झुणका रेसिपी मराठी Zunka Recipe in Marathi

Zunka Recipe in Marathi – Besan Recipes in Marathi झुणका रेसिपी मराठी झुणका हि रेसिपी एक पारंपारिक महाराष्ट्रीयन डिश आहे जी बेसनच्या पिठापासून बनवली जाते. झुणका हा पदार्थ एक भाजीचा प्रकार म्हणून ओळखला जात असला तरी आपण हा पदार्थ २ प्रकारे बनवू शकतो एक म्हणजे पातळ झुणका आणि मोकळा झुणका आणि हे दोन्हीही प्रकार चवीला खूप छान लागतात. झुणका हा पदार्थ कोणाला आवडत नाही, हा सर्वांना आवडतो आणि हा विशेषता भाकरी सोबत खूप लोक खातात. झुणका हा पदार्थ बहुतेक लोक आवडीने खातात आणि भारताच्या बहुतेक भागांमध्ये हा पदार्थ बनवला जातो.

झुणका किंवा पिठलं हि रेसिपी खूप कमी वेळेमध्ये आणि खूप कमी साहित्यामध्ये अगदी उत्तम बनते. चला तर मग आज आपण या लेखामध्ये झुणका कसा बनवायचा ते पाहूयात.

 zunka recipe in marathi
zunka recipe in marathi

झुणका रेसिपी मराठी – Zunka Recipe in Marathi

बनवण्यासाठी लागणारा वेळ१० ते १५ मिनिटे
पाककलाभारतीय
वाढणी३ ते ४ व्यक्ती
बनवण्याची पध्दतखूप सोपी

झुणका रेसिपी – recipe of zunka in marathi

झुणका हा एक सामान्य प्रकार आहे जो गरीब ते मोठ्या लोकांच्यापर्यंत तो आपल्या आवडीनुसार खाल्ला जातो. झुणका हा एक भाजीचा प्रकार आहे जो भारतामध्ये काही ठिकाणी आठवड्यातून एकदा तरी बनवतात आणि हा पदार्थ भाकरी सोबत खाल्ला जातो. चला तर आता आपण दोन्हीही प्रकारे झुणका कसा बनवायचा ते पाहूयात.

बनवण्यासाठी लागणारा वेळ१० ते १५ मिनिटे
पाककलाभारतीय
वाढणी३ ते ४ व्यक्ती
बनवण्याची पध्दतखूप सोपी

पिठलं किंवा पातळ झुणका रेसिपी – Pithale Recipe in Marathi

आता आपण पातळ किंवा रबरबीत झुणका कसा बनवायचा आणि हा झुणक्याचा प्रकार बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूयात.

पिठलं किंवा पातळ झुणका बनवण्यासाठी लागणारे साहित्य – ingredients needed to make zunka 

झुणका बनवण्यासाठी जे जे साहित्य लागते ते आपल्या घरामध्ये अगदी सहजपणे उपलब्ध असते. आपल्याला बाजारातून काही विकत आणावे लागत नाही. चला तर मग झुणका बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी पाहूयात.

  • १ वाटी बेसन पीठ.
  • १ मध्यम आकाराचा कांदा ( बारीक चिरलेला ).
  • ६ ते ७ कडीपत्ता पाने.
  • १ मोठा चमचा तेल.
  • २ वाटी पाणी.
  • दीड चमचा लाल मिरची पावडर किंवा १ चमचा टेचलेली हिरवी मिरची.
  • १/२ चमचा मोहरी.
  • एक चिमुटभर हिंग.
  • साखर ( चवीनुसार )
  • मीठ ( चवीनुसार ).
  • कोथिंबीर ( आवश्यकतेनुसार ).

झुणका बनवण्यासाठी केली जाणारी कृती – process to make zunka recipe 

आता आपण वरील साहित्य वापरून झुणका कसा बनवायचा ते पाहूयात.

  • सर्वप्रथम एक कढई घ्या आणि ती मध्यम आचेवर गॅसवर गरम करण्यासाठी ठेवा आणि कढई गरम झाली कि त्यामध्ये १ मोठा चमचा तेल घाला आणि तेल गरम होऊ द्या.
  • तेल गरम झाले कि त्यामध्ये मोहरी टाका आणि ती चांगली तडतडू द्या आणि मोहरी तडतडली कि त्यामध्ये लगेच कडीपत्ता आणि कांदा घाला आणि तो कांदा चांगला लालसर होईपर्यंत भाजून घ्या.
  • कांदा चांगला लालसर होईपर्यंत भाजला की त्यामध्ये हिंग, हळद आणि लाल मिरची पावडर घाला आणि ते चांगले मिक्स करा आणि आता त्यामध्ये पाणी घाला आणि ते उकळेपर्यंत वाट पहा.
  • त्या फोडणीच्या पाण्यामध्ये थोडी साखर आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करा आणि ते चांगले एकत्र करून फोडणीच्या पाण्याला उकळी येवू द्या.
  • पाण्याला उकळी आली कि त्यामध्ये एक हाताने पीठ टाका आणि एका हाताने ते चांगले मिक्स करा. पीठ टाकते वेळी पिठाची गुठळी होणार नाही याची काळजी घ्या.
  • अश्या प्रकारे एक वाटी पीठ मिक्स करून घ्या आणि ते थोडे घट्ट होईपर्यंत शिजवून घ्या.
  • झुणका रबरबित झाल्यावर आणि त्याला झाकली वाफ आल्यानंतर गॅस बंद करा आणि त्यावर चिरलेली कोथिंबीर घालून. गरमागरम झुणका कांदा आणि भाकरी सोबत सर्व्ह करा.

मोकळा झुणका रेसिपी – sutta zunka recipe in marathi

मोकळा झुणका हि रेसिपी खूप लोक आवडीने खातात म्हणून आता आपण मोकळा झुणका कसा बनवायचा ते पाहूयात.

मोकळा झुणका बनवण्यासाठी लागणारे साहित्य – ingredients needed to make zunka recipe 

मोकळा झुणका बनवण्यासाठी बेसन, तेल, लाल मिरची पावडर हे मुख्य साहित्य लागते आणि ते आपल्या घरामध्ये उपलब्ध असते तसेच मोकळा झुणका बनवण्यासाठी लागणारे इतर साहित्य देखील घरामध्ये उपलब्ध असते.

  • १ वाटी बेसन पीठ.
  • २ ते ३ मोठा चमचा तेल.
  • ८ ते ९ लसून पाकळ्या ( चेचलेल्या ).
  • ५ ते ६ कडीपत्ता पाने.
  • दिड वाटी पाणी.
  • दीड चमचा लाल मिरची पावडर किंवा १ चमचा टेचलेली हिरवी मिरची.
  • १/२ चमचा मोहरी.
  • एक चिमुटभर हिंग.
  • साखर ( चवीनुसार )
  • मीठ ( चवीनुसार ).
  • कोथिंबीर ( आवश्यकतेनुसार ).

मोकळा झुणका बनवण्यासाठी केली जाणारी कृती – process to make zunka recipe 

  • सर्वप्रथम एक कढई घ्या आणि ती मध्यम आचेवर गॅसवर गरम करण्यासाठी ठेवा आणि कढई गरम झाली कि त्यामध्ये २ मोठे चमचे तेल घाला आणि तेल गरम होऊ द्या.
  • तेल गरम झाले कि त्यामध्ये मोहरी टाका आणि ती चांगली तडतडू द्या आणि मोहरी तडतडली कि त्यामध्ये लगेच कडीपत्ता आणि लसून घाला आणि तो चांगला भाजून घ्या.
  • लसून चांगला भाजला की त्यामध्ये हिंग, हळद आणि लाल मिरची पावडर घाला आणि ते चांगले मिक्स करा आणि आता त्यामध्ये पाणी घाला आणि ते उकळेपर्यंत वाट पहा. ( टीप : हि प्रक्रिया थोडी गडबडीने करा नाही तर लसून किंवा चटणी करपण्याची शक्यता असते )
  • त्या फोडणीच्या पाण्यामध्ये थोडी साखर आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करा आणि ते चांगले एकत्र करून फोडणीच्या पाण्याला उकळी येवू द्या.
  • पाण्याला उकळी आली कि त्यामध्ये एक हाताने पीठ टाका आणि एका हाताने ते चांगले मिक्स करा. पीठ टाकते वेळी पिठाची गुठळी होणार नाही याची काळजी घ्या. पीठ चांगले हलवून ते गुसळून घ्या आणि ते जोपर्यंत हलवा की त्याचा गोळा चांगला एकत्र होणार नाही. पिठाचा गोळा झाला कि त्याच्यावर झाकण ठेवून त्याला एक वाफ येवू द्या.
  • चांगली वाफ आली कि गॅस बंद करा आणि तो चमच्याने सुट्टा करून घ्या आणि त्यामध्ये कोथिंबीर घालून मिक्स करा आणि भाकरी किंवा चपाती सोबत सर्व्ह करा.

झुणका कश्यासोबत खातात – serving suggestion 

झुणका आपण कांदा, तळेलेली मिरची या बरोबर भाकरी किंवा चपाती सोबत खाऊ शकतो.

टिप्स (Tips)

  • झुणक्याचे पीठ डायरेक्ट फोडणीच्या पाण्यामध्ये घालण्यास जमत नसेल तर ते एका बाऊलमध्ये घ्या आणि त्यामध्ये आवश्यक तेवढे पाणी घालून त्यामधी सर्व गुठळ्या फोडून ते एकजीव करून त्याचे बॅटर बनवून घ्या.
  • मोकळा झुणका बनवताना आपण जितके जास्त तेल वापरतो तितका तो मोकळा बनतो.

आम्ही दिलेल्या zunka recipe in marathi language माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर झुणका रेसिपी मराठी माहिती बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या zunka bhakri recipe in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि gavran zunka recipe in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये zunka recipe video Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!