विमानाची माहिती Airplane Information In Marathi

airplane information in Marathi चला आज आपण जाणून घेउयात विमानाबद्दल काही रोचक तथ्य. आकाशात होत असलेल्या विजेचा परिणाम विमानावर होत नाही. कारण विमानाची रचना अशा प्रकारे केलेली आहेकी त्यांच्यावर आकाशात होणाऱ्या विजेचा परिणाम होत नाही. १९६३ पासून अजून एकदाही आकाशातील विजेमुळे विमान अपघात झाला नाही. प्रत्येक वर्षी एक वेळा तरी वीज विमानावर आदळते. विमानामधून प्रवास करत असतानाच आपल्याला एक ऑक्सिजन मास्क दिला जातो. तो मास्क फक्त १५ मिनटापर्यंत ऑक्सिजन पुरवतो. काही लोकांना हे माहित नसते कि ऑक्सिजन मास्क फक्त १५ मिनिटे पुरू शकत. पण तोपर्यंत पायलट आपणाला सुरक्षित अंतरावर पोचवतो. यामुळे प्रवासी श्वास घेऊ शकतात.(airplane in marathi)

airplane-information-in-marathi
airplane information in Marathi/airplane in marathi

विमान माहिती (Airplane Information In Marathi)

विमानाच्या खिडकीमध्ये एक छोटा न दिसणारा छिद्र असतो तो हवेचा दाब नियंत्रण करण्यासठी असतो. तसेच तो धुक्यात खिडकीची सुरक्षा करतो. विमानाच्या खिडक्या तीन लेयरच्या असतात. त्या एक्रेलिक मटेरियल पासून बनवल्या जातात. आतील आणि बाहेरील लेयर हवेचा दाब नियंत्रित करतात.  पायलट जिथे बसतात त्या जागेला कॉकपिट असे म्हणतात. या कॉकपिटला एक बाहेर पडण्याचा दरवाजा आहे तो आपत्कालीन परिस्थितीत पायलटला बाहेर पडायला मदत करतो. प्रवाशांना आपत्कालीन वेळेत बाहेर पडण्यासाठीही खूप गेट आहेत. हे गेट प्रत्येक विमानामध्ये वेगवेगळ्या जागेवर दिसून येतात. आपण जर कधी विमानातून प्रवास केला असेल तर आपनाला जाणवले असेल कि प्रवासामध्ये दिलेले जाणारे अन्न चव नसलेले जाणवते. पण विमानामध्ये हवेच्या असामान्य दाबामुळे आपल्या चव ग्रंथी सुस्त होतात त्यामुळे आपणाला चव समजत नाही. विमान फक्त एका इंजिनवर डिजाइनवर उडण्यासाठी तयार केलेलं असते. पण विमानामध्ये दोन इंजिन असली तरी ते फक्त एका इंजिनवर कितीतरी वेळ उडू शकतात आणि परत जमिनीवर आणले जाऊ शकते. आपत्कालीन वेळेत एक इंजिन जरी फेल झाले तरी पर्यायी म्हणून दुसरे इंजिन विमानामध्ये असते या इंजिन च्या मदतीने पायलट विमान जवळच्या विमानतळावर विमान उतरू शकेल.

विमानाचे प्रकार (Types of aircraft)

विमानामध्ये आपल्याला खूप प्रकार पाहायला मिळतात. ते आपण जाणून घेऊयात. वाणिज्यिक विमानांचे प्रकार, खाजगी जेट्सचे प्रकार, प्रोपेलर प्लेनचे प्रकार हे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. आपण या प्रकारांची थोडक्यात माहिती घेऊयात. वाणिज्यिक विमानांचे प्रकारामध्ये आपल्याला ६ प्रकार पाहायला मिळतात. जंबो पॅसेंजर जेट्स, मध्यम आकाराचे प्रवासी जेट्स, हलका पॅसेंजर जेट्स, प्रवासी टर्बोप्रॉप्स आणि कार्गो विमान हे प्रकार सामान्य प्रवाशांना प्रवास करण्यासाठी वापरलेले जातात. दुसरा प्रकार म्हणजे खाजगी जेट्सचे प्रकार यामध्ये आपल्याला एकूण ५ प्रकार पाहायला मिळतात. व्हीएलजे (वेरी लाइट जेट्स), लाइट बिजनेस जेट्स, मध्यम आकाराचे बिजनेस जेट्स, हेवी बिजनेस जेट्स, सैन्य विमान हे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. तिसरा प्रकार म्हणजे प्रोपेलर प्लेनचे प्रकार यामध्ये आपल्याला एकूण ५ प्रकार पाहायला मिळतात. खासगी सिंगल इंजिन, ट्विन टर्बोप्रॉप्स, एरोबॅटिक, अम्पिबीस (उभयचर) ,सैन्य टर्बोप्रॉप्स असे प्रकार पाहायला मिळतात.

विमानाचा शोध (Aircraft search)

वाचकानो आपण आयुष्यमान खुरानाचा हवाईजादा हा पिक्चर बघितलाच असेल. त्यामध्ये आपल्याला असे दाखवलेले आहे कि एका मराठी माणसाने राईट बंधूंच्या आधी विमानाचा शोध लावला. तर चला आज आपण जाणून घेऊयात नक्की काय घडले ते. त्यांचे नाव आहे शिवकर बापूजी तळपदे. काही अहवालानुसार शहरातील जे जे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये प्रशिक्षक म्हणून काम करत असताना तळपदे यांनी हे विमान बनवले. भारद्वाज ऋषींनी रचलेल्या ‘वैमानिक शास्त्र’ मधील विमानांमधील कथितमुळे त्याच्यावर त्याचा प्रभाव होता झालेला दिसते आणि तेच विमान बनवायचे होते. आर्किटेक्ट-इतिहासकार प्रताप वेळकर यांनी कथांवर आधारित आपल्या अहवालात म्हटले आहे की ज्या दिवशी हे विमान उड्डाण केले जाणार होते त्या दिवशी प्रेक्षक म्हणून कमी लोक उपस्थित होते. तळपदे यांचे विमान काही काळ हवेमध्ये होते आणि ते जमिनीवर येण्यापूर्वी 1,500 फूट उंचीपर्यंत उड्डाण केले होते. हा पराक्रम करण्यासाठी मरकरी  व्हर्टेक्स इंजिनचा वापर करण्यात आला. हा पारा ज्याला सूर्यप्रकाशाचा धोका होता तेव्हा हायड्रोजन सोडला आणि जहाज वरच्या दिशेने उड्डाण केले. म्हणून,  की ज्या हायड्रोजन विमानास हवेत उडवायचे याबद्दल बोलले गेले आहे, ते कोठून आले? यामुळे या शोधाला ग्रहित धरले जात नाही. १७ डिसेंबर, १९०३  रोजी विल्बर आणि ऑरविले राईट यांनी किट्टी हॉक येथे त्यांच्या पहिल्या सत्तेवर असलेल्या विमानासह चार संक्षिप्त उड्डाणे केली. राईट बंधूंनी पहिले यशस्वी विमान शोधून काढले होते. अशा प्रकारे विमानाचा शोध राईट बंधूनी केला असे आपल्याला पाहायला मिळते.

विमान चालवणार्याला काय म्हणतात (What is a pilot called?)

आपण विमान चालविणाऱ्या वैमानिकाना पायलट असे म्हणतो. पायलट होण्यासठी खूप अभ्यास करायला लागतो. पायलट यांना पगार पण खूप असतो. पायलटच्या दैनदिन जीवन हे खूप व्यस्त असते.

विमानाची माहिती दाखवा (Show flight information)

आपल्याला जर विमानाची माहिती पहायची असेल तर आपण वेगवेळ्या ठिकाणावरून फ्लाइट ची माहिती बघू शकतो. आपण विमानतळावरून फ्लाइटची माहिती पाहू शकतो. आजकाल आपण इंटरनेट वरून घरी बसल्याही फ्लाइटची माहिती पाहू शकतो. त्यासाठी आम्ही तुम्हाला काही चांगल्या संकेतस्थळांची पूर्तता करून देणार आहोत.

विमान तिकीट दर (Plane ticket rates)

विमान तिकीट दर हे प्रत्येक जागेवर, सीटवर आणि सिजण वर अवलंबून असते. उदाहरणातून आपणाला गरमीच्या दिवसामध्ये थंड हवेच्या ठिकाणी फिरायला जाणार असाल तर तेव्हा सीजन ते सीजन दर वाढत जातो. तेच जर आपण हिवाळ्यामध्ये थंड हवेच्या ठिकाणी जात असाल तर तिकीट चा दर कमी असेल. तसेच विमान तिकिटाचे दर हे बसण्याच्या जागेवरही अवलंबून असते. उदाहरणातून जर तुम्ही साधी इकॉनॉमी सीटवर बसलात तर आपणाला तिकीट दर कमी होईल आणि तेच जर आपण बिजनेस क्लास मध्ये बसलात तर आपणाला तिकीट दर जास्त बसेल असे हे तिकीट दर बदलत राहतात. तिकीट तर हे ओईलवर ही अवलंबून असते. जर मार्केटमध्ये तेलाच्या किमतीत वाढ झाली तर तिकिटाचे दर ही आपल्याला वाढ झालेल्या दिसतील. अशाच प्रकारे वेगवेगळे वेळेत वेगवेगळ्याप्रकारे दर अवलंबून असतात.

वरील सर्व मजकूर पाहून आपणास अंदाज लागला असेल कि विमानाची माहिती काय आहे त्याचा इतिहास काय आहे विमानाचा शोध कोणी लावला? त्याच बरोबर विमान चालवणारा ला काय म्हणतात? airplane information in Marathi language हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच Information about Airplane in Marathi हा लेख कसा वाटला व अजून काही विमानाविषयी राहिले असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद.

आम्ही दिलेल्या airplane in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू. अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!