अ‍ॅट्रॉसिटी कायदा म्हणजे काय Atrocity Act in Marathi

Atrocity Act in Marathi – Atrocity Meaning in Marathi अ‍ॅट्रॉसिटी कायदा माहिती आज आपण या लेखामध्ये अ‍ॅट्रॉसिटी कायदा (atrocity act) या विषयावर माहिती घेणार आहोत म्हणजेच अ‍ॅट्रॉसिटी कायदा काय आहे त्याचा उपयोग कशासाठी केला जातो आणि तो वापरल्यामुळे कोणते फायदे होतात अश्या या कायद्याबद्दल सर्व माहिती माहिती घेवूयात. आपण ज्यावेळी या कायद्याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो त्यावेळी आपल्या मनामध्ये येणारा पहिला प्रश्न म्हणजे अ‍ॅट्रॉसिटी कायदा म्हणजे काय आणि तर अ‍ॅट्रॉसिटी कायदा म्हणजे हा कायदा दारिद्र्य रेषे खालील आणि आदिवासी गटातील लोकांच्यासाठी ह्या कायद्याची सुरुवात करण्यात आली.

आपल्या देशामध्ये अनेक गोष्टींना बंधन घालण्यासाठी, संरक्षण देण्यासाठी, नियमांच्या चौकटीमध्ये घालण्यासाठी तसेच न्याय मिळवून देण्यासाठी लोकांच्यासाठी अनेक कायदे बनवलेले असतात आणि त्यामधील हा कायदा देखील आहे.

अ‍ॅट्रॉसिटी कायदा (atrocity act) हा अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांच्यावर होणाऱ्या अत्याचारावर प्रतिबंध घालण्यासाठी बनवण्यात आलेला एक महत्वाचा कायदा आहे आणि हा अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी लागू होतो. या कायद्यामध्ये असे आहे कि हा कायदा मुख्य अनुसूचित जाती जमातींच्यावर कोणीही अन्याय करू शकत नाही.

म्हणजे या कायद्याच्या कलामांच्यानुसार त्यांना मारहाण करणे किंवा इजा करणे तसेच त्यांचा सतत अपमान करणे, तसेच त्यांना अयोग्य पदार्थ खाण्यासाठी जबरदस्ती करणे, नग्न करून धिंड काढणे, महिलांचा लैंगिक छळ करणे, अनुसूचित जाती जमातीतील लोकांना त्रास देणे किंवा त्यांच्यावर सतत अन्याय करणे, भीती दाखवून मतदान करण्यासाठी भाग पडणे अश्या सर्व गोष्टींच्यासाठी अ‍ॅट्रॉसिटी कायदा ( atrocity act ) हा लागू होतो.

अ‍ॅट्रॉसिटी कायदा ( atrocity act ) हा भारतामध्ये खूप पूर्वीच्या काळापासून आहे म्हणजेच हा खूप जुना कायदा आहे. सध्या जरी अनेक वेगवेगळ्या प्रकाचे कायदे जन्माला आले असले तरी हा कायदा खूप जुना कायदा आहे जो भारताच्या संसदेने इ. स १९८९ मध्ये सुरु झाला आणि हा अनुसूचित जाती आणि जमातींच्यासाठी एक संरक्षण कायदा होता. चला तर या कायद्याबद्दल आपण आणखीन जाणून घेवूयात.

atrocity act in marathi
atrocity act in marathi

अ‍ॅट्रॉसिटी कायदा माहिती – Atrocity Act in Marathi

कायद्याचे नावअ‍ॅट्रॉसिटी कायदा ( atrocity act )
केव्हा सुरुवात केलीइ. स १९८९
कोणी सुरु केलाभारत संसद
कोणासाठी सुरु केलाअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती

अ‍ॅट्रॉसिटी कायदा म्हणजे काय – atrocity meaning in marathi

आपल्या देशामध्ये अनेक गोष्टींना बंधन घालण्यासाठी, संरक्षण देण्यासाठी, नियमांच्या चौकटीमध्ये घालण्यासाठी तसेच न्याय मिळवून देण्यासाठी लोकांच्यासाठी अनेक कायदे बनवलेले असतात आणि त्यामधील अ‍ॅट्रॉसिटी कायदा ( atrocity act ) हा अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांच्यावर होणाऱ्या अत्याचारावर प्रतिबंध घालण्यासाठी बनवण्यात आलेला एक महत्वाचा कायदा आहे आणि हा अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी लागू होतो.

अ‍ॅट्रॉसिटी कायद्याची वैशिष्ठ्ये 

 • अ‍ॅट्रॉसिटी कायदा ( atrocity act ) हा अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्यासाठी बनवण्यात आला आहे.
 • या कायद्या मार्फत अनुसूचित जाती आणि जमातींच्यावर होणाऱ्या अन्यायावर प्रतिबंध घालण्यासाठी हा कायदा निर्माण केला.
 • अ‍ॅट्रॉसिटी कायद्यामुळे अनुसूचित जाती आणि जमातींना संरक्षण मिळते.
 • अ‍ॅट्रॉसिटी कायदा ( atrocity act ) हा खूप जुना कायदा आहे.

अ‍ॅट्रॉसिटी कायद्यामध्ये समाविष्ट असणारी कलमे – गुन्हे 

अ‍ॅट्रॉसिटी हा कायदाच मुळात गरीब किंवा अनुसूचित जाती आणि जमातींच्यावर होणारा अन्याय थांबवण्यासाठी केला जातो आणि म्हणूनच या कायद्यानुसार काही कृत्ये हि कायद्याने गुन्हा ठरवलेली आहेत. चला तर आता आपण अ‍ॅट्रॉसिटी कायद्यामध्ये समाविष्ट असणारी कलमे पाहूयात.

 • कलम ३( १ )२ नुसार अनुसूचित जाती जमातीच्या लोकांना त्रास देणे किंवा त्यांचा सतत आपण करणे हे अ‍ॅट्रॉसिटी कायद्याच्या अंतर्गत येते.
 • अनुसूचित जाती आणि जमातींच्या लोकांना अयोग्य पदार्थ खाण्यासाठी आणि पिण्यासाठी जबरदस्ती करणे हा कायद्याने गुन्हा मनाला जातो आणि या कायद्या अंतर्गत कलम ३( १ )१ मध्ये तरतूद आहे ज्यामुळे अश्या व्यक्तीला शिक्षा होऊ शकते.
 • कलम ३( १ )५ नुसार जर त्यांच्या कोणत्याही मालकीच्या जमिनीचा गैरवापर करणे तसेच त्यांच्या मालकीच्या जमिनीमध्ये किंवा पाणी वापरामध्ये अडथळा आणणे हे कायद्याने गुन्हा ठरवला जातो.
 • अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या लोकांना एखाद्या व्यक्तीने भीती दाखवून किंवा त्यांच्यावर कोणतेही दडपण आणून त्यांना मतदान करण्यास भाग पाडणे हा देखील कायद्याने गुन्हा आहे आणि या विषयी देखील या कायद्या अंतर्गत कलम ३( १ )७ मध्ये तरतूद आहे ज्यामुळे त्या संबंधित व्यक्तिला या गुन्ह्याबद्दल शिक्षा होऊ शकते.
 • आपल्या भारता देशामध्ये महिलांच्यासाठी देखील अनेक कायदे बनवण्यात आले आहेत आणि अ‍ॅट्रॉसिटी कायद्यामध्ये देखील काही तरतुदी महिलांच्यासाठी आहेत आणि कलम ३( १ ) ११ आणि १२ नुसार अनुक्रमे महिलांचा विनयभंग आणि महिलांच्यावर लैंगिक अत्याचार करणे हे कायद्याने गुन्हा मानले जाते आणि म्हणून या कायद्याच्या दोन कलमामध्ये अनुसूचित जाती आणि जमातींच्यासाठी देखील तरतूद आहे.
 • काही वेळा अनु सूचित जाती आणि जमातींच्या लोकांना त्याचे घर किंवा गाव सोडण्यासाठी भाग पाडले जाते आणि कलम ३( १ )१५ नुसार हा देखील गुन्हा मनाला जातो.
 • अनुसूचित जाती आणि जमातींच्यासाठी असणारे प्रार्थना स्थळ किंवा मग त्यांच्या राहण्याच्या निवासांना आग लावणे हा देखील या कायद्यानुसार गुन्हा आहे आणि त्या संबंधित व्यक्तीला यासाठी शिक्षा होऊ शकते कारण त्याने त्यांचे निवास्थान किंवा प्रार्थना स्थळ उद्वस्त केलेले असते.
 • अनुसूचित जाती आणि जमातीच्या लोकांच्यासाठी सार्वजनिक ठिकाणी प्रवेश न देणे ( कलम ३( १ )१४ आणि अनुसूचित जाती आणि जमातीच्या लोकांचा सार्वजनिक ठिकाणी अपमान करणे ( कलम ३( १ )१० नुसार गुन्हा मनाला जातो आणि या प्रकारचे कृत्य करणाऱ्या लोकांना या कायद्या अंतर्गत शिक्षा किंवा दंड दिला जातो.
 • कलम ३( १ )१३ नुसार अनुसूचित जाती आणि जमातींच्या लोकांचे पिण्याचे पाणी दुषित करणे या कायद्याने गुन्हा मनाला जातो.

कायद्यामध्ये केली जाणारी सरकारची महत्वाची कामे

 • या कायद्या अंतर्गत जातीय अत्याचारा विरुध्द खटले चालवण्यासाठी न्यायालयाची स्थापना केली जाते.
 • तसेच या कायद्या अंतर्गत केस लढण्यासाठी सरकारी वकिलाची नेमणूक केली जाते.
 • राज्यास्थारावरील मुख्यमंत्र्यांनी दक्षता समिती स्थापन केली पाहिजे.
 • वर्षभर या कायद्या अंतर्गत आलेल्या कारवायांचा अहवाल हा केंद्र सरकारला सादर केला पाहिजे.
 • तसेच अनुसूचित जाती आणि जमातींच्या लोकांना संरक्षण देण्यासाठी शस्त्र वापरण्याची परवानगी दिली जाते.
 • राज्य सरकारला सामुहिक दंड आकारण्याचा अधिकार या कायद्या अंतर्गत दिला जातो.
 • त्रास दिलेल्या किंवा पिडीत व्यक्तिला मदत करणे तसेच त्यांचे जीवन सुरळीत मार्गावर आणण्यासाठी प्रयत्न करणे.

आम्ही दिलेल्या atrocity act in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर अ‍ॅट्रॉसिटी कायदा म्हणजे काय माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या atrocity meaning in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि atrocity act in marathi pdf माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये atrocities meaning in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!