बाल कामगार कायदा Balkamgar Act in Marathi

balkamgar act in marathi – Child Labour Act in Marathi बालकामगार कायदा माहिती आज आपण या लेखामध्ये बालकामगार कायदा या विषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत. बालकामगार कायद्याला इंग्रजीमध्ये child labour act म्हणून ओळखले जाते आणि बालकामगार कायदा हा १९८६ मध्ये लागू केला आहे आणि म्हणून या कायद्याला बालकामगार कायदा १९८६ (child labour act 1986) म्हणून ओळखले जाते. हा कायदा सुरु करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे काही १४ वर्षाखालील मुले हि आपल्या बिकट परिस्थितीमुळे वेगवेगळ्या ठिकाणी काम करत होती पण हे त्यांचे शिकण्याचे वय आहे काम करण्याचे नाही हे लक्षात घेवून सरकारने १४ वर्षाखालील मुलांना काम करण्यापासून प्रतिबंध घालण्यासाठी सरकारने हा कायदा सुरु केला.

जर एखाद्या व्यक्तीने १४ वर्षाखालील मुलांना कामाला ठेवले तर त्यासाठी त्या व्यक्तीला १ वर्षाचा तुरुंगवास आणि दंडात्मक शिक्षा होण्याची शक्यता असते असे कडक नियम या कायद्यामध्ये घालून दिलेले आहेत. बालकामगार म्हणजे जी मुले १४ वर्ष वयाच्या खालील आहेत आणि ते आपल्या परिस्थितीमुळे एखाद्या कारखान्यात, एकाद्या हॉटेल मध्ये किंवा इतर कोणत्याही क्षेत्रामध्ये काम करत असतील तर अशा मुलांना भारतीय घटनेतील कलम २४ नुसार बाल कामगार मानले जाते.

तसेच अनेक वेळा लोकांना अनेक धोक्याच्या ठिकाणी काम करावे लागते आणि तसेच जर १४ वर्षाखालील मुले काम करत असतील तर या कायद्यानुसार बालकामगारांना धोक्याच्या ठिकाणी काम करण्यास मनाई आहे. चला तर खाली आपण या कायद्याविषयी आणखीन माहिती घेवूया.

balkamgar act in marathi
balkamgar act in marathi

बाल कामगार कायदा – Balkamgar Act in Marathi

कायद्याचे नावबालकामगार कायदा (child labour act)
केंव्हा लागू केलाहा कायदा १९८६ मध्ये लागू करण्यात आला
कोणी लागू केलाभारत सरकारने

बालकामगार म्हणजे काय ? – what is mean by child labour 

बालकामगार म्हणजे जी मुले १४ वर्ष वयाच्या खालील आहेत child labour act आणि ते आपल्या परिस्थितीमुळे एखाद्या कारखान्यात, एकाद्या हॉटेल मध्ये किंवा इतर कोणत्याही क्षेत्रामध्ये काम करत असतील तर अश्या मुलांना भारतीय घटनेतील कलम २४ नुसार बाल कामगार मानले जाते.

बालकामगार कायदा म्हणजे काय ? – what is mean by Child Labour Act in Marathi

बालकामगार कायदा हा असा कायदा आहे जो १४ वर्षाखालील मुलांना कोणत्याही ठिकाणी काम करण्यास प्रतिबद्ध घालण्यास मदत करतो. बालकामगार कायदा (child labour act) हा कायदा भारतामध्ये १९८६ मध्ये लागू केला.

बालकामगार समस्या कशामुळे निर्माण होते

१९८६ च्या काळामध्ये आपल्या देशामध्ये अनेक बालकामगार होते आणि हे पाहूनच सरकारने यांच्यावर एक कायदा तयार करण्याचे ठरवले आणि हा कायदा संपूर्ण देशामध्ये लागू केला. सध्या बालकामगारांची संख्या हि कमी असली तरी मुले किंवा मुली बालकामगार होण्याची काही कारणे आहेत ती आपन आता खाली पाहूया.

 • जर एखाद्या मुलाची परिस्थिती हि बिकट असेल किंवा तो गरीब असेल तर अश्या कुटुंबातील मुले बालकामगार होऊ शकतात.
 • एखाद्या मुलाच्या घरामध्ये अनेक कौटुंबिक समस्यांना सतत सामोरे जावे लागत असेल तर अश्या कुटुंबातील मुले देखील बालकामगार म्हणून काम करतात.
 • जर एखादे क्षेत्र किंवा कुटुंब हे शैक्षणिक रित्या मागासलेले असेल तर त्यांचे विचार इतके उच्च नसतात त्यामुळे ते आपल्या मुलांना कामावर पाठवतात त्यामुळे ते बालकामगार बनतात.

कायद्यामधील तरतुदी

 • जर १४ वर्षाखालील मुले हि आपल्या परिस्थितीमुळे काम करत असतील तर त्यांच्या कामाची वेळ हि दिवसा असावी आणि त्यांना रात्री १० ते ६ या वेळेमध्ये कामाला बोलावले नाही पाहिजे आणि या कायद्यानुसार बालकामगारांना रात्री १० ते ६ या वेळेमध्ये कामावर बोलावण्यासाठी मनाई आहे,
 • १९४८ च्या कंपनी कायद्यानुसार जर एखाद्या कंपनी मध्ये मुले आपल्या इच्छेने काम करत असतील तर १४ ते १८ या वयोगटातील बालकामगारांना ओळखपत्र दिले पाहिजे तसेच त्यांना दिवसामध्ये फक्त ४ तास काम लावले पाहिजे अशी तरतूद बालकामगार कायद्यामध्ये आहे.
 • जी मुले १४ ते १६ या वयोगटातील आहेत आणि ते आपल्या परिस्थितीमुळे काम करण्यास इच्छुक आहेत अश्या मुलांना कंपनी मध्ये सुरक्षित ठिकाणी काम दिले पाहिजे. या कायद्या नुसार १४ ते १६ या वयोगटातील मुलांना कंपनीमधील धोक्याच्या ठिकाणी काम करण्यास मनाई आहे.
 • या कायद्यानुसार १२ वार्हखालील मुलांना शेतामध्ये किंवा मळ्यामध्ये काम करण्यास मनाई आहे.
 • १९५२ च्या खान कामगार कायद्यानुसार १६ वर्षा खालील मुलांना खाणीमध्ये काम करण्यास मनाई आहे.

बालमजुरी थांबवण्यासाठी केले जाणारे उपाय

 • बालकामगार जर कमी करायचे असतील तर त्या संबधित कुटुंबाने त्याच्या लहान मुलाला कामावर पाठवून देणे थांबवले पाहिजे.
 • जर तुमच्या निदर्शनास बालमजुरीची किंवा बाल कामगारांची अशी कोणतीही केस आली तर तुम्ही तेथील जवळच्या पोलीस स्टेशन मध्ये लगेच तक्रार करा असे केल्यामुळे बालकामगार कमी होतील.
 • बालकामगार कमी करण्यासाठी सरकारने एकदम कडक नियम व कायदे बनवले पाहिजेत ज्यामुळे बालकामगार बनणार नाहीत.
 • गरीब पालकांनी आपल्या मुलांना कामावर पाठवून देण्याऐवजी त्यांचे शिक्षण कसे होईल या कडे लक्ष दिले पाहिजे.
 • जर तुम्ही एखाद्या जरी गरीब मुलाचा शिक्षणाचा खर्च उचलू शकत असाल तर ते खूप चांगले आहे कारण यामुळे बालमजुरी आणि बालकामगार निर्माण होणे थांबतील.

आम्ही दिलेल्या balkamgar act in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर बाल कामगार कायदा माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या Child Labour Act in Marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!