बीसीए म्हणजे काय? BCA Course Information in Marathi

Bca course information in marathi बीसीए म्हणजे काय?, सध्या शिक्षणाला खूप महत्व प्राप्त झाले आहे कारण सध्या चांगले शिक्षण घेतल्या शिवाय आपल्याला जगातील अनेक गोष्टी समजू शकत नाहीत. त्यामुळे अनेक विद्यार्थी हे आपल्या कश्या प्रकारे चांगले शिक्षण घेता येईल तसेच त्या शिक्षणामुळे आपल्याला करिअर बनवण्यासाठी कसा वापर होऊ शकतो ह्यांचा विचार करत असतात आणि सध्या चर्चेमध्ये असणारे कोर्स म्हणजे बी. सी. ए (BCA), बी. बी. ए (BBA), बी. सी. एस (BCS) असे अनेक कोर्स आहेत.

ते करून आपण पुढे मास्टर डिग्री करू शकतो आणि नंतर पी. एच. डी (PHD) देखील करू शकतो आणि आज आपण या लेखामध्ये यामधील एक कोर्स म्हणजे बी. सी. ए. विषयी माहिती घेणार आहोत म्हणजेच बी.सी.ए हा कोर्स काय आहे आणि हा कोर्स कोण कोण करू शकतात तसेच हा कोर्स करण्यासाठी काय काय पात्रता निकष आहेत तसेच या कोर्समध्ये कोणकोणते विषय असतात या सर्व गोष्टींच्या विषयी आता आपण जाणून घेणार आहोत.  

बी.सी.ए  हा एक कोर्स आहे जो १२ विज्ञान शाखेतून केलेल्या विद्यार्थ्यांना करता आणि हा आयटी (IT) क्षेत्रातील एक कोर्स असून याचे पूर्ण स्वरूप बॅचलर ऑफ कॉम्पुटर अॅप्लिकेशन (Bachelor of Computer Application) आणि हा कोर्स ३ वर्षाचा कोर्स असून यामध्ये एकूण ६ सेमिस्टर असतात.

सध्या आयटी (IT) क्षेत्र हे खूप झपाट्याने वाढत आहे त्यामुळे या क्षेत्रामध्ये नोकरीच्या संधी देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे त्यामुळे बी.सी.ए हा कोर्स तुमच्या करिअरसाठी एक उत्तम उपाय ठरू शकतो.

bca course information in marathi
bca course information in marathi

बीसीए म्हणजे काय – BCA Course Information in Marathi

कोर्सचे नावबी. सी. ए (BCA)
पूर्ण स्वरूपबॅचलर ऑफ कॉम्पुटर अॅप्लिकेशन (Bachelor of computer application)
कालावधी३ वर्ष
क्षेत्रआयटी (IT)
पात्रता१२ वी विज्ञान शाखेतून पूर्ण असावी.

बी.सी.ए कोर्स काय आहे – bca meaning in marathi

बी.सी.ए हा एक आयटी (IT) क्षेत्रातील कोर्स आहे आणि हा कोर्स ज्यांना संगणक क्षेत्रामध्ये रुची आहे ते लोक करू शकतात. या कोर्सचा कालावधी हा ३ वर्षाचा असून यामध्ये ६ सेमिस्टर आहेत आणि या कोर्समध्ये नेट्वर्किंग, डेटा स्ट्रक्चर, डेटाबेस तसेच सी (C) आणि जावा (JAVA) सारख्या कोर प्रोग्रामिंग भाषांचा समावेश असतो. या मधून शिक्षण घेणाऱ्या व्यक्तीला सॉफ्टवेअर डेव्हलोपर म्हणून कोणत्याही चांगल्या कंपनीमध्ये काम मिळू शकते.

बी.सी.ए चे पूर्ण स्वरूप काय आहे – bca full form in marathi

बी.सी.ए हा एक प्रकारचा आयटी क्षेत्रातील कोर्स आहे आणि यांचे पूर्ण स्वरूप बॅचलर ऑफ कॉम्पुटर अॅप्लिकेशन ( Bachelor of computer application ) असे आहे.

बी.सी.ए करण्यासाठी आवश्यक असणारे पात्रता निकष – eiligibility

कोणताही कोर्स करण्यासाठी त्या संबधित व्यक्तीला किंवा विद्यार्थ्याला त्या संबधित संस्थेने ठरवलेले पात्रता निकष पार पाडावे लागतात आणि तसेच बी.सी.ए हा कोर्स करण्यासाठी देखील त्या संबधीत विद्यार्थ्याला काही पात्रता निकष पार पाडावे लागतात ते कोणकोणते आहेत ते आपण पाहूया.

  • जर एखाद्या विद्यार्थ्याला बी.सी.ए हा कोर्स करायचा असल्यास त्या विद्यार्थ्याला १२ वी पर्यंतचे शिक्षण हे इंग्रजी विषयातून केले पाहिजे तसेच त्याचा १२ वी विज्ञान शाखेमध्ये शिकत असताना गणित हा विषय देखील मुख्य असला पाहिजे.
  • तसेच त्या विद्यार्थ्याने १२ वी हि विज्ञान शाखेतून मान्यताप्राप्त विद्यापीठातून तर केली पाहिजेच परंतु त्या विद्यार्थ्याने १२ वी मध्ये कमीत कमी ५० टक्के गुण तरी मिळवलेले असले पाहिजेत.
  • तो संबधित विद्यार्थी भारताचा नागरिक असला पाहिजे.
  • काही संस्था ह्या १२ वी मध्ये विद्यार्थ्याला मिळालेल्या गुणवत्तेच्या आधारे प्रवेश देतात.
  • तसेच विद्यार्थ्याना वैयक्तिक मुलाखती आणि विविध संस्था / विद्यापीठांच्याद्वारे घेतलेल्या लेखी परीक्षेच्या आधारे प्रवेश दिला जातो.
  • प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याचे वय हे कमीत कमी १७ वर्ष आणि जास्तीत जास्त २४ ते २५ इतके असावे.

बी.सी.ए कोर्स नंतर करिअर पर्याय – career

एखाद्या विद्यार्थ्याचा बी.सी.ए हा कोर्स पूर्ण झाल्यानंतर तो विद्यार्थी अनेक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करू शकतो आणि खाली आपण ती क्षेत्रे कोणकोणती आहेत ते पाहणार आहोत.

  • सॉफ्टवेअर डेव्हलोपर.
  • संगणक अभियंता.
  • संगणक प्रणाली विश्लेषक.
  • संगणक समर्थन विशेषज्ञ.
  • वित्त व्यवस्थापक.
  • विपणन व्यवस्थापक.
  • शिक्षक आणि व्याख्याता.
  • व्यवसाय सल्लागार.

बी. सी. ए कोर्समध्ये असणारा अभ्यासक्रम – syllabus

सेमिस्टर १ : पायाभूत गणित, हार्डवेअर लॅब, सर्जनशील इंग्रजी, डिजिटल संगणक मुल्बूत तत्वे, सी ( c ) प्रोग्रामिंगचा परिचय, सी प्रोग्रामिंग लॅब आणि पीसी सॉफ्टवेअर लॅब.

सेमिस्टर २ : कास्ट टूल्स लॅब, ऑपरेटिंग सिस्टम, संप्रेषनात्मक इंग्रजी, मुलभूत गणित, डेटा स्ट्रक्चर, डेटा स्ट्रक्चर लॅब आणि व्हिज्युअल प्रोग्रामिंग.

सेमिस्टर ३ : प्रास्ताविक बीजगणित, परस्पर संवाद, आर्थिक लेखा, डेटाबेस व्यवस्थापन सॉफ्टवेअर अभियांत्रिकी, प्रणाली, सी++ ( C++) वापरून ऑबजेक्ट ओरीएंटेड प्रोग्राम, सी++ ( C++) लॅब, ओरॅकल लॅब, डोमेन लॅब.

सेमिस्टर ४ : आर्थिक व्यवस्थापन, व्यावसायिक इंग्रजी, संगणक नेटवर्क, जावा मध्ये प्रोग्रामिंग, डीबीएमएस प्रकल्प, वेब तंत्रज्ञान प्रयोगशाळा, भाषा प्रयोगशाळा.  

सेमिस्टर ५ : युनिक्स प्प्रोग्रामिंग, ग्राफिक्स आणि अॅनिमेशन, वापरकर्ता इंटरफेस डिझाईन, पायथन प्रोग्रामिंग, व्यवसाय बुद्धिमत्ता, युनिक्स लॅब, वेब डिझायनिंग प्रकल्प, पायथन प्रोग्रामिंग लॅब, ग्राफिक्स आणि अॅनिमेशन लॅब, बिझिनेस इंटेलिजन्स लॅब.

सेमिस्टर ६ : क्लाउड कॉम्प्यूटिंग, मल्टिमिडिया अनुप्रयोग, सॉफ्ट कॉम्प्यूटिंगचा परिचय, अल्गोरिदम डिझाईन, क्लायंट सर्व्हर संगणक, संगणक आर्किटेक्चर, प्रगत डेटाबेस व्यवस्थापन प्रणाली.

आम्ही दिलेल्या bca course information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर बीसीए म्हणजे काय माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या bca full form in marathi या bca meaning in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि bca full form marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये bca information in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!