वासुदेव बळवंत फडके माहिती मराठी Vasudev Balwant Phadke Information in Marathi

Vasudev Balwant Phadke Information in Marathi – Vasudev Balwant Phadke Biography in Marathi वासुदेव बळवंत फडके माहिती मराठी ब्रिटिश राजवटीपासून आपल्या भारत मातेचे संरक्षण करताना अनेक क्रांतिवीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आणि त्यातीलच एक श्रेष्ठ नाव म्हणजे वासुदेव बळवंत फडके. वासुदेव बळवंत फडके हे एक भारतीय क्रांतिकारक होते. वासुदेव बळवंत फडके हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील आद्य क्रांतिकारक किंवा सशस्त्र क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जातात. या महान व श्रेष्ठ क्रांतीवीराची भारताच्या स्वातंत्र्यासाठीची संघर्षमय कथा या ब्लॉगमध्ये जाणून घेणार आहोत.

vasudev balwant phadke information in marathi
vasudev balwant phadke information in marathi

वासुदेव बळवंत फडके माहिती मराठी – Vasudev Balwant Phadke Information in Marathi

पूर्ण नाव (Name)वासुदेव बळवंत फडके
जन्म (Birthday)४ नोव्हेंबर १८४५
जन्म गाव (Birth Place)महाराष्ट्रातील रायगड येथे पनवेल जिल्ह्यातील शिरोड
राष्ट्रीयत्व (Citizenship)भारतीय
ओळख (Identity)भारतीय क्रांतिकारक
मृत्यू१७ फेब्रुवारी १८८३

जन्म

४ नोव्हेंबर १८४५ रोजी महाराष्ट्रातील रायगड येथे पनवेल जिल्ह्यातील शिरोड येथे फडके यांचा जन्म एका हिंदू ब्राह्मण कुटुंबामध्ये झाला. त्यांचे संपूर्ण नाव वासुदेव बळवंत फडके आहे. फडके यांना शालेय शिक्षणापेक्षा कुस्ती, घोडेस्वारी यांसारख्या शारीरिक कौशल्याची अधिक आवड होती त्यामुळे लहानपणापासूनच त्यांनी ही शारीरिक कौशल्य शिकण्यास प्राधान्य दिलं.

सन १८६२ साली पदवीधर झालेल्या मुंबई विद्यापीठाच्या सुरुवातीच्या पदवीधरांपैकी वासुदेव फडके हे एक होते. शिक्षणानंतर वासुदेव फडके मुंबईतील सरकारी संस्थांमध्ये काम करत होते आणि त्यानंतर ते माध्यमिक शिक्षण पूर्ण झाल्यावर पुण्यात आले आणि तिथे मिलेट्री फायनान्स ऑफिस मध्ये लिपिक म्हणून नोकरी करण्यास सुरुवात केली.

आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके

वासुदेव बळवंत फडके यांची स्वातंत्र्यलढ्यातील घौडदौड पुण्यातून सुरू झाली. माध्यमिक शिक्षणानंतर फाडके पुण्यामध्ये आले आणि सदाशिव पेठे मध्ये नरसिंह मंदिराजवळ राहू लागले तिथूनच त्यांना इंग्रज सरकारच्या सैन्य लेखा सेवेत भरती होण्याची संधी मिळाली. या कालावधीमध्ये क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे हे पुण्यातील तत्कालीन प्रमुख सामाजिक व्यक्तिमत्व त्यांना गुरू म्हणून लाभले. साळवे हे कुस्तीपटू होते शिवाय त्यांनी फाळके यांना मागासलेल्या जातींना स्वातंत्र्यलढ्याच्या चळवळीत सहभागी करून घेणे महत्त्वाचं असल्याचं सांगितले.

त्याचवेळी वासुदेव बळवंत फडके हे महादेव गोविंद रानडे यांच्या प्रभावात होते. फडके महादेव गोविंद रानडे यांच्या व्याख्यानांना उपस्थित राहायचे. रानडे यांची व्याख्याने प्रामुख्याने ब्रिटिशांच्या धोरणामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला कसा हानी पोहोचत आहे यावर लक्ष केंद्रित करणारी होती. यातून फडके यांच्या लक्षात आलं की भारताच्या खालावलेल्या आर्थिक परिस्थितीचे कारण ब्रिटिश धोरणे होती.

यादरम्यान वासुदेव फडके यांच्या आईची प्रकृती खालावली होती त्या अक्षरशः अंथरुणाला खिळलेल्या होत्या त्यांना भेटण्यासाठी फाडके यांनी रजा मागितली होती परंतु क्रूर इंग्रज अधिकाऱ्यांनी वासुदेव फडके यांना रजा देण्यास मनाई केली ज्यावेळी वासुदेव फडके रजा मिळवून आपल्या आईला भेटण्यासाठी घरी परतले तो पर्यंत त्यांची आई मरण पावली होती.

आपल्या आईला शेवटचं भेटता देखील आलं नाही यामुळे वासुदेव फडके यांच्या मनामध्ये ब्रिटिश अधिकाऱ्यांविरुद्ध अतिशय राग होता आणि म्हणूनच त्यांनी संतप्त होऊन आपली सरकारी नोकरी सोडून दिली. या प्रसंगामुळे वासुदेव बळवंत फडके यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली आणि या नंतर त्यांनी ब्रिटिश सरकारच्या धोरणांविरुद्ध जाहीर भाषणे देण्यास सुरुवात केली.‌ इंग्रजांच्या राजवटी मध्ये जनतेचे फार हाल होत होते. वासुदेव बळवंत फडके यांना इंग्रजांच्या राजवटीत होणाऱ्या शेतकऱ्यांच्या दुरवस्थेचा मोठा धक्का बसला होता.

सन १८७६-७७ मध्ये महाराष्ट्रात दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती आणि या परिस्थितीकडे इंग्रज सरकार दुर्लक्ष करत होते या वेळी वासुदेव फडके यांनी या भागाचा दौरा केला आणि तेथील विध्वंसक लोकांच्या परिस्थितीबद्दल अधिकाऱ्यांनी केलेल दुर्लक्ष पाहून त्यांना वाईट वाटले. फडकेत्यांनी तेथील लोकांना मदत केली आणि ठरवले की भारताला ब्रिटिश राजवटीपासून मुक्त करायचं आणि हा एकच सर्व समस्यांवरचा उपाय आहे.

सन १८७९ मध्ये वासुदेव बळवंत फडके यांची क्रांतिवीर म्हणून खरी सुरुवात झाली त्यांना कसेही करून ब्रिटिश राजवटीपासून भारताला स्वातंत्र्य मिळवून द्यायचं होतं आणि त्यासाठी त्यांनी आपल्या रक्ताचे पाणी केलं. राजकीय प्रचारासाठी दौरे करणारे ते पहिले भारतीय होते. लोणी जवळ धामरी गावावर वासुदेव बळवंत फडके यांनी पहिला दरोडा टाकला या दरोड्या मध्ये त्यांच्या हाती तीन हजार रुपये लागले. २५ व २७ फेब्रुवारी सन १८७९ मध्ये लोणी व खेड या गावांवर वासुदेव बळवंत फडके यांनी दरोडा टाकला आणि लूटमार केली. दुसरा दरोडा ५ मार्च १८७९ रोजी जेजुरी जवळील वाल्हे गावावर टाकला गेला.

या लुटमारी मध्ये बळवंत फडके यांच्या हातात चार बंदूका, तीनशे रुपये, शंभर रुपयांचे कापड मिळाले आणि या नंतर ब्रिटिश राजवटीविरुद्ध सशस्त्र उठाव करण्यासाठी फडके यांची धडपड सुरू झाली. त्यासाठी त्यांना मोठा समूह हवा होता. या परिस्थितीमध्ये वासुदेव फडके यांनी सुशिक्षित वर्गाकडून पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न केला त्यासाठी त्यांनी पुणे, मुंबई यांसारख्या इतर शहरातील सुशिक्षित व धनाढ्य भारतीयांकडे मदत मागितली परंतु तसं घडलं नाही म्हणून त्यांनी मागासलेल्या जातींचा समूह गोळा करण्यास सुरुवात केली.

रामोशी जातीतील लोकांचा समूह गोळा केला ज्यामध्ये नंतर कोळी, भिल्ल आणि धनगर लोकांचा समावेश करण्यात आला. त्यांनी मागासलेल्या अनेक समाजातून तरुण गोळा केले आणि त्यांना शास्त्त्रास्त्त्रांचे प्रशिक्षण दिले. स्वतंत्र सैन्य उभारले. वासुदेव फडके यांनी पुण्यामध्ये भावनिक आणि प्रेरणादायी भाषणे करण्यास सुरुवात केली त्यांनी लोकांना संपूर्ण स्वातंत्र्यासाठी बंड करण्याचे आवाहन केले परंतु त्यांना अपेक्षेप्रमाणे लोकांकडून प्रतिसाद मिळाला नाही आणि म्हणूनच त्यांनी ब्रिटिश राजवटीचा नायनाट करण्यासाठी एक स्वतंत्र क्रांतिकारक फौज उभारण्यास सुरुवात केली.

यावेळी त्यांनी इंग्रज सरकारविरुद्ध अधिकृतरीत्या युद्धाची घोषणा केली. त्यांच्या सैन्याने शिरुर आणि खेड तालुक्यातील सरकारी खजिन्यावर डाका टाकण्यास सुरुवात केली आणि यानंतर त्यांच पुढचं पाऊल थेट पुण्यावर पडले. त्यांनी पुण्यावर चाल केली आणि काही दिवसांकरता संपूर्ण शहरावर कब्जा मिळवला होता परंतु एकाच वेळी अनेक ठिकाणी हल्ला करून इंग्रज सरकारचे लक्ष विकेंद्रित करण्याच्या त्यांच्या कल्पनेला यश मिळालं नाही.

वासुदेव बळवंत फडके यांचं हे सशस्त्र उठाव इंग्रजांच्या नाकामध्ये दम करू लागल होता आणि म्हणूनच त्यांनी फडके यांना जो कोणी पकडून देईल त्याच्यासाठी इनाम जाहीर केला होता. ब्रिटिश सरकारला प्रत्युत्तर देण्यासाठी वासुदेव फडके यांनी आपलं चातुर्य वापरलं त्यांनी मुंबईच्या गव्हर्नरला पकडून देण्यासाठी याहूनही मोठा इनाम जाहीर केला आणि सोबतच प्रत्येक युरोपियन व्यक्तीला मारण्याबद्दलही त्यांनी बक्षीस जाहीर केले.

वासुदेव बळवंत फडके हे अनेक अर्थाने प्रणेते होते संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी करणारे ते पहिले व्यक्ती होते व देशातील पहिल्या क्रांतिकारक नेत्यांपैकी एक होते. लाल बाल पाल या त्रिकुटापूर्वीही अनेक लोकांना प्रेरित करण्यासाठी आणि भारतीयांच्या मनामध्ये देशभक्ती जागृत करण्यासाठी ब्रिटिश राजवटीविरुद्ध जाहीर भाषण करणारे ते पहिले नेते होते.

मृत्यू

फडके आंध्रप्रदेश येथे गेले तेथे त्यांनी निजामाच्या सैन्यातील रोहल््ला, अरब आणि शीख यांच्या मदतीने नवीन सैन्य तयार करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांचा विश्वास घात केला गेला. जुलै १८७९ मध्ये वासुदेव फडके यांना अटक झाली पुणे येथे त्यांच्यावर खटला चालवला गेला. त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली परंतु ती टळून त्यांना आजीवन कारावासाची शिक्षा झाली.

त्यासाठी त्यांना येमेन देशातील एडन येथे पाठवण्यात आलं एक दिवशी तर फडके यांनी कोठडीचे दार उचकटून काढल आणि तुरुंगातून पळ काढला. काही दिवसांनी इंग्रजांनी त्यांना पुन्हा पकडलं आणि तुरुंगात टाकलं. तुरुंगात असताना फडके यांनी आमरण उपोषण केलं. १७ फेब्रुवारी इसवी सन १८८३ रोजी वयाच्या ३८ व्या वर्षी वासुदेव बळवंत फडके यांचा मृत्यू झाला.

इतर

सन १८६० मध्येच वासुदेव फडके यांनी लक्ष्मण इंदापूरकर आणि वामन भावे यांच्यासोबत पुना इन्स्टिट्यूट सुरू केलं. हि एक शिक्षण संस्था आहे. कालांतराने याचे नाव महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी असे ठेवण्यात आले. या संस्थेद्वारे सुरू असलेली अनेक शाळा व महाविद्यालय आजही अनेक मुलांचे भवितव्य घडवत आहेत. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी वासुदेव बळवंत फडके यांचे स्मारक उभारण्यात आले आहे. शिवाय बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी आपल्या आनंदमठ कादंबरी मध्ये फडके यांनी ब्रिटिश सरकार विरुद्ध केलेल्या अनेक कारस्थानांचा उल्लेख केला आहे.

आम्ही दिलेल्या Vasudev Balwant Phadke Information in Marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर वासुदेव बळवंत फडके माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या vasudev balwant phadke biography in marathi pdf या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information of Vasudev Balwant Phadke in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये vasudev balwant phadke full information in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!