जाते.
  • लसून : वरणामध्ये जर आपण ठेचलेला लसून फोडणीसाठी वापरला तर त्यामुळे वरणाला एक स्वादिष्ट टेस्ट येते आणि खमंग वास देखील येतो.
  • हिरवी मिरची आणि मीठ : वरणामध्ये हिरवी मिरची फोडणीमध्ये वापरली तर वरणाला थोडा तिखटपणा येतो आणि मीठ घातल्यामुळे वरणाला चव येते.

वरण रेसिपी – how to make varan recipe in marathi language

वरण रेसिपी हि एक पारंपारिक रेसिपी आहे म्हणजेच हि रेसिपी खूप पूर्वीच्याकाळापासून बनवली जाते आणि हि बनवण्यासाठी खूप सोपी आहे आणि खूप कमी वेळेमध्ये आणि कमी साहित्यामध्ये बनते. वरण हे तुरीच्य डाळीपासून किंवा मुगाच्या डाळीपासून किंवा दोन्ही डाळी मिक्स करून बनवले जाते आणि मग त्याला मोहरी, लसून, कडीपत्ता, हळद, हिंग याची फोडणी दिली जाते. वरण हि रेसिपी आपण भात, चपाती किंवा भाकरी सोबत खावू शकतो. चला तर मग वरण कसे बनवायचे ते पाहूयात आणि त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूयात.

तयारीसाठी लागणारा वेळ१० मिनिटे
बनण्यासाठी लागणारा वेळ१० मिनिटे
एकूण लागणारा वेळ२० मिनिटे
बनवण्याची पध्दतखूप सोपी
वाढणी२ ते ३ व्यक्ती

वरण बनवण्यासाठी लागणारे साहित्य – ingredients needed to make varan recipe 

वरण बनवण्यासाठी तुरीची डाळ, मोहरी, जिरे, लसून, कढीपत्ता, ओले खोबरे आणि कोथिंबीर हे साहित्य लागते आणि हे सर्व साहित्य आपल्या घरामध्ये अगदी सहजपणे उपलब्ध असते आणि जर घरामध्ये उपलब्ध नसेल तर ते आपण बाजारातून अगदी सहजपणे उपलब्ध करू शकतो. चला तर आता आपण वरण बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी पाहूयात.

  • अर्धी वाटी तूर डाळ.
  • २ ते ३ चमचे तेल.
  • १/२ चमचा मोहरी.
  • १/४ चमचा जिरे.
  • १/४ चमचा हळद.
  • हिंग ( चिमूटभर ).
  • ५ ते ६ कडीपत्ता पाने.
  • २ हिरवी मिरच्या ( मोडून ).
  • ६ ते ७ लसून पाकळ्य ( ठेचलेल्या ).
  • २ चमचे वाटलेले खोबरे कोथिंबीर.
  • मीठ ( चवीनुसार ).
  • साखर ( चवीनुसार ).
  • पाणी ( आवश्यकतेनुसार ).

वरण बनवण्यासाठी केली जाणारी कृती – process to make varan recipe 

वरण हि रेसिपी बनवण्यासाठी खूप सोपी आहे आणि हि खूप झटपट बनते म्हणजेच हि रेसिपी १५ ते २० मिनिटामध्ये बनते आणि मोजक्या साहित्यामध्ये बनते. आता आपण वर दिलेले साहित्य वापरून वरण कसे बनवायचे ते पाहणार अहोत.

  • वरण बनवताना सर्व प्रथम तुरीची डाळ चांगली निवडून घ्या आणि मग ते स्वच्छ धुवून कुकरमध्ये घाला आणि त्यामध्ये पाणी घालून ते शिजण्यासाठी गॅसवर मोठ्या आचेवर ठेवा आणि ३ ते ४ शिट्या येवू द्या म्हणजे डाळ शिजण्यास मदत होईल.
  • आता कुकरला ३ ते ४ शिट्या झाल्या की गॅस बंद करा आणि कुकर थंड होण्यासाठी ठेवा.
  • मग कुकर थंड झाला कि त्यामधील डाळ रवीने गुसळून घ्या ( टीप : डाळ शिजवताना जास्त पाणी घालू नका कारण आपल्याला वर्ण जास्त घट्ट आणि जास्त पातळ देखील बनवायचे नाही तर ते आपल्याला सरसरीत बनवायचे असते त्यामुळे डाळ शिजवताना काळजी पूर्वक पाणी घाला ).
  • मग गॅसवर मध्यम आचेवर वरण फोडणी टाकण्यासाठी भांडे ठेवा आणि त्यामध्ये तेल घाला तेल गरम झाले कि त्यामध्ये मोहरी घाला आणि ती तडतडली कि त्यामध्ये जिरे टाका आणि जिरे चांगले फुलले कि मग त्यामध्ये ठेचलेला लसून, कडीपत्ता आणि मिरच्या घाला आणि ते तेलामध्ये अर्धा मिनिट परता आणि मग त्यामध्ये हिंग आणि हळद घाला आणि ते देखील मिक्स करा. ( टीप : फोडणीची प्रक्रिया हि गडबडीने करा आणि मंद आचेवर करा त्यामुळे तुमची फोडणी करपणार नाही ).
  • लगेच या फोडणीमध्ये शिजवलेली डाळ घाला आणि मिक्स करा.
  • आता यामध्ये चवीनुसार मीठ आणि साखर घाला तसेच वाटलेले खोबरे आणि कोथिंबीर घालून मिक्स करा.
  • आणि मग त्याला मध्यम आचेवर एक उकळी आणा आणि मग गॅस बंद करा.
  • तुमचे स्वादिष्ट आणि खमंग वरण तयार झाले.

वरण कश्यासोबत खातात – serving suggestions 

  • वरण हे आपण गरमागरम पांढऱ्या भातामध्ये तूप आणि वरण घेवून खावू शकतो तसेच आपण वरण चपाती, रोटी, भाकरी किंवा पुलकी सोबत देखील खावू शकतो.

आम्ही दिलेल्या varan recipe in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर वरण रेसिपी मराठी phodnicha varan बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या varan bhat recipe या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि varan chakolya recipe in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये goda varan recipe in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!