भोपळ्याचे घारगे रेसिपी Bhoplyache Gharge Recipe in Marathi

Bhoplyache Gharge Recipe in Marathi भोपळ्याचे घारगे रेसिपी भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पध्दतीचे पारंपारिक पदार्थ बनवले जातात आणि भोपळ्याचे घारगे देखील असा पदार्थ आहे. जो खूप पूर्वीच्या काळापासून बनवला जातो म्हणजेच हा देखील एक पारंपारिक पदार्थ आहे. भोपळ्याचे घारगे बनवण्यासाठी पिकलेला भोपळा लागतो जो कट करून त्यामधील बिया काढल्या जातात आणि मागत त्यातील गाभा खिसून काढला जातो आणि मग तो खीस गुळ घालून शिजवला जातो आणि हे मिश्रण गार झाल्यानंतर त्यामध्ये मावेल तेवढे गव्हाचे पीठ घातले जाते.

आणि त्याचे छोटे छोटे गोळे बनवून ते प्लास्टिक पेपरवर थापले जाते किंवा पापड मशीन वर बनवून घेवून तेलामध्ये लालसर रंग येईपर्यंत तळले जाते. घारगे रेसिपी हि महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात करतात तसेच हि रेसिपी भारताच्या इतर भागामध्ये देखील बनवतात आणि हि रेसिपी लहानांच्या पासून मोठ्यांच्या पर्यंत सर्वांच्यासाठी उत्तम आहे.

भोपळ्याचे घारगे घरी बनवणे खूप सोपे आहे आणि आणि खूप कमी साहित्यामध्ये बनतात परंतु बनवण्यासाठी थोडा वेळ लागतो. चला तर आज आपण या लेखामध्ये भोपळ्याचे घारगे कसे बनवायचे ते पाहूयात.

bhoplyache gharge recipe in marathi
bhoplyache gharge recipe in marathi

भोपळ्याचे घारगे रेसिपी – Bhoplyache Gharge Recipe in Marathi

तयारीसाठी लागणारा वेळ१ तास
बनण्यासाठी लागणारा वेळ२० ते २५ मिनिटे
एकूण लागणारा वेळ१ तास २५ मिनिटे
पाककलाभारतीय
बनवण्याची पध्दतखूप सोपी

भोपळ्याचे घारगे कसे बनवतात ?

भोपळा कट करून त्यामधील बिया काढल्या जातात आणि मागत त्यातील गाभा खिसून काढला जातो आणि मग तो खीस गुळ घालून शिजवला जातो आणि हे मिश्रण गार झाल्यानंतर त्यामध्ये मावेल तेवढे गव्हाचे पीठ घातले जाते आणि त्याचे छोटे छोटे गोळे बनवून ते प्लास्टिक पेपरवर थापले जाते किंवा पापड मशीन वर बनवून घेवून तेलामध्ये लालसर रंग येईपर्यंत तळले जाते.

भोपळ्याचे घारगे बनवण्यासाठी लागणारे मुख्य साहित्य – key ingredients 

  • भोपळ्याचा खीस : भोपळ्याचा खीस हा घटक घारगे बनवण्यासाठी लागणारा महत्वाचा घटक आहे. भोपळ्याच्या खीस मध्ये इतर साहित्य घालून त्याचे पीठ बनवले जाते आणि मग त्याचे गोळ बनवून त्याचे घारगे बनवले जातात.
  • गुळ : भोपळ्याच्या खीस मध्ये गुळ घातला जातो आणि मग हे मिश्रण चांगले एकत्र करून शिजवले जाते. गुळ घातल्यामुळे घारगे गोड होतात. यामध्ये गुळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता.
  • गव्हाचे पीठ : भोपळ्याचा खीस आणि गुळ घालून शिजवलेल्या मिश्रणामध्ये जितके मावेल तेवढे पीठ घालून त्याची मऊसर कणिक मळून घेतली जाते.

भोपळ्याचे घारगे रेसिपी – bhopalyache gharge recipe 

भोपळ्याचे घारगे हि रेसिपी एक पारंपारिक रेसिपी आहे जी खूप पूर्वीपासून बनवली जाते आणि रेसिपी आता आपल्याला खेडे गावामध्ये जास्त प्रमाणात बनवली रेसिपी आहे कारण त्या ठिकाणी भोपळ्याची उपलब्धता अगदी सहजपणे होते. भोपळ्याचे घारगे घरी बनवणे खूप सोपे आहे आणि आणि खूप कमी साहित्यामध्ये बनतात. चला तर मग भोपळ्याचे घारगे कसे बनवायचे आणि त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूयात.

तयारीसाठी लागणारा वेळ१ तास
बनण्यासाठी लागणारा वेळ२० ते २५ मिनिटे
एकूण लागणारा वेळ१ तास २५ मिनिटे
पाककलाभारतीय
बनवण्याची पध्दतखूप सोपी

भोपळ्याचे घारगे रेसिपी बनवण्यासाठी लागणारे साहित्य – ingredients needed to make gharge recipe 

भोपळ्याचे घारगे बनवण्यासाठी भोपळा, गुळ आणि गव्हाचे पीठ हे मुख्य साहित्य लागते आणि काही इतर साहित्य देखील लागते. घारगे बनवण्यासाठी जे साहित्य लागते त्यामधील काही साहित्य आपल्या घरामध्ये उपलब्ध असते तर काही साहित्य घरामध्ये उपलब्ध नसते. चला तर मग आता आपण घारगे बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी पाहूयात.

  • २ ते ३ वाटी भोपळ्याचा खीस.
  • गव्हाचे पीठ ( आवश्यकतेनुसार ).
  • १ वाटी गुळ किंवा थोडे त्यापेक्षा जास्त ( खिसलेला ).
  • १ चमचा वेलची पावडर.
  • खसखस ( घाऱ्यांना लावण्यासाठी ).
  • तेल ( तळण्यासाठी ).
  • पाणी ( आवश्यकतेनुसार ).

भोपळ्याचे घारगे बनवण्यासाठी केली जाणारी कृती – process to make bhopalyache gharge 

भोपळ्याचे घारगे घरी बनवणे खूप सोपे आहे आणि आणि खूप कमी साहित्यामध्ये बनतात. चला तर मग आता आपण वर दिलेले साहित्य वापरून घारगे कसे बनवायचे ते पाहूयात.

  • घारगे बनवताना सर्वप्रथम भोपळा कट करून त्याच्या छोट्या छोट्या फोडी कट करा तसेच त्यामधील बिया काढून घ्या आणि मग त्या फोडी खिसणीवर खिसून घ्या ( फोडी खिसताना फक्त गाभा खिसायाचा साली तश्याच टाकायच्या )
  • मग आता हा ३ वाटी कीस एका भांड्यामध्ये काढा आणि त्यामध्ये एक वाटी किंवा त्यापेक्षा थोडा जास्त खिसलेला गुळ घाला ( तुमच्या आवडीनुसार घाला ) आणि ते मिश्रण एकत्र करून गॅसवर मध्यम आचेवर ठेवा आणि आणि ते सतत हलवत राहून ते चांगले शिजवून घ्या.
  • हे मिश्रण शिजवत असताना त्यामध्ये वेलची पावडर मिक्स करा आणि ते सर्व मिश्रण चांगले शिजवा. आणि ते शिजले कि गॅस बंद करा आणि हे मिश्रण गार होऊ द्या.
  • मग हे मिश्रण गार झाले कि त्यामध्ये जितके मावेल तेवढे गव्हाचे पीठ घाला आणि ते चांगले मळून घ्या ( यामध्ये जितके मावेल तेवढेच पीठ घाला जास्त घातले तर घारगे चांगले लागत नाहीत ).
  • आणि हे मळलेले पीठ कमी कमी अर्धा तास भिजू द्या किंवा जास्तीत जास्त १ तास भिजवा.
  • मग हे पीठ चांगले भिजले कि त्याचे छोटे छोटे गोळे बनवा.
  • आता गॅस मध्यम आचेवर एक कढई ठेवा आणि त्यामध्ये घारगे तळण्यासाठी तेल घाला आणि ते गरम होऊ द्या.
  • आता आपण बनवलेले गोळ्यामधील एक गोळा घ्या आणि पोळपाटावर एक प्लास्टिक पेपर ठेवा आणि हाताला अगदी थोडेसे पाणी लावून तो थोडा जाडसर थापून घ्यावा ( आपण पुऱ्या जितक्या आकाराच्या बनवतो तितक्या आकाराचे घारगे बनवून घ्यावे ).
  • आणि त्या घराग्याच्या वरील भागावर थोडीसी खसखस घालावी आणि मग ते हळुवार पणे गरम तेलामध्ये सोडावे आणि लालसर रंग येईपर्यंत तळून घ्यावे.
  • अश्या प्रकारे सर्व घारगे बनवून घ्यावे.

घारगे कश्या सोबत खातात – serving suggestions

  • घारगे आपण कोणत्याही वेळेला तसेच खावू शकतो किंवा मग चहा सोबत देखील घारगे खूप छान लागतात.

आम्ही दिलेल्या bhoplyache gharge recipe in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर भोपळ्याचे घारगे रेसिपी माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या lal bhoplyache gharge recipe in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि pumpkin puri recipe in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये gharge recipe in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!