Veg Frankie Recipe in Marathi व्हेज फ्रँकी रेसिपी मराठी आपण सकाळच्या नाश्त्याला वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनावती परंतु रोज रोज तेच तेच पदार्थ नाश्त्यामध्ये खावून कंटाळा येतो आणि त्यावेळी आपण काही वेगळी आणि एकदम स्वादिष्ट आणि पौष्टिक रेसिपी बनवू शकतो ती म्हणजे फ्रँकी. आज आपण या लेखामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या वापरून एकदम स्वादिष्ट आणि पौष्टिक फ्रँकी कशी बनवायची ते पाहणार आहोत. फ्रँकी हि रेसिपी लहान मुलांना खूप आवडते कारण यामध्ये वेगवेगळय भाज्या सॉस घालून फ्राय केल्या जातात आणि त्या फ्रँकीरॅप मध्ये घालून त्याचा रोल बनवला जातो.
फ्रँकी हि रेसिपी अशी आहे कि हि लहान मुलांच्या पासून मोठ्यांच्या पर्यंत सर्वांना आवडते. फ्रँकी रेसिपी घरी बनवण्यासाठी खूप सोपी आहे आणि खूप कमी वेळेमध्ये म्हणजे ३० ते ३५ मिनिटामध्ये बनते आणि खूप कमी साहित्यामध्ये बनते. चला तर मग आता आपण फ्रँकी कशी बनवायची ते पाहूयात.
व्हेज फ्रँकी रेसिपी मराठी – Veg Frankie Recipe in Marathi
तयारीसाठी लागणारा वेळ | १० मिनिटे |
बनवण्यासाठी लागणारा वेळ | २० ते २५ मिनिटे |
एकूण लागणारा वेळ | ३० ते ३५ मिनिटे |
पाककला | इंडो – चायनीज |
बनवण्याची पध्दत | खूप सोपी |
फ्रँकी बनवताना सर्वप्रथम सर्व भाज्या तेलामध्ये भाजून घेतल्या जातात आणि मग त्यामध्ये चिली सॉस, टोमॅटो सॉस आणि सोया सॉस आणि इतर काही साहित्य घातले जाते आणि ते मिक्स करून त्याचे सर्न बनवले जाते आणि मग एक चापातीसारखी मैद्याच्या किंवा गव्हाच्या पिठाची पोळी लाटली जाते आणि ती गॅसवर चांगली भाजून मग त्यामध्ये भाजीचे सारण भरून त्याचा रोल बनवून ती सर्व्ह केली जाते.
- चपात्या : फ्रँकी बनवण्यासाठी चपात्या ह्या एक महत्वाचे साहित्य आहे कारण या चापात्यांमध्ये बनवून घेतलेले मिक्स भाज्यांचे सारण भरले जाते आणि त्याचा रोल बनवला जातो.
- वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या : फ्रँकी मध्ये जे सारण भरलेले असते ते वेगवेगळ्या भाज्या वापरून बनवलेले असते जसे कि कोबी, गजर, शिमला मिरची, कांदा इत्यादी.
- सॉस : सारणामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सॉस वापरल्यामुळे फ्रँकीला मस्त चव येते. फ्रँकीच्या सारणामध्ये आपण चिली सॉस, टोमॅटो सॉस आणि सोया सॉस वापरू शकतो.
फ्रँकी रेसिपी – frankie recipe
फ्रँकी रेसिपी हि एक खूप सोपी रेसिपी आहे जी आपण सकाळच्या नाश्त्यासाठी आपण अगदी सहजपणे बनवू शकतो. फ्रँकी हा एक इंडो – चायनीज पदार्थ आहे आणि हा पदार्थ एक लोकप्रिय स्ट्रीट फूड म्हणून देखील ओळखला जातो. फ्रँकी रेसिपी घरी बनवण्यासाठी खूप सोपी आहे आणि खूप कमी वेळेमध्ये म्हणजे ३० ते ३५ मिनिटामध्ये बनते आणि खूप कमी साहित्यामध्ये बनते. चला तर आता आपण फ्रँकी रेसिपी कशी बनवायची आणि त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूयात.
- नक्की वाचा: फ्राईड राईस रेसिपी
तयारीसाठी लागणारा वेळ | १० मिनिटे |
बनवण्यासाठी लागणारा वेळ | २० ते २५ मिनिटे |
एकूण लागणारा वेळ | ३० ते ३५ मिनिटे |
पाककला | इंडो – चायनीज |
बनवण्याची पध्दत | खूप सोपी |
फ्रँकी रेसिपी बनवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या, चिली सॉस, टोमॅटो सॉस, सोया सॉस आणि काही इतर साहित्य लागते आणि यामधील काही साहित्य आपल्या घरामध्ये उपलब्ध असते तर काही साहित्य आपल्या घरामध्ये उपलब्ध नसते. त्यावेळी आपण हे साहित्य बाजारातून अगदी सहजपणे उपलब्ध करून घेवू शकतो. चला तर मग फ्रँकी बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी पाहूयात.
- २ ते ३ चपात्या.
- १ मोठा कांदा ( उभा चिरलेला ).
- अर्धी वाटी शिमला मिरची ( उभी आणि बारीक चिरलेले ).
- १ वाटी कोबी ( लांबट, बारीक चिरलेले ).
- अर्धी वाटी गजर ( खिसलेले ).
- १ टोमॅटो ( उभा बारीक चिरलेला ).
- १ चमचा चिली सॉस.
- २ चमचे टोमॅटो सॉस.
- १/२ चमचा सोया सॉस.
- काळी मिरी पावडर.
- चाट मसाला.
- अर्धा मोठा चमचा तेल.
- मीठ ( चवीनुसार ).
- फ्रँकी रेसिपी घरी बनवणे खूप सोपे आहे आणि म्हणूनच आता आपण वर दिलेले साहित्य वापरून फ्रँकी रेसिपी कशी बनवायची ते पाहणार आहोत.
- फ्रँकी रेसिपी बनवताना सर्वप्रथम सर्व भाज्या चिरून घ्या आणि टोमॅटो आणि शिमला मिरची मधील बिया काढून ते उभे बारीक चिरा.
- आता फ्रँकी रोल बनवण्यासाठी लागणाऱ्या चपात्या बनवून ठेवा.
- मग एक कढई घ्या आणि ती गॅसवर मध्यम आचेवर गरम करण्यासाठी ठेवा आणि गरम झाली कि त्यामध्ये तेल घाला आणि तेल गरम झाले कि त्यामध्ये कांदा घाला आणि कांदा थोडा वेळ लालसर भाजून घ्या.
- मग त्यामध्ये शिमला मिरची, गाजर आणि टोमॅटो घाला आणि ते चंगले भाजून घ्या मग त्यामध्ये कोबी टाका आणि कोबी थोडा मऊ होईपर्यंत म्हणजे मिनिटे भाजून घ्या.
- आता यामध्ये १ चमचा चिली सॉस, २ चमचे टोमॅटो सॉस आणि १/२ चमचा सोया सॉस घाला तसेच यामध्ये चवीनुसार मीठ देखील घाला आणि ते मिक्स करा.
- हे मिश्रण चांगले मिक्स झाले कि गॅस बंद करा.
- आता आपण बनवून ठेवलेल्या चपात्या घ्या आणि त्यामधील एक चपातीला थोडेसे बटर लावा आणि मग त्यावर आपण बनवलेले भाज्यांचे सारण घाला आणि ते पसरवा आणि त्यावर थोडीसी काळी मिरी पावडर आणि चाट मसाला घाला आणि त्याचा रोल बनवून सर्व्ह करा.
फ्रँकी कश्यासोबत सर्व्ह करावी – serving suggestion
- फ्रँकी आपण टोमॅटो सॉस सोबत किंवा हिरव्या चटणी सोबत खावू शकतो.
टिप्स (Tips)
- फ्रँकी सर्व्ह करताना भाजी गरम असावी.
- फ्रँकी मध्ये जर तुम्ही शिमला मिरची आणि टोमॅटो वापरत असाल तर टोमॅटो आणि शिमला मिरची मधील बिया काढून ते उभे बारीक चिरा.
- फ्रँकी मध्ये आपण ताजे मटार देखील वापरू शकतो.
- फ्रँकी मध्ये आपण चीज देखील वापरू शकतो.
आम्ही दिलेल्या veg frankie recipe in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर व्हेज फ्रँकी रेसिपी मराठी माहिती बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या veg schezwan frankie recipe in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि noodles frankie recipe in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये veg frankie roll Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट