abacus information in marathi अबॅकस ची माहिती, पूर्वी अंकांच्या मोजणीसाठी कोणत्याही प्रकारचे यंत्र किंवा साधन नव्हते आणि त्यावेळी हाताच्या बोटांनी अंकांची मोजणी केली जात होती परंतु सध्या अंकांच्या मोजणीसाठी अनेक साधने आली आहेत आणि त्यामधील एक म्हणजे अबॅकस आहे. कारण हे मोजणीचे साधन आहे आणि आज आपण या लेखामध्ये अबॅकसविषयी संपूर्ण महोती घेणार आहोत. अबॅकस हे एक असे साधन आहे ज्यापासून आपण एका मोजू शकतो म्हणजेच हे स्लायडिंग काऊंटर, रॉड वापरून गणना केली जाते.
हे साधन लाकडी किंवा प्लास्टिकचे असते आयताकृती आकाराचे असते आणि त्याच्या मध्यभागी रॉड असतात आणि त्या रॉड मध्ये मोठे मनी असतात आणि त्या मण्यांच्या मार्फत मोजणी केली जात होती आणि अश्या प्रकारच्या या गणिताच्या मोजणीच्या साधनाला पूर्वी कॅल्क्युलेटर म्हणून ओळखले जात होते आणि या प्रकारच्या कॅल्क्युलेटरचा वापर हा प्रथम रशिया, चीन आणि युरोप या देशांनी केला होता.
अबॅकस ची माहिती – Abacus Information in Marathi
अबॅकस म्हणजे काय – abacus meaning in marathi
अबॅकसची जुनी आवृत्ती एक उथळ ट्रे होती ज्यामध्ये वाळूचा समावेश होता जेथे आवश्यकतेनुसार संख्या सहजपणे मिटविली जातहोती आणि आधुनिक अबॅकस हे लाकूड किंवा प्लास्टिक पासून बनलेले होते आणि हे एका आकाताकृती पेटीसारखे आहे ज्यामध्ये मनी बांधलेल्या नऊ उभ्या काड्या असतात.
अबॅकसचे वेगवेगळे प्रकार – types
अबॅकस हे वेगवेगळ्या लाकडांच्यापासून तसेच प्लास्टिक पासून बनलेले असते तसेच ते वेगवेगळ्या आकारामध्ये आणि वेगवेगळ्या प्रकारामध्ये आपल्याला पहायला मिळते आणि ते कोणकोणते आहेत ते आपण खाली पाहुया. चला तर खाली आपण अबॅकसचे वेगवेगळे प्रकार कोणकोणते आहेत ते पाहूया.
रशियन अबॅकस :
रशियन अबॅकस आणि चीनी अबॅकसमध्ये एक साम्यता आहे कि यामधील रॉड क्षैतिजरित्या ठेवलेले असतात आणि मनी उजवीकडून डावीकडे सरकतात. एका सामान्य रशियन अबॅकस हे २८ सेंटी मीटर रुंद आणि ४६ सेंटी मीटर उंच असते.
बायनरी अबॅकस :
अलीकडच्या काळामध्ये असे दिसून आले कि अबॅकसचा वापर हा अंकगणित ऑपरेशन करण्यासाठी मर्यादित नाही. संगणक संख्या हि कशी हहाताळतात हे स्पष्ट करण्यासाठी देखील या बायनरी अबॅकसचा वापर केला जातो. बायनरी अबॅकस हे आपल्याला दाशांशाचे बायनरी मध्ये रुपांतर करण्यास शिकवते आणि यामध्ये मण्यांची मालिका हि तीन स्वातंत्र्य पंक्तीमध्ये ठेवलेली असते.
रोमन अबॅकस :
प्राचीन रोमन लोकांनी मोजणीसाठी गुळगुळीत टेबलवर आणि खाली काऊंटरवर म्हणून दगडांचा वापर केला होता. रोमन अबॅकस हे बंकर्स, व्यापारी, मनी चेंजर्स आणि अभियंते यांना मदत करण्यासाठी विकसित केले होते. रोमन लोकांनी इतर अनेक अबॅकस प्रकार शोधले आहेत जसे कि लाइन अबॅकस, गृव्हड अबॅकस आणि डस्ट अबॅकस इत्यादी.
क्रॅनमर अबॅकस :
क्रॅनमर अबॅकस हे दृष्टी अपंग असलेल्या विद्यार्थ्यांच्यासाठी आधार देण्यासाठी बनवले आहे. शिकणारे हे मनी हाताळू शकतात ज्यामुळे त्यांना संख्या सखोल समजण्यास मदत होईल. बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या सारख्या अंकगणितीय प्रक्रियांचा समावेश असलेल्या विविध संख्यांची गणना करण्यासाठी या प्रकारच्या अबॅकसचा वापर केला जातो.
अबॅकसचा वापर – use
- अबॅकस वापर हा गणितीय मोजणीसाठी केला जातो आणि या साधनाचा वापर कश्यासाठी केला जातो हे आपण खाली सविस्तर पाहूया.
- हे एका संख्येची वर्गमूळ आणि घनमूळ काढण्यासाठी देखील वापरले जाऊ शकते.
- अबॅकसचा वापर हा बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार करण्यासाठी वापरले जाते.
- हे मुलांना ऐकणे, वेग, एकाग्रता, अचूकता, कल्पनाशक्ती, नाविन्य छायाचित्रण, क्षमता इत्यादी मुलभूत आणि महत्वपूर्ण कौशल्ये विकसित करण्यास मदत करते.
- हे व्यक्तीला त्याच्या एकूण शैक्षणिक कौशल्ये सुधारण्यासाठी मदत करते, त्यांना आव्हानांना कसे तोंड द्यावे आणि त्यांना कसे सामोरे जावे हे शिकवते. यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होते तसेच विद्यार्थ्याची कौशल्ये वाढतात.
- तर्जनी किंवा एका हाताच्या अंगठ्याच्या सहाय्याने मनी हाताळले जातात.
- विद्यार्थ्यांच्या मनातील गणिताची भीती काढून टाकण्यास मदत होते कारण हे गणित सोपे करण्यास मदत करते.
- हे विद्यार्थ्यांची अवकाशीय क्षमता विकसित करते ज्यांचा उपयोग आर्किटेक्चर, अभियांत्रिकी, विज्ञान या सारख्या क्षेत्रात होतो.
अबॅकस विषयी काही विशेष आणि मनोरंजक तथ्ये – facts
- जगाच्या काही भागामध्ये आजही गणना करण्यासाठी अबॅकसचा वापर केला जातो आणि हे अजूनही चीन, रशिया आणि जपानमध्ये वापरले जाते.
- चीनमध्ये अबॅकसला सुआनपॅन असे म्हणतात.
- आज आपण वापरत असलेला अबॅकस म्हणजे सोराबान हा आहे.
- अबॅकसचा वापर हा गणिते शिक्षण्यासाठी केला जातो आणि ५ ते ६ वायोगटातील मुलांच्यासाठी शिकण्यासाठी घेतला जातो.
- हे साधन लाकडी किंवा प्लास्टिकचे असते आयताकृती आकाराचे असते आणि त्याच्या मध्यभागी रॉड असतात आणि त्या रॉड मध्ये मोठे मनी असतात आणि त्या मण्यांच्या मार्फत मोजणी केली जात होती.
- अबॅकस हे ५००० वर्षापूर्वी शोधलेले मानवनिर्मित गणना यंत्र आहे आणि काही इतिहासकारांच्या मते ५०० बीसीच्या आसपास अबॅकसचा शोध चीनी लोकांनी लावला आहे असे म्हटले आहे.
- आधुनिक काळात अबॅकस हे मेंदूच्या विकासाचे साधन असल्याचे सिध्द झाले आहे जे लहान मुलांच्यामध्ये मानसिक अंकगणितीय क्षमता वाढवण्यात देखील मदत करते.
- चीन हे मुख्यता अबॅकसचे उगमस्थान मानले जाते. चीनी अबॅकसवरील मूळ लिखित दस्तऐवज ख्रिस्तपूर्व दुसऱ्या शतकातील आहे.
आम्ही दिलेल्या abacus information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर अबॅकस ची माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या abacus information in marathi language या abacus meaning in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि information about abacus in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये abacus meaning marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट