आधार कार्ड माहिती Aadhar Card Information in Marathi

aadhar card information in marathi आधार कार्ड माहिती, आपल्याला भारत सरकारद्वारे अनेक वेगवेगळ्या प्रकारची सरकारी ओळखपत्रे जारी केली जातात जसे कि वोटिंग कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, रेशन कार्ड अश्या प्रकारे वेगवेगळ्या प्रकारची ओळखपत्रे जारी केली जातात आणि आधार कार्ड देखील भारत सरकार द्वारे जारी केलेले एक ओळखपत्र आहे ज्यामुळे भारतीय लोकांना कोणतेही सरकारी काम करायचे असेल तर त्यांना त्याच्या आधारे करता येऊ शकतात. आ

धार कार्ड हे एक सरकारने जारी केलेले सरकारी कागदपत्र आहे. जे भारतातील प्रत्येक व्यक्तीकडे असणे आवश्यक आहे आणि या आधार कार्ड वर एक १२ अंकी नंबर असतो जो भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने जारी केलेला आहे हा नंबर त्या संबधित व्यक्तीसाठी खूप महत्वाचा असतो.

ज्यावेळी एखादा व्यक्ती आधार कार्ड साठी नोंदणी करत असतो त्यावेळी त्या व्यक्तीला किंवा भारतातील कोणत्याही व्यक्तीला वय, लिंग, स्थान आणि रहिवासी याची कोणतीही आट नसते कोणत्याही वयाचा व्यक्ती आधारकार्ड नोंदणीसाठी अर्ज करू शकतो. ज्यावेळी आधार कार्डसाठी एखादा व्यक्ती नोंदणी करत असतो.

त्यावेळी त्या व्यक्तीला वेगवेगळ्या प्रक्रियेतून आणि अनेक कागदपत्रांची पुरवणी करून आधार कार्ड मिळवण्यासाठी पात्र व्हावे लागते. चला तर खाली आपण आधार कार्ड या सरकारी कागदपत्राविषयी खाली आपण सविस्तर आणि संपूर्ण माहिती घेवूया.

aadhar card information in marathi
aadhar card information in marathi

आधार कार्ड माहिती – Aadhar Card Information in Marathi

आधार कार्ड आयडी म्हणजे काय – uid no meaning in marathi

आधार कार्ड आयडी हा एक १२ अंकी नंबर असतो जो भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने जारी केलेला आहे आणि हा भारतातील लोकांच्यासाठी ओळखीचा आणि पत्याचा पूर्वा म्हणून काम करतो.

आधारकार्ड नोंदणी करताना विचारलेली माहिती

आधार कार्ड हे एक सरकारी कागदपत्र आहे जे भारतातील प्रत्येक व्यक्तीकडे असणे आवश्यक आहे आणि म्हणून प्रत्येक व्यक्तीने आधार कार्ड साठी नोंदणी करून ते मिळवले पाहिजे. खाली आपण आधार कार्ड नोंदणी करत असताना तो विभाग कोणकोणत्या प्रकारची माहिती विचारतो ते खाली आपण पाहणार आहोत.

 • आधार कार्ड नोंदणी करताना त्या संबधित व्यक्तीचे नाव, फोन नंबर, जन्मतारीख, लिंग, इमेल आयडी, रहिवासी पत्ता या प्रकारची बेसिक माहिती प्रथम गोळा केली जाते.
 • आधारसाठी अर्ज करताना जर तो व्यक्ती परिचयकर्त्याच्या आधारे आधार कार्डसाठी अर्ज करत असेल तर त्या व्यक्तीने परिचयकर्त्याचे नाव आणि परिचयकर्त्याचा आधार क्रमांक पुरवला पाहिजे.
 • जर व्यक्ती कुटुंब प्रमुखाच्या आधारावर आधार कार्डसाठी अर्ज करत असणाऱ्या व्यक्तीने कुटुम प्रमुखाचे नाव, कुटुंब प्रमुखाशी त्याचे काय नाते आहे आणि त्या कुटुंब प्रमुखाचा आधार क्रमांक हि सर्व माहिती आवश्यक असते.
 • आणि जर मुले आधार साठी नोंदणी करत असतील तर त्या मुलांना पालकांनाच आधार क्रमांक आणि नाव नोंदणी आयडी तसेच नातेसंबधाचा पुरावा देणारे कागदपत्र.
 • तसेच थंब इम्प्रेशन आणि आपला फोटो देखील स्कॅन करून घेताला जातो.

आधार कार्डचा वापर आणि फायदे – uses and benefits

आधार कार्ड हे भारत सरकारने जारी केलेले एक कागदपत्र आहे. जे भारतातीय लोक वेगवेगळ्या सरकारी कामांच्यासाठी वापरतात ते खाली आपण पाहूया.  

 • आधार कार्ड मुळे सरकारला लाभार्थ्यांचा अचूक माहिती मिळण्यासाठी मदत झाली.
 • आधार प्रमाणीकरण अंमलबजावणी करणाऱ्या एजन्सींना सेवा आणि लाभ वितरणाच्या वेळी लाभार्त्यांची पडताळणी करण्यास सक्षम बनवले आणि लाभांचे लक्षित वितरण सुनिश्चित करण्यास मदत मिळाली आणि लक्षित वितरणामुळे गळती दूर होण्यास मदत झाली.
 • आधार कार्ड या प्लॅटफॉर्मने सेवा आणि वितरण यंत्रनेबद्दल अचूक आणि पारदर्शक माहिती प्रधान केल्यामुळे सरकार यामुळे वितरण प्रणाली सुधारू शकले.
 • आधार कार्ड हे भारतातील लोकांच्यासाठी एक महत्वाचे सरकारी कागदपत्र बनले कारण हे ओळखीचा पुरावा आणि रहिवासी पुरावा म्हणून काम करू लागले.
 • जर एखाद्या व्यक्तीला सरकारी कोणत्याही योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास किंवा सबसिडी किंवा सरकारी फायद्यांचा लाभ घ्यायचा असल्यास सरकार तो व्यक्ती त्या संबधित लाभासाठी पात्र आहे कि नाही याची पडताळणी आधार कार्ड आयडी वरून करू शकतो कारण हे कागदपत्र अनेक कागदपात्रांशी लिंक असते.
 • जर एखाद्या व्यक्तीला एका भागातून दुसऱ्या भागात ( भारतामध्ये ) स्थलांतरित व्हायचे असेल तर तो व्यक्ती आधार कार्ड ही कागदपत्र ओळखीचा पुरावा म्हणून वापरू शकतो.
 • जात एखाद्या व्यक्तीला कोणतेही सरकारी काम ऑनलाईन करायचे असल्यासतो व्यक्ती आधार कार्डचा पुरावा देऊन ते काम काही वेळात करू शकता.

ई आधार कसे डाऊनलोड करायचे – how to download aadhar card in marathi

संबधित व्यक्ती ई आधारकार्ड दोन प्रकारे डाऊनलोड करू शकतो आणि ते कोणकोणते आहेत ते खाली आपण पाहणार आहोत.

आधार क्रमांक वापरून

जर एखाद्या व्यक्तीला ई आधारकार्ड डाऊनलोड करायचे असेल तर तो व्यक्ती आधार क्रमांक वापरून देखील आधार कार्ड डाऊनलोड करू शकतो. तो संबधित व्यक्ती पिन कोड सोबत १२ अंकी आधार क्रमांक वापरून ई आधारकार्ड डाऊनलोड करू शकतात आणि प्रक्रियेमध्ये नोंदणीकृत मोबईल नंबरवर ओटीपी येतो तो वापरून तुम्हाला ई आधारकार्ड डाऊनलोड करण्याची परवानगी मिळू शकते.

नावनोंदणी क्रमांक वापरून

नावनोंदणी क्रमांक वापरून देखील ई आधारकार्ड डाऊनलोड करता येते यामध्ये पिन कोड आणि नावासह ई आधारकार्ड डाऊनलोड केले जाते आणि या प्रक्रियेमध्ये देखील नोंदणीकृत मोबईल नंबरवर ओटीपी येतो तो वापरून तुम्हाला ई आधारकार्ड डाऊनलोड करण्याची परवानगी मिळू शकते.

आम्ही दिलेल्या aadhar card information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर आधार कार्ड माहिती मराठी अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या aadhar card mahiti या aadhar card marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि information about aadhar card in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये aadhar card link with mobile number in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!