अरुणिमा सिन्हा यांची माहिती Arunima Sinha Information in Marathi

Arunima Sinha Information in Marathi अरुणिमा सिन्हा यांची माहिती दिव्यांगजन लोकांना आशेचा किरण दाखवणारी अरुणिमा सिन्हा या जगातील सर्वोच्च शिखर मानला जाणारा माऊंट एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली महिला ठरली आहे. अरुणिमा सिन्हा यांच्या कर्तृत्ववान कामगिरीमुळे अपंग लोकांना प्रेरणा मिळाली आहे. प्रत्येक वेळी अपंग लोकांनवर‌ ते निरुपयोगी आहेत असे आरोप लावून त्यांची निंदा केली जाते. परंतु, अरुणिमा सिन्हा यांनी अशा लोकांचा म्हणं‌ चुकीचं ठरवून दिलं आहे. एक भारतीय म्हणून अरुणिमा सिन्हा यांच्या या कार्याचा फार अभिमान वाटतो. आजच्या लेखामध्ये आपण अरुणिमा सिन्हा यांचा माउंट एवरेस्ट प्रवास चढतानाचा प्रवास व त्यांच्या जीवनाबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत.

arunima sinha information in marathi
arunima sinha information in marathi

अरुणिमा सिन्हा यांची माहिती – Arunima Sinha Information in Marathi

पूर्ण नाव अरुणिमा सिन्हा
जन्म२० जुलै १९८८
जन्म गावउत्तर प्रदेशातील आंबेडकर नगर
राष्ट्रीयत्व भारतीय
ओळख जगातील सर्वोच्च शिखर मानला जाणारा माऊंट एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली महिला
राष्ट्रीय पुरस्कारपद्मश्री पुरस्कार

जन्म

अरुणिमा सिन्हा यांचा जन्म भारतातील उत्तर प्रदेश मधला आहे. २० जुलै १९८८ रोजी अरुणिमा सिन्हा यांचा जन्म उत्तर प्रदेशातील आंबेडकर नगर मध्ये झाला. आंबेडकर नगर हा उत्तर प्रदेशातील एक छोटासा जिल्हा आहे. मध्यमवर्गीय घरामध्ये अरुणिमा सिन्हा यांचं बालपण गेलं. अरुणिमाच कुटुंब साधं व गरीब होतं. तिचे वडील भारतीय सैन्यात अभियंता म्हणून सेवा देत होते तर, तिची आई दवाखान्या मध्ये आरोग्य विभागात सुपरवाइजरच काम करायची.

अरुणिमाला दोन भाऊ-बहिण आहेत. एक मोठी ताई आणि एक छोटा भाऊ. अरुणिमा ही तिच्या आईवडिलांची दुसरी अपत्य आहे. अरुणिमा नुकतीच तीन वर्षांची झाली होती आणि तिच्या वडिलांचे दुःखद निधन झाले. कुटुंबाची परिस्थिती आणखीनच बेताची झाली आणि मग पुढे अरुणिमाच्या कुटुंबीयांचे पालनपोषण तिच्या बहिणीच्या सासरच्यांनी केलं.

शिक्षण

अरुणिमाला लहानपणापासूनच क्रीडा क्षेत्राची आवड होती. अरुणिमा सिन्हा नॅशनल वॉलीबॉल प्लेयर देखील होऊन गेल्या आहेत. अरुणिमाने तिचं प्राथमिक शिक्षण गव्हर्मेंट गर्ल्स इंटर कॉलेजमधून पूर्ण केलं. अरुणिमा यांनी महाविद्यालयीन शिक्षण नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ मौंटेनीरिंग येथून पूर्ण केलं. समाजशास्त्र या विषयांमध्ये अरुणिमा सिन्हा यांनी एम.ए ही पदवी मिळवली आहे.

नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ मौंटेनीरिंग अरुणिमा सिन्हा यांनी गिर्यारोहणाचा कोर्स देखील केला आहे. स्ट्रथक्लाइड विद्यापीठांमधून अरुणिमा सिन्हा यांनी डॉक्टरेट ही पदवी संपादन केली. लहानपणापासून जरी अरुणिमा यांना क्रीडा क्षेत्राची आवड असली तरी क्रीडा क्षेत्रामध्ये करिअर व्हावं असं त्यांच्या ध्यानी मनी देखील नव्हतं.

एका चित्तथरारक प्रसंगांमधून अरुणिमा यांना मिळालेली प्रेरणा

अरुणिमा सिन्हा या तेवीस वर्षांच्या असताना त्यांच्या सोबत एक भयानक प्रसंग घडला. ज्यामुळे त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली आणि त्यांच्यासारख्या बऱ्याच लोकांना प्रेरणा. अरुणिमा सिन्हा या नोकरीच्या इंटरव्यू साठी निघाल्या होत्या तो दिवस होता १२ एप्रिल २०११. लखनऊ वरून दिल्लीला येण्यासाठी त्या एक्स्प्रेसच्या जनरल कोच मध्ये चढल्या.

रात्रीच्या वेळी काही वंगाळ तरुण पोरं चाकु सुरे घेऊन या जनरल कोच मध्ये चढले जिथे अरुणिमा सिन्हा देखील होत्या. सगळ्यांना धमकावू लागले आणि त्यांच्या कडे असलेलं मौल्यवान सामान मागू लागले. कोपऱ्यात एका सीटवर बसलेल्या अरुणिमा सिन्हा यांच्या गळ्यातली चैन बघून त्यातील एक तरुण अरुणिमा सिन्हा यांच्याकडे गेला आणि धमकावून मागू लागला खरंतर हिसकावून घेऊ लागला.

परंतु, अरुणिमा सिन्हा यांनी सोन्याची चैन देण्यास नकार केला. तर त्याच्या बाकीच्या साथीदारांनी येऊन एकाने अरुणिमा सिन्हा यांच्या पोटात लाथ घातली तर एकाने त्यांचा गळा पकडला आणि तिसर्‍याने त्यांच्या गळ्यातून सोन्याची चैन खेचून घेतली. बाकीच्या प्रवाशांनी या गुंडांना आपापल्या गोष्टी लगेच देऊन टाकल्या परंतु अरुणिमा सिन्हा यांनी विरोध केल्यामुळे या गुंडांनी अरुणिमा सिन्हा यांना भर चालू रेल्वे गाडीमधून बाहेर ढकलून दिले.

अरुणिमा सिन्हा यांना या प्रसंगामुळे बऱ्याच जखमा झाल्या. त्यांच्या कमरेपासून पायाचे हाड मोडले गेले. याशिवाय चेहऱ्यावर बऱ्याच खाणा खुणा होत्या त्यांचे अर्ध अंग एका रेल्वे रुळावर तक दुसरं बाजूच्या रुळावर होतं. रात्रभर अरुणिमा सिन्हा त्याच जखमी अवस्थेत रुळावर पडून होती. रुळावरून बऱ्याच रेल्वे गाड्या देखील ये जा करत होत्या बराच वेळ अरुणिमा स्वतःच्या जीवनाशी संघर्ष करत होती.

परंतु थोड्यावेळाने ती बेशुद्ध पडली. सकाळी तिथून जाणाऱ्या एका गृहस्थाने अरुणिमा सिन्हा यांना अतिशय दयनीय अवस्थेत पडलेलं बघितलं आणि त्याने लगेचच अरुणिमा सिन्हा यांना जवळच्या प्राथमिक दवाखान्यांमध्ये नेलं. अरुणिमा सिन्हा यांचा एक पाय कापण्यात आला. आणि त्यांना एक कृत्रिम पाय लावण्यात आला.

माऊंट एव्हरेस्टची सर

अरुणिमा सिन्हा यांच्या सोबत घडलेल्या या भयानक प्रसंगानंतर देखील अरुणिमा सिन्हा यांनी हार मानली नाही. आणि त्यांनी माऊंट एव्हरेस्टची सर करण्याचा निर्णय घेतला. या आधी देखील अरुणिमा सिन्हा यांनी किलिमंजारो, एल्ब्रस, कोसीउस्झाको, एकोनगुवा, कारस्टेनझ पायरामिड ही शिखरं सर केली आहेत.

माऊंट एव्हरेस्ट शिखर सर करण्यासाठी अरुणिमा सिन्हा यांनी बचेंद्री पाल यांची मदत घेण्याचा निर्णय घेतला. बचेंदी् पाल या पहिल्या भारतीय स्त्री माउंट एव्हरेस्टवर आहेत. खरं तर एका कुत्रिम पायावर माऊंट एव्हरेस्ट सर करण्याचा अरुणिमा सिन्हा याचा निर्णय कौतुकास्पद आहे. त्यांच्यासोबत जी काय घटना घडली त्याच्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा बळ एकवटून हा निर्णय घेतला आहे. यासाठी खरंच कौतुक झालं पाहिजे.

माउंट एव्हरेस्ट शिखर सर करण्यासाठी अरुणिमा सिन्हा यांना ५२ दिवस लागले. २१ मे २०१३ रोजी अरुणिमा सिन्हा सकाळी दहा वाजून ५५ मिनिटांनी जगातील सर्वात उंच शिखरावर पोहोचल्या होत्या. हा प्रवास अरुणिमा सिन्हा यांच्यासाठी खूपच खडतर होता. कारण ज्यावेळी अरुणिमा सिन्हा यांच्यासोबत ट्रेन एक्सीडेंट झाला त्यावेळी अरुणिमा सिन्हा यांच्या पायावरून जवळपास ४९ रेल्वे गाड्या गेल्या होत्या. त्यानंतर त्यांना कृत्रिम पाय बसवून घ्यावा लागला होता.

माउंट एवरेस्ट चढताना त्यांचा हा कृत्रिम पाय देखील निकामी होतो की काय याची भीती त्यांना होती परंतु सुदैवाने असं काहीच घडलं नाही आणि त्यांनी यशस्वीरीत्या माऊंट एव्हरेस्ट ची सर केली. उंच शिखर चढण्यासाठी अरुणिमा सिन्हा यांनी नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ मौंटेनीरिंग प्रशिक्षण घेतलं होतं. शिवाय मार्गदर्शनासाठी त्यांच्यासोबत बेचेंद्री पाल देखील होत्या.

अरुणिमा सिन्हा यांची ही जिद्द सर्वांना चकित करून टाकणारी आहे. आपण सगळ्यांनी अनेक मोटिवेशनल स्टोरीज ऐकल्या असतील परंतु अरुणिमा सिन्हा यांनी त्यांच्या या जीवनाच्या कथेतून दिलेली प्रेरणा खरंच प्रोत्साहित करणारी आहे. आज आपला भारत देश आधुनिक रित्या भरपूर पुढे गेले आहे. प

रंतु आपल्या समाजामध्ये आज बरेच असे लोक आहेत जे अशी मानसिकता बाळगतात की स्त्रिया या पुरुषांची बरोबरी करू शकत नाहीत किंवा स्त्रिया पुरुषांपेक्षा नेहमीच मागे असतात. परंतु अरुणिमा सिन्हा यांनी ही अंधश्रद्धा मोडून जगासमोर एक नवीन उदाहरण ठेवलं आहे की स्त्रीने जर ठरवलं तर ती काहीही करू शकते.

पुरस्कार

मनात असलं की देव देखील भेटतो‌ म्हणतात ना तसंच काहीसं अरुणिमा सिन्हा यांच्या बाबतीमध्ये घडलं त्यांचा प्रवास संघर्षमय होता. पण शेवटी त्यांना यश मिळालं. अरुणिमा सिन्हा यांच्या या कर्तृत्ववान कामगिरीसाठी भारत सरकारद्वारे २०१५ रोजी अरुणिमा सिन्हा यांना भारतातील सर्वोच्च पुरस्कार पद्मश्री या पुरस्काराचे मानकरी ठरवले.

शिखर चढाई या खेळासाठी सुद्धा एक स्वतंत्र पुरस्कार प्रदान करण्यात येतो. अरुणिमा सिन्हा यांना अशाच सर्वोच्च तेनसिंग नोर्गे पुरस्कार प्रदान करण्यात येऊन त्यांचा गौरव करण्यात आला. अरुनिमा सिन्हा यांचं प्रोफेशनल लाईफ जरा बाजूला ठेवलं तर अरुणिमा सिन्हा यांना सामाजिक बांधिलकी देखील आहे त्यांनी पुरस्कारा तर्फे मिळणारे पैसे सामाजिक कार्यासाठी दान केले.

तर एक गरीब आणि अपंग लोकांसाठी फ्री मध्ये स्पोर्टस अकॅडमी सुरू केली. बरीच लोकं अशा काही प्रसंगानंतर हार मानतात आशा गमावून बसतात परंतु अरुणिमा सिन्हा त्यांच्यातील नव्हत्या. परिस्थिती कितीही वाईट किंवा कट्टर असली तरी जर मनात इच्छा असेल तर यशाचा मार्ग नक्कीच मिळतो. हे अरुणिमा सिन्हा यांनी संपूर्ण जगाला दाखवून दिलं. अरुणिमा सिन्हा यांचं कौतुक संपूर्ण भारत देशाला आहे आणि त्यांचा अभिमान देखील आहे.

पुस्तके – Arunima Sinha Book in Marathi

“When going gets tough tough gets going” हे अरुणिमा सिन्हा यांनी स्वतः लेखन केलेलं पुस्तक आहे. हे पुस्तक प्रकाशित करण्यासाठी खुद्द नरेंद्र मोदी आले होते. अरुणिमा सिन्हा यांनी लिहिलेले हे पुस्तक एकदा तरी नक्की वाचा. अरुणिमा सिन्हा यांचा जीवन प्रवास खरंच स्फूर्तिदायक आहे

आम्ही दिलेल्या arunima sinha information in marathi language माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर अरुणिमा सिन्हा यांची माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या arunima sinha wikipedia in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information about arunima sinha in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये arunima sinha biography in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!