Veg Kolhapuri Recipe in Marathi झणझणीत व्हेज कोल्हापुरी रेसिपी आपल्याला कधी तरी झणझणीत, चमचमीत आणि मसालेदार खावेसे वाटते त्यावेळी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या मसालेदार भाज्या बनवून खावू शकतो जसे कि काजू मसाला, पनीर टिक्का मसाला, व्हेज कुर्मा, छोले बटूरे या सारखे अनेक मसालेदार भाज्यांचे प्रकार बनवून खातो आणि त्यामधील एक झणझणीत आणि मसालेदार भाजी म्हणजे व्हेज कोल्हापुरी आणि कोल्हापूर म्हटलं कि कोल्हापूरची खासियत असणाऱ्या भाज्यांच्यामध्ये झणझणीत पणा किंवा तिखट पणा येतोच. व्हेज कोल्हापुरी हि एक महाराष्ट्र मधील कोल्हापूर या भागातील असून या भाजीमध्ये वेगवेगळ्या भाज्या कांद्याबरोबर फोडणी दिल्या जातात आणि त्या तेलामध्ये थोड्या भाजून शिजवून घेतल्या जातात.
आणि मग त्यामध्ये बनवून घेतलेली ग्रेव्ही टाकली जाते. व्हेज कोलाहापूर हा पदार्थ ढाबे किंवा हॉटेलमध्ये पनीर मसाल्यानंतर ऑर्डर केला जाणारा आणि लोकप्रिय असणारा पदार्थ आहे. व्हेज कोल्हापुरी हा पदार्थ बनवण्यसाठी खूप सोपा आहे आणि खूप कमी वेळेमध्ये अगदी उत्तम बनणारी रेसिपी आहे. चला तर आज आपण या लेखामध्ये झणझणीत आणि मसालेदार हॉटेल सारखे व्हेज कोल्हापुरी कसे बनवायचे ते पाहूयात.
व्हेज कोल्हापुरी रेसिपी – Veg Kolhapuri Recipe in Marathi
तयारीसाठी लागणारा वेळ | २० मिनिटे |
बनवण्यासाठी लागणारा वेळ | २० मिनिटे |
एकूण लागणारा वेळ | ४० मिनिटे |
पाककला | कोल्हापुरी (महाराष्ट्र) |
बनवण्याची पध्दत | सोपी |
व्हेज कोल्हापुरी म्हणजे काय ?
व्हेज कोल्हापुरी या भाजीमध्ये वेगवेगळ्या भाज्या कांद्याबरोबर फोडणी दिल्या जातात आणि त्या तेलामध्ये थोड्या भाजून शिजवून घेतल्या जातात आणि मग त्यामध्ये बनवून घेतलेली ग्रेव्ही घातली जाते. व्हेज कोल्हापुरीमध्ये जी ग्रेवी वापरली जाते ती खोबरे वापरून बनवली जाते आणि एक एक कोल्हापुरी रेसिपी असली तरी भारतामध्ये अनेक ठिकाणी देखील हि रेसिपी आवडीने खाल्ली जाते.
व्हेज कोल्हापुरी रेसिपी – how to make veg kolhapuri in marathi
व्हेज कोल्हापुरी बनवताना सर्वप्रथम खोबरे आणि इतर काही मसाले वापरून ग्रेवी बनवून घेतली जाते आणि मग नंतर फरसबी, फ्लॉवर, मटार, शिमला मिरची, बटाटे आणि गाजर सोबत हि भाजी मसाला घालून शिजवली जाते. व्हेज कोल्हापुरी हि रेसिपी खूप मसालेदार आणि झणझणीत असल्यामुळे हि रेसिपी अनेक लोकांची आवडती डिश आहे.
आणि कोल्हापूर तसेच महाराष्ट्राबरोबर देशाच्या काही भागामध्ये देखील हि रेसिपी खूप आवडीने बनवली जाते खाल्ली देखील जाते किंवा हॉटेलमध्ये ऑर्डर केल्या जाणाऱ्या यादीतील हि एक प्रसिध्द डिश आहे. चला तर मग आता आपण व्हेज कोल्हापुरी कशी बनवायची आणि ती बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूयात.
तयारीसाठी लागणारा वेळ | २० मिनिटे |
बनवण्यासाठी लागणारा वेळ | २० मिनिटे |
एकूण लागणारा वेळ | ४० मिनिटे |
पाककला | कोल्हापुरी ( महाराष्ट्र ) |
बनवण्याची पध्दत | सोपी |
व्हेज कोल्हापुरी बनवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या लागतात तसेच मसाले देखील लागतात आणि यामधील काही साहित्य आपल्या घरामध्ये उपलब्ध असते आणि काही साहित्य उपलब्ध नसते आणि ते आपल्याला बाजारातून विकत आणावे लागते. चाल तर मग व्हेज कोल्हापुरी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूयात.
- १ वाटी सुखं खोबरं ( खिसलेलं ).
- १ चमचा तीळ.
- २ चमचे लाल मिरची पावडर.
- १/४ चमचा हळद.
- १ चमचा धने पावडर.
- १ तुकडा दालचिन.
- १ बदाम फुल.
- १ मध्यम आकाराचा कांदा.
- १ टोमॅटो ( उभा चिरलेला ).
- ५ ते ६ लसून पाकळ्या.
- २ ते ३ छोटे आल्याचे तुकडे.
- १ चमचा काजू.
भाजीसाठी लागणारे साहित्य
- अर्धी वाटी मटार.
- अर्धी वाटी शिमला मिरची ( चैकोनी चिरलेली ).
- अर्धी वाटी गाजर ( चौकोनी चिरलेले ).
- अर्धी वाटी फ्लॉवर ( सुटे करून घेतलेले ).
- अर्धी वाटी फरसबी ( चिरलेले ).
- अर्धी वाटी बटाटा ( चौकोनी चिरलेला ).
- १ कांदा ( बारीक चिरलेला – फोडणीसाठी ).
- १ चमचा आले लसू पेस्ट.
- १ चमचा कांदा लसून पेस्ट.
- १/२ चमचा गरम मसाला.
- मीठ ( चवीनुसार ).
- साखर ( चवीनुसार ).
- तेल ( आवश्यकतेनुसार ).
आता आपण वर दिलेल्या साहित्यापासून व्हेज कोल्हापुरी हि रेसिपी कशी बनवायची ते पाहूयात.
- सर्वप्रथम सर्व भाज्या स्वच्छ धुवून चिरून घ्या आणि त्या बाजूला ठेवा.
- आता एक कढई घ्या आणि ती गॅसवर मध्यम आचेवर गरम करण्यासाठी ठेवा आणि त्यामध्ये सुखं खोबरं घाला आणि ते भाजून घ्या आणि मग ते बाजूला काढा आणि त्यामध्ये तील देखील भाजून घ्या आणि ते खोबऱ्यामध्ये घाला.
- आता कढई मध्ये तेल घाला आणि तेल गरम झाले कि त्यामध्ये कांदा घाला आणि तो लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्या मग त्यामध्ये दालचिन तुकडा, बदाम फुल, लसून आणि आल्याचे तुकडे घाला आणि ते भाजा. मसाले भाजले कि त्याला खमंग वास येतो आता यामध्ये टोमॅटो घाला आणि तो देखील चांगला भाजा आणि तो तेल वेगळे होईपर्यंत शिजवून घ्या आणि यामध्ये काजू घाला आणि मिक्स करा.
- मग यामध्ये आपण भाजून घेतलेले खोबरे आणि तीळ घाला आणि मिक्स करा मग त्यामध्ये धने पावडर, लाल मिरची पावडर आणि हळद घालून ते चांगले ते सर्व मिश्रण एकत्र करू गरम करून घ्या.
- त्यानंतर हे मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढा आणि त्यामध्ये थोडे पाणी घालून त्याची एकदम बारीक पेस्ट बनवून घ्या आणि ती बाजूला ठेवा.
- आता परत गॅसवर मध्यम आचेवर कढई ठेवा आणि त्यामध्ये २ मोठे चमचे तेल घाला आणि तेल गरम झाले कि त्यामध्ये कांदा आणि आले लसून पेस्ट घाला आणि ते थोडा वेळ भाजा. कांदा चांगला भाजला कि त्यामध्ये एक एक करून सर्व भाज्या घाला आणि त्या चांगल्या कुरकुरीत भाजून घ्या ( टीप : भाज्या तेलामध्ये चांगल्या भाजून घ्या कारण आपण भाज्या पाण्यामध्ये जास्त शिजवणार नाही ).
- तेलामध्ये भाज्या चांगल्या भाजल्या कि त्यामध्ये कांदा लसून पावडर आणि गरम मसाला घाला आणि ते मिश्रण चांगले एकत्र करा आणि मग त्यामध्ये आपण तयार करून ठेवलेली ग्रेवी घाला आणि मिक्स करा.
- मग या भाजीमध्ये चवीनुसार मीठ आणि साखर घाला आणि थोडे पाणी घालण्याची आवश्यकता असेल तर पाणी घाला आणि ते मिक्स करून मध्यम आचेवर ६ ते ७ मिनिटे झाकण लावून शिजवून घ्या.
- तुमची व्हेज कोल्हापुरी भाजी तयार झाली आता त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून ती भाजी रोटी किंवा चपाती सोबत सर्व्ह करा.
व्हेज कोल्हापुरी भाजी कश्यासोबत सर्व्ह केली जाते – serving suggestions
झणझणीत आणि मसालेदार व्हेज कोल्हापुरी आपण रोटी, नान, चपाती किंवा पांढऱ्या भातासोबत सर्व्ह करी शकतो.
आम्ही दिलेल्या veg kolhapuri recipe in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर व्हेज कोल्हापुरी रेसिपी मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या mix veg kolhapuri recipe in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि veg kolhapuri bhaji recipe in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये veg kolhapuri recipe in marathi madhura Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट