संगीतकार अजय अतुल यांची माहिती Ajay Atul Biography in Marathi

Ajay Atul Biography in Marathi – Ajay Atul Information in Marathi अजय अतुल यांची माहिती भारतीय संगीतामध्ये पिढ्यान पिढ्या अनेक अश्या संगीतकार जोड्या होऊन गेल्या ज्यांच्या गाण्याने मन अगदी शांत होत होते. असेच काही सध्याच्या अश्याच काही संगीतकार जोड्या आजही खूप लोकप्रिय आहेत ज्यामधील एक लोकप्रिय जोडी म्हणजे अजय अतुल या दोन भावांची जोडी. या दोन भावांनी सध्याच्या भारतीय संगीतामध्ये अगदी मोलाची कामगिरी केली आहे आणि त्यांची गाणी ऐकल्यानंतर मन अगदी तृप्त होवून जाते. या दोन संगीतकारांनी मराठी, हिंदी आणि तेलगु या भाषेंच्या चित्रपटासाठी अनेक गाणी बनवली आणि ती  गायिली सुध्दा आणि ती भारतामध्ये लोकप्रिय देखील झाली.

अजय गोगावले आणि अतुल गोगावले हे दोघे भाऊ भारतीय संगीतकार आहेत. त्यांनी शॉक ( तेलगु ) तसेच तान्हाजी, धडक, अग्निपथ, झिरो, ब्रदर्स यांसारख्या अनेक हिट चित्रपटांना आणि सैराट, जोगवा, लय भारी आणि इतर अनेक मराठी चित्रपटांना संगीत दिले आहे. २०१० मध्ये या संगीतकार जोडीला ‘जोगवा’ या मराठी चित्रपटातील त्यांच्या संगीतासाठी त्यांना भारत सरकारकडून राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.

ajay atul biography in marathi
ajay atul biography in marathi

अजय अतुल यांची माहिती – Ajay Atul Biography in Marathi

अजय-अतुल या संगीतकार जोडीची  सुरुवात 

अजय – अतुल यांना लहानपनी पासूनच संगीताची खूप आवड असावी परंतु वडिलांच्या सततच्या बदलीमुळे त्यांची एका गावातून दुसऱ्या गावात सतत बदली होत होती. एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी बदली होत असल्यामुळे त्यांना आपल्या संगीत शिक्षणावर लक्ष केंद्रित करणे खूप कठीण जात होते.

पण त्या दोघांनी नववीच्या वर्गानंतर ते पुण्यामध्ये स्थलांतरित झाले आणि तेथूनच त्यांनी संगीतकार बनण्यासाठी आपली वाटचाल सुरु केली. पुण्यामध्ये त्यांनी संगीत शिक्षण घेतले तसेच ते ते सराव करू लागले आणि दिवसेंदिवस स्वत: ला चांगले बनवू लागले आणि आज ते भारतीय संगीत उद्योगातील मोठे नाव असणारे संगीतकार आहेत.

अजय गोगावले – Ajay Gogavale Information in Marathi

पूर्ण नावअजय अशोक गोगावले
जन्म२१ ऑगस्ट १९७६
जन्म ठिकाणमहाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील आळंदी
ओळखसंगीतकार आणि गायक

अजय गोगावले हे एक हे एक संगीतकार आणि गायक आहेत ज्यांचे पूर्ण नाव अजय अशोक गोगावले असे आहे. अजय गोगावले यांचा जन्म महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील आळंदी या ठिकाणी २१ ऑगस्ट १९७६ मध्ये झाला. अजय गोगावले या संगीतकाराला लहानपणी पासूनच संगीताची खूप आवड होती.

त्यामुळे त्यांनी आपल्या शैक्षणिक शिक्षणापेक्षा संगीताकडे जास्त लक्ष केंद्रित केले त्यांनी आपले ग्रॅज्यूएशन पूर्ण केले आणि त्यांनी आपला जास्तीत जास्त वेळ संगीत शिकण्यामध्ये घालवला. यांना लहानपणी पासूनच संगीताची खूप आवड होती परंतु वडिलांच्या सततच्या बदलीमुळे त्यांची एका गावातून दुसऱ्या गावात सतत बदली होत होती.

एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी बदली होत असल्यामुळे त्यांना आपल्या संगीत शिक्षणावर लक्ष केंद्रित करणे खूप कठीण जात होते. पण त्यांनी आपल्या शालेय शिक्षणानंतर पुण्यामध्ये स्थलांतरित झाल्या नंतर संगीत शिक्षण घेण्यास लक्ष केंद्रित केले.

पुरस्कार 

  • अजय गोगावले या संगीतकाराला मराठी चित्रपट जोगवा साठी २०१० मध्ये राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.
  • २०१० मध्ये बिग एफएम सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक हा पुरस्कार मिळाला होता.
  • २०१३ मध्ये अग्निपथ या हिंदी चित्रपटासाठी झी सीने सर्वोत्तम पार्श्वभूमी स्कोअर पुरस्कार मिळाला होता.

अतुल गोगावले – Atul Gogavale Information in Marathi

पूर्ण नावअतुल अशोक गोगावले
जन्म११ सप्टेंबर १९७४
जन्म ठिकाणमहाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील आळंदी
ओळखसंगीत कर आणि गायक

अतुल गोगावले हे एक प्रसिध्द संगीतकार आहेत ज्यांचे पूर्ण नाव अतुल अशोक गोगावले असे आहे. या संगीत कारचा जन्म ११ सप्टेंबर १९७४ मध्ये महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील आळंदी या ठिकाणी झाला. त्यांनी आपले शाळेक शिक्षण हे आपल्या गावामध्ये घेतले आणि मग त्यांनी ग्रॅज्यूएशन पुण्यामध्ये केले. अतुल गोगावले यांना.

यांना लहानपणी पासूनच संगीताची खूप आवड होती परंतु वडिलांच्या सततच्या बदलीमुळे त्यांची एका गावातून दुसऱ्या गावात सतत बदली होत होती. एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी बदली होत असल्यामुळे त्यांना आपल्या संगीत शिक्षणावर लक्ष केंद्रित करणे खूप कठीण जात होते. पण त्यांनी पुण्यामध्ये स्थलांतरित झाल्यानंतर त्यांनी संगीतामध्ये पूर्ण लक्ष केंद्रित केले आणि आज ते एक लोकप्रिय संगीतकार आहेत. 

पुरस्कार 

  • २००३ मध्ये केलेले नाटक सही रे सही याच्या साठी अतुल गोगावले या संगीतकारला झी गौरव तर्फे सर्वोत्कृष संगीतकार म्हणून पुरस्कार मिळाला होता.
  • अतुल गोगावले या संगीतकाराला २०१० मध्ये जोगवा या मराठी चित्रपटाच्या गाण्यांच्यासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.
  • २०११ मध्ये नटरंग या मराठी चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट संगीतकार म्हणून मराठी आंतरराष्ट्रीय चित्रपट आणि थिएटर पुरस्कार हा पुरस्कार मिळाला.

अजय अतुल यांची संगीतातील कामगिरी 

  • अजय आणि अतुल या संगीतकार जोडीला सर्वप्रथम एक नाटक साठी पुरस्कार मिळाला होता त्यांचे नाव सही रे सही असे होते.
  • या दोघांनी २००४ मध्ये राम गोपाल वर्मा यांच्या गायब या चित्रपटाला आपले संगीत दिले आणि हे वळण त्यांच्या आयुष्यातील महत्वाचे वळण होते.
  • त्यानंतर त्यांनी आग बाई अरेच्या या चित्रपटासाठी संगीत दिले त्यामध्ये त्यांनी मल्हार वारी आणि मन उधान वाऱ्याचे या सारखी गाणी बसवली आणि गायिली आणि हि गाणी लोकांना आवडू लागल्यामुळे त्याची देखी लोकप्रियता वाढली आणि त्यानंतर त्यांनी अनेक गाण्यांची रचना केली आणि गायिली.
  • २००८ मध्ये त्यांनी जत्र चित्रपटातील ‘कोंबडी पळाली’ आणि हिंदी चित्रपट अग्निपथ या मधील ‘चिकणी चमेली’ यासारखी हित गाणी बसवली आणि ती खूप लोकप्रिय देखील झाली.
  • त्यानंतर त्यांनी अनेक मराठी चित्रपटांच्यासाठी संगीत दिले तसेच हिंदीमधील सिंघम, पिके, धडक आणि अग्निपथ या सारख्या हिट झालेल्या चित्रपटांच्यासाठी संगीत दिले.
  • २०१६ मध्ये त्यांची लोकप्रियता आणखीन वाढली कारण २०१६ मध्ये सैराट या चित्रपटाचे संगीत त्यांनीच दिले आणि या चित्रपटातील सर्व गाणी लोकांच्या मनामध्ये घर करून गेली त्यामुळे त्यांना २०१६ मध्ये मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली.
  • त्याचबरोबर २०१८ मध्ये त्यांनी धडक या हिंदी चित्रपटासाठी देखील संगीत दिले.

अजय अतुल यांची गाणी – Ajay Atul Songs

अ.    क्र.गाणी
१.       झिंगाट ( सैराट )
२.       सैराट झाल जी ( सैराट )
३.       नटरंग उभा ( नटरंग )
४.       खेळ मांडला ( नटरंग )
५.       वाट दिसू दे ( जावू द्या ना बाळासाहेब )
६.       मोरया ( उलाढाल )
७.       अपसरा आली ( नटरंग )
८.       कोंबडी पळाली ( जत्रा )
९.       साथिया (सिंघम )
१०.   सिंघम (सिंघम )
११.   ललाटी भंडार ( जोगवा )
१२.   जीव रंगला ( जोगवा )
१३.   ये गो ये ये मैना ( जत्रा )
१४.   माऊली माऊली ( लय भारी )
१५.   मेरा नाम मॅरी ( ब्रदर्स )
१६.   यारे निवू परिमल ( मनसु मल्लिगे )
१७.   मर्द मराठी ( पानीपत )
१८.   देवा श्री गणेशा ( अग्निपथ )
१९.   मन मी शिवा ( पानीपत )
२०.   धडक ( धडक )
२१.   पेह्ली बार ( धडक )
२२.   दुर्गे दुर्गट भारी ( अगं बाई अरेच्या )
२३.   मल्हार वारी ( अगं बाई अरेच्या )
२४.   चांग भल चांग भल ( तुझ्या माझ्या संसाराल आणि काय हवं )
२५.   अभी मुज्मे कही बाकी थोडीसी हे जिंदगी (अग्निपथ )

 आम्ही दिलेल्या ajay atul information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर संगीतकार अजय अतुल यांची माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या ajay atul biography in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information of ajay atul in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये ajay atul songs Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!