12 balutedar information in marathi बलुतेदारांची माहिती, सध्याच्या आधुनिक जगामध्ये काहींना बारा (१२) बलुतेदार विषयी माहिती आहे तर काहींना या विषयी माहिती नाही परंतु आपण या लेखामध्ये १२ बलुतेदार विषयी सविस्तर आणि संपूर्ण माहिती पाहणार आहोत. पूर्वीच्या काळी बारा बलुतेदार हि एक पध्दत होती आणि हि देवाणघेवाण विषयीची एक पध्दत होती.सध्या जसे आपण दुकानातून किंवा बाजारातून कोणतीही वस्तू घ्यायची असल्यास आपण त्या बदल्यात पैसे देतो आणि वस्तू खरेदी करतो.
परंतु पूर्वी असे नव्हते तर वस्तू खरेदी करण्यासाठी पैसे नाही तर त्या वस्तूच्या बदली आपल्याकडे उपलब्ध असणारी वस्तू त्या व्यक्तीला दिली जात होती म्हणजेच वस्तूंची देवाणघेवाण होत होती आणि हि पध्दत बारा बलुतेदारांच्या मार्फत चालवली जायची आणि हे बलुतेदार प्रत्येक गावामध्ये हे काम करत होते किंवा हि पध्दत चालवत होते आणि यामध्ये कुंभार, पारिट आणि माळी यांचा देखील समावेश होता.
पूर्वी जे शेतकरी होते ते जास्त प्रमाणात धान्य पिकावाणार आणि ते इतर लोकांना जगण्यासाठी महत्वाचे होते त्यामुळे इतर लोक शेतकऱ्याकडून धान्य घेत आणि पुढे बारा बलुतेदार त्यांची वेगवेगळी कामे करत असे पूर्वी वस्तूच्या बदली वस्तू किंवा कामाच्या बदली काम केले जाते.
आणि हे सर्व बारा बलुतेदार यांच्या सहाय्याने होत होते. चला तर खाली आपण १२ बलुतेदार यांच्या विषयी संपूर्ण माहिती घेवूया आणि १२ बलुतेदारांची यादी खाली आपण पाहूया.
बलुतेदारांची माहिती – 12 Balutedar Information in Marathi
१२ बलुतेदार म्हणजे काय ?
१२ बलुतेदार हि एक पूर्वीची पध्दत किंवा प्रणाली होती जी पूर्वीच्या व्यापाऱ्यांच्यामार्फत वापरली जात होती आणि यामध्ये वस्तू घेतल्यानंतर पैसे देण्याऐवजी वस्तूंची देवाणघेवाण होत होती आणि सध्या देखील महाराष्ट्राच्या काही भागामध्ये हि पध्दत ऐतिहासिक दृष्ट्या वापरली जाते.
१२ बलुतेदार यांची यादी -12 balutedar in marathi
१२ बलुतेदार हे पूर्वीच्या काळी गावामध्ये काम करणारे किंवा एक व्यापार करणारे व्यक्ती होते ज्यामध्ये वस्तूच्या बदली वस्तू, कामाच्या बदली काम किंवा सेवेच्या बदली सेवा दिली जात होती आणि यामध्ये पाटील आणि कुलकर्णी आहे, लोक सोडून इतर लोक बारा बलुतेदार यादी मध्ये येत होते जसे कि लोहार, सुतार, कुंभार आणि इतर ते खाली आपण सविस्तर पाहणार आहोत.
कुंभार
कुंभार हे मातीच्या वेगवेगळ्या वस्तू बनवून लोकांना विकतात हे आपल्याला माहीतच आहे आणि त्यांचा हा व्यवसाय खूप पूर्वीपासून चालत आलेला व्यवसाय आहे आणि हे बारा बलुतेदारांच्यापैकी पहिल्या क्रमांकाचे मानकरी आहेत. कारण हे खूप पूर्वीपासून ते आपला व्यवसाय चालवत आलेले आहेत.
आणि ते पूर्वीच्या काळी वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू बनवून म्हणजेच मातीच्या चुली, मातीची वेगवेगळी भांडी, आकर्षक वस्तू आणि वेगवेगळ्या मूर्ती बनवून त्या लोकांना पुरवत होते आणि पूर्वीच्या काळी मातीची भांडी आणि चुली हा महत्वाचा घटक होता त्यामुळे कुंभार हे बारा बलुतेदार पध्दत वापरत होते.
चांभार
चांभार हे जनावरांच्या कातड्या पासून वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू जसे कि चप्पल, पर्स, बेल्ट्स आणि इतर अश्या अनेक वस्तू बनवतात आणि हे देखील बारा बलुतेदार पैकी एक आहेत जे पूर्वी व्यवसायासाठी बलुतेदार पध्दत वापरत होते.
मातंग
मातंग समाज हा पूर्वी वेगवेगळ्या प्रकारची कामे करत होता जसे कि झाडू बनवणे, दोरखंड बनवणे आणि हे लोकांना पुरवणे आणि आजा देखील हा समाज या प्रकारच्या वस्तू बनवतो आणि ह्या बाजारामध्ये विकतो तसेच पूर्वी देखील हा समाज या प्रकारच्या वस्तू बनवत होता आणि त्या बलुतेदार पध्दतीने विकत होता. मातंग समाज हा बलुतेदारांच्यापैकी पाचव्या क्रमांकावरील समाज आहे.
परीट
परीट हे सर्वांच्या परिचयाचे आहेत म्हणजेच हे आजही आपल्याला घरी येऊन आपले धुवायचे कपडे घेऊन जाऊन ते वाळवून देतात तसेच जर इस्त्रीचे कपडे असतील तर ते कपडे इस्त्री करून देतात.
अश्या प्रकार ते पूर्वी देखील हेच काम करत होते आणि या कामाच्या बदल्यात ते त्या संबधित व्यक्तीकडून त्यांच्याकडे उपलब्ध असणाऱ्या वस्तू किंवा सेवांचा लाभ घेत होते आणि म्हणून ते बारा बलुतेदार पैकी आठव्या क्रमांकाचा समाज आहे.
कोळी
कोळी समाज हा देखील एक परिचित समाज आहे. जो आज देखील अनेक ठिकाणी आपला व्यवसाय हा मोठ्या प्रमाणात करतो आणि त्यांच्या मासेमारी हा मुख्य व्यवसाय आहे.
कोळी या समाजामध्ये वेगवेगळ्या जातीचे समाज येतात आणि ज्या ठिकाणी कोळी राहतात त्या भागाला किंवा ठिकाणाला कोळीवाडा म्हणून ओळखले जाते. कोळी हे १२ बलुतेदारांच्यापैकी दुसर्या क्रमांकाचा समाज आहे.
लोहार
लोहार हा देखील एक १२ बलुतेदारांच्यापैकी एक समाज आहे जे लोखंडापासून किंवा लोहापासून वेगवेगळ्या वस्तू ह्या पूर्वी पासून बनवते होते आणि ते देखील त्यांच्या व्यवसायासाठी बलुतेदार पध्दत वापरत होते आणि म्हणून हे बलुतेदारांच्या पैकी अकरावा समाज आहे.
तेली
तेली लोक हे बियांच्यापासून तेल काढून ते लोकांना विकत होते आणि पूर्वी तेल हे अन्न बनवण्यासाठी खूप उपयुक्त होते त्यामुळे तेली लोक देखील बलुतेदार पध्दत वापरत होते किंवा ते वस्तूंची देवान घेवाण करत होते आणि त्यामुळे तेली समाज देखील बारा बलुतेदारांच्यापैकी सहाव्या क्रमांकावरील समाज आहे.
माळी
माळी म्हणजे हे लोक भाज्या आणि फळे विकणारे असतात म्हणजेच ते वेगवेगळ्या भाज्यांचे मळे करतात आणि ते पिकवून बाजारामध्ये विकतात आणि पूर्वी देखील हे लोक फळे किंवा भाज्यांचा व्यवसाय करत होते आणि म्हणून त्यांना बारा बलुतेदारांच्या पैकी नवव्या क्रमांकाचा समाज आहे.
न्हावी
न्हावी हा समाज देखील बारा बलुतेदारांच्यापैकी एक आहे आणि हा समाज या यादीमध्ये सातव्या क्रमांकावरील समाज आहे आणि ह्या समाजातील लोक केस कर्तन, दाढी आणि केसांची रचना करणे या सारखे काम करतात.
गुरव
जो समाज मंदिरातील पूजा करतो अश्या लोकांना गुरव म्हणतात आणि गुरव समाज हा बारा बलुतेदार यादीतील तिसऱ्या क्रमांकावरील समाज आहे.
महार
महार हा समाज देखील बारा बलुतेदारांच्यापैकी एक आहे आणि ह्या समाजामधील लोक हे जासुसी करणे किंवा राखण किंवा चौकीदारी करणे या सारखी काम करत होते.
सुतार
सुतार हा समाज देखील आजही खूप परिचित आहे आणि हा समाज जरी पूर्वी देखील मोठ्या प्रमाणात सुतार कामाचा व्यवसाय करत असले तरी ते पूर्वी देखील मोठ्या प्रमाणात व्यवसाय करत होते.
सुतार काम म्हणजे लाकडापासून वेगवेगळ्या वस्तू बनवणे आणि त्यापासून आपला व्यवसाय चालवणे. सुतार देखील १२ बलुतेदारांच्यापैकी एक आहेत आणि हे यामधील १२ व्या क्रमांकाचा समाज आहे.
आम्ही दिलेल्या 12 balutedar information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर बलुतेदारांची माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या 12 balutedar information in marathi wikipedia या 12 balutedar name in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि 12 balutedar name in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये bara balutedar in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट