अकबर ची माहिती Akbar Information in Marathi

akbar information in marathi अकबर ची माहिती, आपल्याला माहित आहे कि एकेकाळी भारतामध्ये देखील अनेक ठिकाणी मुघल साम्राज्याचे राज्य होते आणि अबुल फतह जलाल-उद-दिन मुहम्मद अकबर हा मुघल काळातील सर्वात बलाढ्य आणि शूर सम्राटांच्या पैकी एक होता. मुघल साम्राज्याचा मोठ्या प्रमाणात विस्तार करण्यासाठी त्याने एक मोठी आणि महत्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. अकबर हा मुघल साम्राज्याचा एक महत्वाचा आणि तिसरा सम्राट होता ज्याच्या वडिलांचे नाव हुमायून आणि आईचे नाव हमीदा बानो बेगम असे होते आणि अकबराचा जन्म हा १४ फेब्रुवारी १५४२ मध्ये सध्या पाकीस्थान या देशामध्ये असलेल्या सिंध प्रांतातील अमरकोट या ठिकाणी झाला.

हुमायून हे अकबराचे वडील होते आणि त्यांनी फक्त एक वर्ष साम्राज्यावर राज्य केले आणि ते मरण पावले त्यानंतर १३ वर्षाचा अकबराचा राज्याभिषेक सोहळा पार पडला आणि त्यांला साम्राज्याच्या सिंहासनावर बसवले आणि हा सोहळा पंजाबमधील कलानौर या ठिकाणी पार पडला होता.

akbar information in marathi
akbar information in marathi

अकबर ची माहिती – Akbar Information in Marathi

पूर्ण नावअबुल फतह जलाल-उद-दिन मुहम्मद अकबर
ओळखमुघल साम्राज्याचा तिसरा राज्यकर्ता
जन्म१४ फेब्रुवारी १५४२
जन्म ठिकाणसध्या पाकीस्थान या देशामध्ये असलेल्या सिंध प्रांतातील अमरकोट या ठिकाणी
पालकवडिलांचे नाव हुमायून आणि आईचे नाव हमीदा बानो बेगम

अकबराची राजवट आणि कामगिरी

 • ज्यावेळी अकबर १३ वर्षाचे असताना ते साम्राज्याच्या सिंहासनावर बसले आणि त्यावेळी पासून अकबराची राजवट होती.
 • अकबराने तो सम्राट असताना साम्राज्याची मोठ्या प्रमाणात सुधारणा केली म्हणजेच त्याच्या साम्राज्याची प्रगत संघटना स्थापन केली.
 • अकबराने सर्वप्रथम जनरल हेमूच्या सैन्याचा सामना केला कारण तो अफगाण सैन्याचा एक माजी सैनिक होता  आणि त्याने पूर्वीच्या मुघल सामाराज्याचा संपूर्ण पूर्वेवर कब्जा केला होता आणि त्यावेळी भारताचे उत्तर हे दोन भागामध्ये विभागले होते पश्चिमेस मुघल आणि पूर्वेस अफगान.
 • १०००० मुघल सैन्यांच्यामध्ये आणि अफगाणा सैन्यांच्यामध्ये ५ नोव्हेंबर १५५६ मध्ये पानिपतचे युध्द झाले आणि यामध्ये अकबराचा विजय झाला.
 • ज्यावेळी अकबर अफगाण सैन्यावर विजय मिळवून दिल्लीमध्ये परतला परंतु त्याला लगेच सिंकंदर शहा पुरीला अटक करण्यासाठी पंजाबला परत जावे लागले आणि मनकोट जिल्ह्याचा वेढा पूर्ण झाल्यानंतर त्याला त्वरितच अटक करण्यात आली बंगाल मध्ये हद्दपार करण्यात आली.
 • त्याचबरोबर पानिपतच्या दुसऱ्या लढाई मध्ये विजय हा मुघल साम्राज्याच्या पुनर्रचनेचा खरा आरंभबिंदू होता आणि येथूनच अकबराने काबुलपासून बंगाल पर्यंतच्या साम्राज्याची सुधारणा करून आपल्या आजोबांनी जिंकलेले सर्व प्रदेश परत मिळवले आणि हे प्रदेश मिळवण्यासाठी त्याला ८ वर्ष लागली.
 • तसेच त्याने आपल्या राज्याच्या सीमेवर विजय मिळवण्याचा देखील प्रयत्न सुरु केला.
 • १५७३ मध्ये अकबराने गौजेरात आणि त्यानंतर १५७६ मध्ये बंगाल प्रांतावर हल्ला केला आणि पूर्वेकडच्या सर्व प्रांत आपल्या ताब्यात घेतला.
 • त्याच बरोबर त्याचा भाऊ काबुल या ठिकाणी राज्य करत होता परंतु तो मरण पावल्यानंतर काबुल देखील त्याच्याच वर्चस्वाखाली आले.
 • त्याने आग्रा सोडल्यानंतर त्याने फतेहपुर सिक्री हे ठिकाण तयार केले आणि फतेहपुर सिक्री हे एक असे ठिकाण आहे जे अकबराने गुजरात जिंकल्यानंतर आपली राजधानी बनवली होती आणि तो काळ १५६९ ते १५७० होता आणि म्हणून या ठिकाणाला विजयाचे शहर म्हणून देखील ओळखले जाते. फतेहपुर सिक्री या ठिकाणी अकबराने अनेक ऐतिहासिक इमारती बांधल्या आहेत आणि त्या ठिकाणी आपली राजधानी बनवली आहे.
 • अकबराच्या अखेरच्या कारकीर्दीमध्ये मुख्य म्हणजे त्याचा मुलगा सलीम याच्याशी असलेल्या समस्या. त्यांच्या वडिलांचा नियुक्त उत्तराधिकारी त्याला अपेक्षेपेक्षा अधिक लवकर स्वतंत्र व्हायचे होते. तो अलाहबाद मध्ये स्थायिक झाला आणि त्याने स्वताला स्वातंत्र्य राजा म्हणून घोषित केले आणि आपल्या वडिलांच्या सीमेवर असलेल्या प्रांताविरुद्ध सैन्याची स्थापना केली.

अकबराविषयी काही विशेष आणि मनोरंजक तथ्ये – facts

 • ज्यावेळी त्यांचे वडील हुमायून हे मरण पावले त्यानंतर अकबराला बादशाह बनवण्यात आले होते आणि त्यावेळी तो फक्त १३ वर्षाचा होता.
 • अकबर हा उदारमतवादी वृत्तीमुळे त्याला इतर राज्ये सहजपणे जिंकण्यास मदत झाली आणि त्यामुळे तो इतर राज्यांना आपल्या साम्राज्यामध्ये अणु शकला.
 • अबुल फतह जलाल-उद-दिन मुहम्मद अकबर असे अकबराचे पूर्ण नाव आहे.
 • अकबर मुघल सिंहासनावर आरूढ होण्यापूर्वी वयाच्या १४ व्या वर्षी आपल्या मामाची मुलगी रुकैया सुलतान बेगमशी विवाह केला.
 • अकबराचा जन्म हा १४ फेब्रुवारी १५४२ मध्ये सध्या पाकीस्थान या देशामध्ये असलेल्या सिंध प्रांतातील अमरकोट या ठिकाणी झाला आणि त्यांच्या वडिलांचे नाव हुमायून आणि आईचे नाव हमीदा बानो बेगम असे होते.
 • अकबराने मनसबदारी नावाच्या व्यवस्थेद्वारे आपले सैन्य तसेच अभिजात वर्ग संघटीत केले. मनसबदरांची ३३ वर्गात विभागणी करण्यात आली होती. शीर्ष तीन कमांडिंग रँक हे ७००० ते १०००० पर्यंत होता.
 • त्याने त्याच्या राजवटीमध्ये अनेक ऐतिहासिक इमारती आणि स्मारके बांधली आणि जसे कि आग्रा किल्ला १५६५ मध्ये बांधला तसेच अलाहबाद किल्ला १५८३ मध्ये बांधला, लाहोर पॅलेस हा १५७२ मध्ये बांधला आणि तसेच त्याने फतेहपूर सिक्री या ठिकाणी देखील अनेक ऐतिहासिक इमारती आणि स्मारके बांधली.
 • अकबराला युद्धाची सर्व तंत्रे शिक्षण्यात रस होता आणि काही प्रमाणात वाचन लेखनाची देखील आवड होती.
 • अकबराने त्याच्या राजवाड्यामध्ये जोधासाठी एक मंदिर बांधले तरीही त्याला खूप विरोध झाला.
 • अकबराकडे अनेक प्रतिभावान आणि महान लोकांसह एक उत्कृष्ट संसद होती आणि त्याच्या संसदेमध्ये अब्दुल फजल, अब्दुल रहीम, राजा मानसिंग, बिरबल, हमीम हुमण, फैजी, तानसेन, शेख मुबारक आणि तोडरमल हे ९ व्यक्ती प्रमुख होते.
 • दिवाण ए आम मध्ये अकबराने सर्वसामान्यांशी बोलून त्यांच्या व्यथा ऐकल्या.
 • अकबराने आपल्या साम्राज्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी अत्यंत कार्यक्षम नोकरशाही व्यवस्था निर्माण केली केली त्याचबरोबर छोट्या प्रदेशांची देखरेख करण्यासाठी त्याने मणसबर नेमले.

 अकबराचा मृत्यू – death

अकबराचा मृत्यू २७ ऑक्टोबर १६०५ मध्ये आग्रा या ठिकाणी झाला आणि आग्र्याच्या वायव्येकडील सिकंदरा येथे पांढऱ्या संगमरवराच्या समाधी परंपरेत त्याचे दफन करण्यात आले आहे.

आम्ही दिलेल्या akbar information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर अकबर ची माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या akbar birbal information in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि information about akbar in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!