Whatsapp Information in Marathi व्हॉट्सअॅप विषयी माहिती व्हॉट्सअॅप हे एक अॅप आहे जे इन्स्टंट मेसेजिंग करण्यासाठी असलेले एक अॅप आहे. जे आयफोन, अँड्रॉइड, विंडोज फोन आणि स्मार्टफोन वापरकर्त्यांना मजकूर, प्रतिमा, ऑडिओ आणि व्हिडिओ संदेशांची मोफत देवाणघेवाण करण्याची परवानगी देते किंवा आपण या अॅपवरून मजकूर, प्रतिमा, ऑडिओ आणि व्हिडिओ दुसऱ्या व्यक्तीला पाठवू शकतो. खर बघायला गेले तर आजच्या या जगामध्ये व्हॉट्सअॅप या संदेश प्रणाली विषयी माहिती नसलेला एकही व्यक्ती या जगामध्ये सापडणार नाही कारण हे एक असे अॅप जे खूप लोकांच्या मार्फत वापरले जाते.
हे एक रोजच्या जीवनाचा एक भाग आहे आणि व्हॉट्सअॅप हे असे अॅप आहे जे कोणत्याही जाहिराती शिवाय खूप लोकप्रिय झाले आहे. व्हॉट्सअॅप चा वापर हा भारतामधील लोक जास्त प्रमाणात करतात. हे एक असे अॅप आहे ज्यामध्ये आपण मजकूर, प्रतिमा, ऑडिओ आणि व्हिडिओ संदेश कोणतेही मूल्य न देता करता येतात.
पण या अॅपवर मजकूर, प्रतिमा, ऑडिओ आणि व्हिडिओ संदेश करण्यासाठी इंटरनेट ची आवश्यकता असते. व्हॉट्सअॅप या अॅपचा शोध जान कोऊम (jan koum) आणि ब्रियन अॅक्टन (brian acton) या दोघांनी लावला.
व्हॉट्सॲप विषयी माहिती – Whatsapp Information in Marathi
व्हॉट्सअॅप म्हणजे काय ?
what is whatsapp – whatsapp mahiti व्हॉट्सअॅप हे एक अॅप आहे जे इन्स्टंट मेसेजिंग करण्यासाठी असलेले एक अॅप आहे जे आयफोन, अँड्रॉइड, विंडोज फोन आणि स्मार्टफोन वापरकर्त्यांना मजकूर, प्रतिमा, ऑडिओ आणि व्हिडिओ संदेशांची मोफत देवाणघेवाण करण्याची परवानगी देते.
या अॅप द्वारे मजकूर, प्रतिमा, ऑडिओ आणि व्हिडिओ संदेश कोणत्याही शुल्क द्यावे लागत नाही पण हे वापरण्यासाठी मोबाईल इंटरनेटची आवश्यकता असते.
सध्या व्हॉट्सअॅप वापरणारे लोक
व्हॉट्सअॅप ह्या अॅपच्या निर्मिती नंतर कोणत्याही जाहिरातीशिवाय व्हॉट्सअॅप चे मोठ्या प्रमाणात वापरकर्ते झाले. सध्या हे जगभरामध्ये १ अब्ज लोक व्हॉट्सअॅपचा वापर करतात आणि हे अॅप सर्वात मोठे अॅप आहे. २०१४ मध्ये व्हॉट्सअॅप फेसबुकने विकत घेतले आणि जुलै २०१७ मध्ये १ अब्जांचा टप्पा गाठत ते अजूनही प्रगतीच्या मार्गावर आहे.
व्हॉट्सअॅप चा वापर
मेसेज पाठवण्यासाठी
व्हॉट्सअॅप हे एक असे अॅप आहे ज्याच्यावरून आपण आपल्या परिवाराला तसेच मित्र मैत्रिणींना आपण विनामूल्य मेसेज / संदेश पाठवू शकतो आणि हे वापरण्यासाठी फक्त मोबाईल इंटरनेटची गरज असते.
व्हॉइस कॉल
व्हॉट्सअॅप मध्ये असणाऱ्या व्हॉइस कॉल या वैशिष्ट्य द्वारे आपण आपल्या जीव भावाच्या लोकांशी बोलू शकतो म्हणजेच आपण आपल्या कुटुंबियांशी, मित्र – मैत्रिणींशी निशुल्क बोलू शकतो.
व्हिडीओ कॉल
ज्यावेळी आपली जवळची माणसे आपल्यापासून दूर किंवा बाहेरील ठिकाणी राहायला असतील आणि जर आपल्याला त्यांना पहावे वाटत असेल तर आपण या व्हॉट्सअॅप मध्ये असणाऱ्या व्हिडीओ कॉल वैशिष्ट्य द्वारे आपण त्या व्यक्तीला पाहू शकतो आणि तिच्याशी बोलू शकतो.
ग्रुप चाट्स
व्हॉट्सअॅप मध्ये असणाऱ्या ग्रुप चाट्स या वैशिष्ट्य मुळे आपण कुटुंबियांशी, सहकारी आणि मित्र – मैत्रिणींच्या संपर्कात राहू शकतो. ग्रुप चाट्स द्वारे २५६ लोकांना एकाच वेळी, प्रतिमा, ऑडिओ आणि व्हिडिओ संदेश कोणतेही मूल्य न देता करता येते.
डॉक्यूमेंट्स पाठवू शकतो
व्हॉट्सअॅप पासून आपण काही महत्वाची डॉक्यूमेंट्स दुसऱ्या व्यक्तीला पाठवू शकतो.
फोटो आणि व्हिडीओ पाठवू शकतो
व्हॉट्सअॅप मध्ये जसे आपण व्हिडीओ कॉल, व्हॉइस कॉल, ग्रुप चाट्स यासारख्या वैशिष्ट्य सोबत आपण व्हॉट्सअॅप द्वारे फोटो आणि वेगवेगळे व्हिडीओ पाठवू शकतो.
लोकेशन पाठवू शकतो
व्हॉट्सअॅप या अॅप द्वारे आपण आपले लोकेशन दुसऱ्या व्यक्तीला पाठवू शकतो.
व्हॉट्सअॅपमध्ये आपण अकाऊंट कसे उघडावे आणि कसे वापरावे ?
how to open whatsapp account जर तुम्ही पहिल्यांदा व्हॉट्सअॅपमध्ये आपण अकाऊंट बनवत असाल तर ते वापरण्यासाठी खाली दिलेली प्रक्रिया वापरा.
- जर तुम्हाला व्हॉट्सअॅपमध्ये आपण अकाऊंट बनवायचे असेल तर त्यासाठी सर्व प्रथम आपल्याला play store मधून व्हॉट्सअॅप हे अॅप डाऊनलोड करून घ्यावे लागते.
- त्यानंतर आपल्याला त्यामध्ये आपला फोन नंबर घालावा लागतो.
- फोन नंबर घातल्यानंतर आपल्या फोन नंबर वर एक OTP येतो तो OTP टेक्स्ट मेसेज मध्ये घालून ते confirm करावे आणि त्यानंतर आपले अकाऊंट तयार होईल.
- त्यानंतर आपण व्हॉट्सअॅपच्या सेटिंग मध्ये जावून user name, profile picture, privacy सेटिंग करू शकतो.
- त्यानंतर व्हॉट्सअॅपमध्ये असणाऱ्या व्हॉट्सअॅप कॉन्टॅक्ट लिस्ट मध्ये जावू आपल्या ज्या व्यक्तीशी बोलायचे आहे त्या व्यक्तीला मजकूर, प्रतिमा, ऑडिओ आणि व्हिडिओ संदेश पाठवू शकतो.
व्हॉट्सअॅपमध्ये असणारी वैशिष्ट्ये – about for whatsapp in marathi
- व्हिडीओ कॉल
- व्हॉइस कॉल
- टेक्स्ट मेसेज
- ग्रुप चाट
- व्हॉट्सअॅप वेब
- ब्लॅकलिस्ट
- स्टेट्स अपडेट
व्हॉट्सअॅप विषयी काही मनोरंजक तथ्ये – best about for whatsapp in marathi
- व्हॉट्सअॅप या अॅपचा शोध जान कोऊम (jan koum) आणि ब्रियन अॅक्टन (brian acton) या दोघांनी लावला आणि हे yahoo चे कर्मचारी होते.
- जून २००९ मध्ये इन्स्टंट मेसेजिंग च्या या अॅपला जगभरात २५०००० वापरकर्ते होते आणि डिसेंबर २०१३ पर्यंत या वापरकर्त्यांची संख्या ३५० ते ४०० दशलक्ष पर्यंत वाढली होती.
- आपण ज्या वेळी कोणतेतरी अॅप वापरत असतो त्यावेळी आपल्याला अनेक जाहिराती पाहायला लागतात पण व्हॉट्सअॅप हे अॅप वापरताना कोणत्याही जाहिराती येत नाहीत.
- व्हॉट्सअॅप हे अॅप कोट्यावधी लोक दररोज डाऊनलोड करतात आणि त्यामुळे व्हॉट्सअॅप दरवर्षी २ अब्ज डॉलर्स आणि त्याहून अधिक उत्पन्न होते.
- २००९ पासून आतापर्यंत कमीतकमी ५ अब्ज व्हाट्सएप गट तयार केले आहेत.
- मजकूर संदेशनसाठी जगातील सर्वात सामान्यपणे वापरलेले अॅप आहे आणि हे फेसबुक मेसेंजरपेक्षा या अॅपला जास्त वापरकर्ते आहेत.
- व्हॉट्सअॅप हे अॅप भारतामध्ये मोठ्या प्रमाणात वापरले जाते.
- व्हॉट्सअॅप हे एक अॅप आहे जे इन्स्टंट मेसेजिंग करण्यासाठी असलेले एक अॅप आहे जे आयफोन, अँड्रॉइड, विंडोज फोन आणि स्मार्टफोन मध्ये वापरता येते.
वरील सर्व मजकूर पाहून आपणास अंदाज लागला असेल कि व्हॉट्सॲप काय आहे, डाऊनलोड कशी करावी whatsapp information in marathi त्याचा वापर कसा करावा आणि information about whatsapp in marathi हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच whatsapp web information in marathi हा लेख कसा वाटला व अजून काही व्हॉट्सॲप बद्दल काही राहिले असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद.
आम्ही दिलेल्या marathi whatsapp माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही about for whatsapp in marathi त्यामध्ये नक्की बदल करू. अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट