अमरवेल औषधी वनस्पती माहिती Amarvel Information in Marathi

Amarvel information in Marathi अमरवेल ऐकून माहित असेलच! कदाचित नसेलही पण त्याला पाहिले कि नक्की ओळखणार अरे हे तर आपण पहिलेलेच आहे. इंग्रजी मध्ये याला Cuscuta (Dodder Plant) असे म्हणतात. चला तर मग या लेखामध्ये अमरवेली विषयी थोडक्यात जाणून घेऊयात.

amarvel-information-in-marathi
अमरवेल संपूर्ण माहिती

अमरवेल औषधी वनस्पती माहिती (Cuscuta Amarvel information in Marathi)

“अमरवेल” या वनस्पतीच्या च्या नावावरुनच आपल्याला कळते कि हा एक वेलीचा प्रकार आहे. पण हि वनस्पती एक परावलंबी वनस्पती आहे, जी दुसऱ्या वनस्पती वर अवलंबून असते. म्हणजेच हि वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः तयार करीत नाही.  

अमरवेलीचे वर्णन (Description Of Cuscuta Plant)

अमरवेल हि नाजूक अशी दिसणारी पिवळसर रंगाची परावलंबी वनस्पती आहे. अमरवेलीच्या फांद्या लांब पातळ व गुळगुळीत असतात. या वनस्पतीचा रंग पिवळसर किंवा नारंगी असा असतो. पिवळा रंगच का ? कारण या वनस्पतीला पाने नसतातच. हो बरोबर आहे, हि परावलंबी असल्यामुळे अमरवेलीला पाने मुळीच नसतात. ज्या वनस्पतीवर हि अमरवेल येते त्या वनस्पतीला हि गुंडाळून टाकण्याचे काम करते, म्हणजेच यजमान वनस्पतीच्या फांद्यांना ती घेऱ्या घालते व स्वतः पसरत जाते. या अमरवेलीची वाढ अगदी झपाट्याने होत असते. कारण यजमान वनस्पतीमधील पोस्टीक खाद्य टी स्वतः खेचून घेत असते.

कालांतराने हि जशी मोठी होत जाते तसतसे हि वनस्पती आपल्या फांद्या सर्वत्र पसरवते. बघता बघता यजमान वनस्पतीला अगदी पांघरून घातल्यासारखी अमरवेल पसरते. याचा अर्थ असा कि अमरवेल कोणत्याही यजमान वनस्पतीवर आली कि त्या वनस्पतीची वाढ खुटते. हि एक विद्वंसक लता आहे.

अमरवेलीची फुले आणि फळे (Fruits Of Amarvel)

हो वरील विधान बरोबर आहे, अमरवेल हि परावलंबी असली तरीही या वनस्पतीला फळे येतात. साधारणता उन्हाळ्याच्या मध्यापासून ते शरद ऋतूमध्ये या वनस्पतीला छोटी छोटी फळे येतात. ती फळे पिवळसर रंगाची असून वाटण्याच्या आकाराची असतात. फुले पिवळसर किंवा गुलाबी रंगाची असतात, त्यातून सौम्य सुगंध येत असतो.

अमरवेलीचा वापर (Uses Of Amarvel)

हि घातक अशी वनस्पती आहे. ती यजमान वनस्पतीला नास्त नेबूत करण्याचे काम करते. अमरवेलीचा व बियान्यांचा वापर औषध म्हणून देखील केला जातो. याच्या रसात अल्कॉयड्स व कुस्कुटियन (Cuscutien) असते व त्याची चव कडू असते. याचा वापर पित्तनाशक, खोकला तसेच त्वचेवरच्या खाजेवरहि केला जातो.

Amarvel information in Marathi हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच हा लेख कसा वाटला व अजून काही अमरवेलीविषयी राहिले असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद.

आम्ही दिलेल्या माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू. अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!