एलोरा/वेरुळ लेणी माहिती Verul Leni Information in Marathi

verul leni information in marathi – ellora caves information in marathi एलोरा/वेरुळ लेणी माहिती, आज आपण या लेखामध्ये महाराष्ट्रातील एक प्रसिध्द आणि पवित्र स्थळ म्हणून ओळखले जाणारे एलोरा गुफा आणि लेणी या ठिकाणाविषयी माहिती घेणार आहोत. एलोरा लेणी हे UNESCO मार्फत जागतिक वारसा असणारे स्थळ म्हणून घोषित करण्यात आले आणि ह्या लेणी ह्या खूप प्राचीन लेणी आहेत आणि या लेणींना प्राचीन काळामध्ये इलापुरा म्हणून देखील ओळखले जात होते. एलोरा लेणी हि ६ व्या ते ८ व्या शतकामध्ये तेथील स्थानिक खडकावर कोरली आहे आणि ते ठिकाण हिंदू, जैन आणि बौद्ध धर्मासाठी ओळखले जाते.

एलोरा लेणी हि महाराष्ट्र राज्यातील संभाजीनगर (जुने औरंगाबाद) या शहरापासून फक्त ३० किलो मीटर अंतरावर आहे आणि ह्या लेणी सह्याद्रीच्या सातमाळा डोंगररांगेतील उंच खडकामध्ये कोरलेल्या आहेत आणि ह्या लेणी ६ व्या ते ८ व्या शतकामध्ये राष्ट्रकुट घराण्याने बनवल्या आहेत असे इतिहासामध्ये सांगितले जाते आणि ह्या लेणी राष्ट्रकुट राजवंश नरेश कृष्णा याच्या काळामध्ये बनवण्यात आल्या आहेत.

आणि या परिसराचे क्षेत्रफळ १५४ फुट रुंद आणि २७५ फुट लांब आहे. या ठिकाणी आपण वर उल्लेख केल्याप्रमाणे हिंदू, जैन आणि बौद्ध धर्मा संबधित लेण्या आहेत म्हणजेच या ठिकाणी १७ हिंदू धर्माच्या, ५ जैन आणि १२ बौध्द धर्मा संबधित लेणी आहेत. तसेच या ठिकाणावरील मठ गुफा या गटातील मंदिराच्या बद्दल कैलाश मंदिर हे गुहेतील अखंड खडकाच्या उत्खननाची एक अनुकरणीय कलक्रुती आहे.

verul leni information in marathi
verul leni information in marathi

एलोरा/वेरुळ लेणी माहिती – Verul Leni Information in Marathi

ठिकाणाचे नावएलोरा गुफा किंवा लेणी
केंव्हा बांधली६ व्या ते ८ व्या शतकामध्ये
कोणी बांधलीराष्ट्रकुट घराण्यातील राजवंश नरेश कृष्णा
क्षेत्रफळ१५४ फुट रुंद आणि २७५ फुट लांब
कोठे आहेसंभाजीनगर पासून ३० किमी अंतरावर सह्याद्रीच्या सातमाळा डोंगर रांगेवर.

एलोरा लेणी माहिती – ellora caves information in marathi

एलोरा लेणी हि ६ व्या ते ८ व्या शतकामध्ये तेथील स्थानिक खडकावर कोरली आहे आणि ते ठिकाण हिंदू, जैन आणि बौद्ध धर्मासाठी ओळखले जाते.राष्ट्रकुट आणि चालुक्य या घराण्यांच्या कारकीर्दीमध्ये दगडी कोरीव कामाची वास्तुकला शिखरावर पोहचवली आणि आपल्या भारताच्या पश्चिम भागाला कोरीव कामाचा इतिहास म्हणून ओळख दिली.

या ठिकाणी जे राजे होते ते हिंदू, बौध्द आणि जैन या सर्व धर्माबद्दल सहिष्णू होते आणि त्यांच्या आश्रयासाठी अश्या वास्तूंची निर्मिती केली होती. एलोरा हे कलचुरी, चालुक्य, आणि राष्ट्रकुट राजवटीमध्ये बांधलेल्या हिंदू, बौध्द आणि जैन मंदिरांच्यासाठी लोकप्रिय आहे.

एलोरा लेणींच्याविषयी मनोरंजक आणि महत्वाची तथ्ये – verul yethil kailash leni information in marathi

 • एलोरा लेणीला वेरूळ लेणी म्हणून देखील ओळखले जाते आणि एलोरा लेणी हि संभाजीनगर ( औरंगाबाद ) – चाळीसगाव मार्गावर जिल्हा मुख्यालय असलेल्या औरंगाबादच्या उत्तर वायव्येस ३० किलो मीटर अंतरावर वसलेली आहे.
 • एलोरा हे कलचुरी, चालुक्य, आणि राष्ट्रकुट राजवटीमध्ये बांधलेल्या हिंदू, बौध्द आणि जैन गुफा मंदिरासाठी प्रसिध्द आहे.
 • एलोरा स्मारकाच्या संरक्षणामध्ये राष्ट्रकुट, चालुक्य, कलचुरी आणि यादव या घराण्यांचा समावेश आहे राष्ट्रकुट राजघराण्याने आणि कलचुरींनी एलोराच्या हिंदू आणि बौध्द लेण्यांचा काही भाग बांधला आणि यादव घराण्याने अनेक जैन लेणी बांधल्या.
 • एलोरा या ठिकाणावरील दशावतार गुहा हि भगवान विष्णूंच्या १० अवतारांचे चित्रण करते.
 • एलोरा या ठिकाणी असणाऱ्या ५ जैन लेणी ह्या नवव्या आणि दहाव्या शतकातील आहेत आणि त्या सर्व दिगंबर पंथांच्या आहेत.
 • बौध्द लेण्यापैकी सर्वात लोकप्रिय लेणी क्रमांक १० आहे आणि त्यामध्ये एक चैत्य हॉल ज्याला चंद्रशाला म्हणतात आणि विश्वकर्मा गुहा देखील आहे.
 • हे महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय पर्यटक स्थळांच्या पैकी एक आहे आणि हे महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतरांगेतील अजिंठा या लेण्यांच्यापासून सुमारे १०० किलोमीटर अंतरावर आहे.
 • एलोरा लेणी हा १०० गुहांचा समूह असून त्यामधील ३४ गुहा लोकांच्यासाठी खुल्या आहेत. या ३४ गुहा पैकी १७ गुहा हिंदू धर्माशी संबधित आहेत, १२ लेणी ह्या बौध्द धर्माशी संबधित आहेत आणि ५ लेणी ह्या जैन धर्माशी संबधित आहेत.
 • एलोरा लेणी हे जगातील सर्वात मोठे एकाल अखंड कहाद्क उत्खनन आहे. हे नाव हिमालयातील कैलास पर्वतश्रेणीतील पर्वातासाठी आहे ज्या ठिकाणी हिंदू देव शिव राहतात.
 • एलोरा या ठिकाणावरील लेण्यांचा संच हा ५ व्या ते ११ व्या शतकापर्यंत विकसित झाला.

एलोरा लेणी पाहण्यासाठी कसे जायचे – how to reach 

आपल्याला जर एलोरा लेणीला भेट द्यायचे असल्यास आपण बसने, रेल्वेने किंवा विमानाने ह्या तिन्ही मार्गाने जावू शकतो कारण संभाजीनगर (औरंगाबाद) हे शहर एलोरा लेणीपासून खूप जवळचे शहर आहे म्हणजेच हे शहर लेणीपासून ३० किलो मीटर अंतरावर आहे. मुंबई, पुणे, हैद्राबाद हे संभाजीनगर या शहराशी तिन्हीही मार्गांनी चांगले जोडलेले आहे त्यामुळे आपण मुंबई, पुणे, हैद्राबाद या शहरातून आपण रेल्वे, विमान किंवा बस पकडून संभाजीनगर मध्ये येऊ शकतो आणि मग तेथून टॅक्सी पकडून एलोरा लेणी पाहण्यासाठी जावू शकतो.

एलोरा लेणीचा पाहण्यासाठी जाण्याची वेळ आणि प्रवेश शुल्क माहिती – time and entry fees 

 • एलोरा लेणी हि पर्यटकांना पाहण्यासाठी मंगळवार सोडला तर कधीही ह्या लेणी आपण पाहण्यासाठी जाऊ शकतो.
 • लेणी पाहण्यासाठी पर्यटकांच्याकडून प्रवेश शुल्क आकाराला जातो. भारतीय आणि सार्क नागरिकांच्याकडून १० रुपये प्रती व्यक्ती हा शुल्क आकाराला जातो तर परदेशी पर्यटकांच्याकडून २५० रुपये प्रती व्यक्ती असा शुल्क आकाराला जातो.

जवळची पाहण्यासारखी ठिकाणे

 • भद्रा मारुती मंदिर : सुफिच्या समाधीच्या पूर्वेस काही किलो मीटर अंतरावर असणारे हे एक सुंदर मंदिर आहे.
 • अजिंठा लेणी : एलोरा लेणी सारखीच लोकप्रिय असणारी अजिंठा लेणी देखील या भागामध्ये आहे त्यामुळे हि लेणी देखील पाहायला जावू शकतो जी एलोरा पासून काही अंतरावर आहे.
 • दौलताबाद किल्ला : संभाजीनगर पासून फक्त ३० किलो मीटर अंतरावर असणारा दौलताबाद हा एक सुंदर किल्ला आहे.
 • खुलदाबाद : दौलताबाद या किल्ल्यापासून १० किलो मीटर अंतरावर खुलदाबाद आहे आणि या ठिकाणी सुफिच्या थडग्याचे सुंदर नक्षीकाम आहे.

आम्ही दिलेल्या verul leni information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर एलोरा/वेरुळ लेणी माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या ellora caves information in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि verul yethil kailash leni information in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!