बेसन लाडू करण्याची रेसिपी Besan Ladoo Recipe in Marathi

Rava Besan Ladoo Recipe in Marathi – Besan Ladoo Marathi बेसन लाडू रेसिपी बेसन लाडू हा एक भारतीय लोकप्रिय गोड पदार्थ आहे जो बेसन पीठ, तूप, वेलदोडे पावडर आणि पिठी साखर या पासून बनलेला आहे. हे गोलाकार असून बेसन पीठ (बेसन चे पीठ हे वाळलेल्या हरभरा डाळीपासून बनवलेले असते) आणि तूप एकत्र बाजून त्यामध्ये नंतर वाटलेली साखर घालून ती पिठामध्ये चांगली मिक्स करून त्याचे लाडू वळले जातात. या लाडवाची खासियत म्हणजे ते खूप मधुर लागतात आणि हे लाडू खाता क्षणी तोंडामध्ये विरघळतात. बेसन लाडू हा पदार्थ करणे खूप सोपे आहे.

कारण हे बनवण्यासाठी खूप मोठी प्रक्रिया करावी लागत नाही आणि हा पदार्थ कमी वेळामध्ये होऊ शकतो आणि हा पदार्थ बनवण्यासाठी साहित्यही खूप जास्त लागत नाही.

बेसन लाडू आपण सोप्या पद्धतीने बनवू शकतो आणि हे बनवताना लाडू स्वादिष्ट बनण्यासाठी बेसन पीठ भाजण्याची जी पध्दत असते ती खूप महत्वाची असते. कारण आपण जर पीठ चांगले भाजले तरच लाडू चांगले मऊ बनतात आणि तोंडामध्ये टाकता क्षणी विरघळतात तसेच पीठ चांगले भाजल्यामुळे लाडूला चांगली चव, खमंग वास आणि लाडू चांगल्या प्रकारे वळता येतात.

आपण वेगवेगळ्या प्रकारचे लाडू बनवतो पण बेसनचे लाडू हे सर्वात लोकप्रिय आणि त्याला वेगळीच चव असते. सणांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गोड पदार्थ बनवले जातात त्यातील सर्वात आवर्जून बनवला जाणारा पदार्थ म्हणजे बेसनाचे लाडू. बेसनचे लाडू काही कार्यक्रमांना, नातेवाईकांना देण्यासाठी आणि खास करून दिवाळी सणामध्ये बनवले जातात.

besan ladoo recipe in marathi
besan ladoo recipe in marathi

बेसन लाडू करण्याची रेसिपी – Besan Ladoo Recipe in Marathi

तयारीसाठी लागणारा वेळ६ ते ७ मिनिटे
भाजण्यासाठी लागणारा वेळ३० ते ३५ मिनिटे
एकूण लागणारा वेळ४२ मिनिटे
पाककलाभारतीय
वाढणी१२ ते १५ लाडू
कॅलरी२२०

बेसन लाडू बनवण्यासाठी लागणारे मुख्य साहित्य – key ingredients 

बेसनाचे लाडू बनवयासाठी काही मुख्य साहित्य लागते ज्या शिवाय बेसन लाडू बनत नाहीत ते साहित्य खाली दिले आहेत.

  • बेसन पीठ : बेसन पीठ हा बेसनाचे लाडू बनवण्यासाठी लागणारा एक महत्वाचा घटक आहे कारण हे लादून बेसनच्या पिठापासून बनवले जातात. बेसनचे पीठ हे वाळलेल्या हरभरा डाळीपासून बनवलेले असते आणि हे तुपासोबत भाजून घेतले जाते.
  • तूप : तूप हा देखील या पदार्थातील महत्वाचे साहित्य आहे कारण बेसनचे पीठ हे तुपामध्ये भाजले जाते आणि तुपामुळेच बेसनाच्या लाडूला मऊपणा येतो.
  • साखर : साखरेमुळे बेसनच्या लाडूला गोड चवा येते त्यामुळे हे लाडू बनवण्यासाठी साखर आवश्यक असते. या लाडूमध्ये वाटलेली साखर (पिठ्ठी साखर) वापरली जाते.

बेसन लाडू कसे बनवायचे – how to make besan ladoo in marathi 

बेसन लाडू बनवणे खूप सोपे आहेत आणि ते चवीला देखील खूप सुंदर आणि स्वादिष्ट लागतात. आपण सणाचा आनंद द्वीगुणीत करण्यासाठी आपण गोड पदार्थ बनवतो त्यामधील एक महत्वाचा पदार्थ म्हणजे बेसनचे लाडू. आता आपण बेसनाचे लाडू बनवण्यासाठी काय साहित्य लागते आणि ते कसे बनवले जातात या बद्दल माहिती घेवूयात.

तयारीसाठी लागणारा वेळ६ ते ७ मिनिटे
भाजण्यासाठी लागणारा वेळ३० ते ३५ मिनिटे
एकूण लागणारा वेळ४२ मिनिटे
पाककलाभारतीय
वाढणी१२ ते १५ लाडू
कॅलरी२२०

बेसन लाडू बनवण्यासाठी लागणारे साहित्य – ingredients needed to make besan ladoo 

बेसनचे लाडू बनवण्यासाठी खूप कमी साहित्य लागते आणि ते आपल्या घरामध्ये अगदी सहजपणे उपलब्ध असते. बेसनचे लाडू बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी आपण खाली पाहूयात.

  • २ वाटी बेसन पीठ.
  • दीड वाटी तूप ( बाजारातील किंवा घरगुती ).
  • १ वाटी पिठी साखर किंवा दळलेली साखर.
  • २ चमचे वेलची पावडर.
  • १ चमचा काजू.
  • १ चमचा बेदाणे.

बेसन लाडू बनवण्याची कृती 

  • मऊ आणि तोंडामध्ये टाकताच विरघळतील असे लाडू कसे बनवायचे याची कृती खाली दिलेली आहे.
  • सर्वप्रथम लाडू बनवण्यासाठी जे साहित्य लागणार आहे ते साहित्य एकत्र करून घ्या.
  • त्यानंतर एक कढई घ्या आणि ती कढई मंद आचेवर गरम करण्यास ठेवा. एकदा कढई गरम झाली कि त्यामध्ये २ वाटी बेसनचे पीठ घाला आणि ते मंद आचेवर भाजण्यासाठी सुरुवात करा.
  • प्रथम बेसनचे पीठ कोरडेच भाजा.
  • बेसनाचे पीठ सारखे चमच्याने वरती खाली करा त्यामुळे सर्व पीठ चांगले भाजले जाईल आणि पीठ खाली लागणार नाही.
  • आपण ज्यावेळी कोरडे पीठ भाजत असतो त्यावेळी आपल्याला पिठामध्ये गुठळ्या झाल्यासारख्या दिसतात पण आपण जस जसे पीठ भाजत जाईन तस तश्या त्या गुठळ्या फुटतात.
  • हे कोरडे पीठ मंद आचेवर ८ ते १० मिनिटे भाजून घ्या आणि मग त्यामध्ये दीड वाटी तूप घाला आणि ते पिठामध्ये चांगले एकत्र करा आणि ते सतत हलवत रहा आणि तुपाचे आणि पीठाचे मिश्रण चांगले शिजवून घ्या.
  • हे मिश्रण १० ते १५ मिनिटे सतत हलवत हलवत भाजून घ्या.
  • आपल्या हे पीठ भाजताना त्याचा रंग बदलेला पाहायला मिळेल तसेच पीठ घट्ट बनेल आणि पिठाचा खमंग वास देखील येईल.
  • पीठ कढईमध्ये पीठ असे एका ठिकाणी गोळा झाल्यासारखे दिसेल म्हणजेच ते कढईच्या कडा सोडतील आणि मध्यभागी गोळा होईल.
  • तसे झाले कि गॅस बंद कारण आणि कढई गॅसवरून खाली उतरून ठेवा आणि ते गार होईपर्यंत वाट पहा.
  • भाजलेले पीठ गरम झाले कि ते दोन्ही हाताने घासून चांगले फोडून घ्या आणि मग त्यामध्ये १ वाटी साखर आणि वेलची पावडर घालून ती साखर चांगली मिक्स करा आणि ते मिश्रण दोन्ही हाताने घासून चांगले एकत्र करून घ्या आणि त्यामधील सगळ्या गुठळ्या फोडून घ्या आणि त्या पीठाचे छोटे छोटे लाडू वळा.
  • लाडू वळते वेळी त्या लाडूंना वरती एक बेदाना किंवा काजू लावा त्यामुळे लाडू छान दिसतील.
  • बेसनचे लाडू खाण्यासाठी तयार झाले.

बेसनचा लाडू कश्या सोबत खाल्ला जातो – serving idea 

बेसनाचे लाडू हे तसेच एक गोड पदार्थ म्हणून खाल्ला जातो तसेच हा लाडू इतर फराळ जसे किं चिवडा, पापडी, शंकरपाळी सोबत खाल्ला जातो.

टीप 

  • बेसन लाडू बनवताना बेसनचे पीठ चांगले खमंग वास येऊपर्यंत भाजून घ्या त्यामुळे पीठ कच्चे राहणार नाही आणि लाडू देखील चांगले वळता येतील.
  • बेसनचे पीठ मंद ते मध्यम आचेवर भाजा त्यामुळे पीठ करपणार नाही किंवा पिठाचा रंग काळपट होणार नाही.
  • लाडू वळते वेळी पिथामधील सर्व गाठी फोडून मग लाडू वळा.
  • बेसनचे लाडू ३ ते ४ आठवडे चांगले ताजे राहतात आणि ते टिकू शकतात पण ते हवा बंद डब्यामध्ये घालून ठेवा.

आम्ही दिलेल्या rava besan ladoo recipe in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर बेसन लाडू रेसिपी मराठी besan ladoo marathi बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या besan laddu recipe in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि besan churma ladoo recipe in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये besan ke ladoo recipe in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!